Tuesday 22 April 2014

Politics : काँग्रेस जातीयवादी नाही काय ?


congress

भाजपा आणि शिवसेना या पक्षांना जातीयवादी ठरवण्यात आणि मतदारांसमोर तसा चित्रं उभं करण्यातच कॉंग्रेसच्या तमाम नेत्यांनी नेहमीच धन्यता मानली आहे. पण भाजपा आणि शिवसेना या पक्षांना जातीयवादी ठरवणारी काँग्रेस स्वतः खरंच निधर्मी आहे का ?



वर्षानुवर्ष या देशावर राज्य करण्याची संधी कॉंग्रेसला मिळाली ती या देशातल्या विषमतेमुळे. कधी ती विषमता गरिबीच्या स्वरूपातली असते तर कधी धार्मिक स्वरुपाची असते. आणि अशी विषमता कॉंग्रेसला हवीच आहे. सत्ता काबीज करण्याचं ते मूलतंत्र आहे याची कॉंग्रेसला पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळेच अशी विषमता मोडीत काढण्यापेक्षा ती वाढीस कशी लागेल याचीच दक्षता कॉंग्रेसने नेहमी घेतली आहे. म्हणूनच ‘ गरिबी हटाव ‘ अशी घोषणा देत स्वर्गीय इंदिरा गांधींनी सत्ता मिळवली पण ह्टलीय का या देशातली गरिबी ?

त्यामुळेच आम्ही निधर्मी आहोत असं म्हणतानाच भाजपा आणि शिवसेना जेव्हा हिंदुत्ववादाला कुरवाळतात तेव्हा काँग्रेस मुस्लिमांच लांगुलचालन करते…मुलायम मुस्लिम समाजाला आपली व्होट ब्यांक मानतात…….मायावती मागासवर्गीयांच्या पदराला धरतात. अशा रीतीने स्वतःला निधर्मी म्हणवणाऱ्या कॉंग्रेससह सारेच धर्मावर आणि जातीवर आधारित राजकारण करतात. मग भाजपा आणि शिवसेना या पक्षांवर एवढे शिंतोडे या इतर पक्षांनी का उडवावेत ? कारण भाजपा आणि शिवसेना या पक्षांना हिदुत्ववादी ठरवणं ही या इतर सर्वच पक्षांची गरज आहे.  निवडणुका तोंडावर आल्या कि मतदारांच्या डोळ्यात हि जातीयवादाची धूळ फेकायची …….  मतदारांची दिशाभूल करायची आणि सत्ता मिळवायची.  हेच कॉंग्रेससह सगळ्या पक्षांचं राजकारण आणि केवळ भाजपा आणि शिवसेना आणि मित्र पक्षांना सत्तेपासून दूर ठेवायचं म्हणून सारे पक्ष कुठल्याही थराची युती करायला मोकळे.

काँग्रेस निधर्मी असती तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मुस्लिमांची खुशामत करणारी विधेयकं का पास करावीत ? ऐन निवडणुकीच्या तोंडावर अन्न विधेयक पास करणाऱ्या कॉंग्रेसला इतकी वर्ष हे का सुचला नाही ? गरिबांना धान्य कुठल्या दरानं पुरवाव हे कळणाऱ्या कॉंग्रेसला शेतकऱ्याच्या शेतमालाला स्थिर भाव कसा द्यावा हे कसं कळत नाही ?


साठ वर्षाहून अधिक काळ या देशावर राज्य करणाऱ्या कॉंग्रेसन आम्हाला भ्रष्टाचार, महागाई , गरिबी , विषमता , शिक्षणाचं  बाजारीकरण आणि त्यातून आलेली बेकारी याशिवाय काय दिलं याचा विचार करावा आणि स्वतःची पोळी भाजताना देशाला मोडीत काढू पहाणाऱ्या कॉंग्रेसला या देशाच्या राजकारणातून कायमचं हद्दपार करावं. ती काळाची ……या देशाच्या उन्नतीची……… आपल्या प्रगतीची गरज आहे.

No comments:

Post a Comment