Thursday 25 September 2014

BJP, NCP, Ajit Pawar : आघाडीचं घोडं अजित पवारांचा तट्टू


शिवसेना आणि भाजपा हि वेगळ्या आईची लेकरं पण नतुटता तुटता त्यांची युती टिकू लागली. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी  काँग्रेस मात्र एकाच आईची लेकरं असताना त्यांचं पटेल असा दिसत नाही. काय होईल आघाडीचं ? काय आहे राष्ट्रवादीच्या मनात ? 




खरंतर सुरवातीच्या काळात राष्ट्रवादीची भूमिका काहीशी योग्य आहे अशी माझी भावना होती. पण शिवसेना मात्रं फारच हेकेखोरपणे वागते असं मला वाटत होतं. त्यामुळे गेल्या दहा - बारा दिवसात मी केवळ युतीमधल्या घडामोडींविषयी लिहित आलो. पण लक्षात येतंय कि शिवसेनेची भूमिका जेवढी आडमुठी  तेवढीच राष्ट्रवादीची. पण युतीत शिवसेनेची राष्ट्रवादी एवढीच आडमुठी भूमिका घेत असताना घटक पक्षांनी सावरलं आणि भाजपानंही आवरलं म्हणून युतीचा कडेलोट होता होता राहिला. 

युती झाली तर आघाडी होईलच असं सगळ्यांना वाटत असताना. युती होत आली तरी आघाडी होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. कुणाचं चुकतंय ? कोण ताणून धरतंय ? आघाडी व्हावी अशी दोन्ही पक्षांची खरंच इच्छा  आहे का ? दोघांपैकी कोण आडमुठेपणाची भूमिका घेतंय ? का घेतंय ? त्याचा हा शेवटच्या क्षणी घेतलेला आढावा. 

१४४ जागांची मागणी पुर्ण व्हायच्या आधीच राष्ट्रवादीनं अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटुन घेण्याची मागणी केली. आणि आघाडीतला पेच वाढला. काँग्रेस १४४ जगच द्यायला तयार होत नव्हती तिथं मुख्यमंत्रीपद वाटून देणं शक्य तरी आहे का ? राष्ट्रवादीला याची जाणीव नसावी का ? नक्कीच असेल. तरीही राष्ट्रवादीनं अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटुन घेण्याचा फासा का टाकला ? यावर विचार करता करता असं लक्षात आलं कि आघाडी झाली तरी आणि नाही झाली तरी सरशी राष्ट्रवादीचीच होणार होती आणि म्हणूनच राष्ट्रवादीनं नको तितक्या जाचक अटी टाकल्या. 

दोन्ही बाजूने सरशी राष्ट्रवादीचीच कशी होणार होतीते पाहू. 

आघाडी केली काय आही केली काय आणि नाही केली काय या निवडणुकीत आपण सत्तेवर येऊ शकणार नाही याची दोन्ही पक्षांना पुर्ण जाणीव आहे. या परिस्थितीचा फायदा घ्यायचा राष्ट्रवादीनं ठरवलं. आणि म्हणुनच राष्ट्रवादीनं अधिकाधिक जाचक अटी घातल्या. अटी मान्य झाल्या तर आनंदच आहे. आणि नाही झाल्या तरी काहीच हरकत नाही. आपण स्वतंत्रपणे लढणारच आहोत. आपण स्वतंत्रपणे लढून काँग्रेसपेक्षा घवघवीत यशही मिळवणार आहोत. स्वतंत्रपणे लढून एकदा का आपल्याला काँग्रेसपेक्षा अधिक यश मिळाले कि काँग्रेसला कायमच आपल्या धाकात रहावे लागेल आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात आपला कायमचा वरचष्मा राहील.

पण हे सारं होत असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी जनतेच्या मनातून उतरत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळेच परस्परातले युती आणि आघाडी ताणताना आपली जनतेशी असलेली नल तुटेल याची जाणीवही शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला नाही. त्यामुळेच युती आणि आघाडीतल्या या दादागिरी करणाऱ्या पक्षांचं भरून न निघण्यासारखं नुकसान होणार आहे हे निश्चितच. 

पण राष्ट्रवादीच्या एकूण वागणुकीवरून आघाडी टिकूच नये अशीच राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे दिसते. बघू या काय होते ते ! 

 





2 comments:

  1. nsawishyti khup kahi lihinyat wel ka ghalwtay. yacha rajkaran smpalay.

    ReplyDelete
  2. मी कुणाविषयी विष पेरावं या हेतूनं हे सारं लिहित नाही. वाचकांसमोर वस्तुस्थिती मांडावी म्हणुन हा सर खटाटोप. शेवटी निर्णय मतदारांनीच घ्यायचा आहे.

    ReplyDelete