Friday 16 January 2015

AAP, BJP, Indian Politics : केजरीवालांची अब्रू का गेली ?


अरविंद केजरीवाल. पाच एक वर्षापुर्वी कुणाच्याही परिचयाच नसलेलं नाव. पण तीन एक वर्षापूर्वी त्यांनी आण्णांच्या आंदोलनात उडी घेतली. आणि आण्णांच्यापेक्षा केजरीवाल मोठे झाले. अरविंद केजरीवाल प्रत्येकाला आपले वाटू लागले. एसएमएस करून त्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणाऱ्यात
मीही एक होतो. स्वातंत्रोत्तर काळात एवढी प्रसिद्धी त्यांच्या आधी कुणाच्या वाटयाला आल्याचे माझ्या पहाण्यात नाही. नरेंद्र मोदींनी त्या सीमा ओलांडल्या. पण पहिलं नाव केजरीवालांचंच.


पुढे त्यांनी आम आदमी पार्टी नावाचा राजकीय पक्ष स्थापन करून राजकारणात उडी घेतली. अत्यंत समर्पक नाव धारण केलेला हा पक्ष. सर्वसामान्यांना आपला वाटावा असा. आप त्याचं छोटं रूपही असाच सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करेल असं. इतरांसाठी आदरार्थी असणारं संबोधन. सगळंच उत्तम जमलं होतं. केवळ वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या कोणत्याही पक्षाला मिळालं नसेल एवढ अदभूतपुर्व त्यांनी मिळवलं. दिल्ली विधानसभेत सव्वाशे वर्षाची परंपरा असलेल्या काँग्रेसला मातीत लोळवून २८ जागांसह सर्वात मोठा दुसरा पक्ष होण्याचा मान मिळवला.

इथंच माशी शिंकली. आपल्या कर्तृत्वाविषयी त्यांना अनाठायी विश्वास निर्माण झाला. दिल्लीत त्रिशंकू अवस्था. सत्ता कोण स्थापन करणार ? भाजपा कि आप ? भाजपानं सुरवातीपासूनच आपल्याला बहुमत नसल्यामुळे आपण सत्ता स्थापन करणार नाही अशी भुमिका घेतली ? पण केजरीवाल मात्र ' आगे क्या क्या होता है देखो ? बीजेपी घोडेबाजार करेगी. विधायको को खरेदी करेगी लेकिन सत्ता मे आयेगी. ' असं म्हणत राहिले. काँग्रेस आणि भाजपावर टिका करत राहिले. आणि शेवटी स्वतः काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली. तिथंच केजरीवाल मागे फेकले गेले. 

सत्ता मिळवली. मुख्यमंत्री झाले. पण राज्य चालवणे बाजूला ठेऊन नको ते स्टंट करत राहिले. सत्तेत असुन उपोषणाला बसले. सत्तेत आपल्यानंतर त्यांच्यातला प्रशासकीय अधिकारी कधीच दिसला नाही. दिसला तो केवळ एक आंदोलक. गरज नसताना राजीनामा दिला. खरं तर काँग्रेसनं पाठींबा काढून घेईपर्यंत केजरीवालांनी वाट पहायला हवी होती. काँग्रेसनं पाठींबा काढून घेतला असता तर सहानुभुती केजरीवालांना मिळाली असती. 

पण येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका त्यांना खुणावत होत्या. त्यांच्याविषयी जनतेत असलेल्या लाटेचा त्यांना फायदा उठवायचा होता. दिल्लीच्या सत्तेत राहुन त्यांना लोकसभेला सामोरं जाणं त्यांना शोभलं नसतं. आपण कांगावा करून दिल्लीची सत्ता सोडली तर आपल्याला जनतेचा वाढता पाठींबा मिळेल आणि आपण लोकसभेला अद्भुतपूर्व यश मिळवु असं त्यांचं गणित होतं. 

पण अल्पावधीत मिळालेल्या प्रसिद्धीच्या जोरावर लगेच राजकारणात उतरलेल्या केजरीवालांची राजकीय कुवत जनतेला कळाली होती. सहाजिकच लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला. 

कुमार विश्वसांना राहुल गांधींच्या विरोधात उभं करणं. स्वतः मोदींच्या विरोधात उभं रहाणं हे सगळे स्टंट होते. त्याची फळं त्यांना मिळाली. प्रचार दरम्यान तर केजरीवालांनी कहर केला. इतर टुकार राजकीय नेते करतात तसे अत्यंत सुमार राजकीय वक्तव्य ते करत राहिले. भाजपा हाच आपला प्रमुख विरीधक असल्याच्या जाणिवेतंन त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. पण जनता फसली नाही. 

आता दिल्लीच्या नव्यानं येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत 'आप ' ला सत्ता मिळण्याची सुतराम शक्यता नाही. पण त्यांच्या पक्षाला वीस जागांपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता कमीच दिसते. आणि त्यांना वीस पेक्षा कमी जागा मिळाल्या तर ती त्यांची मोठी पिछेहाट असेल.                     

4 comments:

  1. Replies
    1. पंकजजी, प्रतिक्रियेबद्दल आभार. गावी गेलो होतो. उसाला तोड आली होती. त्यामुळे उत्तर दयायला उशीर झाला. क्षमा असावी. असेच भेटत रहा.

      Delete
  2. भ्रष्टाचाराविरुद्ध ओरडणारे लोक आयुष्यात इतर काहीच करू इच्छित नाहीत. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाटी त्याना ही ओरड करावीच लागते.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार म्याडम, अभिप्रायाबद्दल आभार. आपण जेष्ठ आहात आपला अनुभव दिर्घ आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध ओरडणारे लोक आयुष्यात इतर काहीच करू इच्छित नाहीत. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाटी त्याना ही ओरड करावीच लागते. हे आपले विधान. पण आपले विधान कोणाला उद्देशून आहे हे स्पष्ट होत नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या आण्णांना आपण नाकर्ते म्हणणार काय ?

      Delete