Sunday 22 March 2015

असंही सेलिब्रेशन !!!!

 आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण भावना व्यक्त करण्याची कृती अमानवी असू नये हे नक्कीच. एखाद्या मुलीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी कुणी शिटी मारतं , कुणी शुक शुक करतं, कुणी
उगाचंच आपल्या केसावरून हात फिरवतं तर कुणी चेहऱ्यावर दवबिंदू इतकं निर्मळ हसु आणतं. यातली शेवटची कृती वगळता इतर कृती असभ्यपणाच्या अथवा टपोरी या सदरात मोडणाऱ्या आहेत.

हे सारं लिहिण्याचं कारण परवा भारत - बांगलादेश या सामन्यात विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना बाद केल्यानंतर बांगलादेशी खेळाडुंनी तो क्षण ज्या रितीने सेलिब्रेट केला तो प्रकार नक्कीच अशोभनीय आहे. 


विराट कोहलीनं शतक केल्यानंतर प्रेक्षकात बसलेल्या अनुष्काच्या दिशेने फ्लाईंग किस भिरकावला होता. त्याची ती कृती निश्चितच समर्थनीय नव्हती. त्याविषयी मी ' विराटचा फ्लाईंग किस ' हा लेख लिहिला होता. 


सुरवातीच्या काळात अत्यंत फॉर्ममध्ये असलेल्या शिखर धवनन शतकामागून शतके केली. तेव्हा शतक केल्यानंतर अथवा एखादा प्रेक्षणीय फटका मारल्यानंतर तो ओठावरच्या मिशांवर ताव मारायचा. मस्त वाटायचं. पण अलिकडे आपल्या ओठावर मिशा आहेत याचा त्याला विसर पडल्यासारखा दिसतंय. 

असो. खरंतर मला लिहायचंय बांगलादेशी खेळाडूंच्या सेलिब्रेशन विषयी. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना बाद केल्यानंतर बांगलादेशी खेळाडुंनी हवेत उड्या घेऊन परस्परांच्या छातीला छाती भिडवली. या कृतीविषयी कुणीही निषेध नोंदवला नाही. पण त्यांची हि कृती अमानवीच होती. बांगलादेशात कोंबड्यांची झुंज अतिशय लोकप्रिय आहे. झुंज घेणारे कोंबडे अशाच रितीने हवेत झेपावत परस्परांना धडक देतात. 

कधी नव्हे ते पहिल्यांदा उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धाव घेतली असल्यामुळे त्यांचा उस्ताह दांडगा होता हे मान्य. पण त्यांच्या सेलिब्रेशन मध्ये खुनशीपणा होता. भारत वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला वर्षानुवर्ष पराभूत करत आला आहे. पण म्हणून भारतीयांनी असा माज कधी केला नाही.

त्यावर कडी म्हणजे बांगलादेशी असलेले आयसीसी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी ' पंचांचे निर्णय हे भारताच्या विजयासाठी रचण्यात आलेलं कटकारस्थान होतं. ' असा आरोप केला. यालाच आपण ' खाण तशी माती ' असं म्हणतो. असा आरोप करताना मुस्तफा यांना आपण एका देशाचे प्रतिनिधी  नसुन एका आंतर राष्ट्रीय संघटनेचे प्रमुख आहोत याचंही भान उरलं नाही. कारण एकच कट्टरतावाद.

मैदानात खेळाडू परस्परांवर चिडतात, एकमेकांवर धावुन जातात हे सारं स्वाभाविक आहे. पण असलं सेलिब्रेशन ?  
    

याविषयी मी लिहितो आहे कारण त्यांच्या या कृतीत मला मुस्लिम समाजात असलेला कट्टरतावाद दिसला. पाकिस्तानी खेळाडूही असेच. जावेद मियादादची माकडउडी तर जगप्रसिद्ध आहेच. पण पाकिस्तानी खेळाडू मैदानात अनेकदा नमाज पढताना दिसतात. ईश्वरावर श्रद्धा सगळ्यांचीच असते. पण तिचं प्रदर्शन कशाला ? 
                   
कोणत्याही खेळाडूंपेक्षा फुटबॉलचे खेळाडू अधिक गरम रक्ताचे असतात. त्यांच्या सेलिब्रेशनचे प्रकारही बऱ्याचदा अततायी असतात. पण तरीही त्यांचं अमानवी वाटत नाही.

असो. कुणी कसं वागावं अथवा कुणी कसं सेलिब्रेट करावं हे आपण नाही ठरवू शकत. आपण आपला मार्ग सोडू नये एवढ मात्र खरं.   


4 comments:

  1. I think you are needlessly paying too much attention to this celebration. Everybody has their own style of expressing joy. Don't waste your valuable words on this silly subject.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Friend for your valuable suggestion. But you had not left your name behind. Thanks Once again. Looking for your valuable suggestion on other articles also. Hope with your name.

      Delete
  2. India will fefinetly win worldcup.

    ReplyDelete