Monday 25 May 2015

आपण म्हणजे एक कणीस

किती दिवस झाले, काही लिहिलंच नाही. लिहिण्याचा हुरूप संपला असं नाही. पण वेळच मिळाला नाही. गावाकडचे सतत येणारे फोन......लाईट नाही ………… डीपी जळाली ………. खतं आणायची आहेत…… मग माझी धावपळ.. ..........पावसाचा लपंडाव.......सणांची लगबग.…………. लगीनसराई ……… जत्रा सत्रा………. भावकीचे साखरपुडे . कुठे कुठे आणि कसा

कसा पुरा पडणार होतो ? 
तरीही कधी कधी वाटत या जगात आपलं कोण आहे ? कुणासाठी करतो आपण हे सगळं ? कशासाठी हि धडपड ? सुखाचे सारे सोबती पण दुखात कोण ? असे कितीतरी विचार मनाला घेरतात. अगदी दुबळं करतात. पण तेव्हाच माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं माझ्या शेतातलं हसत मुखानं वाऱ्यावर हिंदोळे घेणारं ज्वारीचं कणीस. इतर दाने म्हणजे त्याचे भाऊबंद, सगेसोयरे नसतात का ? त्या कणसातल्या प्रत्येक दाण्याला आपण परस्परांपासून वेगळे होणार आहोत हे माहित असतं. पण ते कधी नकारार्थी विचार करत असतील. कधी हिरमुसून जात असतील. मला तरी नाही वाटत. पाण्यावर तरंग उमटावेत आणि विरून जावेत तसे अनेक विचार मनात उमट होते आणि विरून जात होते.

कणसाची आठवण होताच माझ्या मनात आणखी विचारांची रिमझिम सुरु झाली.………….

एका कणसात किती दाणे असतात. पण सारे होतातच ना परस्परांपासून वेगळे. गळून पडतात न मुळ आधारापासून. पण असे गळून जाताना हरतात का कधी ? उमेद संपते का कधी त्यांची ? ते कणसाचे दाने कसे कधी भुकेल्याचे घास होतात…… कधी अंकुरतान मातीतून धान्याची रास होतात……कधी चोचीमधले दाने होतात.………. उघड्या वाघड्या माळावरचे कधी हिरवे हिरवे गाणे होतात. मग आपणच आपल्याला एकटे एकटे मानतो. 
जवळ जवळ आठवड्यापेक्षाही अधिक काळ मी काही लिहिलं नाही. पण दहा बारा वाचकांना का असेना माझी आठवण झाली. बाकीचे मला विसरले असं नाही म्हणत मी. त्यांनी समजूत घातली असेल आपल्या मनाची....धावपळीत असतील.........नसेल मिळत वेळ.......वेळ मिळाला कि नक्की लिहितील. माझ्या लिखाणाची वाट पहाणाऱ्या सगळ्यांसाठी या ओळी -








No comments:

Post a Comment