Thursday 25 June 2015

लो कट to हाय हिल्स

परवा एक जाहिरात पहिली -
' Low Cut to High hill '
all fashion on your mobile.
हि जाहिरात पाहिली आणि वाटलं हे काय चाललंय आमचं ?
गरज आहे संस्कार आणि संस्कृती जपण्याची आणि आमची सिस्टीम तुम्हाला घरपोच देतेय काय तर  फ्याशन ? म्हणजे आपल्याला हवी आहे भाजी पोळी आणि हे देताहेत बर्गर नाही तर चायनीज ?
बरं हि फ्याशन तरी कसली तर लो कट्स आणि हाय हिल्सची ? म्हणजे काय तर पोरींचे गळे उघडे पडायचे आणि त्यांच्या टाचा उचलून घ्याच्या ? कशासाठी हे सारं ?  फ्याशनच पोहचवायचीय ना तुम्हाला नव्या पिढीपर्यंत तर मग नववारीची फ्याशन पोहचवा.........काष्ट्याची फ्याशन पोहचवा.........रंगीबेरंगी गळून पडणाऱ्या टीचभर टिकलीच्या फ्याशन ऐवजी..........कपाळभर कुंकवाची फ्याशन पोहचवा. अलिकडे तर मी नविनच पहातोय. ट्याटू आमच्या मातीत रुजतोय. पवित्र,सुसंस्कृत मेंदीची जागा घेतोय.     
पण नाही आम्ही असलं काही नाही भरवणार तरून पिढीच्या मनात. आम्ही त्यांना शिकवणार ' लो कट्स आणि हाय हिल्सची ' सौंदर्याला बेताल करणारी  फ्याशन. त्याशिवाय का आमच्या संस्कृतीचे तीन तेरा आणि नऊ बारा वाजणार ?
स्त्री मुक्तीचा दंडोरा पिटणाऱ्या कित्येकांना माझा हा लेख मोडीत काढावासा वाटेल. पण मी काही स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा सनातनवादी नाही किंवा स्त्रियांनी बुर्ख्यातच वावरायला हवं या कुणा मौलवीच्या फतव्याचा समर्थकही नाही.
स्त्री हि सुंदर दिसावी. तिच्याकडं पाहिल्यानंतर कुणाही डोळ्यांला सुख लाभाव. याच मताचा मी आहे. पण स्त्रीच्या फ्याशनमुळं एखाद्यातला पशु जागा होणार असेल तर त्या फ्याशनचा काय उपयोग ?
नाही, मी  फ्याशनच्या विरोधात नाही. स्त्रीनं सजाव - धजाव,  सुंदर दिसावं पण............!!!!!!
निळ्याभोर तलावातल्या चंद्राचं प्रतिबिंब पहाण्यात जी मजा आहे ती डबक्यातल्या चंद्राचं प्रतिबिंब पहाण्यात नाही हे ज्याचा त्याला कळायला हवं.
बरं !!!!!!!!! हया  फ्याशन कधीही मुलांसाठी नसतात बरं का ? आणि असाव्यात तरी का ? मुलांनी अशी लो कट फ्याशन केली तरी सौंदर्याचा कुठला गाभा दिसणार आहे ? आणि high heels घातले तर कुठले उभार नजरेत भरणार आहेत ?
अरे, मनाचे श्लोक का नाही पाठवत तूम्ही नव्या पिढीच्या मोबाईलवर ? फ्याशन व्यतिरिक्त आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत ना तरुणांपर्यंत पोहचायला. कुठली पुस्तक वाचायला हवीत ते पोहचवा, नव्या शोधांविषयी माहिती द्या, तरुणांनी कोणत्या प्रकारचं सामाजिक काम करण्याची गरज आहे ते त्यांना सांगा. आमच्या संस्कृतीला आणि संस्काराला सुरंग लावणारी एकही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहचू देऊ नका.

अस झाल तर आमच्या संस्कृतीचा.........संस्काराचा आणि आमच्या तरुणाईचा ऱ्हास कधीच होणार नाही.

7 comments:

  1. An outstanding share! I've just forwarded this onto a co-worker
    who has been doing a little homework on this. And he in fact ordered me breakfast simply because
    I found it for him... lol. So let me reword this....
    Thanks for the meal!! But yeah, thanks for spending the time to talk about this topic here on your website.


    My website: hindi love sms

    ReplyDelete
  2. I've been surfing online more than 4 hours today,
    yet I never found any interesting article like yours.
    It is pretty worth enough for me. In my view, if all webmasters and bloggers made
    good content as you did, the internet will be a lot more useful than ever before.



    Also visit my weblog; hindi sms

    ReplyDelete
  3. Replies
    1. प्रमोदजी , शेतावर गेलो होतो. त्यामुळे आपल्या अभिप्रायास वेळेत उत्तर देण्यास विलंब झाला. आपल्या नेमक्या ( हवे तर शेलक्या म्हणु ) अभिप्रायाबद्दल आभार.

      Delete
  4. प्रमोदजी , शेतावर गेलो होतो. त्यामुळे आपल्या अभिप्रायास वेळेत उत्तर देण्यास विलंब झाला. आपल्या अभिप्रायाबद्दल आभार.

    ReplyDelete
  5. Vijay Sir this Article is Excellent...! Superlike...!!

    ReplyDelete
    Replies
    1. सामिधाजी, आपल्या सारख्या एका स्त्रीच्या पसंतीस माझा लेख उतरणं हाच माझा बहुमान. आपले मनापासून आभार

      Delete