Wednesday 20 July 2016

देव मानू नका

Presence of God. अर्थात देवाचं अस्तित्व. अहो आपल्या अस्तित्वाची आपल्याला खात्री नाही . आजचा दिवस मावळलाय खरा पण उगवता दिवस दिसेल कि नाही याची खात्री नाही. आणि तरीही अलिकडे , ' मी देव मनात नाही. देव नाही.' असं सांगणाऱ्या बऱ्याच मंडळी आपल्या अवती भवती दिसतात. जो दिसत नाही त्याला का मानायचे असे त्यांचे म्हणणे. पण खरेच देव आहे कि नाही ? देव मानावा कि मानू नये ? देव मानणे हि अंधश्रद्धा आहे का ? मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक कोणी स्पष्ट केला आहे का ?


श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काय फरक असावा यावर मी खूप विचार केला. 

माझ्या दृष्टीने देव मानणे हि श्रद्धा आणि ' असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ' हि अंधश्रद्धा. मला आठवतय मी लहान असताना आमच्या आणि शेजारच्यांच्या घरी दर चार सहा महिन्याने एखादे पत्र यायचे. त्याचा आशय असा - ' आमक्या आमक्याने, आमक्या आमक्या देवाच्या नावाने अकरा पत्रे पाठवली. त्यामुळे त्याची अशी अशी भरभराट झाली. तमक्याला नौकरी लागली. फलाण्याला लाखाची लॉटरी लागली. एकाने ते पत्र फाडून फेकून दिले तर त्याचं मुलगा वारला. वगैरे, वगैरे.'

याच गोष्टींची सुधारित आवृत्ती आज whats aap , फेसबुक यासारख्या सोशल मिडीयांवर दिसते. कोणी तरी फोटो टाकतो आणि हा फोटो दोन ग्रुपवर पाठवा आणि चमत्कार पहा असे सांगतो. मला असे अनेक फोटो येतात. फेसबुकवर देवादिकांचे फोटो टाकून लाईक अथवा , कॉमेंट करायला सांगितले जाते. आणि अनेक मंडळी तसं करतात. किती हा मूर्खपणा !

आमच्या घरात देव्हारा आहे, देवाचे एक दोन नव्हे चांगले चार फोटो आहेत. पूजा अर्चा माझी पत्नी करते. फोटोला दोन चार दिवसातून भरगच्च हार करते. 

एक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवित साठवलेलं निर्माल्य तिनं मला दिलं. म्हणाली , " तळ्यात विसर्जन करून या." मी गेलो. ते तळ्यात टाकून तिथं प्रदूषण करायची माझी इच्छा होईना. मी ती पिशवी तिथंच बाजूला ठेवली आणि घरी आलो. 

घरी आल्यावर तिला म्हणालो, " या पुढे परत हे काम मला सांगायचं नाही. एक तर देवाला हार करण बंद कर अथवा ते निर्माल्या जिथे टाकायचं तिथे तूच टाकून ये. "

देवाला दिवा लावणं , धूप जाळण , उदबत्ती लावणं हे ठीक आहे. पण रोज हार फुलं कशाला ? आणि त्यातून तयार झालेलं निर्माल्य येन ना केन प्रकारे कचर्यातच जाणार आहे तर मग नदीत कशाला ? शिवाय कचऱ्यानं दुषित झाल्या नाहीत आणि देवत्वाच पावित्र्य पदरात घेऊ शकतील अशा नद्या शिल्लक आहेत कुठं ?

एखाद्या गोष्टीची कारण मिमांसा करणे शक्य आहे. पण त्या गोष्टीच्या मुळाशी जाणे हि फार कठीण गोष्ट आहे.   देव मानायचा अथवा न मानायचा हा ज्याचं त्याचा प्रश्न आहे. परंतु जे देव मानीत नाहीत त्यांनी पुढील प्रश्नाची उत्तरे द्यावीत - 

१ ) ' अंड आधी कि कोंबडी आधी '  या प्रश्नाचं विज्ञानाला अजुनही उत्तर का देता येत नाही  ?

२ ) अगदी, झाडातही झाड आधी कि बी आधी ? आणि पहिले बी आले कोठून ? 

३ ) उत्क्रांतीचं सिद्धांत वगैरे ठीक आहे. तरी पहिला सजीव आला कुठून ? 

४ ) मातेच्या गर्भात असणाऱ्या बाळात प्राण येतो कुठून ? 

५ ) कोणताही जीव मृत झाल्यानंतर त्यातला प्राण गेला असे आपण म्हणतो. पण हा प्राण म्हणजे नेमके काय?
     आणि सजीवाचा देह सोडून हा प्राण जातो कुठे ?

आता कुणी म्हणेल ? वेगवेगळे देव का ? त्याचं कारण एवढंच. ज्याला जसा वाटला त्यानं तसा देव व्यक्त केला.  आता देव मानायचा कि नाही हे तुम्हीच ठरवा. देव मानला नाहीत तरी कमीत कमी इतरांच्या श्रद्धेला धक्का लागणार नाही एवढी काळजी घ्या.

          

4 comments:

  1. तुम्ही डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचे ’गोफ जन्मांतरीचे’ हे पुस्तक जरुर वाचा. या व अशा बर्‍याच प्रश्नांची थोडीफार उत्तरं मिळतील. खूप छान पुस्तक आहे.
    :-)
    छान लेख,

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

      Delete
  2. तुम्ही सवामी दत्तावधूत यांची “मानवी जीवनाची गुढ रहस्ये” भाग १ ते ७ ही सात पुसतके वनिता प्रकाशन, लालबाग, मुंबई यांनी प्रकाशीत केली आहेत. ही पुसतके वाचल्यानंतर तुमच्या मानवी जीवनाबाबतचय सगळ्या शंका दूर होतील. पुसतके विकत घेऊनच वाचावी लागतील कारण ही पुसतके वाचनालयात नसतील. कोणाकडे असल्यास मिळवून वाचा. यामधये देव आहे की नाही हेच नव्हे तर इतर हजारो गोष्टी कळतील ज्यांची मी इथे यादी देऊ शकत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. विकासजी, अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. काही कारणास्तव आपला अभिप्राय खूप उशिरा पाहिला. परंतु आपला सल्ला अमूल्य असून. तसा प्रयत्न करतो.

      Delete