Tuesday 17 May 2016

marathi movie sairat : मीही सैराट पाहिला


सैराट येऊन पंधरा दिवस झाले. मुलांनी सैराट पाहिला आणि , " बाबा, तुम्हीसुद्धा सैराट पहा . " माझ्यामागे असा घोषा लावला. इकडून तिकडून सगळीकडून सैराटविषयी  ऐकत होतो. पण मला मात्र सिनेमा पाहायला वेळ नव्हता. शेवटी काल वेळ काढला आणि सैराट पाहून आलो. पण
पंचावन्न कोटीचा गल्ला जमवणारा सिनेमा पाहून काहीसा निराश झालो.

मी काही फार मोठा समिक्षक नाही. पण एक चांगला रसिक नक्कीच आहे. माझे एक मित्र राजेश मंडलिक यांनी सैराटवर खूप स्तुती सुमनं उधळली आहेत. तरीही मला मात्र सिनेमा गृहात पाऊल टाकण्या आधीच हा सिनेमा आपल्याला आवडणार नाही असं वाटत होतं आणि झालंही तसंच. मला खरंच सिनेमा फार आवडला नाही. पूर्वार्ध तर अक्षरश लांबवायचा म्हणून खूप लांबवलाय. टाळ्या द्यावा असा एकही प्रसंग नाही आणि संवादही नाही.  उत्तरार्ध मात्र बरा जमला आहे. एका अत्यंत सामान्य कथानकावर सिनेमा जुळवून आणण्याचं श्रेय मात्र नागराज मंजुळे यांना नक्कीच द्यावं लागेल.

हौसे नवसे कलाकार घेऊन सिनेमा यशस्वी करून दाखवणं याचं श्रेयही नागराज मंजुळे यांनाच. पण संवाद लेखन, सहकलाकारांचा अभिनय त्यांची संवादफेक म्हणजे दुष्काळाच. 

अजय - अतुलचं संगीत श्रवणीय आहे. आणि ती सिनेमाची एक जमेची बाजू आहे. त्यातही झिंग झिंग झिंगाट या गाण्याचा फार बोलबाला झाला होता. मिडीयावरील एका मुलाखतीत एका पत्रकाराने त्या गाण्याच्या डान्सच्या  कोरिओग्राफी संदर्भात मंजुळे यांना प्रश्नही विचारला होता. पण काय आहे त्या डान्समध्ये. आमच्या गणपतीच्या मिरवणुकीत नाचणारी पोरंही डोळ्याचं पारणं फिटावं असं नाचतात. मला मात्र तेवढं गाणं सोडुन बाकी सगळी गाणी मनापासून आवडली.

' हळद पिवळी , पोर कवळी ' हे गाणं तर अप्रतिम आहे. त्यांच्यात विरहाचा प्रसंग आला त्या पार्श्वभूमीवर -

दोघे - ' तुझ्या विना , जीव सुना
           प्रेम केले , काय गुन्हा
तो -     घेतो श्वास, अंधारात
           क्षीण झाली , प्रीत ज्योत
ती -     घेते श्वास, अंधारात
           क्षीण झाली , प्रीत ज्योत
तो -     सांगा कुठे, तिच्या खुणा
ती -     सांगा कुठे, त्याच्या खुणा

दोघे - ' तुझ्या विना , जीव सुना
           प्रेम केले , काय गुन्हा  '

असं एखादं गाणं टाकायला हवं होतं असंहि मला वाटलं. आणि घरी आल्यानंतर मी माझ्या मनात आलेलं गाणं लिहूनही काढलं. 

तरीही नुसत्या गाण्यासाठी कुणी सिनेमाला जात नाही. हेही तेवढंच खरं.   

शेवटी प्रश्न पडतो या सिनेमानं समाजाला काय दिलं ? कोणता नवा विचार दिला ? मराठी चित्रपट सृष्टीला कोणती नवी ओळख दिली ? 

हिंदी सिनेमात बऱ्याचदा नायक मुस्लिम आणि नायिका हिंदू दाखवलेली असते. मंजुळे यांच्या सिनेमात नायक मागासवर्गीय आणि नायिका उच्चभ्रू आणि गडगंज असते. असं का ?  सैराट मधे नायकाला आणि त्याच्या सोबत्यांना झालेली मारहाण तो मागास समाजाचा होता म्हणून झाली हे नागराज मंजुळे सांगणार असतील तर मग आम्ही जात कशी पुसून टाकणार आहोत ?

नागराज मंजुळे मागास समाजातून आले आहेत म्हणून ते असं चित्रण करणार असतील तर मग यात निपक्षपातीपणा कुठे आहे ? समाजाने जातीचं जोखड झुगारून द्यावं म्हणून शाहू महाराजांपासून धोंडो केशव कर्वे यांच्या सारख्या अनेक उच्चभ्रू जातीतल्या समाजसुधारकांनी काम केलं आहे. पण हे सारं विसरून अनेक दलित साहित्यिकांनी दलितांवरील अन्यायाचं भांडवल करून आपल्या साहित्याला एक कोंदण प्राप्त करून दिलं. नागराज मंजुळेही तेच तर करत नाहीत ना ? 

नायक टुकार आणि नायिका सुसंस्कृत दाखविण्याचा एक नवा ट्रेंड मराठी सिनेमात आला आहे. टाईमपास , सैराट यास्रखी आणखी काही उदाहरणे यासाठी देत येतील. पण असा ट्रेंड येणं हि फार अभिमानाची गोष्ट नाही.  प्रेम आंधळ असतं असं म्हणतात. ते जात - पात, धन - दौलत पहात नाही असंही म्हणतात. पण असं उदाहरण हजारातून एखादं आणि अशी सारी बंधन झुगारून पूर्णत्वाच्या कळसाला गवसणी घालणारं प्रेम तर आणखी दुर्मिळ.

नायिकेला अभिनयाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळालंय खरं. पण त्याचं श्रेयही नागराज मंजुळे यांनाच द्यायला हवं. कारण नवख्या कलाकारांकडून अभिनय करून घेणं हि काही फार सोपी गोष्ट नाही.  पण तिचा चेहरा फार लोभस आणि प्रेक्षणीय आहे हे मात्र नक्की. 

एकूणच कलात्मक दृष्टीकोनातून सिनेमा नक्कीच सामान्य होता. पण तरीही तो चालला. हे दिग्दर्शकाचं कौशल्य आणि निर्मात्यांचं नशीब.









  


  

32 comments:

  1. Prathmesh Gaikwad17 May 2016 at 12:09

    Tumhi uttam smiksh kelet. kharach mlahi sinema far aawdla nwhta. pan itranche abhipray ekun aapanch chukto aahot ase watat hote.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रथमेश , अभिप्रायाबद्दल आभार. पण काही असलं तरी मंजुळे यांच्याकडे जादूची कांडी आहे हे नाकारून चालणार नाही.

      Delete
  2. कविता लांघे17 May 2016 at 12:47

    सुंदर लिहिलंय.

    ReplyDelete
  3. मी सर्वसाधारणपणे चांगली कथा नसलेले सिनेमे बघणं टाळतो. त्याचमुळे या सिनेमाबद्दल फारशी उत्सुकता नव्हतीच. तुमचा लेख वाचून सिनेमा न पाहिल्याबद्दल बरं वाटलं.

    ReplyDelete
    Replies
    1. राजतजी अभिप्रायाबद्दल आभार. कोणताही सिनेमा पहाताना माझे कथानकापासून संगीतापर्यंत आणि अभिनयापासून छायाचित्रणा पर्यंतच्या सर्व कलात्मक बाबींवर लक्ष असते. संगीत सोडला तर इतर बाबतीत या सिनेमात कौतुकाचा भाग नाही. अनिकांनी हा सिनेमा पहिला तो यातल्या प्रेमकथेसाठी आणि तो म्हणून. मी सिनेमा पाहण्यापूर्वी अनेकांनी सिनेमा उत्तरार्धात नकोसा वाटतो असे मत नोंदवले होते. पण मला वाटते उत्तरार्धातच सिनेमा जरा बरा जुळून आला . प्रेक्षकांना आवडला नाही तो त्याचा शोकांत. पण शोकांत हि त्या कथेची गरज होती.

      Delete
    2. I don't know you..pan changli katha nahi ..hahaha..he khup hasyaspad...if u like movies with good storyline for god's sake watch Sairat..! N Simple story but very well told..

      Delete
    3. मित्रा तू कोणत्या तुझ्या सारखी अपरिपक्व मुले अशा कथानकाला भुलतात म्हणूनच असे सिनेमे समाज हिताचे नाहीत हे नक्की. खालील शैलेश पाटील यांचे मत पहा.

      Delete
    4. Vachali mi Shaileshjinchi post...hasu aala mala vachun..aho honor kiling kiti bhayankar n krur aahe ...asa konihi karu naye asa message aahe aho movie cha...ha msg madhe kasa vait asu shakto...

      N ya film ne mula bhultit? Kash sathi? Ulat ha film prem kelyanantar sagla gulabi nasta he dakhavto... fil kuthehi palun jyanyacha samarthan nahi karat...

      N jyanna he kalat nahi te mazya mate 'अपरिपक्व' aahet..

      Delete
    5. मित्रा तू वयाने लहान आणि प्रेमात पडण्याच्या वयाचा दिसतोस. मी पुजाजींना दिलेले उत्तर नक्की पहा. माझा प्रेमाला विरोध नाही. आंतरजातीय प्रेमालाही विरोध नाही. पण आई वडील आपले हितचिंतक आहेत याचा विसर पडून देऊ नये असे मनापासून वाटते.

      Delete
  4. Mihi 100% sahamat aahe. Malahi Sairat peksha Fandry 100 patine jast aavadala...! Fandry chi katha, ekun vishay mandani uttam hoti.
    sairat keval mannoranjanatmak vatala...! fakt shevatcha sean madhiil balacha abhinay kaalj helavnara hota he nakki...!

    ReplyDelete
    Replies
    1. समिधाजी बर्याच दिवसांनी आपली प्रतिक्रिया मिळाली. आभार. काही असले तरी नागराज मंजुळे कौतुकास पात्र आहेत हे मात्र नक्की.

      Delete
  5. Mulat Sairat tumhala kallach nahi as distay. Sairat made aaplay padhatine Jagnari tarun pidhi aani tila mage khechanari samajik paristhiti donhihi dkavlyat.
    Aani mulat pratek Cinema ne samajik sandesh dilach pahije asa kahi niyam nahi. Sairat kontahi samajik bhashya karat nahi pan aajchi samajik parishthiti nemki dakihavto. tas natsamrat hi kontahi Samajik sandesh det nahi tarihi to tumhala aavdalach hota na.
    Aani ho hya purn Chitrapatat Nayak tukar aani nayika susanskrut ajibat dakhavili nahi. Tumhala kharatar chitrapat punha pahanyachi garaj aahe. Purv grah dushit manane baghal tar sairat kalnar nahi tumhala.

    ReplyDelete
    Replies
    1. चेतजनी , अभिप्रायाबद्दल आभार. आपल्या मताचा मी आदर करतो. पण नटसम्राटने कोणताही संदेश दिला नव्हता हे आपले मत पटण्यासारखे नाही. मुलांनी आई वडिलांच्या उतरत्या वयात त्यांची मने सांभाळली पाहिजेत हा सामाजिक संदेश दिला आहे.

      आपले वय काय मला माहित नाही. पण सैराट मधील घटना आपल्याच घरात शिरले आणि आपल्या बहिणीने , मुलीने केवळ प्रेमासाठी स्थिरस्थावर नसलेल्या खालच्या जातीतल्या मुलाशी घरच्यांचा विरोध झुगारून पळून जाऊन लग्न केले तर कोणाला आवडेल.

      प्रेमाला अथवा अंतर जातीय प्रेमाला माझा विरोध नाही. शालेय आयुष्यात प्रेनात पडू नये असेही माझे मत नाही. पण शिक्षण संपल्यावर , स्थिरस्थावरलग्न करणे अधिक योग्य आहे असे आपणास वाटत नाही का ? सैराटच्या मार्गाने गेलेल्या आणि आयुष्याची धूळधाण झालेल्या तीन तरुण मुलींच्या आयुष्याची शोकांतिका मला माहिती आहे.

      आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केवळ तारुण्यातल्या प्रेमापोटी लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या आई वडिलांचा विसर मुला - मुलींना पडतोच कसा ?

      Delete
  6. Namskar,
    Sairat chitrapat ha Marathi chitrapat srushtitla ek soneri aksharne lihalile pan aahe. Nagraj Manjule ni navin team ghuevun je kamkele te nakkich kautaks patra ahe. Chitrapt hit hotoy he pahun kahi sadashiv pethi vihcarachya lokani ani kahi Maratha jatichya lokani amchi badnami zali mhanun bomb maryala survat keli.
    Mala sanga, pinjra madhe sriram lagu chi life chi vatahat hote mhanun tyakli ani aata pan lokani tamasha pahayacha sodle ka?
    jithe dance bar ani drugs che nasha Karun lok bhikela lagtat tithe hi alpasantushi lok gappa bastat.

    regards.
    Bapu.

    ReplyDelete
    Replies
    1. बापुजी , अभिप्रायाबद्दल आभार. नागराज मंजुळे यांचे माझ्या लेखात मी पदोपदी कौतुक केले आहे.

      सदाशिव पेठी लोकांना या सिनेमाचे यश पचनी पडले नाही. हे आपले मत मलाही यापूर्वी ऐकायला मिळाले आहे. पण मी सदाशिव पेठी नाही आणि माझी विचारसरणीही तशी नाही. मी स्वतः मागासवर्गीय या सदरातच मोडतो.

      तरून वयात भिन्न लिंगी आकर्षण निर्माण होणे आणि प्रेमात पडणे यात अनैसर्गिक असे काही नाही. पण सैराट मधील घटना आपल्याच घरात शिरले आणि आपल्या बहिणीने , मुलीने केवळ प्रेमासाठी स्थिरस्थावर नसलेल्या खालच्या जातीतल्या मुलाशी घरच्यांचा विरोध झुगारून पळून जाऊन लग्न केले तर कोणाला आवडेल ?

      प्रेमाला अथवा अंतर जातीय प्रेमाला माझा विरोध नाही. शालेय आयुष्यात प्रेनात पडू नये असेही माझे मत नाही. पण शिक्षण संपल्यावर , स्थिरस्थावरलग्न करणे अधिक योग्य आहे असे आपणास वाटत नाही का ? सैराटच्या मार्गाने गेलेल्या आणि आयुष्याची धूळधाण झालेल्या तीन तरुण मुलींच्या आयुष्याची शोकांतिका मला माहिती आहे.

      Delete
    2. Namskar Shendge Saheb,
      Ata lok badalt aahet. Mi mulcha nagar cha. Maza ek lahanpansauncha mitra (shetkari haratil) aahe tyachya mothya bhavchya muline machyach gavatil riksha driver chya mulasobat lagna kele, mazya mitrachya ghrache accept kele. Tesech aamchya shejaril muline(vanjari samaj) Maratha mulashi(ekach college madhil) lagna kele. Donhi mulincha sansar vyavsthit suru aahe. Fakt mulachya ghari arthik subatta aahe mhanun ticya mana virudha lagna laven denyat kahich faida nasto. Shevati mulichi ichha nai khushi mahtwachi rahate. Samaj badaltoy thoda vel lagel.

      Punyat aalyvar tumhala bhetnacha viachar aahe.

      regards.
      Bapu.

      Delete


    3. टेंगळेसाहेब मीही नगरचाच. समाज बदलतोय हे मला मान्य आहे. प्रेम विवाहाला माझा विरोध नाही. अपेक्षा एवढीच प्रेम करताना आयुष्यातील ध्येयाचा विसर पडू नये. आई वडिलांचे प्रेम डोळ्याआड करू नये. आपण दोन चांगली उदाहरणे दिलीत. पण परवा प्रेम या विषयावर समुपदेश करणाऱ्या डॉक्टरांचा लेख वाचला. त्यांच्या मतानुसार," शालेय अथवा महाविद्यालयीन आयुष्यात प्रेमात पडून लग्न करणाऱ्या जोडप्यांपैकी ऐंशी टक्के जोडपी आमचे पटत नाही म्हणून घटस्पोट घेतात. कारण त्या वयातील नैसर्गिक आकर्षण हाच त्यांच्या प्रेमाचा केंद्रबिंदू असतो. "

      असो. आपण पुण्यात येण्यापूर्वी कळवा नक्की भेटू.

      Delete
  7. Very nice thoughts Vijay Sir and a correct review of the movie. The movie has good songs which caused the popularity else the overall message from the movie is not good. And what message does the movie give my honor killing? How can the brother take a revenge of his sister after so many years? Honor killing is a big issue in Haryana and Nagraj is trying to send the same message of honor killing in Maharashtra too...

    ReplyDelete
    Replies
    1. शैलेशजी , अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. माझा ब्लॉग आणि पोस्ट आपल्याला कशी सापडली माहित नाही. बहुदा फेसबुकवरून वरून आपण माझ्या ब्लॉगवर आला असाल. असो आता नियमित ब्लॉग पहात चला.

      आपण मांडलात तो Honor killing चा मुद्दा तर माझ्या लक्षातच आला नाही. माझा प्रेमाला विरोध नाही पण आईवडिलांची फसवणूक, विश्वास घात करून केलेल्या प्रेमाला नक्कीच विरोध आहे. असाच शेवट करायचा आहे हे दिग्दर्शकांना ठरवून ठेवलेलं असल्यामुळे शेवटच्या क्षणी झोपेतून उठल्याप्रमाणे आर्चीचा भाऊ त्यांना संपवतो.

      Delete
  8. Pratyekala swatahcha mat mandanyacha poorn hakka aahe.. pan aapan poorv dooshit pane comment keliy ashi shanka yete..mulat khup virodhabhas aahe tumchya post madhe mazya mate..jar tumhala sanvad..acting cha dushkal vatala...katha hi nahi awadli tar.. directior chi jadu kuthun disali..n ka tumhi tyancha kautuk kartay...

    Punha ekda Sairat paha..without any assumption.. asa mala vatata...

    Movie ne sandesh dyava asa bandhan nasavach muli... pan Sairat baddal bolaycha tar ..khup motha sandesh khup jast prabhavipane dilay. ..jar ti kalalach nasel tar kharach durdaiva.. n sanvad atyant chapkhal aahet picture jithe ghadto tya place shi... n sanvadatun hi barech sandesh dile aahet..e.g. ghutkha khau naye..apanganna hinavu naye.. samorcha premala pratisad det nasel tar vishay sodun dyava...khara tar he explain karava lagat aahe..yacha dukh aahe..

    ReplyDelete
    Replies
    1. पुजाजी अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. मीच माझ्या लेखात मला सिनेमा आवडणार नाही असे लिहिले होते त्यामुळे मी पूर्वग्रह दुषित मताने सिनेमा पहाण्यास गेलो हेतो असे आपणास वाटते. पण तसे नाही. आपण माझे कट्यारचेही परीक्षण वाचा. तो सिनेमाही मी मुलांच्या आग्रहावरून तोहि सिनेमा मला आवडणार नाही असे वाटत होते. पण सिनेमा पाहिल्यानंतर मी अक्षरशा भारावून गेलो होतो.



      प्रत्येक सिनेमाने सामाजिक संदेश द्यायलाच हवा असे माझेही म्हणणे नाही. पण पण श्वास , दहावी फ , थ्री इडीय्ट्स यासारखे सिनेमे नक्कीच अत्यंत प्रभावी संदेश देऊन जातात. सैराट ने जे सामाजिक संदेश दिले आहे असे आपण म्हणतात ते सारे आपल्याला माहित आहे पण तरीही आपण ते अंमलात आणीत नाही हे वास्तव आहे. प्रेम करावे कि करू नये या संदर्भात हा सिनेमा नक्की काय सांगतो हे आपण स्पष्ट करावे. स्वतःच्या पायावर उभे नसतानाही प्रेमासाठी घरातून पळून जायला आणि लग्न करायला काहीच हरकत नाही. भले पुढे डोशाच्या गाडीवर काम करायची वेळ आली तरी चालेल हाच या सिनेमाचा संदेश असेल तर आपणास आवडेल का ?

      Delete
    2. Prem hi khup natural goshta aahe...karu naye va karava asa konihi nahi sangu shakat... Sairat cha sarvat motha sandesh jo mi aadhichya comment madhe lihla navta karan mala vatla to saglyanna thalak kalala asel...pan aso.. tar Sairat kai shikavto ... samajat asha kahi pravrutti aahet jyanna swatachya khotya mothepanacha garv aahe..jya pudhe tyanna kahi disat nahi... 2 jeev prem kartat...tya sathi kathin paristhiticha samna kartat... jya mule tyanche prem kiti pure aahe he kalata...pan kahi mansatla vaitpana tya nishpap jeevancha krurpane ant karto...



      Film asha lokanna vicharto...kai karun thevlay tumhi...


      Manus hi ekch jaat apan manali pahije...otherwise bhayankar prakar ghadtat..he film sangto..mazyamate..


      N ha jasa tumhi mhanalat tasa nehmichach sandesh aahe...pan Sairat to atyant prabhavi pane mandto.. film pahilya nanatr sunn zalela man he tharvel..ki asa bhedbhav mi karnar nahi...ashi director chi apeksha asavi..

      Delete
    3. पुजाजी आपले वय काय माहित नाही.प्रेम विवाहाला माझा विरोध नाही. अपेक्षा एवढीच प्रेम करताना आयुष्यातील ध्येयाचा विसर पडू नये. आई वडिलांचे प्रेम डोळ्याआड करू नये. परवा प्रेम या विषयावर समुपदेश करणाऱ्या डॉक्टरांचा लेख वाचला. त्यांच्या मतानुसार," शालेय अथवा महाविद्यालयीन आयुष्यात प्रेमात पडून लग्न करणाऱ्या जोडप्यांपैकी ऐंशी टक्के जोडपी आमचे पटत नाही म्हणून घटस्पोट घेतात. कारण त्या वयातील नैसर्गिक आकर्षण हाच त्यांच्या प्रेमाचा केंद्रबिंदू असतो. " मुली पळून का जातात ? हा लेख नक्की वाचा. https://maymrathi.blogspot.in/2015/04/blog-post_14.html

      Delete
  9. Sarang Chapalgaonkar28 May 2016 at 11:08

    विजयजी समीक्षा छान लिहिलित. फक्त माझं उलट मत आहे.पूर्वार्ध फास्ट आणि उत्तरार्ध रेंगाळवलेला.

    ReplyDelete
    Replies
    1. सारंगजी आपण माझे ब्लॉग अनेकदा वाचले असतील परंतु आपला अभिप्राय पहिल्यांदाच मिळाला आहे. आपल्या प्रमाणेच अनेकांचे मत आहे. पण ते पूर्वार्ध मस्त पण उत्तरार्ध मात्र नकोसा वाटते असे आहे. कारण सिनेमाचा दुखान्त कोणालाच आवडलेला नाही. मला पुर्वार्धापेक्षा उत्तरार्ध भावला त्याचे कारण वेगळे आहे. पूर्वार्धाला काही कथानक आहे असे मला वाटले नाही पण उत्त्र्राढत मात्र जे दाखवायचे आहे त्या दिशेने कथानक चालल्यासारखे वाटते.

      Delete
    2. Vijay sir malahi sinema avadla nahi pan te je gavakadcha vatavaran dakhavlay te awadla. Pan acting baddal jasti apeksha na kelelich bari karan kalakar nave ahet. Ani mala yacha akshep ahe ki lok sadashiv pethetil vichar sarni' aslelya lokanna kiva 'patil' lokana point out karun ka bolat ahet? Kontehi Natak aso kiva Movie aso kiva Shastriya sangitachi mehefil aso tumhi observe karal tar ''sadashiv pethetil vichar sarni' aslele lokach mothya pramanavar bhettil karan te lok kalecha ani quality cha respect kartat, ani hich lok mothya pramanat rasik hi astat. Jar asha lokana Sairat awadla nahi tar tar nakkich kahitari kami ahe. Ata krupaya Box Office collections che dakhle deu naye. Barech lok natsamrat ani katyarshi sairat chi tulna kartat. Box office collections cha vishay sodun dya pan kahich match nahi sapadnar na acting madhe, na Directing madhe, na story madhe. Music nech kay to match dakhavla ahe, pan music cha prakar sairat ani katyar madhe vegla ahe. Pan mazi kahi lokana vinanti ahe ki krupaya katyar tumcha tar sairat amcha, fandry amcha ase balish panache bol bolu naye. Dhanyavad!

      Delete
    3. सारंगजी, आपण योग्य लिहिले आहे. परंतु ' Kontehi Natak aso kiva Movie aso kiva Shastriya sangitachi mehefil aso tumhi observe karal tar ''sadashiv pethetil vichar sarni' aslele lokach mothya pramanavar bhettil karan te lok kalecha ani quality cha respect kartat, ani hich lok mothya pramanat rasik hi astat. Jar asha lokana Sairat awadla nahi tar tar nakkich kahitari kami ahe. ( कोणतेही नाटक असो , मुव्ही असो , शास्त्रीय संगिताची मैफिल असो तुम्ही ऑबझर कराल तर सदाशिव पेठेतील विचारसरणी असलेले लोकच मोठ्या प्रमाणात भेटतील. कारण ते लोक कलेचा आणि कॉलेटीचा रिस्पेक्ट करतात आणि हेच लोक मोठ्या प्रमाणात रसिकही असतात. जर या लोकांना सैराट आवडला नाही तर नक्कीच काहीतरी कमी आहे. ' या आपल्या म्हणण्याशी मी पूर्णतः सहमत नाही. आणि या आपल्या मतावर माझा आक्षेप आहे. कारण आपल्या या मताला ब्राह्मणीपणाचा तसेच सदाशिव पेठी वास येतो आहे. मी सदाशिव पेठी नाही. पण मी रसिक आहे असे मला वाटते. आपण माझे रसिकत्व नाकारू शकाल का ?

      पैसा म्हणजे यश हे समीकरण मी आयुष्याच्या कोणत्याच क्षेत्राला लागू करू इच्छित नाही. त्यामुळेच बॉक्स ऑफिसचे कोणी कितीही दाखले दिले तरी सैराट उत्तम कलाकृती आहे असे म्हणता येणार नाही आणि तिच्यातले दोषही झाकता येणार नाहीत.

      Delete
  10. बहुजनांचा ‘बॉबी’ सैराट....... आज ‘सैराट’ या सिनेमाला छोटय़ा गावांपासून मोठय़ा शहरांपर्यंत सर्वत्र गर्दी होत आहे. त्यातही विशिष्ट तरुण प्रेक्षक मोठय़ा संख्येने आणि दुप्पट उत्साहाने पुन:पुन्हा हा सिनेमा बघताना दिसतो आहे. ‘सैराट’ हा आजच्या बहुजनांचा ‘बॉबी’ आहे. ज्यांचे आवाज आजवर दडपले गेले होते, त्यांची ही प्रेमकहाणी अहे. अर्थात ‘सैराट’ फक्त रोमँटिक भूक भागवून थांबत नाही; तो आजच्या काळातलं जातवास्तवही मांडू पाहत आहे. - See more at: http://www.loksatta.com/lekha-news/movie-sairat-and-audience-1243773/#sthash.ybQTUP8T.dpuf- See more at: http://www.loksatta.com/lekha-news/movie-sairat-and-audience-1243773/#sthash.ybQTUP8T.dpuf http://www.loksatta.com/lekha-news/movie-sairat-and-audience-1243773/

    ReplyDelete
    Replies
    1. सुजितजी , आज बर्याच दिवसांनी आपली प्रतिक्रिया मिळाली. बालक पालक असो, टाईमपास अथवा सैराट शाळकरी वयातलं प्रेम दाखवणं हा आजकाल मराठी सिनेमांचा ट्रेंड झाला आहे. काय साधणार यातून ? त्यातही प्रियकर टुकार आणि प्रेयसी सुसंस्कृत घरातली दाखवताना काय सांगू पहातात हे सिनेमे ? शाळेत असताना प्रेमात पडणं यात अनैसर्गिक काहीच नाही. पण तोच सिनेमाचा आत्मा असेल तर शाळकरी मुलांना कोणता संदेश जाईल ? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलाच मुलगा अथवा मुलगी शालेय वयात असे प्रेमात पडून लग्न करू लागले तर आपल्याला रुचेल काय ? त्या वयात मुलांनी प्रेमात पडण्यापेक्षा आपल्या करिअर वर लक्ष केंद्रित करावे हिच प्रत्येक पालकाची इच्छा नसते काय ? खूप प्रश्न आहेत सुजितजी. हा सिनेमा पाहिल्यानंतर हे सगळे प्रश्न माझ्यासमोर ' आ ' वासून उभे होते ?

      Delete
  11. आपले फिल्म विचार ऐकून बरे वाटले..पण लक्षात येत नाहि सैराटच का या आधी टाइमपास आला होता त्यावेळि आपले विचार कुठे जातात कोणास ठाउक..कसे आहे फिल्म हि अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा भाग आहे. कोणी उठुन कोणालाही सेंन्सॉर्ड करु शकत नाहि त्यासाठि उचीत नियुक्त मंडळ असतात. आपण म्हणाला त्याप्रमाणे या करिअर करायच्या वयात असे का घडावे. जर मुलांना घेवून काढलेले सर्व चित्रपट करिअर आधारितच असतिल तर आपण देखील जाल का हा मोठा प्रश्न आहे. खर तर हा चित्रपट अतःमुख करायला लावाणारा आहे.. पण तसे न होता आपण काय असायला हवे काय नको बोलुन लेखकावरच प्रश्न चिन्ह निर्माण करतो.. हे खुप हास्यास्पद वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. मिलिंदजी एकावेळी दोन अभिप्राय देणारे आपण पहिले रसिक मनापसून आभार. आपल्या नमो नमो लेखावरील अभिप्रायाला सुध्दा उत्तर दिले आहे.

      नागराज मंजुळे हे माझे वैरी नाहीत आणि मी स्वतःला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ अथवा बरोबरीचाही मानीत नाही. मी ज्या काही सिनेमांबद्दल लिहिले आहे ते सगळे सिनेमे मी सिनेमागृहात जाऊन पाहिले आहेत. टाईमपास , बालक पालक दुनियादारी हे सिनेमे मी प्रिंट पार जुनी झाल्यानंतर आणि लोकांनी टाकून दिल्यानंतर म्हणजेच टिव्हीवर दाखवला तेव्हा पाहिले. आणि माझ्या लेखात मी त्याही सिनेमांविषयी नाराजीचा सूर काढला आहे.

      दहावी फ हा पूर्णतः शालेय मुलांच्या आयुष्यावर आणि मानसिकतेवर आधारित सिनेमा आहे. नेमके नाही सांगता यायचे पण बारा चौदा वर्षापूर्वी कधीतरी तो रिलीज झाला होता. आपण पाहिला नसेल तर नक्की पहा. मला काय सांगायचे आहे ते आपल्या लक्षात येईल.

      मिलिंदजी आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्या आहे. आणि त्या स्वातंत्र्यानेच बरेच प्रश्न निर्माण केले आहेत. आजची मिडिया हे सुध्दा मोकाट सुटलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच उत्तम उदाहरण आहे.

      सेन्सॉरच कशाला आपल्याकडे जेवढी म्हणून महामंडळ आहेत त्यावरील पदाधिकाऱ्यांविषयी मी न बोलेलच बरं. अगदी शिक्षण मंडळालाही हे लागू आहे.

      Delete