Sunday, 29 June 2014

Love and Women : पुरुष स्त्रीचा दास का ?

खरंतर या जगात कुणीच कुणाचं दास नसतं. तरीही आपल्याला हव्या असलेल्या आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसाठी आपण आपल्या अनेक इच्छा आकांक्षांना मुरड घालतो. आणि यालाही समाजात ' दास होणं ' असंच संबोधलं जातं. या अर्थानं स्त्रीला पुरुषाची दास मानलं जातं. पण खरंतर बऱ्याचदा पुरुषच स्त्रीचा दास असतो. पुरुष स्त्रीचा दास कशामुळे झाला त्याची ही कथा -

Thursday, 26 June 2014

Love and wife : बायकोचा भडीमार

आज एका कार्यक्रमाला गेलो होतो. मराठी गाण्यांच्या ” दिवाना झालो तुझा ” या व्ही.सी.डी.चं प्रकाशन होतं. गायक होता ” सा रे ग म ” फेम मंगेश बोरगांवकर. निवेदिका होती सिनेतारका दिप्ती भागवत.

मध्यंतरात बायकोला म्हणालो, ” मी तिला भेटून येतो.”

आपलं मन किती मोठं आहे हे दाखवत तिनं मला परवानगी दिली खरी. पण बाहेर आल्या आल्या खोचकपणे विचारलं, ” भेटली का ?”

” मग काय. ” माझंही तेवढंच खोचक सूर.”

काय म्हणाली ?” तिचा चौकस प्रश्न.

Tuesday, 24 June 2014

Boards In Pune : पुणेरी पाटी


( खालची पाटी आवर्जून पहा आणि जागे व्हा. )

पुणेरी पाटी या विषयावर वर्तमान पत्रातून स्वतंत्र कॉलम झळकलेले आहेतच. परंतु या विषयी एखादी स्वतंत्र वेबसाईट चालावी, किंवा एखाद्याला हा विषय घेवून पीएचडी करावीशी वाटावी एवढी पुणेरी पाटीची ख्याती आहे.

मीही अशा अनेक पाट्या वर्तमानपत्रातून वाचल्या आहेत. पण प्रत्यक्ष पुण्यात राहूनही गेल्या चाळीस वर्षात फारच मोजक्या पाट्या माझ्या नजरेस पडलेल्या आहेत. पण पुर्वी जसे पावलोपावली कॉईन बॉक्स दिसायचे तशा या पुणेरी पाट्या मला फारश्या दिसल्या नाहीत. कदाचित सदाशिव पेठेत माझं फारसं जाणं – येणं नसल्यामुळेही अशा पाट्या माझ्या कधी नजरेस पडल्या नसाव्यात.

Sunday, 22 June 2014

social media and sex : सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग 3

सोशल मिडिया आणि अश्लीलता या विषयावर लिहावं तितकं थोडं आहे. आजतागायत मी सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग १ आणि भाग २ लिहिले आहेत.  पहिल्या भागात चार सहा महिन्यांच्या मुलाला मोबाईलची सवय कशी आणि कुणामुळे लागते तसेच हि सवय मुल चार सहा वर्षाच होईपर्यंत हाताबाहेर कशी जाते याविषयी लिहिलं होतं. तर भाग २  मधे शालेय वयातील मुलांना मोबाईलची गरज का नसते याविषयी लिहिलं होतं. या तिसऱ्या भागात शालेय वयातली आणि उच्च माध्यमिक शिक्षण ( ११,१२ वी ) घेणाऱ्या मुलांच्या मोबाईल वर नेमकं काय चालतं ? त्यांच्या मोबाईलवरच्या अश्लीलतेच स्वरूप कसं असतं ? आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याविषयी लिहिणार आहे.

Saturday, 21 June 2014

Story for Kid's : राजा पेक्षा दगड बरा


राज्यस्थान मधलं अजलमेर. खूप खूप वर्षापूर्वी तिथ रणजितसिंग नावाचा एक राजा राज्य करीत होता. एक दिवस नेहमीप्रमाणे तो त्याचा सारा लवाजमा घेवून शिकारीला गेला. सकाळपासून जंगल पालथं घालून सगळे थकले होते. शिकार हाती लागली नव्हतीच पण दुपार झाली होती. दमून भागून सारे एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले. दुपारचं भोजनही उरकून घ्यावं असा विचार केला. इतक्यात

Friday, 20 June 2014

Birthday Gritting : माझं बर्थडे गिफ्ट

काही दिवस महत्वाचे आणि स्मरणीय असतात. जन्माचा वाढदिवस……. लग्नाचा वाढदिवस. हे असेच काही दिवस. अशा स्मरणीय दिवसांचा आणि गिफ्टचा दृढ संबंध आहे. अशा दिवशी कुणी आपल्याला गिफ्ट दिलं तर आपल्याला आनंद होतोच. पुरुषांपेक्षा मुलांना आणि स्त्रियांना या गिफ्टचं खुपच कौतुक असतं. मुलं गिफ्टसाठी हट्ट करतात. तर स्त्रियांना गिफ्ट मिळालं नाही तर त्या हिरमुसतात.

Tuesday, 17 June 2014

social media and sex : जागरण गोंधळ का घालतात ? कथा १

मुरळी हि काही पट्टीची नृत्यांगना नसते. तिचा नाच ग्रामीण बाजाचाच असतो. परंतु रात्री नऊ सकाळी सहा एवढ्या वेळात सहा ते सात तास नाचण्याचा तिचा स्ट्यामिना नक्कीच कौतुकास्पद असतो. तिच्या नृत्याची झलक एकवार पहाण्यासाठी खालील तीन चार मिनिटांचा व्हिडीओ एकवार नक्कीच पहायला हवा.

हिंदू समाजात आणि त्यातही जेजुरीचा खंडोबा हे ज्यांचं आराध्य दैवत आहे त्यांच्यात जागरण गोंधळ घालण्याची प्रथा आहे. पण जागरण गोंधळ का घालतात ?  किंवा का घालावं ? हे मात्रं बऱ्याच मंडळींना माहित नसतं.

Sunday, 15 June 2014

Marathi poem : बाबा म्हणजे नेहमी छडी

( जगभर जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी Fathers Day साजरा केला जातो. या वर्षी जून महिन्यातला तिसरा रविवार येतोय १५ जूनला. म्हणून आज बाबा दिन.
आता बाबाचा पूर्वीसारखा धाक राहिलेला नाही. आता बाबा अधिक हळवा झालाय. आता बाबा ‘ बाप ‘ कमी आणि ‘ मित्र ‘ अधिक झालाय. त्यामुळेच लहानपणी बाबाच्या अंगाखांद्यावर खुशाल खेळणारी पिलं पंख फुटले कि बाबाला फारशी जमेत धरत नाहीत. म्हणूनच मित्रहो हे लेखन. पटलं तर बाबाचा प्रत्येक शब्द झेला. नाही तर पटलं तर सोडून द्या )

Friday, 13 June 2014

Story for Kid's : राक्षसपूरचा राक्षस

माझी  ' राक्षसपूरचा राक्षस ' हि कविता परवाच्या दैनिक लोकमत च्या ' सुटी रे सुटी ' या सदरात प्रकाशित झाली आहे.

मधे कुणास ठाऊक कसं पण लहान मुलांसाठी माझ्याकडून बरंच लिखाण झालं. छोटया मुलांसाठी अनेक कविता मी त्या वेळी लिहिल्या.

आठएक दिवसापूर्वी दैनिक लोकमत मधूनच प्रकाशित झालेली -

Wednesday, 11 June 2014

social media and sex : सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग २

चार सहा दिवसापूर्वी मी सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग १  हा लेख लिहिला होता. एवढ्या काळात जवळ जवळ चारशेहून अधिक रसिकांनी तो लेख वाचला. त्यातील उद्बोधक चित्रे मी फेसबुकवरही लोड केली होती. पण कुठेही मला ना एकही Like मिळाली ना प्रतिक्रिया. याचे दोन अर्थ निघतात…… एक तर माझे विचार रसिक वाचकांना पटले नाहीत किंवा आपल्याला आपल्या मुलांची,  भावी पिढीची काळजी नसावी.

Tuesday, 10 June 2014

Love Poem : “ तू प्रेमच होऊन ये…"

ती पावसात भिजत तिची वाट पाहत उभी. क्षणानं मागून क्षण गेले……………क्षणांचे तास झाले. ती त्याची वाट पाहून थकून गेलेली……………कासावीस झालेली ……… त्याच्या ओढीनं अवघी व्यापून गेलेली.

आकाशात गच्च काळे ढग भरून आलेले……….संधीप्रकाश लोप पावलेला. भिरभिरणारा वारा………….निवांत एकांत. पण ती....……तो मात्र अजूनही नजरेच्या पल्याड. आभाळ मात्र जड झालेलं………कुठल्याही क्षणी बरसेल असं. पण पाऊसही तसाच  त्याच्यासारखाच हव्या त्या क्षणाला न येणारा………….हूर हूर लावणारा. या क्षणापर्यंत यायलाच हवा होता तो. पण तो तर दूरवरही कुठे दिसेना.

Monday, 9 June 2014

Love Poem : मिठी पडावी पहाट वेळी

मराठी साहित्यात कुणाविषयी सर्वात अधिक लिहिलं गेलं असेल ? एक तर परमेश्वराविषयी आणि त्यानंतर तिच्याविषयी. परमेश्वरानंतर सर्वव्यापी कोण असेल तर ती. सहाजिकच कलावंत मग तो कुठलाही असो. कवी असो, लेखक असो, चित्रकार असो, शिल्पकार असो, प्रत्येकजण तिलाच साकारण्याचा प्रयत्न करतो. कुणी शब्दातून………कुणी रंगातून………प्रमाण बद्धतेतून……….कुणी कशातून………….तर कुणी कशातून. पण आस एकच………तिला साकारण्याचा. तिला साकारत असताना तिच्यात रमून जाण्याचं.

Saturday, 7 June 2014

social media and sex : जागरण गोंधळ आणि चावटपणा


जागरण गोंधळ. हिंदू संस्कृतीनुसार हि खंडोबाची पूजा. खंडोबाचा दरबाराच असतो हा. प्रत्यक्ष देवाचा. या दरबारात वाघ्या, मुरुळी असतात. टिमकीची तिडतीड असते. तुणतुण्याची तुणतुण असते. संभळाचं घुमणं असतं. आणि त्या सगळ्या तालावर मुरळीच थिरकणं असतं. हे सगळं रात्रभर सुरु असतं. इंद्राच्या दरबारात नाचणारी मेनकाच वाटत असते ती मुरळी. हे सारं छान वाटत असतं. पण त्यात मध्येच तमाशा सुरु होतो. अगदीच तमाशा नव्हे पण तमाशातल्या वगात असते तशी चावट जुगलबंदी. ती नकोशी वाटते. त्यातल्या काही शाब्दिक चावटपणाची उदाहरणं खाली देणारच आहे.

Friday, 6 June 2014

social media and sex : सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग १

आजकाल मुलं आठ दहा महिन्यांची झाली कि त्यांच्या हातात मोबाईल दिसू लागतो. बाबा ऑफिसात असतात. त्यांचा फोन येतो. " चला, बाबांशी बोला. ह्यालो म्हणा बाबांना. बाबांना म्हणावं जेवलात का ? " असं म्हणत आई आठ दहा महिन्याच्या बाळाच्या कानाशी मोबाईल धरते. आणि इथून मुलांची मोबाईलशी ओळख होते.

Poem For Kid's : पाटी तेवढी खरी वाटते


वर्षभर अभ्यास केला. परिक्षा आली. परिक्षा दिली. पेपर खुप सोपे गेले. परिक्षा संपली. सुटी लागली. मामाच्या गावाला गेलो. सूर पारंब्या खेळलो. विटी दांडू खेळलो. आट्यापाट्या खेळलो. खूप मजा केली. पण आता सुटीचाही कंटाळा आलाय. पुन्हा शाळा हवीशी वाटू लागलीय.

हो खरंच असं होतं. मुलांना सुटीचाही कंटाळा येतो. त्यांना शाळा सुरु व्हावीशी वाटते. शाळेतल्या मित्रांना भेटावसं वाटतं. नवी पुस्तकं घ्यायची असतात..... नवं दप्तर घ्यायचं असतं...... नवे बुट.... नवे मोजे. सारं सारं……नवं कोरं.

Thursday, 5 June 2014

Mrathi Poem : मला झाड व्हायचं

पर्यावरण दिन नव्हे पर्यावरण चिरायू होवो.

माझी मोर आणि लांडोर हि कविता रसिकांना खुप आवडली होती. खरंतर कविता नव्हतीच ती चारोळीच होती. पण तरीही एकाच दिवसात ३०० हुन अधिक रसिकांनी हि कविता वाचली होती. कारण स्त्री पुरुषांना परस्परांविषयी वाटणाऱ्या आकर्षणावर या चारोळीतून अत्यंत चपखल भाष्य करण्यात मी यशस्वी झालो होतो.

मोर आणि लांडोर या कविते एवढीच मला माझी " मला झाड व्हायचं " हि कविताही आवडते.

Monday, 2 June 2014

SSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन ?

खाली बारावीचं मुल्यांकन मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या साईटचा पत्ता आणि SMS कुठे आणि कसा करावा ते सांगितलाय.

Result या शब्दाचा मराठी अनुवाद निकाल. पण निकाल या शब्दाला मराठीत किती छटा आहेत ? निकाल लागणे या वाक्य प्रयोगातून कोणताच चांगला अर्थ प्रतित होत नाही. त्यातून नैराश्य आणि नकारात्म्कताच प्रतीत होते. काय लागला का निकाल ? असं एखादयाला विचारलं तरी निकाल चांगला असेल तर ठिक. नाहीतर खजील व्हायलाच होतं. न्यायालयीन खटल्यांच्या संदर्भात किंवा प्रौढ व्यक्तींच्या संदर्भात तो शब्दप्रयोग ठिक आहे.  त्यामुळेच शालेय शिक्षणाच्या Result च्या संदर्भात तरी ' आज दहावी बारावीचा निकाल ' असा वाक्यप्रयोग न करता ' आज दहावी बारावीचं मुल्यांकन' असा करावा.

Sunday, 1 June 2014

Poem for Kids:एक होतं वांगं

हि कविता आजच्या दैनिक लोकमतच्या 'सुटी  रे सुटी' या सदरात प्रकाशित झाली आहे.  कविता खुप साधी सोपी आहे कि हिच्या विषयी फारसं काही लिहित नाही. याचा अर्थ

Police and traffic : धंदा ??????सर्वसाधारणपणे आपल्या व्यवसायाला कोणीही सभ्य माणूस ‘ धंदा ‘ म्हणत नाही. अगदी खऱ्या अर्थाने ती व्यक्ती धंदा करीत असली तरी ती, ' मी व्यवसाय करतो.' असंच सांगते. आणि एखादी महिला तर चुकुनही तिच्या नोकरीला, व्यवसायाला ' धंदा ' म्हणणार नाही. अशाच आपल्या नोकरीला धंदा संबोधणाऱ्या एका महिलेची हि  गोष्ट.

असो. यावर मी कितीही चर्चा केली तरी यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण त्यातल्या ‘ बाईच्या धंद्याची ‘ गोष्ट अधिक महत्वाची आहे.