युती तुटली आघाडी बिघडली. आणि बघता बघता विधानसभेची सगळी गणितच बिघडली. गेली दहाबारा दिवस मी राजकीय घडामोडींवर लिहितो आहे. माझं लिखाण रसिक वाचकांच्या पसंतीस उतरतं आहे. युतीचा आणि आघाडीचा काडीमोड झाल्यानंतर आता प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला समोर जाणार आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांसोबत मनसेही रिंगणात आहे. त्यामुळेच विधानसभेच्या पोटी पाच मुलांनी जन्म घेतला आहे असे मला वाटले. आणि त्याच कल्पनेतून माझ्या या राजकीय वात्रटिकेने जन्म घेतला. मला विश्वास आहे रसिक वाचकांना हि राजकीय वात्रटिका नक्की आवडेल.
या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Sunday 28 September 2014
Saturday 27 September 2014
Friday 26 September 2014
Thursday 25 September 2014
Shiv Sena , BJP, Gopinath Munde : मुंडेंनी जोडलं उद्धवरावांनी तोडलं
होणार म्हणता म्हणता युती तुटली. घडू नये ते घडलं. चुकलं कुणाचं हे मतदार ठरवतीलच. परंतु पंधरा दिवसांच्या अनेक चर्चा झाल्या. आणि मिशन १५० प्लस घेऊन मैदानात उतरलेले उद्धव ठाकरे सत्ता मिळाल्याच्या थाटात १५०च्या खाली उतरले नाही. नवनवे फोर्म्युले मित्रपक्षांसमोर ठेवताना उषाव ठाकरेंनी कधी भाजपाच्या जागा कमी केल्या तर कधी घटक पक्षांच्या. मुख्यमंत्रीपदाचा आग्रही त्यांनी धरला होताच. कशासाठी हा अट्टहास ?
Wednesday 24 September 2014
Tuesday 23 September 2014
Shiwsena, BJP, Narendra Modi : शिवसेनेने माघार घेतली नाही तर ?
कुणी काही म्हणालं तरी शिवसेना - भाजपा युती तुटणार नाही असा मला विश्वास आहे. शिवसेना का माघार घेईल आणि कोणत्या अटी घालेल याविषयी मी माझ्या
Indian Politics : शिवसेना माघार घेईल पण का आणि कशी ?
या लेखात विस्तारानं लिहिलं आहे. पण समजा शिवसेनेने माघार घेतलीच नाही तर ?
Sunday 21 September 2014
Shiv Sena, BJP, NCP : हे कसलं मिशन ?
काय चाललंय हे आमच्या नेत्यांच ? अर्ज भरायला अवघे पाच दिवस राहिलेत आणि चारी प्रमुख पक्षांचा जागा वाटपाचा घोळ अजुन मिटत नाहीये. चुकतंय कुणाचं हे मतदारच ठरवतील आणि त्याप्रमाणे ज्याला त्याला धडा शिकवतील. परवा मी माझ्या
Indian Politics : स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा
या लेखात स्थानिक पक्षांच्या स्वार्थी प्रवृत्तीबद्दल लिहिलं होतं. आणि आज शिवसेनेचं मिशन १५० प्लस असो अथवा राष्ट्रवादीची १४४ जागांची मागणी असो. काय दिसतंय यातनं ? शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा स्वार्थीपणाच ना !
उद्धव ठाकरेंच मिशन १५० प्लस आलं कुठून ?
Friday 19 September 2014
Shiv sena, BJP, Congress : शिवसेना माघार घेईल पण का आणि कशी ?
अर्ज भरण्याचे दिवस जवळ आलेत. आणि अजूनही युतीच्या जागा वाटपाच कोडं सुटलं नाही. राजेशाही थाटात उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुका झाल्यापासून भाजपावर दबाव टाकायला सुरवात केली होती. आणि भाजपानं निम्म्या जागांवर दावा सांगण्या अगोदर पासून शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगायला सुरवात केली होती. पण आता युती शेवटचा आचका देत असताना उद्धव ठाकरे काढा घ्यायला तयार होतील असं दिसतय. पण का आणि कोणत्या अटीवर ते पाहू.
Thursday 18 September 2014
BJP, Shiv sena, congress : स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा
खरंतर स्थानिक पक्षांच्या राजकारणाविषयी मला नेहमीच शंका येते. या विषयी मी माझ्या काही लेखातून यापूर्वी थोडं बहुत लिहिलं आहे. परंतु आज याविषयी तातडीने स्वतंत्र लेख लिह्ण्याला कारण आहे. झालं काय! मी परवा
BJP, Shiwsena : असं असावं युतीच्या जागा वाटपाचं सुत्र.
हा लेख लिहिला. त्या लेखाला ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यातील एक प्रतिक्रिया मला मुर्खात काढणारी होती ती अशी -
Wednesday 17 September 2014
BJP, Shiv sena, congress : टोलचा झोल , आघाडी सरकार आणि अजित पवार
राष्ट्रवादीची पहिली प्रचार सभा पार पडली. ' आता माझी सटकलीय. ' असं अजित पवारांची सांगण्याची काहीच गरज नव्हती कारण त्यांची नेहमीच सटकलेली असते हे मतदारांना माहित आहे. आश्वासनांची खैरात वाटायची हि आघाडीची नेहेमीची पद्धत. असं करूनच आघाडीनं गेली पंधरा वर्ष महाराष्ट्रात्या मतदारांना मुर्ख बनवलं आणि महाराष्ट्रावर राज्य केलं. आम्ही सत्तेत आलो तर असं करू आणि तसं करू असं म्हणण्याचा आघाडीला अधिकार आहे का ?
Tuesday 16 September 2014
Narendra Modi, BJP : मोदींची क्रेझ संपली का ?
बिहारची पोटनिवडणूक झाली. भाजपाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. नितीश आणि लालूंनी आपापली पाठ थोपटून घेतली. आता नुकताच विविध राज्यात पार पडलेल्या विधानसभा आणि लोकसभा पोट निवडणुकीचा निकाल हाती आलाय. मोदींचा प्रभाव संपलाय असा सुर विरोधकांनी विविध वाहिन्यांवर लावून धरलाय. पण खरं काय खरंच मोदींचा प्रभाव संपलाय ?
Monday 15 September 2014
Friday 12 September 2014
Marathi Blog Directory : तुमचा ब्लॉग जोडा
मित्रहो,
'रिमझिम पाऊस ' हा ब्लॉग, ब्लॉगची डिरेक्टरी नाही. हा तुमच्या ब्लॉग सारखा एक सामान्य ब्लॉग आहे. परंतु आमच्या बरोबर इतर लेखकांच लेखन वाचकांपर्यंत पोहोचवलं किती बरं होईल या हेतूनच आम्ही इतर लेखकांचे ब्लॉग ' रिमझिम पाऊस ' ला जोडण्याचे ठरवले आहे. यामुळे आमच्या ब्लॉगला भेट देणारे बहुसंख्या वाचक आपल्या ब्लॉगला भेट देतिल. याशिवाय आम्ही आपला ब्लॉग नियमितपणे तपासणार असल्यामुळे आम्ही आपल्या ब्लॉगला वरचेवर भेट देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक फार छोटीशी गोष्ट करायची आहे.
'रिमझिम पाऊस ' हा ब्लॉग, ब्लॉगची डिरेक्टरी नाही. हा तुमच्या ब्लॉग सारखा एक सामान्य ब्लॉग आहे. परंतु आमच्या बरोबर इतर लेखकांच लेखन वाचकांपर्यंत पोहोचवलं किती बरं होईल या हेतूनच आम्ही इतर लेखकांचे ब्लॉग ' रिमझिम पाऊस ' ला जोडण्याचे ठरवले आहे. यामुळे आमच्या ब्लॉगला भेट देणारे बहुसंख्या वाचक आपल्या ब्लॉगला भेट देतिल. याशिवाय आम्ही आपला ब्लॉग नियमितपणे तपासणार असल्यामुळे आम्ही आपल्या ब्लॉगला वरचेवर भेट देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक फार छोटीशी गोष्ट करायची आहे.
Sunday 7 September 2014
Mother's Day : अशीही एक आई
जगातला सगळ्यात ' प्राईम सब्जेक्ट ' कोणता असेल तर आई. काय दुर्दैव आहे पहा ! मी स्वतःला मराठी म्हणवतो आणि लिहायला सुरवात केल्यानंतर आधी ' प्राईम
सब्जेक्ट ' ला ' प्राधान्य विषय ' हा प्रती शब्द आठवत नव्हता. म्हणून आधी प्राईम
सब्जेक्ट असा शब्दप्रयोग केला होता. आज ' मदर्स डे ' नाही पण आईविषयी लिहायला दिवस कशाला हवा !
Saturday 6 September 2014
Friday 5 September 2014
Tuesday 2 September 2014
पंचवीस लाखाचं बाथरूम !
आपल्याकडे खूप पैसे असावेत असं प्रत्येकाला वाटतं. अगदी मलाही. पण कशासाठी ? बऱ्याचदा आपलं आयुष्य सुखकारक करण्यासाठी. मलाही खुप पैसा हवा आहे. पण तो सुखासाठी नव्हे. समाजासाठी काहीतरी करता यायला हवं म्हणून. दहा वर्षापूर्वी आठ दहा लाखात मिळणाऱ्या वन बीएचके घराची किंमत आता २५ - ३०लाख झालीय. खरंच परवडतं असं घर घेणं ? इथं आपण २५-३० लाखाचं घर परवडतं कि नाही असा विचार करतो आणि परवा मी एका गृहस्थांच्या घरात अत्यंत देखणं बाथरूम पाहिलं. काय नव्हतं त्यात. अंघोळीसाठी जेजे हवं ते सारं होतंच, स्टिम बाथची सोय होती. गिझर तर होताच होता. पण टिव्ही होता, इंटरनेट होतं. सारं काही स्वयंचलित. मला फार अप्रूप वाटलं. न राहून त्या गृहस्थांना ' बाथरुमला किती खर्च आला ? ' असं विचारलं.
Monday 1 September 2014
Subscribe to:
Posts (Atom)