Monday 28 July 2014

Money From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १


Online Money/ Money From Blog
Online Money/ Money From Blog
( ब्लॉग  लिहून पैसे मिळवता येतात हे सत्य आहे. पण मी तुम्हाला फार झाडावरही चढवणार नाही आणि खडयातही पडू देणार नाही. यातले फायदे आपल्यासमोर ठेवावेत पण त्याच बरोबर धोकेही आपल्या नजरेस आणून दयावेत म्हणून हे लेखन. कृपया बारकाईन वाचा. शंका असल्यास संपर्क साधा. ) 

Earn Money from your Blog. - Part 1


Earn online money
Earn Money From Your Blog
Internet is know at our door step. Many of us using it. peoples are very familiar with computer Knowledge. Many peoples even not related with the simple word like Google search, blog, etc. But now a days Google became social life. People interacting with each other on social media like facebook, twitter, whatsapp' etc.  All these thing are now on the finger of the children.

Saturday 26 July 2014

Dancing Jockers : बहुरूपी नाचे

Dancing jocker
Dancing jocker
मला स्वतःला नाचता येत नाही. त्यामुळे मनात आणलं तरी माझी बायको मला नाचवू शकत नाही. पण आजकाल नाचणं आणि नाचवणं सार्वजनिक झालंय.  बायको नवऱ्याला नाचवते, नवरा बायकोला खेळवतो, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसला नाचवू पहाते तर शिवसेना भाजपला ठुमकायला लावू इच्छिते. 
वरातीत आणि मिरवणुकात नाचणं आता प्रतिष्ठेच मानलं जातं. तर अशा ठिकाणी चारचौघात नाचता आलं  नाही तर फारच खजील व्हायला होतं.  

पण परवा एका लग्नात मी दोन बहुरूप्यांना नाचताना पाहिलं आणि त्यांच्या नाचावर मी जाम खूष झालो तो व्हिडीओ खाली लोड केला आहेच. पण तरीही नाच या प्रकाराविषयी मला थोडसं अधिक लिहिणं गरजेचं वाटतं आहे. 

How To give Comment to blog post : प्रतिक्रिया ( Comment ) कशी दयावी ? भाग - २ ( ब्लॉगर वरील ब्लॉगला )

Comment To Blog
Comment To Blog
( तुम्ही वाचक असा अथवा ब्लॉगर ही आणि या संदर्भातील पुढच्या पोस्ट जरूर वाचा.)

पहिल्या भागात मी ब्लॉगर मित्रांना आणि रसिक वाचकांना वाचलेल्या ब्लॉगला प्रतिक्रिया देण्याची इच्छा  असतानाही का देता येत नसावी या बाबत लिहिलं होतं. 

या भागात प्रतिक्रिया देण्यासाठी काय काय करावं लागतं याविषयी लिहिणार आहे.

How to give the comment to Blog ? Part - 2 ( Blogger )


Comment To Blog
Comment To Blog
In the first article i discuss on many point and conclude that bloggers and readers wish to comment to the blog they read. But they may don't know the process. So in this part I am writing about the process of giving comment to the blog.  

Friday 25 July 2014

How To give Comment to blog post : प्रतिक्रिया ( Comment ) कशी दयावी ? भाग - १

Comment To Blog
Comment To Blog
( तुम्ही वाचक असा अथवा ब्लॉगर ही आणि या संदर्भातील पुढच्या पोस्ट जरूर वाचा.)

इंडीब्लॉगर ही विविध भाषांमधील ब्लॉगची संग्रहिका ( directory ) आहे. यात मराठी भाषांमधील ब्लॉगसोबत इंग्लिश, हिंदी, कन्नड, तेलगु अशा विविध भाषांमधील ब्लॉग पहायला मिळतात. यातील इंग्लिश भाषांमधील ब्लॉगला भेट दिल्यांनतर दोन - तीन तासांच्या कालावधीतच त्या ब्लॉगला तीनशेहून अधिक वाचकांनी भेटी दिल्याचे व ७० ते ८० प्रतिक्रिया ( comment ) मिळाल्याचे मी अनेकदा पहिले आहे. परंतु मराठी भाषांमधील ब्लॉगला मात्र केवळ ५० च्या आसपास वाचक व एखादी दुसरी प्रतिक्रिया मिळाल्याचे मी पहातो. मराठी ब्लॉगला मराठी विश्व या व्यासपीठावरून सर्वात अधिक वाचक मिळतात. पण कित्येक ब्लॉगला तर महिनोमहीने एकही प्रतिक्रिया मिळत नाही. 

How to give the comment to Blog ? Part -1

Comment To Blog
Comment To Blog
 indiblogger is the blog directory of Indian blogger. This blog directory contains blogs in all Indian language.When i visit indiblogger and went through different blog in English and Marathi language. I have seen the difference between the Marathi and English blogs. This difference is not only regarding the content of the blog but also in design, daily visitors and the comments of readers to the blog. 

Thursday 24 July 2014

Dancing Horse : नाचणारा घोडा

( मी अनेक लग्नात घोड्याचा नाच पाहिला आहे. पण परवा माझ्या पुतण्याच्या लग्नात मी पाहलेला घोडयाचा नाच थक्क करणारा होता. त्याचा व्हिडीओ खाली आहे. ) 
नृत्य हि कला माणसाची. इतर कोणताही प्राणी मानवा इतकं सुरेख नृत्य करू शकत नाही. पण आपल्या बरोबर इतर प्राण्यांना नाचायला लावण्यात माणसाला फार मजा वाटते. माकड हा माणसाच्या या हौसेला बळी पडणारा एक प्राणी. पण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी माणसानं माकडाला जसं भरीस घातलं तसंच तसंच इतर प्राण्यांना. त्यासाठी कुणाला नाचायला लावलं, कुणाला धावायला लावलं, कुणाच्या झुंजी लावल्या, तर एखाद्या प्राण्याबरोबर स्वतःच झुंजी घेतल्या.  

Wednesday 23 July 2014

Paintings of Nature : दुबळा प्रयत्न


अशा या रिमझिम धारा, निसर्गाचं हिरवं रूप आम्हा शहरवासियांच्या नशिबी नाहीच. आम्ही सतत सिमेंटच्या जंगलात हरवलेले. कधी कधी वाटतं आमच्या घरांपेक्षा कोंबड्यांची खुराडीही बरी. त्यांनाही दिवसभर मोकळा श्वास घेता येतो. पण आम्ही मात्र फ्ल्याट नावाच्या खुराड्यातून निघतो आणि ऑफिस नावाच्या कत्तलखान्यात जातो. आपलंच रक्त शोषल जाताना आणि आपलीच कातडी सोलली जाताना पाहतो. पुन्हा

Sunday 20 July 2014

Photographs of Miss India : मिस इंडिया

माझ्याकडे फार चांगला कॅमेरा नाही. खिशात असणाऱ्या मोबाईलचा कॅमेरा हेच माझं साधन. त्या कॅमेऱ्याचा पिक्सलही मी कधी विचारात घेत नाही. एखादी फ्रेम डोळ्यात बसली कि ती मी माझ्याजवळ असेल त्या कॅमेऱ्यानं शूट करतो पण त्याच कॅमेऱ्यानं मला हा असा मिस इंडियाचा फोटोही शूट करता येईल याची मला कल्पना नव्हती . तो हा फोटो -

Saturday 19 July 2014

Social Media and sex : सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग ४

 ( कृपया लेख पूर्ण वाचा. माझ्या मुलाचं आहे म्हणून नव्हे पण शेवटचं उदाहरण आवर्जून पहा.)

सोशल मिडिया आणि अश्लीलता या विषयावर लिहावं तितकं थोडं आहे. पण तरीही आज चौथा भाग लिहून हा विषय मी माझ्यापरीनं संपवणार आहे. या भागात मुलांना मोबाईल पासून दुर कसं ठेवावं याविषयी लिहिणार आहे. यानंतरही वाचकांनी हि बाब गांभीर्यानं घेतली नाही तर आपलंच भविष्य धोक्यात येणार आहे. कारण अनेक सेक्सियुल वेब साईट्स ना व्हिव आणि लाईक करणाऱ्यांची संख्या लाखात आणि कोटीत असते आणि त्यात आपलीही मुलं असु शकतात.

Friday 18 July 2014

Photgraphs of Nature : संधीकाली या अशा

हे दोन्ही फोटो आहेत पवना धरणाच्या परिसरातले.





कधी कधी वाटतं

Thursday 17 July 2014

In love with her : तुम्ही ‘ तिला ‘ रब मानता ?

ती खरंच आपल्या स्वप्नांचं आभाळ असते. तिच्यासाठीच घेत असतो आपण प्रत्येक श्वास………ती जगण्याच्या प्रत्येक क्षणाची आस……….आपल्याला हवी असते तिची आपल्या भोवतालची दरवळ………तिचा सहवास. तिच्या सहवासात आपण अनुभवतो प्रत्येक क्षणाला उमलत जाणारं आपलं आयुष्य. ती म्हणजेच आनंदाचा प्रत्येक क्षण…..ती आयुष्यातला हर्ष.

Sunday 13 July 2014

Love Poem ; तिची पाऊले झेलून घ्याया

ती अशी कशी येते आपल्या आयुष्यात आणि व्यापून टाकते आपल्याला……..प्रत्येक श्वासागणिक तिचा ध्यास…….जगावंसं वाटण्याच्या प्रत्येक क्षणाला तिचा भास………असं असतं काय तिच्यात ??  हे कधीही न कळलेले आपण एक अजागळ. पिंजरा मधला मास्तरच होऊन जातो आपण. तहान भूक हरवलेले……..स्वतःच्या कर्तुत्वाची उंची विसरलेले.


Saturday 12 July 2014

Indian Politics : काँग्रेस वयात कधी येणार ?

शहाणं होणं म्हणजे वयात येणं. वयात येणं म्हणजे शारिरीक, मानसिक आणि परिपक्वता येणं. मुलींचा संदर्भ देऊन सांगायचं झालं तर शहाणं होणं म्हणजे ऋतुप्राप्ती होणं. काँग्रेसनं या देशावर साठहून अधिक वर्ष राज्य केलं पण काँग्रेस अजुनही वयात आली नाही. खऱ्या अर्थानं शहाणी झाली नाही.

Wednesday 9 July 2014

Love and Friendship : श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री ?”

किती दिवस झाले तुझं पत्र नाही………फोन नाही………..अगदी साधा यस एम यस नाही. रागावलीस ना माझ्यावर ? कशासाठी पण ? आजवर तुझ्या माझ्या ज्या नात्याला तू ‘ मैत्री ‘ म्हणत होतीस त्याच नात्याला मी ‘ प्रेम ‘ म्हणालो म्हणून ?

Sunday 6 July 2014

Love : मला चुरमुरे, तुला फरसाण


आम्ही जेवायला बसलो होतो. जेवता जेवता सहज आठवणी निघाल्या. म्हणजे बायकोनं काढल्या. नाही तरी बायकांना चघळायला सतत काहीतर विषय हवाच असतो.

बायको म्हणाली, ” आशु तिच्या मुलांची किती काळजी घेते, नाही का हो ? “  अशा प्रश्नाला हो म्हणावं नाही म्हणावं काही कळत नाही. कारण हो म्हणावं , " मी आपल्या मुलांची काळजी घेत नाही का ? " असा प्रतिप्रश्न येणार. आणि नाही म्हणावं तर , " असे कसे हो तुम्ही ? तुम्हाला तुमच्या बहिणीचही कौतुक कसं नाही.? " अशा आडकित्यात मान सापडायला नको म्हणून प्रश्न कानामागेच ठेवून आम्ही आपले जेवण चघळत होतो.

Saturday 5 July 2014

Sms : दिमाग का दही


मी माझ्या ब्लॉगवर इकडे तिकडे वाचेले  विनोदी SMS टाकतो. खरंतर हे SMS अनेकांनी कुठे ना नक्कीच वाचलेले असतील. तरी असे SMS मी पुन्हा माझ्या ब्लॉगवर टाकून काय साधणार कि नुसत्याच पोस्ट वाढवणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यावर मी एवढंच सांगेन कि हे SMS तुमच्यासोबत शेअर करताना त्यावर थोडं भाष्य करावं आणि वाचकांना सामाजिक चिमटा काढावा. 

Friday 4 July 2014

Love Letter : आईनस्टाइनचा सिद्धांत आणि प्रेमपत्र


तुझं पत्र वाचलं.

तू लिहिलंस, " किती दिवस झाले पत्र पाठवलं नाही " मी खुप दिवसात तुला पत्र पाठवलं नाही म्हणजेच मला तुझा राग आला असावा अशी शंकाही येतेय तुला. आणि ती तू पत्रात बोलूनही दाखवली आहेस.

वेडूबाई, राग वगैरे असं काही नाही. आणि त्याहीपेक्षा खरं सांगू पुरुषांना रागावताच येत नाही.

Wednesday 2 July 2014

Sms : काट सकता है

 आजकाल तरुणाई मधे sms ची खूप मोठी क्रेझ आहे. खूप गंमतीशीर sms पहायला मिळतात.  याला त्याला आलेले, कुठे कुठे वाचलेले असे sms संग्रहित करावेत या हेतूनं हे सदर सुरु केलंय. आपल्या मित्रांची खूप मजेशीर फिरकी घेणारे sms यात पहायला मिळतात. अनेकदा हे sms मार्गदर्शकाची भूमिकाही बजावतात. फिरकी घेणारे sms मैत्रीत अंतर निर्माण करू शकत नाहीत पण मार्गदर्शक sms मैत्री अधिक दृढ करतात हे मात्र नक्की.  

असाच हा एक sms. -