Tuesday 12 September 2017

टॉप मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट आणि बॉटम लाईन ( Top Management, Middle Management and Bottom Line )

top management, middle management and bottom linet

story of Indian management

काल One Cruise या कंपनीच्या एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. टुरिझमशी रिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी हि अग्रेसर कंपनी. मुळात आपल्या ऑफर कस्टमर समोर मांडणं आणि आपले लाईफ टाईम सभासद वाढवणं हा त्यांच्या या कार्यक्रमाचा हेतू.

मला हँडेल  करणारा तरुण साधारणतः चोवीस - पंचवीसचा. ग्रामीण भागातून आलेला. आई वडील शेतकरी. शिक्षण BE Mechanical. MS करण्यासाठी जर्मनीला जाण्याची महत्वकांक्षा बाळगणारा. पण घरची परिस्थिती बेताची. म्हणून ते स्वप्नं अडगळीत फेकणारा.

त्यानं आजच्या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.

एक मेकॅनिकल इंजिनीअर हे असलं काम करतोय हे पाहून मला कससंच झालं. मी त्याला त्याचं शिक्षण विचारलं होतंच. तोच धागा पकडुन  मी म्हणालो, " BE झालास मग हा असला जॉब का करतोस ? "