Thursday, 29 December 2016

नोटबंदी : त्रास कुणाला ? जाच कुणाला ? ( ban of currncy : Who is troubled? Check out who? )


आपली सामाजिक मानसिकता अशी आहे कि आपण जिंकलो यापेक्षा आपल्याला दुसरा हरला याचा अधिक आनंद होतो. आणि म्हणूनच मोदींची पन्नास दिवसांची मुदत संपत आलेली असताना आज दैनिक सामनानं ' नोटबंदीचा निर्णय फसला ' असं सांगत आनंद व्यक्त केला. तर

Monday, 31 October 2016

का उगा मी झुरतो ( love poem : Why am I brood )

मराठी प्रेम कविता , प्रेम कविता , love poem


आपण तिच्यावर खूप प्रेम करत असतो.
आपल्या मनातल्या सगळ्या भावनांचा पसारा आपण तिच्या पुढ्यात मांडतो.
पण ती .......
ती मात्र मी त्या गावीची नाही.
आपला तिचा काही संबंध नाही अशा थाटात आपल्या भावना नजरे आड करते.

Saturday, 29 October 2016

ढंमप्या - भाग ३ ( my dog : dhampya part 3 )

गडी गेले पण ढंमप्या राहिला माझ्याजवळ. माझ्यातली अर्धी चतकोर खायचा. पण कमी पडतय म्हणून त्यानं  कधी तक्रार केली नाही आणि माझी साथ सुद्धा सोडली नाही.

मी घरी असलो कि भाकर तुकड्याच्या आशेने हा दुसऱ्याच्या दारात जाईल तेवढाच. अन्यथा मी घरात असलो कि हा सतत घरासमोर बसून रहायचा. रात्री मी दार लाऊन झोपलो तरी भालदारासारखा हा बाहेर अंगणातच पसरायचा. पण एकदम जागरूक. जरा कुठं धस्स S S S झालं कि

Monday, 24 October 2016

अरे शिक्षण शिक्षण ( Marathi Poem : what a education )

मराठी कविता , Marathi Poem


एक मित्र सांगत होता कि पुण्यातल्या एका नामंकित इंग्रजी शाळेत नर्सरीची फी आहे तब्बल ४२००० रुपये. मागे कुठल्या एका महाराष्ट्रातल्या सत्तेवरील सरकारनं मुलींना बारावी पर्यंतचं विनामूल्य शिक्षण जाहीर केलं होतं. पण

Tuesday, 11 October 2016

विजयादशमीसाठी शुभेच्छा पत्रे ( greeting for Vijaya Dashami )

दसऱ्यासाठी शुभेच्छा पत्रे , Greeting cards for Dasaraउशीर झालाय खरा. पण इकडून तिकडून उचलेलं शुभेच्छा पत्र पोस्ट कार्ड पोस्ट करण्यापेक्षा मला नव्यानं तयार केलेलं शुभेच्छा कार्ड पोस्ट करायला आवडतं. अर्थात पार्श्वभूमी गुगलवरनंच घेतलेली असते. पण

Monday, 10 October 2016

पाऊस गेला शाळेमध्ये ( Marathi poem : Rain has gone to school )

marathi poem , poem for kids,

परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला सांगितलीय.” मोठेपण नाही सांगत पण या एवढ्याश्या पोरटयांनाही माझ्या कविता आवडतात आणि कळतात ही.

Thursday, 22 September 2016

मराठा क्रांती मोर्चा ? हि कसली क्रांती ? ( Maratha Kranti Front? Is it revolution?)


Marataha Kranti morcha ?

गेली पंधरा दिवस मिडियात मराठी क्रांती मोर्चाची खूप चर्चा आहे.लाखा लाखाचे आकडे राजकीय व्यासपीठाला हादरे देत आहेत असं भासवलं जात आहे. पण आपल्या झुंडशाहीला क्रांतीच नाव देणारी हि जात पाहिली कि 

Tuesday, 20 September 2016

मनं सैर भैर ( status of mind )

Marathi Poem , Love Poem

सैर भैर मन , sair bhair man


परवा एक पन्नाशीचा मित्र भेटला आणि म्हणाला , " अरे यार , मी प्रेमात पडलोय. खूप सैरभैर झालोय. काय करावं कळत नाही. इत्यादी ......इत्यादी. " माझ्या मनात लगेच चक्र फिरू लागली. विचारांची गर्दी झाली. पन्नाशीचा हा. कडेला आलेला संसार. सुसंस्कृत मुलं. काय गरज होती आपल्याला या वयात प्रेमात पडायची ? हे स्वतःला त्याच्या ठायी समजून माझंच माझ्याशी चाललेलं भांडण. आणि मग -

Tuesday, 16 August 2016

बैल गोठ्यात कण्हतो ( ox in Cemetery )


Gramin Kawita, marathi kwita, ग्रामीण कविता

अलिकडे जो उठतो तो शहराकडे धाव घेतो. शिक्षण असो वा नसो पण शहरात जायचं. पडेल ते काम करायचं. मिळेल तेवढा पगार घ्यायचा. जमेल तसं जगायचं. पण शहरात जायचं. आठ तास काम........सोळा तास आराम. शिवाय छान - छोकी. मौज - मजा, हिंडण - फिरणं, झकपक रहाणं, नुसती एैष. ज्याची त्याची भुमिका

Sunday, 7 August 2016

किती जणांना कळतो मैत्रीचा अर्थ ? ( How many people knows what is friendship? )


Friendship, Friendship day

मैत्री विषयी आजकाल कुठून कुठून खूप ऐकायला मिळतं. खूप सुंदर असत ते. whats aap सारख्या प्लॅटफॉर्मवर तर या विषयावर रोज आख्यानं झडतात.

आज लिहायला उशीर झालाय. माझ्या ब्लॉगलाहि अनेकांनी भेट दिली. इकडं तिकडं पोस्ट करण्यासाठी मैत्री विषयी काही सापडतय का ते पाहिलं. म्हणून बसलो लिहायला.

Saturday, 6 August 2016

मोडून घरटे चिमणी गेली ( sparrow has been broken the nest )


Love Poem, Sad Poem ( एका प्रियकराचे विरह गीत )

ती दिसते. ती त्याला हवी हवीशी परीच वाटू लागते. तो हरखून जातो. आयुष्य म्हणजे सुखाचा पेला वाटू लागतं त्याला. ते सुख पिताना त्याची ओंजळही अपुरी पडते त्याला. जेवढं सुख ओठाशी लागतं, त्याची प्रेमाची तहान भागवतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक सुख त्याच्या ओंजळीतून ओसंडून वहातं. पण

Monday, 1 August 2016

ढंमप्या भाग - २

Dog Video, My Dog ( तळाचा व्हिडीओ नक्की पहा . )

 माझे गडी येताना ढंमप्याला सोबत घेऊन आले. पण जाताना मात्र त्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागलं. ढंमप्या माझ्याजवळच राहिला. तीनचार महिन्यानंतर माझ्याकडे दुसरं गडी आला. जातीनं भिल्ल. तीर कामठा जाऊन हाती गलोल आलेला. चार पोर, तीन पोरी, नवरा बायको असं मोठं खटलं. त्याला ठेवताना बरीच माणसं कामाला मिळतील हा माझा हेतू.

ढवळ्या शेजारी बांधला पवळा , वाण नाही पण

Friday, 29 July 2016

फेसबुकवरच्या मैत्रिणीFacebook , friends on facebook

खरंतर या विषयावर लिहावं कि लिहू नये अशा फार मोठ्या संभ्रमात मी होतो. कोणाचे माझ्याविषयी काय समज होतील आणि काय नाही देव जाणे. देव कशाला मलाच काही वेळात कळतील माझ्या लिखाणाचे परिणाम. माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये ज्या थोड्या बहुत मैत्रिणी आहेत. त्या मला कदाचित लगेच डस्टबिनमध्ये टाकतील. टाकू दे टाकलं तर. पण वास्तव मांडायलाच हवं ना.

Friday, 22 July 2016

कशाला हवी हेल्मेट सक्ती ?


Helmet , Voice against Helmet

कालच बातमी वाचली ? ' दिवाकर रावतेंचा हेल्मेट सक्तीचा आदेश. ' म्हणजे पुन्हा हेल्मेट सक्तीचा फास. काय म्हणावं या रावतेंना ? यांनी फेब्रुवारी २०१६ ला असाच हेल्मेट सक्तीचा फतवा काढला होता. तेव्हाही मी लेख लिहिला होता.  दोनचार दिवसांत पोलिसांनी जनतेचा जमेल तसा खिसा कापला. एका दिवसांत पाच लाखांचा दंड वसूल केला. जनतेच्या रेट्यापुढे त्यांना आपला हुकूम म्यान करावा लागला. त्याला अजून सहा महिने व्हायचे आहेत. आणि

Wednesday, 20 July 2016

देव मानू नका

Presence of God. अर्थात देवाचं अस्तित्व. अहो आपल्या अस्तित्वाची आपल्याला खात्री नाही . आजचा दिवस मावळलाय खरा पण उगवता दिवस दिसेल कि नाही याची खात्री नाही. आणि तरीही अलिकडे , ' मी देव मनात नाही. देव नाही.' असं सांगणाऱ्या बऱ्याच मंडळी आपल्या अवती भवती दिसतात. जो दिसत नाही त्याला का मानायचे असे त्यांचे म्हणणे. पण खरेच देव आहे कि नाही ? देव मानावा कि मानू नये ? देव मानणे हि अंधश्रद्धा आहे का ? मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक कोणी स्पष्ट केला आहे का ?

Monday, 18 July 2016

IGP वाल्या नगरयांचा पाहुणचार

Friendship , friends in college

मी परवा पुणेकर आणि नगरकर यांच्यातला स्वभाव विशेष स्पष्ट करणारा एक छोटासा लेख लिहिला होता. आणि मी स्वतः नगरचा असुनही नगरकरांवर काहीशी टीका केली होती. पण माझा लेख खोटा ठरेल असा माझा पाहुणचार माझ्या नगरच्या दोन मित्रांनी केला. त्यातला पहिला भगवान नगरे आणि दुसरा प्रकाश आंधळे. या दोघांना मी कॉलेज लाईफनंतर केवळ दुसऱ्यांदा भेटत होतो. आणि हे कॉलेज लाईफनंतरच लाईफ थोडं थिडकं नव्हे अठ्ठावीस युगे विटेवर उभा राहिलेल्या विठोबाच्या अठ्ठावीस युगांसारखं तब्बल अठ्ठावीस वर्षाचं आहे होतं .

Saturday, 16 July 2016

ढंमप्या


Dog, Pet Animal

लोकं काय काय नावं ठेवतात नाही आपापल्या कुत्र्यांची. मोती काय ? टायगर काय ? लाल्या काय ? शेरू काय ? आणि त्यांची बडदास्त सुध्दा केवढी असते. अशाच एका कुत्र्याला काखेत घेऊन मिरवणाऱ्या बाईला

Friday, 15 July 2016

पुणेरी ते नगरीPropels in Pune and Ahamadnagar

पुणेरी माणूस काहीसा स्थितप्रज्ञ. शिष्ट म्हणायलाही हरकत नाही. असं असलं तरी तो माणूसघाणा मात्र नक्कीच नाही. पण उगाच कुणाला जाऊन खेटणार नाही आणि कुणाला मर्यादेपेक्षा जास्त जवळ सुद्धा येऊ देणार नाही.

पुणेकरांच्या घरात गेलात कि ते , " चहा घेणार ? " असंच विचारणार. विशेष म्हणजे

Saturday, 9 July 2016

Whats App वर कॉमेंट कशी द्यावी ?

How to give comment for Whats App post.

सगळ्या जगाला अडाणी समजून मी हि पोस्ट लिहितोय. पण तसे नाही याची मला जाणीव आहे. हे असं करता येतं याची माहिती मलाच आज झाली. अर्थात हे फिचर फार जुनाट नसून नवीनच आहे. परंतु माझ्यासारखे बापडे बिचारे कोणी असतील तर त्यांच्यासाठी हि पोस्ट आहे. आणि त्याहीपेक्षा मी ज्या चार सहा ग्रुपचा सभासद आहे त्यात कोणी हा पर्याय वापरल्याचे मी पहिले नाही म्हणून मी या विषयावर लिहायला घेतलं.   

Friday, 8 July 2016

कशासाठी हवी पेन्शन ?


Government pension scheme

खरंतर मी या विषयावर लिहिण्याचं काही कारण नाही. पण मग लिहिणार कोण ? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? कुणी तरी हे काम केलंच पाहिजे. एका वर्गाचा रोष कुणीतरी ओढवून घेतलाच पाहिजे. तो कुणीतरी दुसरं कशाला हवा ? मीच का असू नये. म्हणून शेवटी मी या विषयावर लिहायचा निर्णय घेतला. सगळे सरकारी कर्मचारी

Tuesday, 5 July 2016

हेच का शरद पवारांचं जनकल्याण ?
Sharad Pawar, Rashtwadi Congress 

परवा मी फेसबुकवरील लवासा संदर्भातली एक पोस्ट शेअर केली आणि अनेक पवार समर्थकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. आम्ही पवारांच्या विरोधात लिहिले म्हणजे आम्हाला पवारांच्या विषयी आदर नाही हा शोध या पवार समर्थकांना कसा लागला कुणास ठाऊक ? पण

Saturday, 2 July 2016

Marathi Poem : तू तरी पावसा असा


Marathi Poem, Marathi Kawita

( मला खात्री आहे तुम्हाला कविता मनापासून आवडेल. वाचून तर पहा. आणि हो ! प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. )

मी दोन एक वर्षापासून ब्लॉग लिहितोय. त्यातून माझा असा एक वाचक आकाराला आलाय. ते नियमितपणे माझं लेखन वाचतात. प्रतिक्रिया देतात. काही चुकलं माकलं तर सांगतात. कधी एखादी प्रेम कविता लिहा असं हक्कानं सांगतात.  तर कधी एखाद्या राजकीय लेखावरून माझ्याशी दोन हात करतात.

परवा

Thursday, 30 June 2016

पर्स बायकोची आणि तिची


collector , peoples in India

आमच्याकडे आम्ही इनमिन चौघे असलो तरी दाराबाहेर बरेच जोडे असतात. रात्री झोपण्यापूर्वी दार लावताना ते जोडे एक तर मुलं आत घेतात अथवा बायको.  मी त्या जोडयांना हात लावायचा नाही असं आमच्याकडे एक अलिखित नियम आहे. हा नियम मुलांनीच केला आहे. कारण त्यांच्या बूट , चपला मी हातात घेणे त्यांना रुचत नाही.

पंकजा मुंडे यांच्या चपला एका पुरुष कर्मचार्याने हातात घेतल्यामुळे सोशल मिडीयावर बराच गदारोळ माजला होता. पंकजा मुंडे यांच्या ताफ्यात स्त्री कार्यकर्त्या नसतील का ? नक्कीच असतील. पण ती स्त्री त्यांच्या चपला हातात घेण्यासाठी पुढे सरसावली नसेल . कारण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसमोर कमीपणा घेणे सहजासहजी मान्य करत नाही.

मागे मी ' बाईची चप्पल ' हा लेख लिहिला होता आणि रसिकांना तो मनापासून आवडला होता . त्यावर काही उलटसुलट प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.

परवाही असेच घडले.

Tuesday, 21 June 2016

मनी नावाची आई

cat , pet animal , mother , mother's day

मी मागच्या पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे माझा प्रवासही बेताचाच आणि माझं जगही छोटंसंच. पण या लहान जगातही अनेक गोष्टी घडत असतात. आणि मी त्यावर लिहित असतो. मागेही मी ' अशीही एक आई ' या मथळ्याखाली एका आईची कहाणी लिहिली होती. तशीच आणखी एका आईची हि आणखी एक कहाणी.  

Sunday, 19 June 2016

Fathers Day : नको असला बाप

Father's Day , marathi kawita , marathi poem

 

माझं आणि माझ्या वडिलांचं फारसं कधी पटत नव्हतं. पटत नव्हतं याचा अर्थ त्यांचा माझ्यावर अथवा माझा त्यांच्यावर जीव नव्हता असे नव्हे. पण त्यांना वाटायचं ' आपलं कार्टं खुप नाठाळ आहे. ' आणि मला वाटायचं ' आपला बाप नको इतका कडक आहे. ' त्यामुळे

Friday, 17 June 2016

Mrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २

Marathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem

 कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्टीकरण का देतो असा प्रश्न पडत असेल ? हे आम्हाला काय एवढे अज्ञानी समजतात कि काय ? असंही वाटत असेल. पण तुम्ही सारे अत्यंत सुज्ञ  आणि रसिक जाणकार आहात याची मला जाणीव आहे. तरीही

Saturday, 11 June 2016

Marathi Poem : तुझ्याचसाठी


आज मूड एकदम मस्त आहे. का ? कुणास ठाऊक ! पण, खूप दिवसानंतर मनाची हि प्रसन्नता मी अनुभवतो आहे. मूड चांगला म्हणजे किती चांगला असावा ! अगदीच पंख असल्याप्रमाणे मी हवेत उडत असल्याचा भास मला होत होता. किंवा ती पहिल्यांदा आपल्या आयुष्यात आल्यानंतर मनाचं मोरपीस व्हावं ना तसं आज वाटत होतं .

संध्याकाळी चहा घेतला. संध्याकाळी म्हणजे

Thursday, 9 June 2016

Narendra Modi : नमो, नमो

खरंतर मी बर्याच दिवसांत राजकीय पोस्ट लिहिली नव्हती. कशासाठी लिहायची ? जे मोदींच्या पाठीशी आहेत ते आहेतच. पण जे कायम नकार घंटाच वाजवणार आहेत त्यांच्यासाठी माझ्या पोस्ट म्हणजे मोदी भक्ती होती. दोष माझा होता कि त्या तथाकथित मोदी विरोधकांचा हे ज्याचं त्यानं पडताळून पहावं. पण कालचं मोदींच अमेरिकन सिनेटमधलं भाषण ऐकलं आणि मी भारावून गेलो. भाषण ऐकता ऐकताच या घटनेवर आधारित दोन तीन मजेशीर पोस्ट Whats aap वर पोस्ट केल्या.

Sunday, 5 June 2016

Marathi Poem : अंधाराच्या छेडून तारा


माझा प्रवास फार दूरचा कधीच नसतो. माझा प्रवास फारतर बसमधला असतो , एसटीमधला असतो अथवा ट्रेनमधला. तोही शंभर सव्वाशे किलोमीटरच्या आतला. त्यामुळे अनुभवांची शिदोरीही बेताचीच असते. पण मी जे पहातो त्याने माझे मन अनेकदा हेलावून जाते.

बसमध्ये हातवारे करून दिलखुलासपणे चाललेलं मुकबधीरांचं संभाषण आणि बोलक्यांचा अबोला पाहून खरे मुकबधीर कोण ? असा मला प्रश्न पडतो. असाच एक प्रसंग. दोन वर्षापूर्वीचा.

Sunday, 29 May 2016

चिमणा, चिमणी आणि कुबड्या खविस

गावाकडचं घर जुनं. माळवादाचं. वाडाच म्हणतात सगळे त्याला. दुपारची वेळ. रणरणतं ऊन. घरात मी एकटाच. घराच्या मागील बाजूस असलेली झरोकावजा खिडकी उघडी. दारही सताड उघडं. घराबाहेर निरव शांतता. किडा मुंग्या शोधत उन्हात आलेल्या आणि

Wednesday, 25 May 2016

marathi Poem : येगं येगं सरू


मला आठवतय लहानपणी आम्ही सर्व नातवंड रात्री आजी भोवती गोळा व्हायचो. आजी एखादी गोष्ट सांगायची. आणि गोष्ट संपली कि , " चला झोपा बरं आता सगळे. " पण कसलं काय ! आमची खुसपूस चालूच असायची. मग आजी आणखी एक हत्यार बाहेर काढायची. म्हणायची ,

Tuesday, 17 May 2016

marathi movie sairat : मीही सैराट पाहिला


सैराट येऊन पंधरा दिवस झाले. मुलांनी सैराट पाहिला आणि , " बाबा, तुम्हीसुद्धा सैराट पहा . " माझ्यामागे असा घोषा लावला. इकडून तिकडून सगळीकडून सैराटविषयी  ऐकत होतो. पण मला मात्र सिनेमा पाहायला वेळ नव्हता. शेवटी काल वेळ काढला आणि सैराट पाहून आलो. पण

Thursday, 5 May 2016

Marathi Poem : सयेबाई उठं गं


आज बऱ्याच दिवसांनी लिहितोय. महिनाभर गावी होतो . शेतावर. कांदा काढला , वखार केली , कांदा वखारीत भरला. वखार सील केली. आणि आलो पुण्यात.

जगात सर्वात महाकठीण गोष्ट कोणती ? तर

Wednesday, 30 March 2016

Indian cricket : धोनीच मॅन आॅफ द मॅचखरं म्हणजे मी काही क्रिडा समिक्षक नाही. पण प्रत्येकाला असत तसं क्रिकेटच वेड मलाही आहे. माझ्या क्रिकेट वेडाविषयी नंतर कधीतरी लिहीन. पण आजकाल खेळत नसलो तरी खेळण्याची उर्मी संपलेली नाही. कधीतरी

Tuesday, 9 February 2016

Helmet and act : हेल्मेटची सक्ती आणि पोलिसांचा सुळसुळाट


सर्वसाधारणपणे चोरांच्या अतिरेकी आणि वारंवार वावरा संदर्भात ' सुळसुळाट ' हा शब्द वापरला जातो. पण परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी हुकुम सोडला आणि शेपटी पेटलेल्या हनुमानाप्रमाणे वाहतूक हवालदार चौकाचौकात धुमाकूळ घालु लागले. पण हनुमानाला रामाची अयोध्या नव्हे तर रावणाची लंका पेटवून देण्याइतपत भान होतं. तेवढं भान या हातात कोलीत मिळालेल्या माकडांना कसे असणार. ते निघाले सामान्य माणसाचे खिसे पेटवत. 

परवा गावाहून आलो. पुणे स्टेशनला उतरलो. स्वारगेटच्या बस थांब्यावर आलो. तर

Friday, 15 January 2016

Indian Festival : मकरसंक्रांतीलाच एवढ महत्व का ?

काल गावाहून आलो. अनेकांनी मकरसंक्रांती संबंधित काहीतरी मिळेल या अपेक्षेने माझ्या ब्लॉगला भेट दिली होती. नवं काहीतरी द्यावं या हेतूनं बसलो. इकडून तिकडून थोडी माहिती गोळा केली. मनातल्या मनात काही ओळी आकाराला आल्या. एक भेटकार्ड तयार करून त्या त्यावर उतरवल्या. ते भेटकार्ड तुम्हाला मनापासून आवडेल अशी आशा आहे. 

Wednesday, 6 January 2016

natsamrat movie : नाटक्या ते नटसम्राट

दहा बारा दिवस झाले. आई माझ्याकडे आली आहे. 

परवा बायको म्हणाली, "आपण सिनेमाला जाऊ. आईंना घेऊन. "  

मलाही तिचा विचार आवडला. आईंन सिनेमा पाहून किती वर्ष झाले स्मरत नाही. मल्टीप्लेक्स मध्ये जाऊन तर

Sunday, 3 January 2016

श्रीपाल सबनीस हे कसले साहित्यिक ?


गुरूंची परंपरा द्रोणाचार्यांपासून साने गुरुजींपर्यंत आणि चौथीच्या पायजमा, सदरा, टोपी या पेहरावातल्या पण आम्हाला हाताला धरून लिहायला शिकविणाऱ्या धुमाळ गुरुजींपासुन अकरावी बारावीला नुसतंच डिकटेशन न देता आमच्या वहीत असणारा शब्द न शब्द फळ्यावर उतरवणारे देशमुख गुरुजी अशी प्रदीर्घ आहे. पण स्वतःला शिक्षक म्हणवणारे श्रीपाल सबनीस पाहिले आणि असाही शिक्षक असतो हे पाहून अचंबित झालो.