Thursday 31 December 2015

का द्यायच्या शुभेच्छा ?

गेली पंधरा दिवस मी whatsaap सह फेसबुक सारख्या सोशल मिडीयावर ' हिंदू नववर्ष चैत्री पाडव्यापासून सुरु होते त्यामुळे एक जानेवारीला परस्परांना शुभेच्छा देऊ नका ' अशा स्वरूपाच्या पोस्ट पहातोय. अर्थात त्यामुळे मी आजतागायत शुभेच्छा दिल्या नाहीत असे नाही. वेळच नव्हता. या महिन्यातली हि माझी अवघी दुसरी पोस्ट. पण आज लिहायचं असं ठरवलं.

Wednesday 9 December 2015

जुने मित्र


यापूर्वी माझे खरे मित्र , खरी मैत्री , श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री , तीन मुर्खांची मैत्री यासारखे अनेक लेख वाचकांना मनापसून आवडले.

कोण आपल्या मदतीला धावून येतो , कोण आपला शब्द झेलते , कोण आपल्या अहंकाराला कुरवाळते यावरून आपण एखाद्याला चांगला अथवा वाईट ठरवतो. पण मैत्रीत या कशाचीच अपेक्षा नसते. त्यामुळेच आपल्या शाळकरी मित्रांची आपल्याला नेहमीच आठवण येते. ज्याच्या दातांमुळे ( देखण्या नव्हे आणि

Sunday 22 November 2015

कटयार

दिवाळी नंतर आज लिहितोय. कारण गेल्या अनेक दिवसात माझं मानसिक स्वास्थ ठिक नव्हतं. म्हणुन लेखणी म्यान केली होती. आणि वाचन डोळ्याआड केलं होतं. पण

Wednesday 11 November 2015

दिवा म्हणजे नेमकं काय ?


अनेकांना अनेकांकडून दिवाळीच्या खुप शुभेच्छा आल्या असतील. त्याचा फार मोठा ढीग झाला असेल. त्यात आणखी भर. कोण आणि कशा शोधणार त्या ढिगातून माझ्या शुभेच्छा. कोण वाचणार हि पोस्ट ? कशासाठी वाचणार ? पण हि पोस्ट वाचायलाच हवी मित्रांनो. कारण

Sunday 8 November 2015

लोकशाहीची फसवणूक


ज्या बिहारच्या निवडणुकीची सगळेजण आतुरतेने वाट पहात होते, ती बिहारची निवडणूक पार पडली. दुसऱ्याच्या दुखातच आपलं सुख शोधणं हि भारतीय संस्कृतीच आहे याची प्रचीती यावी तसं शिवसेनेच्या संजय राउतांनी आनंदोस्त्व साजरा करत भाजपाला चिमटा काढला. म्हणाले ,

Monday 2 November 2015

जय हो IGP - भाग दुसरा

पहिला भाग लिहिल्यानंतर जवळ जवळ सहा महिन्यानंतर हा दुसरा भाग लिहितोय. कारण एकतर इथं मला रोज पोस्ट करनं शक्य होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मनात अनेक विषय रोज आकारला येतात आणि त्याक्षणी IGP हा विषय मागे पडतो. शिवाय मागचे अनेक महिने मी महिन्याकाठी आठ दहा लेखांपेक्षा अधिक लेख पोस्ट करू शकलो नाही. पण

Thursday 22 October 2015

अंधेर से देर......

खरंतर खूप उशीर झालाय. दुपारच्या जेवणाच्या वेळी सकाळचा चहा पुढ्यात आणून ठेवावा तसं काहीसं करतोय मी . पण म्हणतात ना , " अंधेर से…. देर भली. " तसं उशिरका होईना पण मला शहानपण सुचलंय ना. ' अंधेर से देर भली 'असा वाकप्रचार हिंदीत हे कि नाही मला माहित नाही. पण

Wednesday 14 October 2015

नागव्यांचा बाजार

मी खूप खूप वर्षापूर्वी लिहिलेली हि चारोळी. चारोळी म्हणजे काय हे हि मला तेव्हा फारसं ठाऊकही   नव्हतं. एकाखाली एक अशा चार ओळी लिहिल्या म्हणजे झाली चारोळी असं एक  माझं मत होतं. आजही

Monday 12 October 2015

जॉईनिंग लेटर


झालं काय ! आमच्या मोठ्या चिरंजीवांचं कॅम्पसमध्येच सिलेक्शन झालं होतं. त्यामुळे परीक्षा झाली आणि तिसऱ्याच दिवशी ते जॉईन झाले.

महिनाभर ठीक गेला. पण

Thursday 8 October 2015

प्रेम हे प्रेम असतं......कि ?

कमल हसन आणि श्रीदेवीचा ' सदमा ' हा सिनेमा सगळ्यांना आठवत असेल. स्मरणशक्ती हरवलेली श्रीदेवी. सर्वस्व झोकुन तिला प्रेम देणारा कमल हसन. आणि स्मरणशक्ती परतल्यानंतर कमल हसनला न ओळखणारी श्रीदेवी. परवा हा सिनेमा पाहिला आणि मला प्रश्न पडला प्रेम हे खरंच प्रेम असतं......कि

Monday 5 October 2015

माझा ' काका ' झाला , त्याची गोष्ट

परवा गावाहून परतताना दौंडला ट्रेनला बसलो. जेमतेम तास दिडतासाचा प्रवास. पण या टप्प्यात खच्चून गर्दी असते. बुड टेकायला जागा मिळण्याची सुतराम शक्यता नसते. तर मग एकटया जिवाला हवा हवासा सहप्रवासी कुठून मिळणार ? पण

Friday 2 October 2015

गाई , गाई आणि शांताबाई

मराठी गाणी, Marathi Songs 


खरंतर या विषयावर लिहिण्यापेक्षा इतर अनेक विषय लिहिणे गरजेचे आहेत. पण जिथं जाईल तिथं माझ्या कानावर शांताबाई येऊ लागलं. अगदी माझ्या घरातुनसुद्धा. म्हणुन मग सारे विषय बाजूला ठेऊन हा विषय ऐरणीवर घेतला.

झालं काय !

Thursday 1 October 2015

आरशाचा सोस



पुरुष आरसा वापरतात. परंतु स्त्रियांप्रमाणे स्वतःला आरशात निरखत बसत नाहीत. याबाबत कुणाचेच दुमत असणार नाही. यावर अनेक किस्से आपल्याला माहिती असतात.

माझ्या घराभोवती खूप चिमण्या आहेत. त्यावर एकदा लिहायचे आहे. पण परवाचा किस्सा सांगतो. ……….

Friday 25 September 2015

शेतकऱ्यांसाठी एवढं कराल

तुम्ही आणि मी नाना नाही, मक्या नाही. अक्षय नाही आणि अजिंक्य रहाणे सुद्धा नाही. परंतु तुमच्या पैकी प्रत्येकाच्या मनात शेतकऱ्यांच्या बाबत एक सॉफ्ट कॉर्नर नक्की आहे. फेसबुकवर दिसणाऱ्या कॉमेंट वरून ते माझ्या लक्षात येतं. त्यामुळेच आपण त्यांना आर्थिक मदत नाही करू शकलो तरी मी सांगतोय तेवढं नक्की करू शकाल.

कदाचित

Wednesday 23 September 2015

गावाकडचं गाणं

माझं गाव ओढ्या वघळीतलं. पावसाळ्यात तुडूंब भरून वाहणारं.............उन्हाळ्यात डोहाडोहातून साचणार. कधी कधी गलितगात्र होऊन ठणठणीत कोरडं पडणारं. आभाळाकड पहात धाय मोकलून रडणारं. 
वस्तीवरची शाळा चवथीपर्यंत. त्यापुढं शिकायचं असेल तर कमीत कमी तीन किलोमीटर चालत जायला हवं आणि शाळा सुटल्यानंतर

Friday 18 September 2015

विघ्नहर्ता गणपती आणि विघ्नकर्ती माणसं

 उस्तव येतात. वातावरणात एक चैतन्य निर्माण करून जातात. मी कोणत्याही जातीच्या अथवा धर्माच्या विरोधात नाही. पण हिंदूंच्या कोणत्याही उस्तवात वातावरणात जेवढं चैतन्य निर्माण होतं तेवढी चैतन्य निर्मिती इतर धर्मियांच्या उस्तवात होत असेल असे मला वाटत नाही. कारण

Monday 14 September 2015

या माऊली या

( तळाचा फोटो पहायलाच हवा ) जवळ जवळ दोन महिन्यापुर्वी हि कविता लिहिली होती. कोरडया खट्ट आभाळाकडे पहात " या माऊली या , आभाळीचे मेघ व्हा " अशी आर्त साद विठू माऊलीला होती. कारण

Friday 11 September 2015

नाना तुम्ही चुकताय ?


facebook घ्या अथवा अन्य कोणतेही सामाजिक माध्यम घ्या. प्रत्येकजण विरोधी नेत्यांच्या खांद्याला खांदा लाऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याविषयी बोलतो आहे. प्रत्येकाला वाटतं मीच शेतकऱ्याचा तारणहार. पण बाजारात भाजी घ्यायला गेलं दहाची गड्डी आठला कशी मिळेल आणि आठची गड्डी पाचला कशी मिळेल हेच पहाणार. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मात्र पदर मोड करून शेतकऱ्यांची मदत करताना एक वेगळाच आदर्श निर्माण केला. समाजातील विविध थरातून दोघांवर कौतुकाचा वर्षाव झाला. पण खरंच नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा उपक्रम स्तुत्य आहे ?

Sunday 6 September 2015

प्रेम कसं करावं ?

अलीकडे तिच्यासाठी ' सामान ' अथवा ' माल ' हि उपाधी वापरली जाते ' तर त्या दोघांचं प्रेम कितीही निखळ असलं तरी त्याला ' लफडं ' संबोधलं जातं. त्याला आदर्शवादाचे वावडे असते आणि टपोरी वागण्यात धन्यता वाटत असते तर त्याला ती ' साधी भोळी ' नव्हे तर ' चिकणी चमेली '

Friday 4 September 2015

मोदी विरोधकांनो ..........

कसं होणार आमच्या देशाचं कुणास ठाऊक ? कोणीही येतो आणि आपापल्या जातीला काखोटीला मारून राजकारण करू पहातो. देशाचं हित या विषयावर मात्र कोणीच बोलत नाही. आमची मानसिकताही अशी आहे कि

Wednesday 2 September 2015

हार्दिक पटेलचं खरं स्वरूप

Reality of Hardik patel , खालील comment मध्ये असलेली लिंक नक्की ओपन करून पहा. तुम्हाला नक्की धक्का बसेल. हार्दिक पटेलचे असे काही फोटो हाती लागले आहेत कि शेळ्यांच्या ( भोळाभाबडा समाज ) कळपात शिरलेला हा शेळीच कातडं पांघरलेला लांडगा तर नव्हे ना अशी शंका यावी. मुळात मिडिया या फोटोवर काही बोलणार नाही. आणि मिडीयाने हा विषय चर्चेला घेतला तरी

Monday 31 August 2015

जगणं म्हणजे ..... तुझी ओढ

तिला, आपलं रोखून पाहणं फारसं आवडत नसलं तरी आपल्याला मात्र  तिचं असं रोखून पाहणं हव असत. जेव्हा तिचे डोळे आपल्या मनात खोल उतरतात तेव्हा कोणत्याही क्षणी आपल्याला तिचे डोळे खूप खूप हवे असतात. भले मग तिनं रोखून पाहिलं तरी ती डोळा भेट आपल्याला हवी असते.
कारण

Thursday 27 August 2015

माती विकता येत नाही

तुम्ही म्हणाल," काय हे सारखे शेतकऱ्यांविषयी आणि राजकारणाविषयी लिहिताहेत ? यांच्या पोतडीतल्या प्रेम कविता संपल्या काय ? "
नाही मित्रांनो माझ्याकडच्या प्रेम कविता संपल्या नाहीत. प्रेम कविता आहेत , सामाजिक कविता आहेत , मधेच एक पावसाची वाट पहात असताना लिहिलेली , 

Sunday 23 August 2015

सेल्फ सर्व्हिस

बऱ्याच दिवसांनी साताऱ्याला गेलो होतो . वाटेत माझी ALFA - LAVAL जुनी कंपनी दिसली . म्हणलं चला जुन्या सहकाऱ्यांना , मित्रांना भेटू या. सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या परत पुण्याकडे निघालो.  जनरल शिफ्ट सुटण्याची वेळ झाली होती.  मला सोबत दयायची म्हणुन माझे मित्र पांडुरंग तनपुरे आणि सुनिल ज्योतिक माझ्याच कारमध्ये आले. सोबत आमचं महिला मंडळ

Wednesday 19 August 2015

वाघ परवडला पण .......

राज ठाकरेंच्या घरच्या कुत्र्याने त्यांच्या पत्नीचा चेहरा फाडला. आणि त्यांच्या चेहऱ्यावर चार सहा नव्हे तब्बल पासष्ठ टाके पडले हि बातमी पाहून खरे तर वाईट वाटले. पण यातून आपण साऱ्यांनी काहीतरी बोध घ्यायला हवा. काय असला पाहिजे तो बोध ? जाणून घ्यायचं आहे तर वाचा हि कथा -

Sunday 16 August 2015

पगारी शेतकरी : संकल्पना आणि समस्या

मी मागे '

शेतकऱ्यांच्या आत्महत्या : रंगकाम कि वास्तव - भाग १


हा लेख लिहिला होता. तुम्ही शेतकऱ्यांचे वैरी आहात. तुम्ही कसले शेतकरी ? या तशा सभ्य पण याही पेक्षा खालच्या पातळीला जाऊन

Friday 14 August 2015

देशद्रोही कॉंग्रेस

संसदेचं अधिवेशन संपलं. काही काम न होताच संपलं. महारवाड्यातल्या एखाद्या अशिक्षित बाईनं चार चौघात तावातावानं भांडाव त्या

Friday 7 August 2015

खरे आतंकवादी कोण ?

याकुबला फाशी झाली. देश ढवळून निघाला. किया प्रतिक्रियांना ऊत आला. सलमान पासुन अनेकांनी याकुबच्या फाशीला फाटे फोडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा सुप्रीम कोर्ट. दावे प्रतीदावे. पण

Wednesday 5 August 2015

Porn Site : पॉर्न साईट : सामाजिक मानसिकता

काही पॉर्न साईटवर सरकारनं बंदी आणली. आणि सोशल मिडीयावर एकच वादळ उठलं. या वादात या बंदीचे समर्थन करणारे जसे होते तसेच या बंदीमुळे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आल्याची ओरड करणारेही होते. काही जण तर

Saturday 1 August 2015

तुझ्या ओंजळीत सखे

I Wish all of you a 

                 Very      

Happy friendship day. 


मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


ती आयुष्यातून दूर जाते आणि तो तिच्या आठवणीत हरवून जातो. जगण्याची खरंतर इच्छाच उरलेली नसते त्याला. पण उद्याची आशा त्याला जगायला भाग पडते. मनात कुठेतरी एक उमेद असते,

Monday 27 July 2015

मंगला कदम यांची ' दादा ' गिरी

मंगला कदम. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या सभागृह नेत्या. महापौरांच्या खालोखाल असलेलं व्यक्तिमत्व. पालिकेतली त्यांची हि चौथी पाचवी टर्म. जुन्या जाणत्या नेत्या. सभागृह नेत्या या नात्यानं विरोधी पक्षासह सगळ्या नगरसेवकांना सांभाळुन घेण्याची त्यांची जबाबदारी. पण

Saturday 25 July 2015

अजित पवारांची नौटंकी

देशातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसला संजीवनी मिळण्याची अजुन कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. भाजपला खिंडीत गाठण्यासाठी कॉंग्रेसच्या हाती अजुनही कोणता ठोस मुद्दा लागत नाही. ज्या मुद्द्याला ते हात घालतात त्याच्या जाळ्यात तेच अडकतात.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहुन

Tuesday 21 July 2015

harmful programs मेसेज कसा घालवायचा ?


कधीतरी नेहमीची साईट ओपन करताना आपल्या स्क्रिनवर harmful programs असा मेसेज दिसू लागतो. आपण घाबरून ती साईट ओपन करायचे टळू लागतो. कधी कधी ती साईट आपल्यासाठी गरजेची असते. काय करावं सुचात नाही. तेव्हा प्रश्न पडतो हा मेसेज कसा घालवायचा ? 

Sunday 19 July 2015

बाहुबली की बजरंगी ?

देशातले सगळेच प्रश्न निकाली निघल्याप्रमाणे मिडिया गेली पंधरा दिवस केवळ बाहुबली आणि बजरंगी या दोन चित्रपटांवर चर्च करण्यात रंगली आहे. बाहुबली आला आणि हिटही झाला. मग सलमानच्या बजरंगीचे कसे होणार ? या चिंतेत मिडिया बुडून गेले. मग

Friday 17 July 2015

बाई, बुद्धी आणि शिक्षण

( माफ करा हे सारं लिहिण्यामागे स्त्रियांना कमी लेखणं हा हेतू मुळीच नाही. मला आई आहे. बहिण आहे. बायको आहे. पण त्या सगळ्यात थोड्याफार फरकाने स्त्री मला अशीच जाणवते. तिचा दृष्टीकोन अधिक व्यापक व्हावा हाच हेतू. ) 

Sunday 12 July 2015

पंढरीची वारी आणि वाघाच्या मिशा

( या सगळ्यात वाघाच्या मिशा कुठे आहेत हे तुम्ही नक्की ओळखाल . )

काही वर्षापुर्वी मी ' त्याची मिशी……. त्याची डाय  ' हि हास्य कविता या सदरात मोडणारी कविता लिहिली होती. तेव्हा ती मी माझ्या ' रे घना ' या ब्लॉगवर प्रकाशित केली होती. याही

Friday 10 July 2015

म्हणे विठ्ठल मला

या लेखातल्या सुरवातीच्या चित्राची संकल्पना आणि निर्मिती सर्वस्वी माझी आहे. वारकऱ्याच्या मुखातून निघणारा, मातीवर उमटलेला पांडुरंग S S S S पांडुरंग गजर मोठा होत होत आभाळा जाऊन भिडतो छे छे आभाळा नव्हे प्रत्यक्ष पांडुरंगाला जाऊन भिडतो. अशी हि संकल्पना. कविता आणि लेखही तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. 

Monday 6 July 2015

प्रेमाहुनी जगी या

" स्वप्नांच्या पलीकडले." हि मालिका स्टार प्रवाहवर गेल्या तीन वर्षापासुन सुरु आहे. ती मालिकेत आजवर अनेक वळण आली. अनेक खाच खळगे आले. पण अहंकार सोडून केलं जातं ते प्रेम हि सांगण्यास हि मालिका कमीच पडली. नेमकं कसं असायला हवं प्रेम ? 

Thursday 25 June 2015

लो कट to हाय हिल्स

परवा एक जाहिरात पहिली -
' Low Cut to High hill '
all fashion on your mobile.
हि जाहिरात पाहिली आणि वाटलं हे काय चाललंय आमचं ?

Sunday 21 June 2015

नको असला बाप

Father's Day 

माझं आणि माझ्या वडिलांचं फारसं कधी पटत नव्हतं. पटत नव्हतं याचा अर्थ त्यांचा माझ्यावर अथवा माझा त्यांच्यावर जीव नव्हता असे नव्हे. पण त्यांना वाटायचं ' आपलं कार्टं खुप नाठाळ आहे. ' आणि मला वाटायचं ' आपला बाप नको इतका कडक आहे. ' त्यामुळे

Friday 19 June 2015

मृत्यूची चाहुल

 हा लेख तसा खुप जुना आहे. माझ्याच रे घना या ब्लॉगवर मी तो चार वर्षापूर्वी टाकला होता. खूप लाईक आणि बऱ्याच प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. 
इहलोकीची आपली यात्रा कधी संपणार आहे हे माणसाला कधीच कळत नाही. पण हे विधान खरे आहे का ? माझ्या मते मृत्यू नेमका कधी येणार हे कुणालाच कळत नाही. पण मृत्यू येण्या आधी काही क्षण त्याची चाहूल माणसाला नक्की लागत असावी. कशावरून ते स्पष्ट करणारा हा  घटनेवर आधारित लेख. 

Wednesday 10 June 2015

हरवलेला मोबाईल , सापडलेली माणसे


परवा आईला गावाहुन एसटीत बसवुन दिलं. तिचा मोबाईल पिशवीच्या तळाशी होता. मीच तिला तो पिशवीतुन काढून हातात ठेवण्याचा सल्ला दिला. कारण तिला घेण्यासाठी माझे मामा दौंडच्या स्टन्डवर येणार होते. पिशवीच्या तळाशी असलेला मोबाईलची

Monday 8 June 2015

मोर आणि लांडोर

सौंदर्याच वेड कुणाला नाही.

प्रियकराला त्याची प्रेयसी सुंदर असावी असं वाटतं.........नवऱ्याला त्याची बायको देखणी असावी असं वाटतं..........अगदी

Wednesday 3 June 2015

भिक, दान आणि सन्मान

आपल्या देशात प्रत्येकजण भिकारी आहे. उद्योजकही याला अपवाद नाहीत. त्यांना करात सुट हवी असते, सामान्यांना अनेक प्रकारच्या सवलती हव्या असतात. ' कोणीही कोणतेही काम करण्याची गरज नाही. यापुढे शासन प्रत्येकाला महिन्याला पंचवीस हजार देणार आहे. तसेच वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या सुविधा प्रत्येकाला पूर्णपणे मोफत देण्यात येतील.

Monday 1 June 2015

धनगर समाज, आशाताई शेंडगे आणि आहिल्याबाई होळकर


काल म्हणजे ३१ मी रोजी पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांची जयंती होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उजव्या बाजुच्या चौकात १९८३ साली पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरां अर्धकृती पुतळा उभारण्यात आला. परंतु तेव्हापासून आजतागायत म्हणजे

Thursday 28 May 2015

शेतकऱ्यांच्या आत्महत्या : रंगकाम कि वास्तव - भाग १

( या लिखाणाला अभिप्राय देऊ इच्छिणाऱ्या वाचकांनी कृपया पोस्टच्या खालीच अभिप्राय द्यावेत. त्यामुळे सर्वव्यापी चर्चा होण्यास मदत होईल. )  

आजकाल मिडिया असो अथवा सोशल मिडिया आम्ही किती समाजाभिमुख आहोत हे दाखवण्याची जिकडे तिकडे चढाओढ सुरु असल्याचे दिसते. फेसबुकवर एखादयाच्या आत्महत्येची पोस्ट दिसताच

Tuesday 26 May 2015

भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ का ?

 काही विषयांवर त्या त्या वेळीच लिहायला हवं हे मला मान्य आहे. पण जगण्याच्या रगाड्यात राहून जात. भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हाच का दिला असेल या माणसाला हा पुरस्कार ? काय याचे कर्तुत्व ? दुसरं कुणी नव्हतंच का त्या पुरस्कारासाठी योग्य ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले. आणि आज

Monday 25 May 2015

आपण म्हणजे एक कणीस

किती दिवस झाले, काही लिहिलंच नाही. लिहिण्याचा हुरूप संपला असं नाही. पण वेळच मिळाला नाही. गावाकडचे सतत येणारे फोन......लाईट नाही ………… डीपी जळाली ………. खतं आणायची आहेत…… मग माझी धावपळ.. ..........पावसाचा लपंडाव.......सणांची लगबग.…………. लगीनसराई ……… जत्रा सत्रा………. भावकीचे साखरपुडे . कुठे कुठे आणि कसा

Sunday 17 May 2015

एक मात्र लक्षात ठेव

" तुला वेळ नाही  मिळाला वाटत माझे फोटो बघायला."
प्रिय नाही.......
                         ........आणि
                                                         ..........तुझीही नाही. 
असं मायना हरवलेलं एका ओळीच पत्र आलं कि