Saturday 30 August 2014

Song for kids : पावसा रे पावसा

मला खात्री आहे आपल्या हि बालकविता आणि त्याचं झालेलं बालगीत निश्चित आवडेल. बऱ्याचदा संगीतकार संपूर्ण गाण्याचा गीतात समावेश करत नाहीत. इथंही तेच झालंय त्यामुळेच. मी इथं संपूर्ण मुळ कविताही दिली आहे. सर्वात शेवटी गाण्याचा व्हीडीओही आहे. गाणं डाऊन लोड करण्यास माझी मुळीच हरकत नाही. पण या गीताचा व्यावसायिक वापर करावयाचा असल्यास माझी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

Friday 29 August 2014

Indian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात ? कथा १

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का ? गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात होता. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं. मध्यंतरी शीला आणि मुन्नी मध्ये अडकलेला गणेशोत्सव आता अधिकाधिक लोकाभिमुख होतोय. झांज पथकांच्या तालात रमतोय. पण का आणि कधीपासून सुरु केला जातोय गणेशोत्सव ? त्या संदर्भातील काही कथा येत्या दहा दिवसात. काही पौराणिक असतील तर काही काल्पनिक अर्थात मी लिहिलेली. त्यातली हि पहिली कथा -

Monday 25 August 2014

Gender Gap : गडी पुढे , बाया मागे

झालं काय परवा आमचे एक चुलत बंधू वारले. अचानक. हृदय विकाराच्या झटक्याने. ध्यानीमनी नसताना. वय ५८ च्या आसपास. मागे दोन विवाहित मुलं. विवाहित मुलगी. पत्नी. असा गोतावळा.

घटना घडली पुण्यात. आम्ही गावी. भावकीच्या चार गाड्या भरल्या. गावाहून पुण्यास यायला निघालो. दुःखद घटना घडूनही गप्पांना उधान आलं होतं. उधाणाचा सूर मात्र मरणाभोवती घोंगावणारा.

“च्यायला, आपल्या बेटात ( म्हणजे आमच्या आजोबांच्या वंशावळीत ) सगळे गडीच पुढं चाललेत आणि बाया माघं राहत्यात. काही तरी बघायला पायजे.” आमचा एक चुलत भाऊ.  

Wednesday 20 August 2014

Love Poem : परतून प्राण माझा

लग्नात  एकमेकांना  घास  देण्याची  पद्धत  आता  इतकी  रुळलीय  कि  तिच्यातला चार्म ……..त्यातलं थ्रील निघून गेलंय. नव्या  नवरीला  घास  घेताना पाहिलं तर, तो तर नाहीच नाही पण तीही पहिला वहिला घास घेताना आतल्या  आत  कुठेतरी  मोहरत असेल असं अजिबात वाटत नाही .

बरं लग्नात हि कलवरी मंडळी काय काय करतील याचा काही नेम नाही. थम्स अप आणतील……स्ट्रोला खालच्या बाजूला गाठ मारतील ………आणि

Sunday 17 August 2014

Love Poem : गोष्ट त्याची, तिची आणि पावसाची

उन्हाळा सरतो. आभाळात काळे ढग जमू लागतात. उन्हाची झळ कमी होते. गार वाऱ्याची झुळूक मन उल्हासित करते. मग सहाजिकच तिला घेऊन डोंगर दऱ्यात, गार वाऱ्यात, पावसाच्या धारात जाव असं त्याला वाटत. त्याचं हे असं आभाळासारख भरून आलेलं…… पाऊस झालेलं मन तो तिच्या जवळ मोकळं करतो. तीही त्याच्या सुरात सूर मिसळते. भरून आलेल्या आभाळाखाली पाऊस होऊ पहाते.  आणि ठरतो मित्र मैत्रिणीन सोबत डोंगर दऱ्यात जाऊन पाऊस होण्याचा बेत.
ठरल्यावेळी......ठरल्या ठिकाणी सारे जमतात. हा आला ............. तो आला ............. ती आली ............... तीही आली..........पण ती कुठाय ?

Saturday 16 August 2014

Love Poem : तू समोर येतेस तेव्हा

मागे मी पुरुष स्त्रीचा दास का ?  ही पोस्ट लिहिली होती. असंख्य वाचकांनी ती पोस्ट वाचली होती. समोर सुंदर स्त्री आल्यानंतर मनात चल बिचल झाली नाही असा माणूस शोधून सापडणार नाही.

Thursday 14 August 2014

Meaning Of sex : समागम म्हणजे नेमकं काय ?

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत असं म्हणलं जातं. पण मला नाही पटत हे फारसं. ज्या कुणी या गरजांना माणसाच्या मुलभूत गरजा ठरवल्यात त्याला माणसाचं फक्त जगणं अपेक्षित असावं.

पण खरंच माणूस जन्म घेतो तो केवळ जगण्यासाठीच का ? नाही ! मुळीच नाही. प्रेम हीसुद्धा माणसाची अगदी मुलभूत गरज आहे. नव्हें प्रेमाविना माणसाच्याच काय कोणत्याही सजीवाच्या जगण्याला मुळीच अर्थ नाही. आणि म्हणूनच मोरासारखा देखणा पक्षांचा राजा प्रेमाच्या शोधात रुपाची वानवा असलेल्या लांडोरीच्या मागे फिरतो.

Monday 11 August 2014

Pet animal : बैल आणि मी

Indian Bull
‘ बैलगाडा शर्यती ’ वर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या महाभागांना आठवडाभर शेतकऱ्याच्या सहवासात ठेवायला हवं. म्हणजे शेतकरी आपल्या जनावरांची किती काळजी घेतो हे त्यांना कळेल. हा माझा लेख वाचला तरी शेतकरी आणि त्यांची जनावरं यांच्यात किती स्नेह असतो ते सगळ्यांच्याच लक्षात येईल.

मी इंजिनीअरींगला असतानाची गोष्ट.

Wednesday 6 August 2014

Bollywood and Rape : बॉलिवूड आणि बलात्कार


Do not rape
बलात्कार आणि त्यासंदर्भातील बातम्या आता नित्याच्याच झाल्या आहेत. याच संदर्भात मी मागे बलात्कार का होतात हा लेख लिहिला होता. पण एका लेखात संपण्यासारखा हा विषय नाही. एकदा लिहून झाल्यावर पुन्हा या विषयावर लिहिण्याची गरजही नव्हती. पण बलात्कारयांना फाशी दिली तरी हा विषय संपला नाही. आजही रोज बलात्कार होताहेत. वर्तमानपत्रात बातम्या येताहेत. टीव्हीवर झळकताहेत. मिडीयाही अशा बातम्या अधिक खोलात शिरून , रंगवून आणि त्या विषयाशी समरस होऊन दाखवताहेत.

Earn Money From Your Blog - Part 2

 It it very difficult that your account get accept by  Google adsense. Than there is a only way in our hand that we have to follow another way.

Sunday 3 August 2014

Friendship Day : तीन मुर्खांची मैत्री

friendship

( माझ्याकडे अनेक कविता असूनही गेल्या अनेक दिवसात मी कविता पोस्ट केली नाही. पण आज मैत्रीदिनाच्या निमित्ताने खूप दिवसांनी कविता पोस्ट करण्याचा योग आला. आजच स्फुरलेली आणि लिहिलेली कविता तुम्हाला नक्कीच आवडेल.) 

आज खरंतर लिहिणारच नव्हतो. पण आज मैत्रीदिन. त्यामुळेच सकाळी झोपेतून उठल्याबरोबर मैत्रीदिना - विषयी लिहिण्याचा निर्णय घेतला. कारण माझा या जगात कशावर विश्वास असेल तो परमेश्वरावर, प्रेमावर आणि मैत्रीवर. परमेश्वराची आराधना करावी लागते……….प्रेम हृदयातून यावं लागतं…….आणि मैत्री विश्वासाची हवी असते. 

पण या तिन्ही पैकी एकही गोष्ट आपल्या पदरात पडत नाही तेव्हा आयुष्य वाटेवरचा दगड होतं. अनेकजण आपल्याशी ठेचाळतात आपल्याला शिव्या देत मागे टाकून पुढे निघून जातात.

Friday 1 August 2014

Animal Sex : प्राण्यांची कामभावना

 भादव्याच्या महिन्यात शहरातल्या रस्तो रस्ती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं मिलन पहाताना आपल्याला किळसच वाटते. काही वात्रट मुलं त्यांच्यावर दगड भिरकावतात. पण सर्वसाधारणपणे आपण ते दृश्य नजरे आड करून वाट धरतो.