Monday 31 October 2016

का उगा मी झुरतो ( love poem : Why am I brood )

मराठी प्रेम कविता , प्रेम कविता , love poem


आपण तिच्यावर खूप प्रेम करत असतो.
आपल्या मनातल्या सगळ्या भावनांचा पसारा आपण तिच्या पुढ्यात मांडतो.
पण ती .......
ती मात्र मी त्या गावीची नाही.
आपला तिचा काही संबंध नाही अशा थाटात आपल्या भावना नजरे आड करते.

Saturday 29 October 2016

ढंमप्या - भाग ३ ( my dog : dhampya part 3 )

गडी गेले पण ढंमप्या राहिला माझ्याजवळ. माझ्यातली अर्धी चतकोर खायचा. पण कमी पडतय म्हणून त्यानं  कधी तक्रार केली नाही आणि माझी साथ सुद्धा सोडली नाही.

मी घरी असलो कि भाकर तुकड्याच्या आशेने हा दुसऱ्याच्या दारात जाईल तेवढाच. अन्यथा मी घरात असलो कि हा सतत घरासमोर बसून रहायचा. रात्री मी दार लाऊन झोपलो तरी भालदारासारखा हा बाहेर अंगणातच पसरायचा. पण एकदम जागरूक. जरा कुठं धस्स S S S झालं कि

Monday 24 October 2016

अरे शिक्षण शिक्षण ( Marathi Poem : what a education )

मराठी कविता , Marathi Poem


एक मित्र सांगत होता कि पुण्यातल्या एका नामंकित इंग्रजी शाळेत नर्सरीची फी आहे तब्बल ४२००० रुपये. मागे कुठल्या एका महाराष्ट्रातल्या सत्तेवरील सरकारनं मुलींना बारावी पर्यंतचं विनामूल्य शिक्षण जाहीर केलं होतं. पण

Tuesday 11 October 2016

विजयादशमीसाठी शुभेच्छा पत्रे ( greeting for Vijaya Dashami )

दसऱ्यासाठी शुभेच्छा पत्रे , Greeting cards for Dasara



उशीर झालाय खरा. पण इकडून तिकडून उचलेलं शुभेच्छा पत्र पोस्ट कार्ड पोस्ट करण्यापेक्षा मला नव्यानं तयार केलेलं शुभेच्छा कार्ड पोस्ट करायला आवडतं. अर्थात पार्श्वभूमी गुगलवरनंच घेतलेली असते. पण

Monday 10 October 2016

पाऊस गेला शाळेमध्ये ( Marathi poem : Rain has gone to school )

marathi poem , poem for kids,

परवा माझ्याकडे माझ्या दोन पुतण्या आल्या. म्हणाल्या, ” बाबा, बाईंनी आम्हाला पावसावरची कविता लिहून आणायला सांगितलीय.” मोठेपण नाही सांगत पण या एवढ्याश्या पोरटयांनाही माझ्या कविता आवडतात आणि कळतात ही.