story of Indian management
मला हँडेल करणारा तरुण साधारणतः चोवीस - पंचवीसचा. ग्रामीण भागातून आलेला. आई वडील शेतकरी. शिक्षण BE Mechanical. MS करण्यासाठी जर्मनीला जाण्याची महत्वकांक्षा बाळगणारा. पण घरची परिस्थिती बेताची. म्हणून ते स्वप्नं अडगळीत फेकणारा.
त्यानं आजच्या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.
एक मेकॅनिकल इंजिनीअर हे असलं काम करतोय हे पाहून मला कससंच झालं. मी त्याला त्याचं शिक्षण विचारलं होतंच. तोच धागा पकडुन मी म्हणालो, " BE झालास मग हा असला जॉब का करतोस ? "