Thursday, 27 November 2014

BJP, MIM, Shivsena : देशद्रोही इमाम शाही

( रसिक वाचकांनी तळास असलेले व्यंगचित्र आवर्जून पहावे. )

लोकसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसला मुस्लिम समाजाच्या शाही इमामांनी जाहीर पाठींबा दिला. मुस्लिम समाजाला भाजपाच्या विरोधात मतदान करण्याचं आव्हान केलं. काँग्रेसलाही तो पाठींबा गोड वाटला. कोणी कोणाला पाठींबा दयावा आणि कोणी कोणाचा पाठींबा घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण
असा एका जातीचा जाहीर पाठींबा स्विकारताना आम्ही सर्वधर्म समभाववादी आहोत ( सेक्युलर ) आहोत आणि भाजपा जातीयवादी आहे अशी दवंडी पिटविण्याचा काँग्रेसला अधिकार उरतो का ?

मला कॉंग्रेसच्या संदर्भात बोलायचं नाहीच मुळी. पण आपल्या मुलाला शाही इमामपदाची वस्त्र प्रदान करण्याचा सोहळा जामा मशिदीचे सध्याचे इमाम बुखारी आयोजित करतात. त्यासाठी देशोदेशीचे पाहुणे बोलवतात. काँग्रेससह देशातल्या सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण देतात. सोनियांना बोलावतात. मुलायम सिंगांना बोलवतात.  भारतावर सतत अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानच्या नवाझ शरीफांनाही निमंत्रण देतात. आणि भारताचे प्रथम नागरिक असणाऱ्या या देशाच्या पंतप्रधांना न बोलावून सापत्नभावाची वागणूक देतात. जाणीवपुर्वक निमंत्रण देत नाहीत. काय अधिकार आहे शाही इमामांना असं वागण्याचा ? या देशात राहुन याच देशाच्या पंतप्रधांना अशी वागणूक देणं हा देशद्रोह नव्हे काय ? शाही इमामांनी असं धाडस केलंच कसं ? काँग्रेसनं का नाही या विरोधात काही प्रतिक्रिया दिली ? कि नेहरूंच्या मोह्त्स्वापासुन मोदींना दूर ठेवणाऱ्या काँग्रेसचीच फूस आहे शाही इमामांना ? 

हिंदू संघटनांवर बंदी घालण्यासाठी नेहनीच पुढाकार घेणारी काँग्रेस यावर का काहीच प्रतिक्रिया देत नाही ? कोणत्याही मुस्लिम समाजानं शाही इमामांच्या या कृत्याचा निषेध का नाही केला ? शाही इमामांचा हा सोहळा देशद्रोही असल्याचा ठपका ठेऊन उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना हा कार्यक्रम उधळुन लावेल का ? कि त्यांची दादागिरी फक्त महाराष्ट्रात ? 

या लेखातुन सामाजिक द्वेष पसरवण्याचा माझा मुळीच हेतू नाही. शिवसेनेनं किंवा अन्य हिंदू संघटनांनी तो कार्यक्रम उधळून टाकावा असेही मला वाटत नाही. पण ज्या कार्यक्रमापासून देशाच्या पंतप्रधांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं जातं त्या कार्यक्रमावर काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी, अन्य देशातून येऊ घातलेल्या नेत्यांनी जाहीर बहिष्कार का टाकू नये ?

भाजपावर नेहमीच जातीयवादाचा शिक्का मारणाऱ्या माध्यमांना काँग्रेसची हि भुमिका दिसत नाही कि दिसत असुनही दे याकडे सोयीस्कर डोळेझाक करत आहेत ? 

सगळेच प्रश्न. पण या प्रश्नांची उत्तर आपण शोधू शकलो नाही. काँग्रेसनं आत्मपरीक्षण करून आपली भुमिका सुधारली नाही तर आज झालंय त्यापेक्षा काँग्रेसचं अधिक पानिपत झाल्याशिवाय रहाणार नाही. 

10 comments:

  1. काँग्रेसच सगळेच पक्ष जातीपातीच राजकारण करतात. भाजपा हिंदुस्थानात हिंदुंच्या पाठीशी उभी रहात असेल तर त्यात गैर काय ?

    ReplyDelete
  2. हिंदुत्ववाद ठीक आहे. पण कडवा हिंदुत्ववादसुद्धा फारसा कामाचा नाही. हिंदुत्ववाद आणि माणुसकी यांचा मेल साधायला हवा.

    ReplyDelete
  3. I think we have to neglect this.congress as well as s.p. ,T.C .C are nothing but Muslim parties. Its obvious to call them not to modi(BJP)

    ReplyDelete
  4. Friend thanks for your opinion. We can't neglect anybody. One more thing on what the position these people are they at least follow some protocols.

    ReplyDelete
  5. आता bjp-shivsena एकत्र आलीना बे. आता उद्धट ठाकरेवर टीका करणार्या पोस्ट काढून टाकणार का. स्वार्थासाठी जन्तेचा वापर करणार्यानो जनता माफ करणार नाही.

    ReplyDelete
  6. मित्रा अभिप्रायाबद्दल आभार. शिवसेना बीजेपी एकत्र आली तर आनंदच आहे. शिवसेनेवर टीका करणं हा माझा हेतू नाही. तर शिवसेनाच काय पण कोणत्याच स्थानिक पक्षाचं राजकारण जनतेच्या हिताचं असणार नाही.

    ReplyDelete
  7. प्रमोद गानु30 November 2014 at 08:51

    rss जेंव्हा bjp बरोबर विचार विनिमय करतो तेंव्हा विंचु चावल्यासारखे ओरडून कांगावा केला जातो . rss निदान सामाजिक भान असणारी संघटना आहे ,देशव्यापी आहे . हे इमाम ,मुलायम कुठल्या angleने देशभक्त आहेत ? कॉन्ग्रेसने आतातरी सडके राजकारण त्यागून विधायक मुलभुत काम केले पाहिजे .कारण मोदी काही म्हणोत सबल विरोधी तत्वाचीही देशाला गरज आहे. आणि प्रादेशिक पक्ष ती पुरी करणार नाहीत !

    ReplyDelete
  8. प्रमोदजी प्रतिक्रियेबद्दल आभार. मीही माझ्या अनेक लेखातून हाच विचार मांडला आहे. पण काँग्रेस प्रबळ व्हायची असे तर सगळ्या स्थानिक पक्षांनी कॉंग्रेसच्या झेंड्याखाली यायला हवं अथवा सगळ्यांचा एकत्रित असा एकच झेंडा मानायला हवा. कारण राज्य इन मीन सगळी मिळुन राज्ये ३६ पण या देशात पक्ष मात्रं १६०० हून जास्त. कुठे घेवून जाणार हे देशाला ?

    ReplyDelete
  9. पण मी म्हणतो कशाला मौदीचे तळवे चाटायचे. आपले जानकरसाहेबच आपल्याला ST आरक्षण मिळवुन देणार.

    ReplyDelete
  10. मित्रा लेखाचा विषय काय ? आपली प्रतिक्रिया काय ? कृपया विषयाला समोर ठेवूनच प्रतिक्रिया दयाव्यात.

    ReplyDelete