Thursday, 28 May 2015

शेतकऱ्यांच्या आत्महत्या : रंगकाम कि वास्तव - भाग १

( या लिखाणाला अभिप्राय देऊ इच्छिणाऱ्या वाचकांनी कृपया पोस्टच्या खालीच अभिप्राय द्यावेत. त्यामुळे सर्वव्यापी चर्चा होण्यास मदत होईल. )  

आजकाल मिडिया असो अथवा सोशल मिडिया आम्ही किती समाजाभिमुख आहोत हे दाखवण्याची जिकडे तिकडे चढाओढ सुरु असल्याचे दिसते. फेसबुकवर एखादयाच्या आत्महत्येची पोस्ट दिसताच
आभाळात चांदणे चमकू लागावेत तसे श्रद्धांजली अर्पण करणाऱ्यांचे पेव फुटते.

जवखेडा हत्याकांड कसे रंगवले गेले ? शासनाला आणि पोलिस खात्याला किती जणांनी शिव्यांची लाखोली वाहिली. शेवटी काय निघाले. हि घटना आम्ही आमची मते मांडताना जागरूक नसतो हेच दर्शविते.

तीच बाब शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची. राहुल गांधींसह तमाम विरोधी नेत्यांनी सध्या शेतकरी आत्महत्या हा एकच विषय लाऊन धरला आहे. हि मंडळी अशा काही थाटात बोलत आहेत कि जणु काही युपीए सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या करतच नव्हते. अथवा आमच्या देशात शेतकऱ्यांशिवाय समाजातील अन्य कोणताही घटक आत्महत्याच करत नाही.

फेसबुकवरसारख्या सामाजिक व्यासपीठावर तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात अनेक मंडळी गळा काढतात. जणू काही यांच्याशिवाय शेतकऱ्यांचा अन्य कोणी कैवारीच नाही. आणि सत्ताधारी पक्ष केवळ शेतकऱ्यांच शोषण करण्यासाठीच सत्तेवर आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात फेसबुकवरसारख्या सामाजिक व्यासपीठावर प्रतिक्रिया नोदावणारी २ टक्के मंडळी तरी वस्तुस्थिती जाणुन घेण्याचा प्रयत्न करतात का  ? भारतात घडणाऱ्या आत्महत्येसंदर्भात नेमकी आकडेवारी कोणी पहिली आहे का ? शेतकरी सोडुन अन्य वर्ग आत्महत्या करतच नाही का ? या संदर्भात मी काही वस्तुस्थिती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आणि समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. खऱ्या खोट्याची शहानिशा करण्यासाठी साठी वाचकांनी येथे क्लिक करावे.

१ ) एकूण आत्महत्यांपैकी ६८ % आत्महत्या या १५ ते ४४ या वयोगटातल्या असतात. ( शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्यांची चर्चा माध्यमात होते ती साधरणता ४५ ते ६० या वयोगटातली शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची असते. )

२ ) आमच्या देशात सरासरी साक्षरतेचे प्रमाण केवळ  ७४ % असताना आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींमध्ये ८० % प्रमाण हे साक्षर लोकांचे असते. ( शेतकऱ्यांमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी आहे हे वास्तव कुणाच नाकारता येणार नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांपेक्षा सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतो असे अनुमान करता येते. पण सुशिक्षित लोकांच्या आत्महत्यांच्या मुळाशी जाणे तर सोडा पण त्यांच्या आत्महत्यांची साधी दखलही कोणी घेत नाही. )

३ ) २०१२ मध्ये शहरातील १९ हजार पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्या तर त्याच वर्षात संपूर्ण भारतात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ( म्हणजेच शेतकऱ्यांपेक्षा शहरी भागात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. ज्याविषयी कोणी चकार शब्द बोलत नाही. )

४ )  २०१२ मध्ये एकूण १,३५००० नागरिकांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी १३७५४ शेतकरी होते. हे प्रमाण एकूण आत्महत्यांच्या ११. % आहे. सोबत जोडलेल्या आलेखावरून एकूण आत्महत्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण खूपच कमी आहे असे दिसून येते.

५ ) २०१२ मध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या १३७५४ आत्महत्यांपैकी ७३ %  म्हणजे जवळ जवळ १०००० हून अधिक आत्महत्या केवळ महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटका आणि केरळ या पाच राज्यात झाल्या आहेत. आणि यापैकी कोणत्याही राज्यात भाजपाच सरकार सत्तेत नव्हतं.

६ ) इतर सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सर्वात अधिक असून ते २३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आणि महाराष्ट्रात वर्षानुवर्षे काँग्रेसचे सरकार अस्तित्वात आहे.

मी स्वतः आज शेतीच करतो आहे. शेतीतल्या अडचणी जवळून पहातो आहे. गेल्या चार वर्षात माझ्या पंचक्रोशित कुणी आत्महत्या केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. यात २०१२ चा महाभयंकर दुष्काळ सुद्धा येऊन गेलेला आहे.

आत्महत्या कुणाचीही असो ती लांच्छनास्पदच आहे. पण इतरांच्या आत्महत्यांकडे डोळेझाक करायची आणि केवळ राजकीय स्वार्थापोटी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या नावाने गळे काढायचे हि मानसिकता चुकीची आहे.    

                                                                                      ………… क्रमश : 





                  
     

8 comments:

  1. panoba pandharkar2 June 2015 at 16:56

    Atyant dhadsi ,yogya pan smajachya gli n utrnare wichar.

    ReplyDelete
    Replies
    1. पांडोबाजी, आपल्या अभिप्रायाबद्दल आभार.

      Delete
  2. Tymhi shetkryancya aayushyat wish pernare shetkri aahat .

    ReplyDelete
    Replies
    1. तू समजतोस तसे नाही मित्रा. शेतकऱ्यांच्या आयुष्यात विष पेरून मला काय मिळणार.

      Delete
  3. pandharinath more15 June 2015 at 20:11

    Aapan Khup abhyaspurn lihile ase diste.trihi he mazych Kay kunachyahi pachni pdnar.

    ReplyDelete
    Replies
    1. पंढरीनाथ अभिप्रयाबद्दल आभार. पण समाजाची मानसिकता बदलायला हवी.

      Delete
  4. थोडक्यात काय तर शेतकरी आत्महत्या हा राजकीय विषय आहे तो समजताय इतका सिरियस नाही असं तुम्ही भासवताय .
    पन तसं नसतंय शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्हाला नाही समजनार किती पाउस पडनार , वातावरन किती साथ देनार , हमीभाव किती मिळनार हे काहीही माहीती नसतानाही आयुष्याचा जुगार खेळतो शेतकरी ,
    त्याचं मरन इतकं हलकं घेउ नका

    ReplyDelete
    Replies
    1. अक्षयजी मी भासवत काहीच नाही. मी आकडेवारी दिली आहे. मीही अठरा एकराचा बागायतदार आहे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे हे नक्कीच. मदत म्हणजे न्याय असे नाही म्हणता येणार. त्यामुळे शेतकरी अधीकाधिक दुबळा होईल. शेतकऱ्याला सक्षम करायचे असेल तर शेतमालाला हमीभाव हा एकमेव पर्याय आहे. मीही हाडामासाचा शेतकरी आहे. गेल्या वर्षी ३०० टन ऊस गेलाय कारखान्याला. भेंडी एकदा ३५ - ४० रुपये किलोने तर एकदा ७ रुपये ( तोटयात. खर्चही निघाला नाही. ) किलोने विकली आहे. त्यामुळे शेतमालाला खर्चाच्या तुलनेत हमीभाव मिळालाच पाहिजे. माझा ' नाना तुम्ही चुकताय ? ' हा लेख नक्की वाचा. http://maymrathi.blogspot.in/2015/09/blog-post_11.html मी शेतकऱ्यांचा विरोधक नाही. पण शेतकरी संघटीत होत नाही. आडते व्यापारी मार्केट बंद पाडू शकतात. मग शेतकरी का नाही पाडू शकत. पंधरा दिवस देशभरातल्या शेतकऱ्याने अन्न धान्य मार्केटला नेले नाही तर सरकारपासून व्यापाऱ्यांपर्यंत सगळेच तळ्यावर येतील. कॉंग्रेसने आजवर हमीभाव दिला नाही. आपण कधी जाब विचारला नाही. बीजेपी हमीभाव देईल से मला वाटते पण त्यासाठी त्यांना वेळ द्यायला हवा आणि आपण योग्य मार्गने पाठपुरावा करायला हवा.

      Delete