Tuesday, 13 January 2015

BJP, Narendrea Modi : चहावाला

चहावाला ' हे शीर्षक पाहुन वाचकांना मी नरेंद्र मोदींविषयी लिहितोय कि काय अशी शंका येईल. परंतु हे स्फुट लेखन नरेंद्र मोदींविषयी नाही. मग इतर कोणा सामान्य चहावाल्याविषयी लिहिण्यासारखं काय असेल ? असा प्रश्न वाचकांना पडेल. त्याचबरोबर यात वाचण्यासारख आणि त्यातुन घेण्यासारखं काय असणार अशीही शंका येईल. पण तरीही वाचुन अभिप्राय नक्की दयावा. 

परवा गावाहून येताना मी पुना स्टेशनला उतरलो. शनिवार होता. उपवास होता. संध्याकाळचे साडेचार वाजले होते सकाळपासुन काहीच खाल्लं नव्हतं. भुकेचे कावळे पोटात चौखुर टोचा मारत होते. घरी पोहचायला तास दीडतास लागणार होता. त्यामुळे बसमध्ये बसण्यापूर्वी एखाद्या टपरीवर चहा घ्यावा असा विचार केला. बसच्या थांब्याच्या बाजुलाच दोन हातगाड्या होत्या. चहाच्या. एका हातगाडीवर गेलो. चहाविषयी विचारलं. 

" आत्ताच संपलाय." असं त्यानं हिरमुसल्या चेहऱ्यानं सांगितलं. पण माझ्या चेहऱ्यावरची चहाची भुक त्याला दिसली असावी. म्हणुन माझ्या कृतीची वाट न पहाता , "अव्या चहा आहे का ? " अशी शेजारच्या हातगाडी वाल्याकडे विचारणा केली. त्याच्याकडुन आणलेला चहा. माझ्या हातात दिला. 

तिथंच येऊन जाऊन त्याच्या परिचयाचे झालेले दोन बिहारी भैय्ये बसले होते. एक तरुण. पंचवीसच्या आसपासचा. दुसरा वयस्कर. साठीचा. नाकाखाली मुठभर मिशा असलेला. चहाची चव चाखता चाखता मी त्यांच्या गप्पा ऐकत होतो. वयस्कर बिहारी भैय्या चहावाल्याला सांगत होता, " हमारे यहाँ एक राजा भैय्या था। बहुत बड़ा गुंडा था ।  ओ जेलमे रहेगा तो उसके आदमी ' राजाभैय्या आएगा, फिर गोली चलायेगा ' ऐसा नारा लगाकर गुंडागर्दी करते थे।" 

चहावाला तसा तरुण. तीस - बत्तीसचा. धिप्पाड. टुकार. पण अंगातली रग मावळलेला. दिवसभर आग ओकून शांत झालेल्या सूर्यासारखा. त्या वयस्कर भैय्याकडे वळून तो म्हणाला, " आप विश्वास नही करोगे। लेकिन मैं बिहारमे गया था।  भागलपुर , किसनगंज सब घूम के आया हूँ।  शामको दारू लेने के लिए एक वाईनशॉप के सामने लाइनमे खड़ा था । इतनेमें दुकनदारने बोला, चलो, चलो। सब बाजु हटो।  राजा भैय्याके लोग आये है। उनको पहले दारू देना पड़ेगा। " 

" अरे, भैय्या। उतना दहशत ही था ना, राजाभैय्याका।  " वयस्कर बिहारी अभिमानाने म्हणाला.

" अरे सुनो तो आगे।  " चहावाला त्याला थांबवत पुढे सांगू लागला. " मैं उसको बोला। कौन राजाभैय्या ? मैं पहले आया, मेरेको पहले दारू मंगता।" 

चहावाल्यान उजव्या हाताचं बोट तोंडात घातलं. तोंडातला तंबाखूचा तोबरा बाहेर काढला. ओठावरती रेंगाळणारा थोडाफार चोथा ' फु ,फु ' करत हवेत उडवला. आणि सांगू लागला. " राजाभैय्याचं नाव ऐकूनही न घाबरणारा हा माणूस कोण असावा असा प्रश्न त्याला पडला. मलाही मागे त्यांचा गोंधळ ऐकू येत होता. आणि तो दुकानदार मला म्हणत होता, ' अरे तू कौनु भाई।  उनके लोगोंके सामने तुमको दारू दिया तो ओ हमारा दुकानवा तुड़वा डालेगा।' यावर मी त्याला म्हणालो, ' और तुम हमको पहले दारू नही देगा हम तुम्हारा दुकान तुडवा डालेगा। उसने मेरेको बॉटल दिया। मैं ओ जेबमे डालकर वहासे निकल गया। "

त्याची स्टोरी संपली होती. आता तो त्याचं तत्वज्ञान सांगत होता. " कुछ गलत किया क्या मैंने ? मैं पहले आया।  मैं पैसा दे रहा हुँ।  मैं लाइनमे आगे हूँ।  तो मैं बाजु को क्यों जाने का ? तुमही बोलो मेरे को।  सॉरी , सॉरी मैं आपसे जैसे बुजुर्ग को एकेरी तुम बोला इसिलिए माफ़ करो।  मैं कुछ किया रहेंगे तो आपका चप्पल और मेरा मुँह। " टपोरी असुनही एका जेष्ठाला आपण एकेरी संबोधलं म्हणू खजील झालेल्या चहावाल्याच मला कौतुक वाटलं.  

माझा चहा पिऊन झाला होता. भूक शमली होती. एका टपोरी म्हणता येतील अशा चहावाल्याच तत्वज्ञान ऐकायला मस्त वाटत होतं. मी आणखी थोडासा रेंगाळलो. चहावाला बोलतच होता, " आपण साला ऐसा आदमी है कसी को कुछ बोलेगा नही।  क्या है , आप मेरे सामने है तो आप मेरा एैना है। मैं आपको गली दूँगा तो ओ मेरे को लगेगी।  फिर मैं आपको गाली क्यों दूँ ? "

तसं पाहिलं तर तो चहावाला एकेकाळचा टपोरिच. ' आप मेरा एैना है ' हे त्याचं तत्वज्ञान मला फार आवडलं. मी त्याचा हात हातात घेतला. हळूवार दाबला. हि मी त्याच्या तत्वज्ञानाला दिलेली दाद होती. सगळं करून झालंय. आता मात्र सगळ्याला रामराम. कुणावर दादागिरी करत नाही आणि कुणाची दादागिरी खपवुन घेत नाही. अजित पवारांपासून दीड दोन दशकापूर्वी शिक्षण मंत्री होऊन गेलेल्या रामकृष्ण मोरेंपर्यंत अनेकांची नावं तो घेत होता. त्यांच्या बैठकीत उठबस असल्याचं सांगत होता. तो बोलतच होता. मी मात्र त्याचं ' समोरची व्यक्ती आपला आरसा असते. आपण त्याला  जे काही वाईट बोलु ते आपल्यावरच उलटत. आपल्यालाच लागतं. ' हे तत्वज्ञान गाठीला बांधून मार्गाला लागलो.

हे तत्वज्ञान त्याला. उशिरा सुचलं होतं. आयुष्यातलं बालपण सरून गेलं होतं. त्या टपोरी आयुष्याच्या भुलभुलैयात शिक्षण व्हावं तसं झालं नाही. चहाची गाडी लावायची वेळ आली. पण म्हणतात ना , ' सुबहका भुला शामको लौटा तो उसे भुला नही कहेते '  अथवा ' देरसे आये लेकिन दुरुस्त आये. ' 

 
20 comments:

 1. Nice Blog... keep it up...
  submit this blog for more visitors....
  www.blogdhamal.com

  ReplyDelete
  Replies
  1. अजिंक्य अभिप्रायाबद्दल आभार. आपली सुचना आमलात आणि आहे. माझा ब्लॉग ' ब्लॉग धमाल ' ला सबमिट केला आहे. असेच भेटत रहा.

   Delete
 2. साधं पण मस्त तत्वज्ञान! पटलं......

  ReplyDelete
  Replies
  1. अभिप्रायाबद्दल आभार. आपला ब्लॉग पहिला आहे. आपण हि छान लिहिताय. लिहिण्याची वारंवारता मात्र फार कमी असते. पण आपले नाव कधी कळेल का ?

   Delete
  2. धन्यवाद. मला माहिती आहे...खूपच कमी वेळा लिहीले जाते....अधिक नियमित लिहायचा प्रयत्न करेन नक्कीच. तुमच्या प्रोत्साहना बद्दल आभार.

   Delete
 3. U P, bihar ani west bengal la jar dhorni mukhyamantri maglchya 40 varshat bhetle aste tar aaj aapla desh pragatshil rahila asta. s.p., bsp, jdu, communist ani tmc sarkhe paksha tithe rajya kartat he tya lokanche badluck aahe. aaplya rajya sarkarla kadhi development, employment babat kadhi chukun pan vicharnar nahit. pan " sanvidhan kahata hai, koi bhi bhartiy pure bharat me jakar naukri kar sakta hai" he tond var karun sangnar. tyamulech deshatil sagli mahanagre hyancha load ghet aahet.

  Regards.
  Bapu Tangal.

  ReplyDelete
  Replies
  1. बापूजी, प्रतिक्रियेबद्दल आभार. सपा, बसपा, तृणमूलच नव्हे तर कोणत्याही स्थानिक पक्षाचे राजकारण जनहिताचे असू शकत नाही. माझा
   ' स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा ' हा लेख जरूर पहावा. http://maymrathi.blogspot.in/2014/09/indian-politics_18.html

   Delete
  2. Shendgesaheb,
   Mi tumche sagle blog regular vachat asto. Nuste Bapu mhatle tari chalel.
   regards.
   Bapu.

   Delete
  3. बापु, मी बहुदा सगळ्यांनाच आदरार्थी संबोधन वापरतो. कारण या सोशल मिडीयावरील कोणाच्याच वयाबद्दल आणि कर्तुत्वबद्दल अजिबात जाणीव नसते. त्यामुळे अनवधानाने आपल्याकडुन कुणाची मानहानी होऊ नये हि माझ्या आदरार्थी संबोधनामागची भावना असते. असो आपल्या विनंतीचा नक्कीच मन राखेन. परंतु आपले अधिकाधिक अभिप्राय मिळतील हि अपेक्षा. कारण रसिकांचा प्रत्येक अभिप्राय हि पुढल्या लेखनाची नांदी असते. काही अनावश्यक लिखाण होत असेल तर नक्की सांगावे.

   Delete
 4. एक चांगला अनुभव.. share केल्याबद्दल धन्यवाद...

  ReplyDelete
  Replies
  1. प्रतिक्रियेबद्दल आभार. आपण जे फॉलो करता त्यात माझा ब्लॉग नाही. अर्थात त्यामुळे वाईट वैगेरे वाटले नाही. असो अशाच वेळोवेळी पाठीवर थाप देत रहाल आणि वेळ आलीच तर उणीवाही दाखवाल अपेक्षा.

   Delete
 5. आरशाच तत्वज्ञान योग्यच आहे सर पण अनेकदा स्वत:कडे वाईटपणा घेऊन काही जणांना आरसा दाखविणे आवश्यक असते असे माझे मत आहे बाकि आपला स्वानुभव आवडला.

  ReplyDelete
  Replies
  1. मकरंदजी आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट देताय. आपले स्वागत. प्रतिक्रियेबद्दल आभार. चहाल्याच पुढचं वाक्य आपल्या नजरेतून सुटलं असावं. तो म्हणतो, ' कुणावर दादागिरी करत नाही आणि कुणाची दादागिरी खपवुन घेत नाही.' हे तत्वज्ञान त्याला. उशिरा सुचलं होतं. आयुष्यातलं बालपण सरून गेलं होतं. त्या टपोरी आयुष्याच्या भुलभुलैयात शिक्षण व्हावं तसं झालं नाही. चहाची गाडी लावायची वेळ आली. पण म्हणतात ना , ' सुबहका भुल …… ' अथवा ' देरसे आये लेकिन ……… '

   Delete
 6. वाल्याचा वाल्मिकी झाला हे महत्वाचं. मस्त लेख.

  ReplyDelete
  Replies
  1. आभार मित्रा. परंतु नावासह अभिप्राय दिल्यास अधिक होईल.

   Delete
 7. khup chan me pahilyandach tumcha blog wachtoy pan tumcha presence of mind khup chan I mean asach aplya ayushyat khup goshti ghadat astat pan tyabdl apan wichar karat nahi ignore karto parantu tumhi eka 5 min chy bhetemdhe je nirikshan kela tyabdl khup chan sandesh det ahat

  ReplyDelete
 8. आपण कोण आहात माहित नाही. पण ' रिमझिम पाऊस ' वर आपले मनपूर्वक स्वागत. आपल्याला माझे लेखण आवडले असे दिसते. आता नियमित संपर्कात रहा. आणि हो पुढच्या वेळी आपले नाव नक्की लिहा. अभिप्रायाबद्दल आभार.

  ReplyDelete