खरंतर सत्तेची हाव कुणाला ? भाजपाला कि शिवसेनेला ? या विषयावर मी लिहिणारच नव्हतो. कारण काय या विषयावर चर्चा करण्याचं ? भाजपा शिवसेना एकत्र येणं हि महाराष्ट्राची गरज आहे. पण मला ज्या अनेक प्रतिक्रिया येतात त्यात शिवसेनेचे काही पाठीराखे भाजपाला सत्तेची हाव आहे असे म्हणतात. त्यांचे म्हणणे खोडून काढणे हा माझा हेतु नाही. पण वस्तुस्थिती काय आहे हे वाचकांसमोर मांडायलाच हवे. म्हणुन या विषयावर लिहायला घेतलं.
अनेकांना असे वाटते कि मी शिवसेनेचा विरीधक आणि भाजपाचा समर्थक आहे. पण तसे मुळीच नाही. महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर सत्तेत आली असती तर मला आनंदच झाला असता. पण उद्धव ठाकरे कधीही स्वतःची कुवत ओळखून वागले नाहीत. काळाची पावलं ओळखून निर्णय घ्यायला त्यांना कधीच जमलं नाही. आज दीड दोन महिन्याच्या चर्चेनंतर शिवसेनेच्या मागण्या मान्य होतीलही. त्यांना हवे तसे होईलही. शेवटी आपण जिंकलो असे शिवसेनेला वाटेल. एकमेकांच्या पाठीवर थाप पडेल. अभिनंदनाचे वर्षाव होतील. हारतुरे होतील. तुताऱ्या वाजतील. पण खरंच हा शिवसेनेचा विजय असेल ? भाजपाचं या सगळ्यामागे जे राजकारण आहे त्याविषयी मी जेव्हा शिवसेना खर्या अर्थाने सत्तेत सहभागी होईल, मंत्रिपदांचा स्वीकार करेल तेव्हा लिहीन.
जागावाटप होताना जे काही झाले त्यातहि उद्धव ठाकरेंचा स्वार्थच होता. जेव्हा आपण भाजपापेक्षा २५ ते ३० जागा जास्त लढवू तेव्हा भाजपापेक्षा आपले जास्त आमदार निवडून येतील. आणि मग आपण मुख्यमंत्रीपदावर दावा सांगू शकू. आपल्याला हवी ती मंत्रीपदं पदरात पाडून घेऊ आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करू. हि सगळी गणितं उद्धव ठाकरेंच्या मनात होती. पण काय पदरात पडलं ? चार सहा जागांसाठी युती तुटली. युती तुटणं हा शिवसेनेचा मतदानाआधी झालेला पराभव होता.
प्रचार सुरु झाला. उद्धव ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादीचा विसर पडला. ते आपल्या मित्रालाच प्रमुख शत्रु मानू लागले. भाजपावर चौफेर टीका करू लागले. उद्धव ठाकरेंच्या मनातलं गणित असं कि , ' जनतेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी नकोच आहेत. त्यामुळे भाजपा हाच आपला शत्रु असा मुद्दा जनतेसमोर उपस्थित केला तर स्थानिक पक्ष आणि हिंदुत्ववादी भुमिका या मुद्यांवर आपण भाजपापेक्षा अधिक जागांवर विजयी होऊ. पण झाला उलटंच. काँग्रेस राष्ट्रवादी नेस्तनाबुत होताहोता वाचली. शिवसेनेला केवळ ६३ जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपा १२३ जागांवर विजयी होऊन सत्तेच्या जवळ पोहचला. हा शिवसेनेचा आणखी एक पराभव.
शिवसेनेचे केवळ ६३ आमदार निवडून आले असले तरी भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही. या गोष्टीचा शिवसेनेला आणि शिवसैनिकांना मनस्वी आनंद झालेला होता. ( कारण दुसऱ्याचे पाय खेचणे हि आमची परंपरा आहे. ) त्यामुळेच राष्ट्रवादीन बिनशर्त पाठींबा जाहीर केलेला असताना उद्धव ठाकरे मात्र , ' त्यांना गरज असेल तर त्यांनी प्रस्ताव घेऊन यावं. आमची दारं उघडीच आहेत. ' असं म्हणत राहिले. पुढा घडलेल्या गोष्टी इथं विस्तारानं लिहित नाही. पण जे घडलं ते म्हणजे शिवसेनेचा प्रत्येक पावलाला झालेला पराभव होता.
फोडाफोडीच राजकारण करण्यात भाजपाला रस नाही. तसं असतं तर दिल्लीतली सत्ता भाजपानं सोडली नसती. फोडाफोडी करायची नाही. महाराष्ट्रातल्या सत्तेपासून काँग्रेस राष्ट्रवादीला दुर ठेवण्याचा विचार पूर्णत्वास न्यायचा आहे. आणि काही असलं तरी शिवसेना हा आपला मित्रपक्ष आहे याची जाणीव भाजपाला आहे. म्हणुन भाजपा पुन्हा पुन्हा शिवसेनेच्या गळ्यात पडते आहे. याचा अर्थ भाजपाला सत्तेची हाव आहे असा होत नाही. कारण देशासह आठ दहा राज्यांची सत्ता हातात असणाऱ्या भाजपाला महाराष्ट्रातली हि अर्धीमुर्धी सत्ता गेली तरी काही फरक पडणार नाही. कारण केंद्रात भाजपा ज्या रितीने निर्णय घेते आहे ते पाहिल्यानंतर पाच वर्षांनी भाजपाची महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता येणं मुळीच अवघड नाही.
पण शिवसेनेचं काय ? शिवसेना गेली पंधरा वर्ष सत्तेपासून दूर आहे. आणखी पाच वर्ष गेले तर पुन्हा काय होईल सांगता येत नाही. स्वबळावर सत्तेत येण्याची शिवसेनेची ताकद नाही. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचं नाव नाही. म्हणजे महाराष्ट्रात आज सत्तेत सहभागी होता येण्याची शक्यता आहे. आणि सत्ता मिळण्याची हि एकमेव संधी शिवसेनेसमोर आहे. त्यामुळेच हाव असलीच तर ती शिवसेनेला.
आणि आज एवढ सारं घडत असताना शिवसेनेने आपला हेका सोडला नाही. आज दिड महिन्यानंतरही, ' आम्ही विरोधी पक्षातच ' अशी भुमिका शिवसेनेने घेतली नाही. आजपर्यंत उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद, महसुल खाते अशा निवडक मंत्रालयांची मागणी सतत लावून धरली आहे. कारण ती खाती हातात म्हणजे केक खाता येण्याची शक्यता जास्त.
पण भाजपानं मात्रं राष्ट्रवादीच्या पाठिंब्याला भिक घातली नाही. कोणत्याही क्षणी राष्ट्रवादीचा पाठींबा स्विकारला नाही. अगदी बहुमत सिद्ध करताना सुद्धा. शरद पवार, अजित पवार यांचा डाव फसला. मग ते भाजपाला भीती दाखविण्यासाठी परस्पर विरोधी विधाने करू लागले. मध्यावधी निवडणुकांची भीती घालू लागले. शरद पवार, अजित पवार यांच्या या भूमिकेलाही भाजपानं भिक घातली नाही. राष्ट्रवादीचा पाठींबा स्विकारला नाही. पण आज दिड महिन्यानंतर भाजपा राष्ट्रवादीच्या सोबत जाणार नाही. आणि आता आपल्याशिवाय भाजपाला दुसरा कोणी वाली नाही. हे उद्धव ठाकरेंनी पुरतं ओळखलं आहे. आणि त्यामुळेच आपल्या मागण्या जशाच्या तशा लावून धरल्या आहेत.
शिवसेना भाजपाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करते आहे. मी माझ्या ' काय आहे भाजपाच्या मनात ' आणि
' मिठाचा खडा आणि उद्धव ठाकरे ' या लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे भाजपा वाट्टेल त्या किंमतीत शिवसेनेला सोबत घेईल पण तो शिवसेनेचा विजय नसून पराभव असणार आहे.
हा पराभव शिवसेनेच्या लक्षात येणार नाही. आणि आला तरी त्यांनी त्याबद्दल शोक करू नये. कारण शिवसेनेचा हा पराभव एकटया भाजपाच्या तसेच शिवसेनाच्या आणि महाराष्ट्राच्या फायद्याचा असणार आहे.
हा पराभव शिवसेनेच्या लक्षात येणार नाही. आणि आला तरी त्यांनी त्याबद्दल शोक करू नये. कारण शिवसेनेचा हा पराभव एकटया भाजपाच्या तसेच शिवसेनाच्या आणि महाराष्ट्राच्या फायद्याचा असणार आहे.
आपला लेख खूपच छान आहे. जे तुमचं मत आहे तेच माझंही. स्वार्थापोटी आंधळ्या झालेल्या उद्धव ठाकरेंना ए कसं कळणार.
ReplyDeleteआभार मित्रा. तुझ्याप्रमाणे प्रत्येक शिवसैनिक जागा झाला तर या स्वराज्याचं सुराज्य व्हायला फारसा वेळ लागणार नाही.
Deleteअहॊ मग bjp ने पाठींबा का नाकारला नाही,,,,,,,त्यात 'तुमच्या' bjp चा सवाभिमान दिसला असता,,,,,,
ReplyDeleteप्रथम सांगतो की मी शिवसैनिक नाही. उलट शिवसेनेच्या गुंडगिरीमुळे पोळलेला एक सामान्य नागरिक आहे. माझे या पक्षाशी व्यक्तिगत कसलेही वैर किंवा द्वेष नाही हा पक्ष सुरुवातीपासून पक्ष म्हणून न वाढता एक टोळी म्हणून वाढला. त्यातील सुजाण व बुद्धीवादी अनुयायी त्यामुळे सोडून गेले किंवा गप्प राहिले. आता या संघटनेचा असत होण्याची वेळ आली आहे असे वाटते. आपण जे परखडपणे लिहित आहात याचे कौतुक वाटते म्हणून हे स्पष्टपणे लिहित आहे.
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल आभार. मीही शिवसेनेचा विरोधक नाही. उलट आजमितीस पुण्यात माझी बहीण शिवसेनेची नगरसेवक आहे. पण स्वाभिमानाच्या नावाखाली किती ताठरपणा दाखवावा याला काही मर्यादा असतात. उद्धव ठाकरेंचं हे वागणं म्हणजे हात दाखवुन अवलक्षण आहे.
Deleteपण महत्वाचं म्हणजे आपण कसे पोळले आहात. हे जाणून घेण्याची इच्छा आहे. shendgevjay2@gmail.com वर आपण आपल्यावरील प्रसंग कळवळत तर बरे होईल. आपली परवानगी असेल तर आपले नाव टाळून त्यावर लिहिण.
Udhav thakreycha jagi babasaheb aste tar tynhi satta dhudkarli asti. Pn udhav thakrey cha tiger satte sathi undir banu pahto aahe. Etun phdhe tyni chmchegiri saru karavi , rajkarn sodun .pandhre saheb mi tumchyashi 100% sahmat aahe.
ReplyDeleteमित्रा प्रतिक्रियेबद्दल आभार. आपले म्हणणे बरोबर आहे पण मला त्यात थोडीशी सुधारणा करावीशी वाटते. बाळासाहेब असते तर त्यांनी युतीच तुटू दी नसती आणि त्यामुळे पुढचे सारे प्रश्नच निर्माण झाले नसते.
ReplyDeleteधनगर आरक्षण न देणार्याला फाडून काढू. आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच.
ReplyDeleteपन्कजा मून्डेलाच मुख्यमन्त्री करा नाहीतर असले मोदी एका दमात उखाडून फेकू.
ReplyDeleteमित्रा हे सभ्य माणसांचं व्यासपीठ आहे. इथे अशी फाडण्याची भाषा करू नये. बरं इतके फाडणारे आहात तर आजपर्यंत का गप्प बसलात ?
ReplyDeleteधनगराना गौड बोलून झुलवत ठेवल साल्यानी. भाजपा तर काहीच करत नाहीये. जवखेडा, खडसेचे टोमणे, फडणवीसला मुख्यमन्त्री केल्यावर असच होणार.
Deleteथांबा थोडे. सगळे निट होईल
Deleteमित्रा पंकज मुंडेंना मुख्यमंत्री केलं तरी मला काही फरक पडणार नाही. पण अनुभव नावाची काही चीज असते. हे असलं जातीयवादी, प्रांतवादी, दादागिरीचं राजकारणच महाराष्ट्राच्या विकासात अडथळा ठरणार आहे.
ReplyDeleteआता परत का मातोश्री वर चाललेत मग ? राष्ट्रवादी सोबत का नाही चालवत सरकार? नाथाभाऊ च्या भाषेबद्दल काय? बेळगाव चा नाव तर एका आठवड्यातच बदलला..भाजप युद्धात जिंकून तहात हरत आहे ...उद्धव ठाकरे हळू हळू पावले टाकून जिंकत आहेत !
ReplyDeleteवन्जारी समाजाला sheduled tribes म्हणुन घोषित करा. मुन्डेसाहेबान्चा बदला घ्या. एकच नारा पन्कजाला मुख्यमन्त्री करा.
ReplyDeleteमित्रांनो कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर्भाला बरे पडते. कोण जिंकतं आणि कोण हरतं याला काहीच किंमत नाही. शिवसेना भाजपा एकत्र येणं हि महाराष्ट्राची गरज आहे. त्यात महाराष्ट्राचं भलं आहे. केवळ हे उद्धव ठाकरेंना कधीच कळालं नाही याचं दुखः वाटतं. ते कालही केवळ आपला स्वार्थ पहात होते आणि आजही केवळ आपला स्वार्थ पहाते आहे.
ReplyDeleteमित्रांनो कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर्भाला बरे पडते.
ReplyDeleteकाँग्रेसन ज्या गोष्टी साठ वर्षात केल्या नाहीत त्या गोष्टी भाजपा पाच महिन्यात अथवा पाच दिवसात करेल अशी अपेक्षा करणं चुकीचं नाही का ? त्यांना वर्ष दोन वर्षाचा वेळ द्यायला हवा. नाही जमले तर उतरवा त्यांना सत्तेवरून. द्या शिवसेनेच्या हातात सत्ता.
मित्रांनो कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर्भाला बरे पडते.
ReplyDeleteपोटासाठी जो समुह स्थलांतर करतो त्याचा समावेश एसटी या वर्गात केला जातो. वंजारी समाजाचा नेमका व्यवसाय काय हे मला माहित नाही. पण प्रत्येकानं ऊठ सुठ आमचा समावेश एससी. एसटी करा असे म्हणू लागे तर कसे होणार. शिवाय इतर जातींचा त्या त्या प्रवर्गात समावेश करताना त्या प्रवर्गात आधी असलेल्या जाती विरोध करतात त्याचं काय ? पण असो आपण पाठपुरावा करावा.
उध्दव ठाकरेनी राजकीय सूद्नपणा दाखवावा. मला व सेनेच्या कार्यकर्त्याना हेच वाटत असेल. स्वाभिमान वगैरे काय तो पाहायला मिळालाच आहे. उध्दव ठाकरेनी संधी गमावल्यास पक्ष फूटू शकेल किंवा शरद पवारानी जाळ टाकलं आहेच ते बाजी मारतील असे दिसते.राष्ट्रवादी हा पक्ष कधीही भाजपा सोबत बसू शकत नाही शिवसेनासोबत भाजपा ला महाराष्ट्रीयन जनता कबुल करेल पण राष्ट्रवादी सोबत कधीच नव्हे ,राष्ट्रवादी हिंदू विरोधी भ्रष्ट पक्ष आहे, भाजपाने कोणाचाच पाठींबा न घेता अल्पमतातील सरकार चालवा पण राष्ट्रवादी अजिबात नको..... कंटाळा आला ह्या बातमी चा.. आता जेव्हा निर्णय होईल तेव्हा बघू.. किती दिवस गूर्हाळ चालू आहे.. भाजपने सत्ता टिकवण्याच्या नादात कामाकडे दुर्लक्ष तर होत नाही ना हे ही पहाव..
ReplyDeleteअहो उठसुठ कोणीही ST मध्ये आरक्षण मागायला लागल तर कस हौणार. आधीच मुन्डेनी वन्जारीना NT अन्तर्गत स्वतन्त्र आरक्षण देउन इतर NT वाल्यावर घोर अन्याय केलाय.
ReplyDeleteST मध्ये कोणालाही घालु नका आता. नाहीतर सगळच आरक्षण रद्द करा.
पन्कजा मुन्डेला पन्तप्रधान केल्याशिवाय गप्प बसणार नाही. सान्डलेल्या रक्ताची शपथ घेतो.
ReplyDeleteवन्जारी समाजाला ST अन्तर्गत स्वतन्त्र आरक्षण द्या जस मुन्डेसाहेबानी NT अन्तर्गत दिल होत.
ReplyDeleteशेन्डगेजी असल्या जात्यन्ध लोकान्च्या कमेन्ट कशाला प्रसिद्ध करता? ह्याना जात व आरक्षण ह्याशिवाय दूसर काही सुचत नाही.
ReplyDeleteसुजीत मी गावी गेलो होतो. शेतावर. त्यामुळे उत्तर दयायला वेळा झाली आज आलोय तेही एका दिवसासाठी. आता दोघे एकत्र आलेत. त्यामुळे महाराष्ट्राला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
ReplyDeleteमित्रा कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर्भाला बरे पडते. मी गावी गेलो होतो. शेतावर. त्यामुळे उत्तर दयायला वेळा झाली आज आलोय तेही एका दिवसासाठी.
ReplyDeleteमी आरक्षणातच येतो. आरक्षण रद्द करायला तुमच आणि माझी संमती असून भागणार नाही. भाजपानं असं काही केलं तर विरोधक टपलेले आहेतच.
मित्रा कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर्भाला बरे पडते. मी गावी गेलो होतो. शेतावर. त्यामुळे उत्तर दयायला वेळा झाली आज आलोय तेही एका दिवसासाठी.
ReplyDeleteपंकजा मुंडेंना पंतप्रधान कधी करताय ? मित्रा या अशा जातीयवादी भूमिका सोडून दे.
मित्रा कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर्भाला बरे पडते. मी गावी गेलो होतो. शेतावर. त्यामुळे उत्तर दयायला वेळा झाली आज आलोय तेही एका दिवसासाठी.
ReplyDeleteमित्रा आरक्षण देऊन कुणी मोठं होत नाही. बाबासाहेब वकील झाले. घटनेचे शिल्पकार झाले तेव्हा त्यांना कुणी आरक्ष दिलेला नव्हतं. गुणवत्ता अंगात असावी लागते.
मित्रा कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर्भाला बरे पडते. मी गावी गेलो होतो. शेतावर. त्यामुळे उत्तर दयायला वेळा झाली आज आलोय तेही एका दिवसासाठी.
ReplyDeleteअशा जातीयवादी रसिकांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. पण त्यांच्या प्रतिक्रिया प्रकाशित केल्यामुळे मला काहीच फरक पडत नाही. उलट समाजातले मतप्रवाह मला आणि इतर वाचकांना कळायला मदतच होते.
विजय शेंडगे साहेब तुम्ही निपक्ष पणे लेख लिहित चला तुमचे सर्व लेख हे भाजप च्या बाजूने दिसतायेत.... मी एक कट्टर शिवसैनिक आहे...
ReplyDeleteप्रसादजी प्रतिक्रियेबद्दल आभार. आपल्या निष्ठेविषयी मला शंका नाही. पण माझे इतर लेख वाचा म्हणजे मी शिवसेनेचाच आहे हे आपल्या लक्षात येईल. हो मोदींच्या धोरणाचा मला अभिमान आहे. पण भाजपानं काही चुकीचे निर्णय घेतले तर त्यांच्यावर तीकाक्रय्लाही मी मागेपुढे पहाणार नाही .स्थनिक पक्षापेक्षा आपल्या देशाला राष्ट्रीय पक्षाची अधिक गरज आहे. या गोष्टीचा आपणही विचार करा. आणि भाजपा योग्य वाटत नसेल तर कॉंग्रेसच्या पाठीशी जा
ReplyDelete