Tuesday, 12 September 2017

टॉप मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट आणि बॉटम लाईन ( Top Management, Middle Management and Bottom Line )

top management, middle management and bottom linet

story of Indian management

काल One Cruise या कंपनीच्या एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. टुरिझमशी रिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी हि अग्रेसर कंपनी. मुळात आपल्या ऑफर कस्टमर समोर मांडणं आणि आपले लाईफ टाईम सभासद वाढवणं हा त्यांच्या या कार्यक्रमाचा हेतू.

मला हँडेल  करणारा तरुण साधारणतः चोवीस - पंचवीसचा. ग्रामीण भागातून आलेला. आई वडील शेतकरी. शिक्षण BE Mechanical. MS करण्यासाठी जर्मनीला जाण्याची महत्वकांक्षा बाळगणारा. पण घरची परिस्थिती बेताची. म्हणून ते स्वप्नं अडगळीत फेकणारा.

त्यानं आजच्या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.

एक मेकॅनिकल इंजिनीअर हे असलं काम करतोय हे पाहून मला कससंच झालं. मी त्याला त्याचं शिक्षण विचारलं होतंच. तोच धागा पकडुन  मी म्हणालो, " BE झालास मग हा असला जॉब का करतोस ? "


" सर, मार्क्स कमी होते. " त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं.

" मग आता. "

" हा जॉब पार्टटाइम. पॅरलल MPSC ची तयारी करतोय. ACP  व्हायचं स्वप्नं मनात आहे. जर्मनीचं  स्वप्नं प्रत्यक्षात नाही उतरलं. कारण त्यासाठी खूप पैसा लागत होता. आईवडिलांकडे तेवढी पुंजी नव्हती. पण त्यासाठी आईवडिलांना दोष देणार नाही सर. आयुष्यभर काबाडकष्ट करून त्यांनी इथवर पोहचवलंय हे त्यांचे फार मोठे उपकार आहेत.  पण या ACP च्या स्वप्नासाठी मला अभ्यास करायचाय. आणि ते माझ्या हातात आहे . खुप कष्ट करीन सर पण ACP होईनच. "

तो तरुण सुंदर. हसतमुख. प्रभावी संवाद कौशल्य असणारा.आमची चर्चा रंगात आली होती. त्यानं त्याच्या कंपनीविषयी सर्व माहिती दिली. आम्हाला त्यांच्या ऑफर चांगल्या वाटतं होत्या पण तरीही आम्ही त्याक्षणी त्या ऑफर स्विकारू शकत नव्हतो. वेळ होता. सहाजिकच आम्ही अवांतर गप्पा मारू लागलो. इंडस्ट्रियल रिसेशन , नोटाबंदी, भारताचं भविष्य , मोदींच्या रुपातला आशेचा किरण  अशा अनेक विषयांवर आम्ही चर्चा करत होतो. आमची चर्चा रंगात आली होती. इतक्यात आमच्या टेबलजवळ आणखी एक तरुण आला. त्याच्या हातातला मोबाईल आमच्यासमोर बसलेल्या  तरुणाला दाखवत म्हणाला , " हा मोबाईल तुझा आहे का ? "

" हो "

" कुठे ठेवला होतास ?"

" काही वेळापूर्वी घरी फोन केला होता तेव्हा चार्जिंगला लावून तिथेच ठेवला. "

" असा कुठेही फोन ठेवतात का ? पुन्हा असं झालं तर घरी पाठविण."

माझ्या समोर बसलेल्या तरुणांनं ते खूप लाइटली घेतलं पण माझ्या कपाळावरची शीर तडतड करू लागली. तसं पाहिलं तर ते दोघेही समवयस्क होते. दोन चार वर्षाचा फरक असणारे.  परस्परांचे कलीग दिसणारे. त्यामुळे त्या तरुणाचं ते बोलणं मला अजिबात आवडलं नाही. सहाजिकच माझी लिंक तुटली. बोलणं पुढं सुरु करताना मी कुठवर आलो होतो ते आठवेना. तेव्हा समोर बसलेला तरुण म्हणाला , " काय झालं सर. आपण काय बोलत होतो ते आठवत नाही का ? "

मी थोडा अडखळो. मग म्हणालो , " नाही रे. हा आत्ता आलेला तुझा बॉस होता का ? "

" हो. "

"तो जे काही बोलला त्यामुळे माझं डोकं ग्राम झालंय. "

" जाऊ द्या ना सर. चालायचंच. "

" नाही रे. आपल्या भारतीय व्यवस्थापनात हे असंच आहे. बहुतेक बॉसला त्यांच्या टीमवर असं तोंड सुख घेण्यातच धन्यता वाटते . आपल्याकडे परफॉर्मन्स हा क्रायटेरिया नसतोच कुठे.'  यस सर , हो सर , करतो सर ' हि पॉलिसी महत्वाची मानली जाते. सो वी आर लॅगिंग. भारतीय इंडस्ट्री फक्त चालते. तिचा ग्रोथ होत नाही. "

" खरं आहे सर . पण इलाज नाही. "

त्यानंतरही आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. पण घडलेला प्रसंग डोक्यातून जात नव्हता.

खरंतर कोणत्याही व्यवस्थापनात काम करणारे आपण सगळेच नौकर असतो. आपल्या कंपनीचा ग्रोथ हीच भावना प्रत्येकाच्या मनात असते. चुका प्रत्येकाकडूनच होतात. पण आपल्या ज्युनियरला सांभाळून घेण्याऐवजी त्यांना फायर करण्यातच अनेक सुपिरियरला धन्यता का वाटते कोणास ठाऊक ?

माझी तर अशी ठाम धारणा आहे कि बऱ्याच उद्योगांना जी उतरती कळा लागते ती टॉप मॅनेजमेंटच्या धोरणांमुळे. मिडल  मॅनेजमेंट अथवा बॉटम लाईन त्या अपयशाला कधीच कारणीभूत नसते. मग आपण त्यातून काहीच बोध का घेत नाही ?



  

2 comments:

  1. This is a topic which is close to my heart... Cheers!

    Where are your contact details though?

    ReplyDelete
  2. Peculiar article, just what I needed.

    ReplyDelete