Sunday, 22 February 2015

Night life in Bombay नाईट लाईफ… कुणासाठी ? कशासाठी ?


सत्तेत सहभागी होण्यापुर्वी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचा दौरा करणारे आणि आपण शेतकर्यांचे कैवारी असल्याचा आव आणणारे. दुष्काळी भागात जाऊन पदरमोड करून शेतकऱ्यांना लाखाचे चेक देणारे उद्धव ठाकरे सत्तेत सहभागी होताच शांत झाले. सत्तेत सहभागी झाल्यापासून त्यांनी दुष्काळाविषयी चकार शब्द काढला नाही. स्वतः पडद्यामागे गेले. आदित्य ठाकरेंना पुढं  केलं. आणि आदित्य ठाकरेंनी कोणता फतवा काढला ? तर ' नाईट लाईफ ' चा. कशासाठी ? कुणासाठी ?


शिवरायांच्या नावाने पक्ष चालवणाऱ्या शिवसेनेला आपल्या संस्कृतीचा विसर पडला का ? काय साधणार नाईट लाईफ मधुन ? या संदर्भातली आदित्य ठाकरेंची वेगवेगळी विधानं ऐकली. त्यातली काही खाली दिली आहेत - 

१ ) नाईट लाईफ सगळ्यांसाठी आहे सगळ्यांसाठी आहे. 
२ ) हॉटेल व्यवसायाला तर त्याचा फायदा होईलच पण वडापाववाले, छोटे व्यावसायिक यांनाही त्याचा फायदा होईल. 
३ ) नाईट लाईफ मुळे रोजगार वाढेल. 
४ ) नाईट लाईफला विरोध करणाऱ्यांनी माझा ब्लॉग वाचावा. ( मी वाचला तो ब्लॉग. मराठी भाषेचा डंका पिटणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंचा ब्लॉग इंग्रजीत आहे. http://yuva-sena.in/m/mumbai-nightlife/ हि त्या ब्लॉगची लिंक. )     
५ ) राज्याचा महसुल वाढेल.   

कोणाला पटतील हि विधानं ? 

उलट रात्री अपरात्री अनिष्ट प्रवृतींचा वावर वाढतो. गुन्हेगारी वृत्तीची मंडळी मोठ्या प्रमाणात बाहेर असतात. कोणाही सुसंस्कृत व्यक्तीला नाईट लाईफचा आस्वाद घेण्यासाठी घराबाहेर पडावंसं वाटणार नाही. मग काय साधणार नाईट लाईफ मधून ? 

कोणी मागणी केली होती नाईट लाईफची ? 

कोणाचा फायदा होईल यामुळे ? 

यातून साधणार काहीच नाही. उलट त्यामुळे पुढील समस्या निर्माण होतील - 

१ ) गुन्हे वाढीस लागतील. 
२ ) पोलिस यंत्रणेवरचा कामाचा ताण वाढेल. 
३ ) तरुणांमध्ये चंगळवाद वाढेल. 
४ ) मराठी साहित्यापासुन दुरावलेली तरुणाई आणखी दुरावेल. 
५ ) मराठी संस्कृती आणखी अडगळीत पडेल.


फायदाही होईल पण कसा ? - 
पोलिसांच्या हप्त्यात वाढ होईल. 

हॉटेल व्यावसायिकांकडुन शिवसेनेला मोठया प्रमाणात महसुल मिळेल.     

यासाठीच सत्तेत सहभाग हवा होता का शिवसेनेला ? नशीब शिवसेनेला बहु मतातली सत्ता मिळाली नाही. ती जर मिल तर काय करतील हे बाप लेक कुणास ठाऊक ?

आपण कितीही बोंब ठोकली तरी ती मंडळी त्यांना हवे तेच करतील. त्यामुळेच मुंबईकर आता काहीच करू शकले नाही तरी येऊ घातलेल्या निवडणुकीत शिव्सेनेलान्क्कीच धडा शिकवतील असा विश्वास वाटतो.





10 comments:

  1. मस्त विजयजी चांगली माहिती मिळाली

    ReplyDelete
    Replies
    1. रमेशजी, अभिप्रायाबद्दल आभार. तुमच्यासारख्या रसिकांचे अभिप्राय हिच प्रेरणा. काही चुकत असेल तरी सांगावे.

      Delete
  2. बरं झालं हा विषय काढला...माझा तर अगदी संताप संताप होतोय. आणि आदित्य ठाकरे लाख म्हणेल काही...मुख्य मंत्र्यांना कळत नाही का...? की सगळेच डोळ्यांवर कातडं ओढून बसले आहेत?
    शिवसेनेचं इतकं लांगूलचालन करायचं होतं तर आधी कशाला दाखवला इतका तोरा आणि निस्पृहता...? नाईट लाईफ .....!! युवा पिढीच्या नितीमत्तेचे, संस्कारांचे आणि चारित्र्याचे वाभाडे आधी निघालेच आहेत...त्यात आणखी भर पडेल...! कुठे नेऊन ठेवताय आता महाराष्ट्र माझा!!

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल आभार.
      युतीच्या राजकारणात अशी घुसमट होतंच असते. त्यासाठीच महाराष्ट्रातल्या जनतेने एकहाती भाजपाच्या हाती सत्ता दयायला हवी होती. या असल्या युतीच्या राजकारणामुळेच अटलजींसारख्या सद्गृहस्थांनाही १३ दिवसात सत्ता गमवावी लागली होती हे कसे विसरता येईल.

      Delete
  3. महाराष्ट्र आणि मुंबईसमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. दुष्काळ, गारपिटीमुळे झालेले नुकसान, बळीराजाच्या आत्महत्त्या, पालिकेतील भ्रष्टाचार, रस्त्यातले खड्डे, वाहतुकीचे प्रश्न, बेरोजगारी, गगनाला भिडलेल्या घरांच्या किमती, महागाई. पण हे सारे प्रश्न अत्यंत दुय्यम आणि गौण आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा मुंबईतील नाईट लाईफ चा आहे. खरे वाटत नसेल तर आदित्य ठाकरेंना जाऊन विचारा. नाईट लाईफला मराठीत निशाजीवन असे म्हणता येईल हे जाता जाता सांगावेसे वाटते. . तेवढीच मराठीची सेवाही होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. सुजितजी अभिप्रायाबद्दल आभार.

      पण हे शालजोडे कुणाला मला कि शिवसेनेला ? अर्थात तुमच्या इतर अभिप्रायांचा बाज पहाता हे शालजोडे शिवसेनेसाठीच असावेत असा विश्वास वाटतो.

      Delete
  4. yօu're iin point of fact ɑ excellent webmaster.
    Τhe sire loading velocity іs amazing. It kіnd οf feels thɑt yοu'rе doing
    any distinctive trick. Μoreover, The contents aгe masterwork.
    yyou ɦave ԁone a wonnderful process in this matter!

    Alѕօ visit my web blog; gfgfgfghhyt

    ReplyDelete
  5. विजय राजे,सुंदर लेख !बऱ्याच दिवसांनी आपला ब्लॉग वाचण्याचा योग आला,सुंदर आणि अभिनंदन !

    ReplyDelete
    Replies
    1. आभार दत्ताजी.

      कुठे नाही पण इथेतरी आपली भेट होते हेही नसे थोडके. पण हि भेट वारंवार झाली तर आणखी बरे वाटेल.

      Delete