Thursday, 25 September 2014

Shiv Sena , BJP, Gopinath Munde : मुंडेंनी जोडलं उद्धवरावांनी तोडलं

होणार म्हणता म्हणता युती तुटली. घडू नये ते घडलं. चुकलं कुणाचं हे मतदार ठरवतीलच. परंतु पंधरा दिवसांच्या अनेक चर्चा झाल्या. आणि मिशन १५० प्लस घेऊन मैदानात उतरलेले उद्धव ठाकरे सत्ता मिळाल्याच्या थाटात १५०च्या खाली उतरले नाही. नवनवे फोर्म्युले मित्रपक्षांसमोर ठेवताना उषाव ठाकरेंनी कधी भाजपाच्या जागा कमी केल्या तर कधी घटक पक्षांच्या. मुख्यमंत्रीपदाचा आग्रही त्यांनी धरला होताच. कशासाठी हा अट्टहास ? 


दहा जागा कमी घेतल्या असत्या तर काय फरक पडला असता शिवसेनेला ? पण मी माघार घेणार नाही. घोडं मेलं तरी चालेल पण मी घोडयावरून उतरणार नाही ? हा कसला अट्टहास ? हि कसली हुकुमशाही ? बाळासाहेब गेल्यानंतर केवळ वर्षभरात उद्धव ठाकरेंनी किती सहजपणे दुधात मिठाचा खडा टाकला ? आता काय करणार ? युती तुटली आहेच आणि आघाडी होण्याची शक्यताही नाही. पण समजा या क्षणी आघाडी झाली आणि पुन्हा आघाडीचं सरकार आलं तर त्याला जबाबदार केवळ उद्धव ठाकरेंचं मिशन १५० प्लस असणार ना ! 

स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी किती दूरदृष्टीनं महायुती घडवून आणली होती. पण उद्धव ठाकरेंनी एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं. केवळ एका माणसाच्या अट्टहासपायी युती तुटली. 

आता आघाडीही मोडावी आणि चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावं. जोखून पहावी प्रत्येकानं आपापली ताकद. जनताच प्रत्येकालाच ज्याची त्याची जागा दाखवुन देईल. 

आज युतीतले घटक पक्ष भाजपाच्या सोबत जायला निघाले आहेत. कारण उद्धव ठाकरेंचा उद्दामपणा त्यांनी फार जवळून पहिला आहे. जो माणुस भाजपासारख्या पंचवीस वर्ष जुन्या आणि राष्ट्रीय पक्षाला इतकी तुच्छ वागणूक देतो अतो आपली काय किंमत ठेवणार आहे हे ते समजुन चुकले होते. आणि म्हणूनच घटक पक्षांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. 

उद्धव ठाकरे स्वतःला इथले सरंजाम समजतात. आणि म्हणूनच एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांनी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मातोश्रीवर यावं आणि आपली भेट घ्यावी अशी अपेक्षा करतात. मी स्वतः शिवसेनेचा कार्यकर्ता असुन शिवसेनेतलं राजकारण फार जवळून पाहिलं आहे. आणि त्यामुळेच युती तुटली ते बरंच झालं असं माझं प्रामाणिक मत आहे. आता शिवसेनेला आपली ताकद कळेल आणि मग मित्रपक्षांशी कसं वागावं याची समज त्यांना येईल. 

मी चार सहा तासापूर्वीच - 

Indian Politics : आघाडीचं घोडं अजित पवारांचा तट्टू 

हा लेख लिहिला होता. आणि त्यात उद्धव ठाकरेंप्रमाणेच अजित पवारही आघाडी तोडण्यासाठीच अडेलतट्टू भूमिका अशी आणि का घेताहेत याविषयी लिहिलं होतं. त्यात आघाडी तुटेलच असं भाकीत केलं होतं आणि हा लेख लिहिता लिहिता आघाडी तुटल्याची बातमी मिडीयावर झळकली आहे. 

चला आता महाराष्ट्रातल्या निवडणुकींना खरा रंग येईल. एक नक्की महाराष्ट्रात एकट्या भाजपाची सत्ता येणं अवघड आहे. त्यामुळेच निवडणुकीनंतर शिवसेनेला सोबत घ्यावंच लागणार आहे. पण तेव्हाही शिवसेनेने भाजपासोबत जायला नकार दिला तर ?

पण शिवसेना असा निर्णय घेणार नाही. तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं धुपाटण अशी अवस्था होत  असताना हाती धुपाटण घेवून का होईना शिवसेना सत्तेत सहभागी होईल. 




10 comments:

  1. kharch yar vijay amhi kharch bala sahebnana ani munde sahebnana khup miss kartoy
    te aste tar kadhi asla divas pahila nasta
    ati tith mati nakki hote
    he aaj sidhh zale ahe
    i really feel sad for mahayuti
    parat ya munde saheb ani bala saheb
    tumhi alyashivay maharashtra var satta yen avghad ch nahi tar ashakya ch ahe
    tumcha ch bhakt
    a true maharashtriyan
    marathi manus

    ReplyDelete
  2. चिंता करू नकोस उमेश. सत्ता युतीचीच येणार आहे. केवा निवडणुकपुर्व युती ऐवजी निवडणूक पश्चात युती असणार आहे. झालं ते बरंच झालं आता प्रत्येकाला आपली खरी ताकद कळणार आहे.

    ReplyDelete
  3. Ekadam khare aani parkhadpane timhi ji mate mandali aahet....! ti mate aani rajkarnacha ekun ragrangach tumacha abhyas uttam aahe....!! aata dudh ka dhud aur pani pani ka pani hoil...!! Ani tumhi mhanta tase aata tari yanchi uti tutali tari nivadnukanche nikalanatar te utichya marganech janar aahet he matra agadi satya aahe...!! sattesathi hech mag ekmekanchya samor lotangane galtil... tenva yanchi asmita.. swabhiman... vanvasala jati...!! Rajkaran ek dhanda jhala aahe...!! samajkarn kuthe disatach nahi....!!!

    ReplyDelete
  4. समिधाजी खूप दिवसांनी तुमची प्रतिक्रिया मिळतेय. आभार., कुठे बाहेरगावी गेला होतात का ? आणि नवी पोस्ट नक्की वाचा.

    ReplyDelete
  5. sahebanni yuti todun far mothi chuk keli aahe.

    ReplyDelete
  6. असु दया. चुक्ल्याशिवाय माणुस शहाणा होत नाही.

    ReplyDelete
  7. सुशांत शेंबडे27 September 2014 at 17:44

    सामाजिक परिवर्तन ग्द्वून आणण्याची ताकद तुमच्या लेखात निश्चित आहे.

    ReplyDelete
  8. सुशांत प्रतिक्रियेबद्दल खुप खुप आभार. आपल्याला वाटतं एवढा मोठा लेखक किंवा राजकारणाचा अभ्यासक मी नाही. पण असेच वरचेवर ब्लॉगला भेट दया. प्रतिक्रिया दया. अधिकाधिक चांगला लिहिण्याचा प्रयत्न करीन.

    ReplyDelete
  9. आपले विचार अगदी बरोबर आहेत. उद्धव ठाकरेंनी जर दहा जागा कमी लढल्या असत्या तर काही फरक पडला नसता. पण त्याला वाटत माझाच झेंडा उंच हवा.

    ReplyDelete
  10. मित्रा परिस्थिती बदलणं शक्य आहे आणि वेळ जवळ आली आहे. गरज आहे ती आपल्यासारख्या समविचारी माणसांनी जनजागृती करण्याची.

    ReplyDelete