युती तुटली आघाडी बिघडली. आणि बघता बघता विधानसभेची सगळी गणितच बिघडली. गेली दहाबारा दिवस मी राजकीय घडामोडींवर लिहितो आहे. माझं लिखाण रसिक वाचकांच्या पसंतीस उतरतं आहे. युतीचा आणि आघाडीचा काडीमोड झाल्यानंतर आता प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला समोर जाणार आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांसोबत मनसेही रिंगणात आहे. त्यामुळेच विधानसभेच्या पोटी पाच मुलांनी जन्म घेतला आहे असे मला वाटले. आणि त्याच कल्पनेतून माझ्या या राजकीय वात्रटिकेने जन्म घेतला. मला विश्वास आहे रसिक वाचकांना हि राजकीय वात्रटिका नक्की आवडेल.
विधानसभेला दिवस गेले
लोकसभेनंतर विधानसभेला
सहाच महिन्यात दिवस गेले
जुळे नव्हे , तिळे नव्हे
तिला पांचाळे झाले.
कळत नव्हतं तिला यांना
कसं घ्यावं मांडीवर
भ्रष्टाचार करतात कधी
कधी करतात घोटाळे
पांचाळे तर नकोच पोटी
म्हणे," नको जुळे, तिळे ."
दुधाविना तिनं त्यांना
दिलं ठेऊन महिनाभर
" जगलं तेवढंच मिरविण," म्हणली
" घेऊन खांद्यावर."
ए वन
ReplyDeleteआभार मित्रा.
ReplyDeleteखूप सुरेख वात्रटिका आहे. पण थोडी वाढवता आली तर पहा.
ReplyDeleteप्रथमेश प्रतिक्रियेबद्दल आभार. तुम्हाला वात्रटिका आवडली हे पाहून समाधान मिळाले. तुमचा सल्लाही योग्य आहे. प्रयत्न करीन.
ReplyDeletesir maf kara pan shevatachya olincha arth lagala nahi.. !! ekun varatika chhan...!!
ReplyDeleteसमिधा,
ReplyDeleteदुधाविना तिनं त्यांना
दिलं ठेऊन महिनाभर
" जगलं तेवढंच मिरविण," म्हणली
" घेऊन खांद्यावर." हे शेवटचं कडवं. दुधाविना म्हणजे सत्तेशिवाय. कारण आचारसंहिता लागू झाल्यापासून सगळेच पक्ष सत्तेबाहेर आहेत. म्हणजेच सत्तेचं दुध त्यांना मिळत नाही. या या महिनाभरा नंतर जेव्हा निकाल लागतील तेव्हा यातला कुणीतरी एकच पक्ष सत्तेवर येईल. आणि म्हणूनच त्या पक्षाला विधानसभा खांद्यावर घेऊन मिरवेल असे मला म्हणावयाचे आहे.
पटतंय कि नाही ते नक्की सांग.
A 1
ReplyDeleteप्रशांत प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.
ReplyDeleteaaa
ReplyDeleteयतिन असले कोड मला कळत नाहीत. ट्रिपल A चा अर्थ काय ?
ReplyDelete