Saturday 16 August 2014

Love Poem : तू समोर येतेस तेव्हा

मागे मी पुरुष स्त्रीचा दास का ?  ही पोस्ट लिहिली होती. असंख्य वाचकांनी ती पोस्ट वाचली होती. समोर सुंदर स्त्री आल्यानंतर मनात चल बिचल झाली नाही असा माणूस शोधून सापडणार नाही.
चलबिचल म्हणजे विषय वासना मनात येत नाहीत. नव्हे जातिवंत सौंदर्य समोर येतं तेव्हा मनात विषय वासना येताच नाहीत. एखाद्या निरागस मुलाकडं पहावं , निसर्गाच्या कुशीत शिरताना ते सौन्दर्य मनात भरून घ्यावं, उमलत्या फुलाकडे डोळे भरून पहावं असंच होतं तेव्हा जेव्हा एखादी सुंदर स्त्री आपल्यासमोर येते तेव्हा.

 जिवंत सौंदर्य समोर येतं  तेव्हा प्रत्येकाचीच अवस्था अशीच होते. कुणी नाही म्हणत असेल तर तो स्वतःचीच खोटं बोलतोय हेच खरं. कारण विश्वमित्रासारखा तपस्वी जिथं मेनकेच्या सौंदर्याकडे पाहून स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही तिथं आपल्यासारख्या पामरांची आणि विषय लोलुप सामान्य माणसाची काय कथा ?

जिवंत सौंदर्य काय कित्येकवेळा चांगला चित्रं पाहूनही आपण जम खुष होतो. डोळ्याचं पारणं  फिटल्या सारखं वाटतं.  पुरुष स्त्रीचा दास का ?  ही पोस्ट लिहिताना मी पार्श्व भूमीसाठी एखादं सुंदर चित्रं नेटवर शोधत होतो. श्वेत धवल रंगात सापडलेल्या त्या अनामिक आणि कदाचित काल्पनिकही सौंदर्यकडे पाहून मी अक्षरशा अचंबित. मनात कितीतरी तरंग उमटले. आणि पाहता पाहता माझी तू समोर येतेस तेव्हा हि कविता लिहून झाली. ती ही कविता - 

2 comments:

  1. रमेश थोरात2 September 2014 at 15:31

    तुमच्या कविता खुप सोप्या असतात. त्यामुळेच चटकन मनाला भिडतात. हो आणि आज मी प्रतिक्रिया लिहू शकतोय तेही तुमच्याच प्रतिक्रिया कशी लिहावी या लेखामुळे.

    ReplyDelete
  2. रमेशजी प्रतिक्रियेबद्दल मनापसून आभार. कविता सोपी असावी हि माझी प्राथमिकता असते. शिवाय तिचा जो मुळ धागा आहे तो अखेरपर्यंत तसाच राहील किंवा कविता तिचा विषय सोडून अन्य कुठेही भरकटणार नाही याची मी अधिकाधिक काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो. असेच प्रेम करत रहा. मी अधिकाधिक चांगले लिहिण्याचा प्रयत्न करीन.

    ReplyDelete