Saturday 1 February 2014

Marathi Blogs : रिमझिम पाऊस

maymrathi

आज नव्यानं हा ब्लॉग सुरु करतोय. ‘ रिमझिम पाऊस ‘ हे जरी या ब्लॉगच शिर्षक असलं तरी हा ब्लॉग निव्वळ ‘ पाऊस ‘ या एकाच विषयाला वाहिलेला नाही. प्रेम, प्रेमकविता, चारोळी, मी लिहिलेली गाणी, कथा, बोधकथा, राजकारण, sms, विनोद असं खुप काही असणार आहे या ब्लॉगमधे. पाऊस जसा टाळता येत नाही तशाच या साऱ्या गोष्टी. कधी आपलं आयुष्य खारट करणार ……… तर कधी आंबट……कधी तिखट ……… तर कधी गोड.

link for this blog -

http://maymrathi.blogspot.com/

pl bookmark this link.

कोणताही पदार्थ जीभेवर टेकला की

त्याची चव आपल्याला सोसावीच लागते. हवेची झुळूक आली कि ती सोबत धुरळा आणते आणि दरवळही. आपल्याला काहीच टाळता येत नाही. पाऊस जसा टाळता येत नाही तसंच. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचे परिणामही आपल्याला कधीच टाळता येत नाहीत. माझ्या कवितांसह अशा अवतीभोवतीच्या घटीतांची रिमझिम म्हणजे हा ब्लॉग ‘ रिमझिम पाऊस ‘. यात नव्या लिखाणाबरोबर माझ्या जुन्या ब्लॉग मधील अनेक पोस्ट असतील.

कारण पाऊस येतो.…….  त्याचा आपल्यापर्यंत पोहचलेला प्रत्येक थेंब आपल्याला चिंब करून जातो…… आपल्या रोमारोमात उतोरतो.……. कधी कौलावरच्या पागोळ्या होतो……… कधी अंगणातल्या रांगोळ्या होतो…….कधी होतो रानातला झरा……. कधी टपटपणारी गारा. माझे माझ्या जुन्या ब्लॉगचे जवळ जवळ ५० हजारहून अधिक रसिक वाचक हे त्या माझ्यापर्यंत येऊन पोहचलेल्या……. मला चिंब करणाऱ्या पावसाच्या थेंबांसारखे आहेत. त्यांनी मला  चिंब केलंय मला नखशिखांत न्याहळलय.

येणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जसा नवा असतो तसेच या ब्लॉगला नव्यानं भेट देणारे वाचक असणार आहेत. त्यांना माझ्या जुन्या लिखाणाचा गंध अनुभवता यावा म्हणून जुन्या ब्लॉगवरच्या नव्यानं पोस्ट करणार आहे पण तसं करताना नव्या ब्लॉगची नवलीही जपणार आहे. कारण मला माहिती आहे पिवळी पडून गळू पहाणारी पालवी कोणालाच नको असते प्रत्येकाला हवं असतं वसंत ऋतूत कोंबाकोंबातून अवतरणार नवं चैत्यन्य.
मला विश्वास आहे जुनी जर जपता जपता मी नवी पैठणीही जन्माला घालीन.

भेटत रहा या नव्या ब्लॉगवर .  
‘ रिमझिम पाऊस ‘  वर
http://maymrathi.blogspot.com/ या लिंकवर.

No comments:

Post a Comment