गडी गेले पण ढंमप्या राहिला माझ्याजवळ. माझ्यातली अर्धी चतकोर खायचा. पण कमी पडतय म्हणून त्यानं कधी तक्रार केली नाही आणि माझी साथ सुद्धा सोडली नाही.
मी घरी असलो कि भाकर तुकड्याच्या आशेने हा दुसऱ्याच्या दारात जाईल तेवढाच. अन्यथा मी घरात असलो कि हा सतत घरासमोर बसून रहायचा. रात्री मी दार लाऊन झोपलो तरी भालदारासारखा हा बाहेर अंगणातच पसरायचा. पण एकदम जागरूक. जरा कुठं धस्स S S S झालं कि
भुंकत उभा रहायचा. धोका नाही असं लक्षात आलं कि पुन्हा जागेवर येऊन तिथंच कलंडायचा.
गावी माझ्याकडे फॅन नव्हता. उन्हाळ्यात खूप गरमायचं. घामाच्या धारा निघायच्या. हवेची झुळूक यावी म्हणून दार उघडं ठेवावं लागायचं. तेव्हा हा पठ्ठ्या घरात येऊन उंबऱ्याच्या आत झोपायचा. रात्रभर पहारा द्यायचा. मी दार उघडं ठेऊन घरात बिनघोर झोपायचो.
ढंमप्या कायम माझ्या सोबत असायचा. मी जिथे जाईल तिथे यायचा. अगदी पाच दहा मैल लांब गेलो तरी. सोबत यायचा म्हणजे मी गाडीवर आणि हा धावत. त्याला चुकवण्यासाठी मी गाडी साठच्या स्पीडने पळवायचो पण हा पठ्ठ्या काही माझी पाठ सोडायचा नाही. त्याला गाडीवर बसवण्याचा मी प्रयत्न करायचो.
अशी वळणं लहान वयातच लावता येतात. ढंमप्या माझ्याकडे आला तेव्हा तीन एक वर्षाचा होता. वळण लावायचं त्याचं वय सरून गेलं होतं. त्यामुळे प्रयत्न करूनही मी त्याला कधी गाडीवर घेऊ शकलो नाही. काही वेळानंतर त्याची दमछाक बघून मीच गाडी स्लो करायचो.
ढंमप्या फार ऐटीत चालायचा. वाघ नसला तरी वाघाच्या चालण्याची ऐट त्याच्या चालण्यात होती. माझ्या गाडी सोबत पळताना तर एखादा चित्ताच माझ्या गाडीसोबत पळतोय असं वाटायचं. वस्तीवरची इकडची तिकडची कुत्री त्याच्या अंगावर धावून यायची. बहुदा त्याचं माझ्यासोबत एवढ्या ऐटीत फिरणं त्यांना रुचत नसावं.
" आम्ही जातो का कधी आमच्या मालकासोबत असे ? मग यालाच काय गरज पडली आहे एवढा जीव काढायची ? मालकाचं शेपूट कुठला. " असे काही विचार त्या कुत्र्यांच्या मनात येत असावेत. आणि मग याची खोड मोडायची या हेतूने रस्त्यातले चार चार कुत्रे एकाचवेळी त्याच्यावर धावून याचे. पण हा पठ्ठ्या सगळ्यांना लोळवून पुन्हा मला गाठायचा.
मी गाडीवर बसलो कि हा निघालाच. अगदी रात्री अपरात्री सुध्दा. रात्रीची लाईट असेल तेव्हा मला रात्री अकरा वाजता शेतावर जावं लागायचं. हा घरासमोर नसला तरी गाडी चालू केल्या बरोबर जिथे असेल तिथून धावून यायचा. रात्रीच्या वेळी कधीकधी त्याची माझ्यासोबत यायची इच्छा नसायची. मग गाडीसमोर आडवा येऊन लाड करायचा. माझी गाडी पुढं जाऊ द्यायचा नाही. पण मला शेतावर जाणं भाग असायचं. त्यामुळे ढंमप्याला इजा होणार नाही अशा बेताने मी हळू हळू गाडी पुढे रेटत रहायचो. आणि शेवटी नाईलाज होऊन ढंमप्या गाडीसोबत धावत शेतात यायचा. तिथं पोहचलं कि आमची ड्युटी सकाळी सातपर्यंत. हा पठ्ठ्या रातभर माझी पाठ सोडायचा नाही. मी उसाला बारं देऊन गोधडी टाकून बसलो कि हाही माझ्यापासून थोडं अंतर राखून जमिनीवर बसायचा. माझ्या अंथरुणावर तो कधीच बसला नाही.
मी जागेवरून उठलो कि हाही उठायचा. माझ्या मागे मागे यायचा.
आमच्या भागात रान डूकरं , कोल्हे , लांडगे , मुंगसं , घोरपडी , ससे फार. ढंमप्या अंधारात कुठे हालचाल दिसली कि जीव खाऊन धावून जायचा. हाती काही लागला तर तिकडेच फस्त करायचा. आणि पानिपतचं युद्ध जिंकल्याच्या अविर्भात परत यायचा. मी बसलो कि पुन्हा माझ्या जवळ अंतर ठेऊन बसायचा. झुंजूमुंजू झालं कि माझ्यापासुन थोडं म्हणजे नजरेआड होण्याइतपत दूर जाऊन फेरफटका मारायचा. थोडं आणखी फटकलं कि निर्धास्त व्हायचा. अगदीच उजाडलं कि सहा साडे सहा वाजता माझी वाट न पहाता घराकडे निघून जायचा.
दिवसा रानात असलो कि रानात आलेलं पाखरू सुद्धा त्याला सहन व्हायचं नाही. आपल्याला उडता येत नाही हे माहीत हा त्यांच्या अंगावर धावून जायचा. जमेल तसा त्या पाखरांचा पाठलाग करायचा. एखादं कचाट्यात सापडलं तर फडशा पडून परत यायचा.
गावाकडे राजू दळवी म्हणून माझे एक फार चांगले , विश्वसनीय आणि प्रामाणिक मित्रं आहेत. एकदा त्यांच्याकडे जाताना हा पठ्ठ्या माझ्या सोबत आला. त्याची वस्तीही रानातली. राखणीला म्हणून दोन कुत्री पाळलेली. तीही आडदांड. जुंपली ना त्यांची. माघार कुणीच घेईना. आमचं कुणाचंच काही चालेना. हाड म्हणालो. तरी हटेना. शेवटी हातात काठ्या घेतल्या. तेव्हा सगळे एकमेकांपासून लांब झाले. पण ते त्यांच्या मालकाजवळ जाऊन हा माझ्याजवळ येऊन गळा फाडून एकमेकांवर भुंकत राहिले. आम्ही लांबूनच एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या आवाजासमोर आमचा आवाज फिका पडत होता. शेवटी पाच मिनिटात मी तिथनं निघालो. आणि मग सगळं वादळ शांत झालं.
मग त्या मित्राकडे जाताना मी नेहमी ढंमप्याला भाकरी टाकून खाण्यात गुंतवायचो. मग निघायचो. पण तरीही भाकरी खाऊन झाली कि काही वेळाने गाडी कोणत्या दिशेला गेली आहे या वरून अंदाज काढत ढंमप्या तिथे पोचायचाच. आणि मला बैठक अर्ध्यावर टाकून परतावं लागायचं.
ढंमप्या आता आत एक वर्षाचा झालाय. गळयाखालची कातडी लोंबते आहे. आता माझ्या गाडीमागे धावणं त्याच्या आवाक्यात राहिलं नाही. तरीही कधे मधे येतोच तो माझ्या मागे.
गावो बंगल्याचं , शेळी पालनासाठी शेडच काम सुरु आहे. दिवसभर गवंडी काम करतात. रात्रीची लाईट असल्यामुळे वेल्डर रात्री काम करतो. मीही असतो तिथेच. ढंमप्याही थांबतो माझ्यासोबत.
पुण्याहून परतताना घरातला सगळं शिळ अन्न घेऊन जातो. तेच त्याला चार दिवस पुरवून पुरवून घालतो. पुण्याला परतताना शिल्लक असेल ते सगळं त्याच्या पुढ्यात ठेवतो.
परवा दिवाळीसाठी गावाहून पुण्याला यायला निघालो. ढंमप्याला जवळ घेतलं ...... कुरवाळलं........आणि म्हणालो, ' तुलाही दिवाळीच्या शुभेच्छा. नीट रहा. चार पाच दिवसात परत येईन. येताना तुझ्यासाठी फराळाचं आणेल.'
मुलानं आईला बिलगावं तसं कुई कुई करत , शेपटी हलवत ढंमप्या माझ्या पायात शिरला. मी त्याला मिठीत घेतलं. थोपटलं. निघालो.
ढंमप्या गाडीमागे आला नाही. जागेवरच थांबला. मी वळून पुन्हा पुन्हा मागे पहात होतो. दूरवर जाईपर्यंत ढंमप्या माझ्याकडे पहात राहिला. त्याचे डोळे मला सांगत होते. " तुम्ही जा. माझी काळजी नका करू. मी राहीन व्यवस्थित. तुमच्या मागे इमानाने घराची राखण करीन."

No comments:
Post a Comment