मराठी कविता , Marathi Poem
एक मित्र सांगत होता कि पुण्यातल्या एका नामंकित इंग्रजी शाळेत नर्सरीची फी आहे तब्बल ४२००० रुपये. मागे कुठल्या एका महाराष्ट्रातल्या सत्तेवरील सरकारनं मुलींना बारावी पर्यंतचं विनामूल्य शिक्षण जाहीर केलं होतं. पण
शहरातल्या मराठी माध्यमांच्याही कितीतरी खाजगी शाळांमध्ये पाच पाच हजार रुपये फी आकारली जाते. इंग्रजी माध्यमांच्या कितीतरी शाळांमध्ये फी वाढीवरून पालक आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये खडाजंगी चालू आहे. शासन मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट याच भूमिकेत मग्न आहे.
आमचे चिरंजीव बारावी झाले. त्याचे मित्र इंजिनिअरिंगला प्रवेश घेवू पाहताहेत. मी फीचे आकडे ऐकून हबकून जातो आहे. सत्तर हजार....ऐंशी हजार.....लाख....हेही तुम्हाला बाय रूल प्रवेश मिळाला तर. नाही तर डोनेशन आहेच. त्याचे आकडे तर विचारूच नका. तुम्ही थैली घेवून गेलात तरी ते रिकामी करून जा म्हणून सांगतील. तुम्हाला गुण कमी असतील तरी हरकत नाही पण तुमच्याकडे पैसे कमी असून चालणार नाही .
फियांचे एक एक आकडे ऐकले कि भोवळ यायची वेळ येते. तुम्ही मुलगा इंजिनिअरिंगला पाठवणार असाल तर तुमच्या जवळ कमीत कमी पाच ते सहा लाख हवेत. तुम्ही एका मुलावर समाधान मानलं असेल तर ठीक नाहीतर दहा-बारा लाखाचा खुर्दा आहेच. क्लासवाले तर काय लुटायलाच बसले आहेत. एका एका सेमिस्टरची फी कमीत कमी बारा बारा हजार रुपये. अशा आठ सेमिस्टर. म्हणजे जवळ जवळ लाखभर रुपये.
शिवाय कॉलेज काय किंवा शिकवणी काय यातलं कोणीच यशाची हमी देत नाहीत.
माझ्यासारख्या बऱ्यापैकी मध्यम वर्गीयालाही ' नको हे शिक्षण ' असं म्हणायची वेळ आली आहे.
आमच्या देशाचं दरडोई उत्पन्न आहे फक्त ५४५२७ रुपये आणि फिया मात्र लाखात.
सामान्य माणसानं कसं शिकवायचं मुलांना ? कि गरिबांनी फक्त दहावी बारावी पर्यंतच शिकावं उच्च शिक्षण फक्त श्रीमंतांनीच घ्यावं अशी दस्तूर खुद्द शासनाचीच इच्छा आहे. ( अर्थात याला जबाबदार वर्षानुवर्षे सत्तेत असलेली कॉंग्रेस आणि वेगवेगळी रुप घेत सत्ता चाखत असणारी राष्ट्रवादी. )
बरं शिक्षणासाठी एवढा पैसा आम्हाला आमच्या खिशातूनच खर्च करायचा असेल तर आम्ही दहा हातांनी शिक्षण कर का भरायचा ? दहा हातांनी एवढ्यासाठी म्हणतोय कि आम्ही आमच्या पगारातून शिक्षण कर भरतोच....पुन्हा घरपट्टी भरताना त्यात शिक्षण कर असतोच......वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण अधिभार भरतो तो वेगळाच. आणि एवढ करून पुन्हा आमच्या खिशाला भुर्दंड आहे तो आहेच. कसं करायचं ? सगळीकडेच फक्त स्वतःची तुंबडी भरायला सोकावलेल्या पुढार्यांना आपल्या देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा एका मुलाच्या शिक्षणाचा खर्चही खूप अधिक आहे हे कळेल काय ?
अशा सगळ्या विचारानंतर मनात आकारलेली ही कविता -

No comments:
Post a Comment