Friday 11 September 2015

नाना तुम्ही चुकताय ?


facebook घ्या अथवा अन्य कोणतेही सामाजिक माध्यम घ्या. प्रत्येकजण विरोधी नेत्यांच्या खांद्याला खांदा लाऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याविषयी बोलतो आहे. प्रत्येकाला वाटतं मीच शेतकऱ्याचा तारणहार. पण बाजारात भाजी घ्यायला गेलं दहाची गड्डी आठला कशी मिळेल आणि आठची गड्डी पाचला कशी मिळेल हेच पहाणार. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मात्र पदर मोड करून शेतकऱ्यांची मदत करताना एक वेगळाच आदर्श निर्माण केला. समाजातील विविध थरातून दोघांवर कौतुकाचा वर्षाव झाला. पण खरंच नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा उपक्रम स्तुत्य आहे ?


नानांचा हेतू शुद्ध आहे याबाबत मला तिळमात्र शंका नाही. त्यांच्या कृतीत दयाभाव आहे याची मला जाणीव आहे. त्यांना या रूपाने समाजसेवा करायची आहे हे मला माहित आहे. पण यात सेवाभाव नाही कर्तव्यनिष्ठा आहे. यात सामाजिक बांधिलकीतून उतराई होण्याची भावना आहे. त्यामुळे , ' नानांचा हेतु शुद्ध असला तरी मार्ग चुकला आहे. ' असे मला वाटते.  

गुंडांना घाबरण , भिकाऱ्याला भिक देणं अथवा सतत याचकाच्या भुमिकेत असलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला अशा आर्थिक मदत करणे कौतुकास्पद नक्कीच नाही. कारण अशाने आपण त्या त्या प्रवृत्तींना खतपाणी घालत असतो.

तुम्ही गुंडांचा सामना करा …………… ते माघार घेतील,
तुम्ही भिकाऱ्याला भिक देणं थांबवा ……………… भिकारी दिसेनासे होतील,

तसंच शेतकऱ्यांच्या बाबतीतही म्हणता येईल. एखाद्या कुटुंबातल्या कर्त्या माणसाने आत्महत्या केल्यानंतर त्या कुटुंबाला दहा - पंधरा अथवा पाच - पंचवीस हजार रुपयांची मदत देऊन काय साध्य होणार ? होतंय काय आपण आजार होऊ नये म्हणून काळजी घेत नाही आणि आजार झाल्यावर औषधोपचार करत बसतो. नेहमी औषधे घेतल्याने माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि माणुस वारंवार आजारी पडण्याची शक्यता बळावते.

शेतकऱ्यांच्या बाबतीत तेच होतंय. दुष्काळ पडू नये यासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत. शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणुन फारसे प्रयत्न होत नाहीत, शेतकऱ्याच्या मालाला योग्य आणि ठराविक भाव मिळावा म्हणुन प्रयत्न होत नाहीत, शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणुन कोणी झटत नाही. प्रत्येक जण केवळ आजार झाल्यानंतर औषध देण्याचा प्रयत्न करतो. कारण माणसे आजारी पडण्यात जसे वैद्यकीय व्यवसायाचे हित आहे तसेच शेतकरी दुर्बल रहाण्यात राज्यकर्त्यांचे हित आहे. आजवरच्या शासकीय व्यवस्थेने शेतकऱ्याच्या सक्षमीकरणासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत. शेतकऱ्याला बळ देत आहोत आणि आम्ही जे काही करीत आहोत ते शेतकऱ्याच्या भल्यासाठीच करीत आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न मात्र नक्की केला. शेतकऱ्यासाठी सहकार आणला , शेतकऱ्यासाठी बाजार समित्या आणल्या, शेतकऱ्यासाठी जिल्हा बँका आणल्या.

पण यातुन बळ मिळालं कुणाला ? ........... राज्यकर्त्यांना,
यातुन सुदृढ झालं कोण ?.......... राज्यकर्ते,
यातुन कल्याण झालं कुणाचं ?............ राज्यकर्त्यांचं.
भलं झालं कुणाचं ? ..............दलालांच.
पोटं सुटली कुणाची ? .............दहा बाय दहाचा गळा घेऊन बसणाऱ्या अडत्यांची.

खपाटीला पोट गेलेला शेतकरी मात्र कष्ट करून मरतोच आहे. पाऊस कमी पडला कि आभाळाकडं बघुन झुरतोच आहे. भाव पडले जिंकला असा वाटणारा डाव हरतोच आहे. त्याचं आभाळ फाटलं आहे. त्याला अशी दहा पंधरा हजारांची ठिगळं लाऊन काय होणार.

म्हणुन मी म्हणालो ," नाना तुम्ही चुकताय. "

त्यामुळे नानांनी अशी मदत करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे आंदोलन उभारावे. आणि पिक खर्चावर आधारित भावाचे प्रश्न तडीस न्यावेत. आजही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणारे नेते आहेत ना. पण त्यांचं राजकारण जास्त असतं. नाना राजकारण करणार नाहीत. विधानसभेत अथवा लोकसभेत गेले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न लाऊन धरतील. त्यामुळे शेतकऱ्यांवर अशा रितीने पैसे उधळण्यापेक्षा नानांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे. त्यांना खऱ्या अर्थाने प्रकाश दाखवावा.  

बाबा आमटे असो वा प्रकाश आमटे, महात्मा फुले असोत अथवा धोंडो केशव कर्वे असोत यांनी असे कुणाला पैसे दिल्याचे ऐकिवात नाही. त्यांची समाजसेवा हि एक तपश्चर्या होती. आणि तपश्चर्येला उशिरा का होईना पण नेहमी चांगलीच फळं येतात.  

पहा पटतय का ? 

30 comments:

  1. Replies
    1. आभार मित्रा. पण आपण आपले नाव का नाही लिहिलेत ?

      Delete
  2. सुहास शेलार11 September 2015 at 18:09

    परखड.

    ReplyDelete
  3. विजयजी खुप छान लेखन
    खर्या शेतकऱ्यांची व्यथा मांडलीत
    नुसती आर्थिक मदतीने माणूस लाचार होतो
    त्याला स्वाभिमानी बनवने तात्पुरती मदत काय कामाची
    तो शेतकरी परत मदतीची अपेक्षा करणार
    त्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांना दिर्घकालिन स्वावलंबी कसे बनवता येईल
    याविषयी विचार मस्त मांडलेत

    ReplyDelete
    Replies
    1. आभार रमेशजी. सामान्य माणुस नाहीच नाही पण राज्यकर्ते आणि अधिकारीसुद्धा अशा रितीने विचार करत नाहीत हि शोकांतिका आहे.

      Delete
  4. Yes you are right. But that would be the second stage after rainy season. Today the situation is its not raining. And some of them have finished their lives. And more should not go the same path.

    ReplyDelete
    Replies
    1. Dear Friend, I don't know why you not left your name here. What I suggested in my article is the long term solution. If you put crores of money on the suicides of farmer it will not help to stop the suicides of farmers. And no body knows the fact in the suicides of farmers. Pl go through the article below. शेतकऱ्यांच्या आत्महत्या : रंगकाम कि वास्तव - भाग १ http://maymrathi.blogspot.in/2015/05/blog-post_28.html

      Delete
  5. बरोबरये..पटल मला...शेतकर्याला मदत करताय ही निच्छित अभिमानाची गोष्ठ आहे..पण शेवटी हे चालणार कुठपर्यंत.?? अशा मदती केल्याने शेतकरी खरच सुदृढ होणारये का..??

    ReplyDelete
    Replies
    1. आभार विनायकजी. येत्या काळात परिस्थिती सुधारेल अशी आशा करू या.

      Delete
  6. प्रथम मी नाना पाटेकर आणी मकरंद अनासपुरे यांचा आदर करत होतो....

    पण विजयजी तुमचा लेख वाचुन खरी समज आली...
    निश्चीतच कलाकार म्हणुन नी त्यांचा आदर करतोच त्यात वाद नाही.
    परंतु नाना पाटेकर जे करत आहे ते योग्यच आहे असेही नाही...

    आधी सलमान व शाहरुख सारखे कलाकारही शेतकर्यांना मदत करण्यास पुढे होतो...
    पण त्यात निश्चीतच त्यांचा स्वार्थ होतो.

    पण नानांचे असे वाटत नाही... कदाचीत त्यांना जाण असावी..

    एखाद्याला वाटेल की 'भाऊ जे चांगलं काम करताहेत त्यांनाही तु बोलतो'...
    खरंतर शेतकर्यांना दान करण्याची आवश्यकता नाही...

    दुष्काळाचे मुळ शोधले पाहीजे..

    शरद पवार,मोदी सरकार आणी सिनेकलाकारांचा उदो उदो करुन चालणार नाही..

    स्वतः सामान्य व्यक्तीने पुढे आले पाहीजे...
    शेती फक्त खायचे काम नाही...

    आपल्यातला प्रत्येक व्यक्ती हा पुर्वी शेतकरीच होता..
    ही जाण असली पाहीजे...

    असो विजयजी आपला लेख डोळे उघड करणारा होता हेच सांगावेसे वाटते...

    ReplyDelete
    Replies
    1. रोशनजी , आपण जे काही लिहितो आहोत ते सर्वसामान्य विचारधारेच्या विरोधात लिहितो आहोत पण आपली मते योग्य आहेत याची जाणीव होती. या लेखावर खूप टिका होईल असे वाटत होते पण इथल्या आणि फेसबुकवरील अनेक प्रतिक्रियांनी मला बळ दिले. नाना आणि मकरंद दोघेही थिर आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याप्रमाणेच मलाही नितांत आदर आहे. आपल्या विस्तृत अभिप्रायाबद्दल मनापासुन आभार.

      Delete
  7. ओंकार मराठे12 September 2015 at 16:38

    आमचे पत्रकार असे लिखाण करण्याचे धाडस का दाखवत नाहीत कुणास ठाऊक ?

    ReplyDelete
    Replies
    1. ओंकारजी, पत्रकार हे बांधील असतात. मध्ये माझे एक पत्रकार मित्र मला सांगत होते बऱ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या या बनावट ( म्हणजे आत्महत्या वेगळ्या कारणासाठी केलेली असते आणि कारण वेगळे सांगितले जाते ) असतात हे आम्हालाही माहित असते. पण बोलता येत नाही. तसे केले आमचे वर्तमानपत्र बंद पडेल.

      Delete
  8. Sir what you wrote absolutely correct. I am appreciate with you. but fact is that we everyone wrote in blog paper and so on.but we don't do anything. Today's situation of farmers are very critical.but politicians doing theire job that's blaming politics.it's very ridiculous when I thought about this I really feel bad. But I am also like you only express my feelings.but only feelings are not workable . We need to strong move on this.

    ReplyDelete
    Replies
    1. Ravi ji, I am totally agree with you. What we are doing is the one candle light. If millions of such candle light are come together situation will definitely different. We are trying for the brain washing of people. I would like to lead the people for such issues but people will not stand with me. So I am doing my job in such a way.

      Delete
  9. विजयजी आपण नेहमीच "कटुसत्य" स्पष्टपणे मांडता, धनयवाद !
    भाकड जनावरे न गोहत्या बंदिवरही आपण भावना बाजुला ठेऊन व्यावहारीक मत स्पष्टपणे मांडले होते, पटले मला ते. त्याच प्रमाणे नानांचा मार्ग चुकलाय हे ही तेवढेच सत्य आहे. ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली त्यांना ती नानांकडुन मिळाली म्हणुन त्यांच्या जीवनमानात काही फरक पडलाय का? ती अर्थिक मदत संपली की पुन्हा त्यांच्या व्यथा चालुच रहाणार! ह्यावर कॉंक्रिट उपाय करणे गरजेचे आहे. धनदांडग्या शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ कधीच लागत नाहाी मात्र ३/४ एकर शेतीवर कुटूंब पोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किमान दुष्काळ परीस्थीतीत सर्व जबाबदारी शासनानेच घ्यायला हवी.

    ReplyDelete
  10. शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या गरीब
    व होतकरू विद्यार्थ्यांसा
    ठी दरमहा केवळ 400 रूपयांत
    राहण्याची उत्तम 3/4 शेयरिंग
    व्यवस्था व्यवस्था.
    बेरोजगार नोकरी मिळेपर्यंत राहू
    शकतात.
    संपर्क : डॉ. रोहीत बोरकर,
    हितकारणी संस्था, पुणे.
    8796510024

    ReplyDelete
    Replies
    1. नागेशजी , यांची कोणी साधी दखलही घेणार नाही आणि याची बातमीसुद्धा होणार नाही.

      Delete
  11. khup chaan vichar aahet..... shetkaryancha tyacha panyacha pan prashna aahe... tyasthi tyana pani uplabdha krun dyave... pani aalyavar zhadye lavanyachi mohim chalu karave.... shetkaryancha dhanya direct bajar peth madge gela tar tyana yogya kimat melela....khup chaan vichar aahet..... shetkaryancha tyacha panyacha pan prashna aahe... tyasthi tyana pani uplabdha krun dyave... pani aalyavar zhadye lavanyachi mohim chalu karave.... shetkaryancha dhanya direct bajar peth madge gela tar tyana yogya kimat melela....

    ReplyDelete
  12. khup chaan vichar aahet..... shetkaryancha tyacha panyacha pan prashna aahe... tyasthi tyana pani uplabdha krun dyave... pani aalyavar zhadye lavanyachi mohim chalu karave.... shetkaryancha dhanya direct bajar peth madge gela tar tyana yogya kimat melela....khup chaan vichar aahet..... shetkaryancha tyacha panyacha pan prashna aahe... tyasthi tyana pani uplabdha krun dyave... pani aalyavar zhadye lavanyachi mohim chalu karave.... shetkaryancha dhanya direct bajar peth madge gela tar tyana yogya kimat melela....

    ReplyDelete
  13. सध्याच्या परीस्थीत आपल्या परीने शेतकर्याना मदत करणे आवश्यक आहे we are following nana
    संजय आंबेकर

    ReplyDelete
    Replies
    1. संजयजी, आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. आपण नानांना फॉलो करू नये असे मी म्हणत नाही. आपण माझ्या लेखाच्या मुद्द्यांपेक्षा शीर्षकाचाच अधिक विचार केलेला दिसतो. आज शेतकऱ्यांना दिलेले दहा पंधरा हजार रुपये २/३ महिन्यात संपून जातील. पुढे काय ? त्यामुळेच नानांनी पुढाकार घेऊन यावर कायम स्वरूपी तोडगा काढावा एवढेच माझे म्हणे.

      Delete
    2. पुढच्या लडयासाठी आजची भूक भागणे गरजेचा असते.

      Delete
    3. आपले मत योग्य आहे. पण वर्षानुवर्ष आपण भुकेसाठीच टाचा घासतो आहोत. आपापल्या भुकेचा विचार करण्यासाठी प्रत्येकजण समर्थ आहे. नाना , मकरंद यांनी १५ - २० हजाराची मदत केली नसती लोक हातवर हात ठेऊन बसले नसते. उलट त्यांनी मदत द्यायला सुरवात केल्यानंतर आपल्यालाही मदत मिळावी यासाठीच अनेकांनी प्रयत्न केले. नाना , मकरंद यासारख्या लोकांनी वेगळा विचार करायला हवा. एकेकाळी बाबा आमटे यांनी तसा विचार केला. ते लोकांच्या भुकेसाठी जगले नाहीत.

      Delete
  14. तुमचे म्हणणे खरे असले तरी हाही मार्ग तातडीची मदत म्हणून ठीक आहे. तसंही ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे त्यांनी थोडीफार आर्थिक मदत करुन बँलंस केले तर काही प्रॉब्लेम नाही. शेवटी पैशाचे काम पैसाच करतो.... हे सत्य आहे. ज्या शेतकर्याला स्वत:चा जीव नको झालाय त्याला पहिले दिलासा व मदत देणं आवश्यक आहे. त्याला कँपेबल करणे वगैरे पुढच्या गोष्टी!!

    ReplyDelete
    Replies
    1. आपले म्हणणे योग्य आहे. परंतु दाता उभा राहिला तर आमच्याकडे याचकांची कमतरता नाही. ' भिकाऱ्यांना भिक देऊ नये. ' असे मी म्हटले आहे कारण ती वृत्ती मारायला हवी. आपण म्हणताय ,' ज्या शेतकर्याला स्वत:चा जीव नको झालाय त्याला पहिले दिलासा व मदत देणं आवश्यक आहे. त्याला कँपेबल करणे वगैरे पुढच्या गोष्टी!! ' पण असं म्हणता म्हणताच साठ वर्ष गेले. याच कालावधीत इवलासा जपान जागतिक अर्थव्यवस्थेला आव्हान देण्या इतका बलशाली झाला आहे.

      Delete
  15. Nana should take two way program at hand. Aid & reform as well!

    ReplyDelete
    Replies
    1. Why Nana ? Promod Sir it is the responsibility of government. It is need that somebody force government to work on reasonable prices for farmers produce.

      Delete