Sunday 1 October 2017

गर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा ( croed and modi's funeral )

Indian rise in price


आमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ......... देवळात गर्दी...... मशिदीत गर्दी ........ गर्दी नाही ती फक्त चांगल्या विचारांची.

शाळेत गर्दी ........ कॉलेजात गर्दी. मैदानात गर्दी ........ मंडईत गर्दी. सभांना गर्दी ........ मोर्चांना गर्दी. गर्दी नाही असं
व्यासपीठ आमच्याकडे उरलं नाही. राजकारणातसुद्धा फार गर्दी झाली आहे. प्रत्येकजण दुसऱ्याला खाली खेचून ती जागा कशी बळकावत येईल एवढाच करतो. मग तो विरोधक असो वा सत्तेत सहभागी मित्रपक्ष. आपल्याकडे विरोधी पक्ष हा जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी नसून जनतेची दिशाभूल करून केवळ सत्ता बळकावण्यासाठी आहे. 

आता परवाचंच उदाहरण घ्या ना. शिवसेनेच्या महागाई विरीधातल्या मोर्चाचं. काय पण घोषणा निवडीली होती मित्रानं. एवढी गर्दी कशाला ........ पुढे लिहावसं वाटत नाही मला. किती हे वैचारिक दारिद्रय .  मित्रपक्षामुळे आपल्याला सत्तेची चव चाखता आली याची थोडीही भीडभाड न बाळगता आज उद्धव ठाकरेंसारखा एक सुमार विचारांचा आणि सुमार दर्जाचा नेता मोदींच्या विरोधात बाष्कळ बडबड करतो. पक्षातील इतरांनी मोदींच्या विरोधात केलेल्या अशाच तऱ्हेच्या बडबडीची भलावण करतो. आणि त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी या देशाच्या सर्वश्रेष्ठ पदावरील व्यक्तीच्या विरोधात दिलेल्या अत्यंत दळभद्री घोषणेच्या विरोधात अवाक्षरही बोलत नाही. तेव्हा आमच्या देशातलं राजकारणाची पातळी किती घसरली आहे हे दिसून येते. 

मनमोहन सिंग आणि राहुल गांधीच्या विरोधात मोदींनी केलेल्या शाब्दिक कोट्यांचा राईचा पर्वत करणाऱ्या विरोधकांना आणि माध्यमांना या असल्या घोषण्याच्या विरोधात चकार शब्द बोलावेसे वाटले नाही. 

मला तर अनेकदा वाटतं वाजपेयी , मोदींसारख्या निर्मोही , निस्वार्थी माणसांनी राजकारणाच्या दलदलीत उतरूच नये. पण त्यांनी असं अंग काढून घेऊन कसं चालेल ? कारण त्यांनी तसं केला तर जनतेनं आशेनं पहायचं कुणाकडे .........आजवरच्या सत्ताधीश भ्रष्टाचारी भस्मासुराकडे कि स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय दुकानं उघडून बसलेल्या स्थानिक पक्षांकडे ? 

' महागाई , महागाई ' अशी काव काव करणाऱ्या मंडळींनी मोदी सत्तेवर येण्यापूर्वी स्वस्त असणाऱ्या आणि आता महाग झालेल्या पाच जीवनावश्यक वस्तूंची यादी द्यावी. बस्स !    


2 comments:

  1. व्यवस्थित मांडलंय शिवसेना ही हुकलेली केस आहे सध्या.
    दुरुस्ती अपेक्षित 👇
    भलवान ऐवजी भलावण
    आजरवाच्या ऐवजी आजवरच्या

    ReplyDelete
    Replies
    1. प्रमोद जी, आपला अनेक माध्यमातून संपर्क व्हायचा. परंतु गेली काही वर्ष आपला संपर्क झाला नाही. हि आपली कॉमेंट स्पॅम मध्ये का गेली कोणास ठाऊक पण आज दिसली. त्वरित आपल्याशी संपर्क साधतो आहे.

      Delete