Wednesday, 18 October 2017

त्या वळणावर ( on that turn )

ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत उमलते.......ती असते अबोल पण तिची पैंजण बोलत असतात ..........तिच्या चुडयाची किणकिण सगळ्या घराला मंत्रमुग्ध करून टाकते.

नव्याचे नऊ दिवस सरतात आणि
तिची पैंजण अबोल होतात..........काकनांची किणकिण थांबते...........तळहातावरली मेहंदी पुसट होते.........घरात चिमुकली पावलं खेळू लागतात आणि ती जुंपून घेते स्वप्नांना ............तोही तिच्याच रामरगाड्यात..........दोघांमधला संवाद गरजेपुरताच. 

दिवस सरत जातात..........स्वप्नं फुलात जातात. वीस पंचवीस वर्षाच्या तपचर्येनंतर का होईना पण स्वप्नांनी मनासारखा आकार घेतलेला पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमलतं......थकलेल्या पावलांना पुन्हा पैंजण खुणावू लागतात..........तळहातावर पुन्हा मेहंदी रेखाविशी वाटते.......त्याच्या खांद्यावर पुन्हा मान टाकावीशी वाटते.......त्याला मागावासा वाटतो पुन्हा जुना सगळ्या कायेला मंत्रमुग्ध करून टाकणारा स्पर्श....... म्हणून ती म्हणते.......

त्या वळणावर थांब जराशी 
जिथे भेटलो होतो आपण 
तीच सावली शोध पुन्हा तू 
जिथे टेकलो होतो आपण. 

        मोरपिशी तो स्पर्श पुन्हा तू 
        दे सख्या रे पुन्हा नव्याने 
        मला गाऊ दे गीत हवेसे 
        पुन्हा जुने ते उंच रवाने. 

दे सख्या तू स्पर्श जुना तू 
मला हवा जो सदैव होता 
माझ्यामधली मला दिसू दे 
कळी जुनी ती फुलून येता.  

        पुन्हा बसू या तळ्यात सोडून
        पाय जराशी दोघे आपण
        अळवावरचा थेंब सख्या रे
        मिळून झेलू दोघे आपण.

जसा ठेवला सख्या आजवर
तसं राहू दे हात उशाला
मरणालाही मग विचारीन -
दरी नाझ्या कशास आला ? 


4 comments:

  1. Namskar,
    Diwalichya shubhechya.
    Mi suttisathi pune aaloy sadhya, aapn bhetlo asto teasathi. 30 oct paryant aahe mi suttila. +966546491815 var whatssapp message taka or 7448282300 var confirm kara.
    Regards.
    Bapu Tangal

    ReplyDelete
    Replies
    1. बापू जी, आपली कॉमेंट स्पॅम मध्ये गेली होती. त्यामुळे मी ती मला दिसू शकली नाही. आज पहिल्या बरोबर आपले नंबर सेव्ह करून ठेवले आहेत. लवकरच संपर्क करतो.

      Delete
  2. Replies
    1. विजयकुमारजी, अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.

      Delete