गोध्रा हत्यांकांडाचं निमित्त करून अनेकांनी मोदींचा छळ केला. अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला. परंतु आज तीच अमेरिका त्यांच्यासाठी पायघड्या घालते आहे. मोदींची मुख्यमंत्री म्हणून १५ वर्षाची कारकीर्द हि
देशातील सर्वाधिक आदर्शवादी आहे. पंधरा वर्षे मुख्यमंत्री राहिल्यानंतर मोदी दुसऱ्यांना देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्यावर कोणी कितीही चिखलफेक केली तरी मोदी हे देशाला लाभलेले सर्वोत्तम नेतृत्व आहे याची जाणीव देशातील बहुतांश जनतेला आहे.
काही मंडळी मोदींवर चिखलफेक करत राहणार आहेत. कारण त्यात त्यांचे स्वार्थ दडलेले आहेत.
चांगल्या माणसांच्या अंगावर चिखलफेक करणारे कमी नाहीत. चिखलफेक करणारी हि मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगावर चिखल फ़ेकतातच. परंतु नरेंद्र मोदींचे हे देशाचे पंतप्रधान आहेत याचाही भान या स्वतः शेणात लोळणाऱ्या माणसांना नसतं. पण मोदींनी, अनेकजण किती नागवे आहेत, लोकशाहीसाठी किती नालायक आहेत याची जाणीव करून दिली आहे. मोदी अशा रितीने अनेकांना नागवे करतील. पण जनतेने डोळे उघडे ठेवून बघायला हवे.
आपण अवतीभोवती पाहतो तेव्हा आपल्याला जाणवत हे जग फार फार स्वार्थी आहे. इतकं कि बऱ्याचदा माणसाला आपलं थोडं सुद्धा वाईट झालेलं नको असत. पण इतरांच चांगलं झालेलही पाहवत नाही. थोडी फार मोजकी माणसं त्याला अपवाद असतातही किवा आहेतच. पण बहुतांश लोक हे नागवेच असतात. हे नागवेपण विचारांचं असतं, कृतीच असतं, एखाद्याचे पैसे घ्यायचे आणि द्यायचेच नाहीत असं व्यावहारिक नागवेपण सुद्धा असतं अनेकांकडे. हि वैचारिक नागवेपण असणारी माणसं दुसऱ्याच्या दुःखात स्वतःच सुख शोधतात. कित्येक लोक तर असे असतात कि त्यांना फक्त स्वतःच्या सुखातच रस असतो इतरांचं काही होवो त्यांना काही घेणंदेणं नसतं. काही माणसा इतरांना स्वतःच्या मनाचा कधीही थांग लागू देत नाहीत. आणि आपल्या मात्र अशाच माणसांवर प्रेम करत रहाण्याशिवाय पर्याय नसतो.
अशी हि वृत्तीनं नागवी असलेली माणसं, त्याचं भलं होत नाही तेव्हा दुसऱ्यांचहि भलं होऊ देत नाहीत.
जग असं खूप वाईट असला तरी चांगली माणसही खूप होवून गेली आहेत या जगात. त्यात संत ज्ञानेश्वर, संत गाडगे महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज, मदर तेरेसा अशी अनेक नवा घेता येतील.
चांगल्या माणसांच्या सहवासात राहून, आपणही चांगल वागावं असं या मंडळींना वाटत नाही. उलट अशी अनेक मंडळी एक होतात आणि चांगल्या माणसाला वाईट ठरवतात. तीन अट्टल दारूबाजांनी चौथ्याला दारू प्यायला फशी पाडाव तसं. अशा वृत्तीच्या लोकांसाठी लिहिलेल्या या ओळी. चारोळी.
मित्रहो जग हे असं आहे. स्वतः नागवं आहे म्हणून अंगभर कपडे असणाऱ्या माणसाला नागवं करणारं. अशा या जगात आपण आपला चांगुलपणा टिकवून धरायला हवा. एवढंच सांगायचय मला.
ओळी अगदी साध्या सोप्या आहेत. पहा आवडतात का ते -
नागव्यांच्या बाजारात
मी ....... लंगोट्या विकायला घेऊन गेलो.
पण त्यांनी.... लंगोट्या नाही विकत घेतल्या
मला नागवे केले.
Mother Teresa he naav changlya mansat yet nahi
ReplyDeleteSevechya navavar he bai Dharmantar karaychi
खरे आहे आपले. परंतु जसे शिकवले गेले. त्या ओघात लिहिले गेले. पण आता बदल नाही करत. यापुढे लिहिताना काळजी घेईन.
Deleteकणखर मोदीजी आहेत, अस्सल हिरा म्हणून कितीही विरोधकांनी टीका केली तरी, निरर्थक टीकाकारांना भीक न घालता कृतीतून उत्तर देणारे आहेत. त्यांच्या कृतीमुळेच अमेरिका सारखा शक्तिशाली देश आज मोदीजींना सलाम करतोय, आभार मानतोय.नमो नमो.
DeletePrarap जी, अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
Deleteआधी आलेल्या कॉमेंटवर प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर reply यावर क्लिक करावे. अन्यथा enter your comment यावर क्लिक करावे.
भारतीय राजकारणात कुठल्याच नेत्याच्या वाटेला आली नसेल एवढी उपेक्षा भारतातीलच राजकिय नेत्यांनी मोदींची केली आहे. पण मोदी जी सोन्या सारखेच ताऊन सुलाखुन जसा रत्नजडीत सुंदर दागिना व्हावा तसे बे किमती अलंकारीत भारताचे राजमुकुट झाले आहेत. आता भारताचीच नाहीतर जगाची जनता मोदीजीवर प्रेम करीत आहे.आता मोदीवर टीका म्हणजे सुर्यावर पाणी फेकण्या सारखे आहे.आज समस्त मोदीभक्तांना खरोखर स्वतवरच स्वकार्याचा गर्व वाटतोय.
ReplyDeleteजय हो नमो नमो.
दिनेश वाघ.
अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
Deleteयोग्य विचार मांडलेत .
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
Delete