Saturday 21 March 2015

बहुजनांनी गुढी उभारू नये ?

सण आले, आषाढीला माउलींची पालखी पुण्यात आली अथवा आषाढ मेघ दाटले कि मला काय होतं कुणास ठाऊक पण माझ्यातला कवी एकदम जागा होतो. जाणीवपूर्वक मी कधीच काही लिहित नाही. पण सणांना अनुसरून काहीतरी लिहावंसं वाटतं. मग मी लिहितो. गेल्या गुढीपाडव्याला लिहिलेली ' गुढी का उभारतात ? ' हि गोष्ट अशीच स्फुरली होती. आणि खरंच का उभारत असतील गुढी
या जिज्ञासेपोटी असंख्य वाचकांनी ती वाचली होती.

आज लिहायला उशीर झालाय. त्यामुळेच अधिक सविस्तर लिहित नाही. आज ' बहुजनांनी गुढी उभारू नये ' या शिर्षकाचा एक लेख सापडला. असले लेख समाजात पसरवू नयेत म्हणुन मुद्दाम त्या लेखाची लिंक येथे देत नाही. पण बहुजन म्हणजे कोण ? अल्पसंख्यांक नसलेले का ? बहुजन या शब्दछ्लाअंतर्गत कोणत्या जाती येतात ? यापैकी कोणत्याच गोष्टी त्या लेखात स्पष्ट केलेल्या नव्हत्या. त्या लेखाची लिंक येथे दिली नसली तरी त्या लेखकाला मी दिलेला अभिप्राय असा - ' स्वतःला हिंदु म्हणवणारे हिंदु समाजात गैरसमज पसरवत असतील तर हिंदूंपेक्षा मुस्लिम बरे असे म्हणावे लागेल कारण ते एक मुठ्ठी बनून रहातात. आम्ही मात्र स्वतःला हिंदू म्हणवतो आणि हिंदु असलेल्या इतर जातींशी वैरभावाने वागतो. मराठे म्हणणार आम्ही महान………. पण त्यातही पुन्हा ब्यांणो कुळी …… शहाण्णो कुळी……कुणबी असे फरक आहेतच. माळी म्हणणार आम्ही भारी पण त्यांच्यातही पोटप्रकार आहेतच. स्वतःचे वर्चस्व निर्माण व्हावे या हेतुने हिंदुंची एक जात दुसऱ्या जातीला पाण्यात पहाते. समाजात द्वेष निर्माण करते. कुणी म्हणणार शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी झाली पाहिजे कुणी म्हणणार तारखेप्रमाणे. कशाला हा वाद. एकाच दिवशी शिवजयंती साजरी केली तर काय बिघडणार आहे. कि दुसऱ्या गटाबरोबर का गेलात म्हणुन महाराज एका गटाचा शिरच्छेद करणार आहेत. पण नाही माघार कुणीच घेणार नाही आणि दोनदा शिवजयंती साजरी केली जाणार. समाजात कलह माजात राहिला पाहिजे आणि त्यावर आम्हाला आमचे राजकीय स्वार्थ साधता आले पाहिजेत. असा प्रयत्न समाजातील विघ्नसंतोषी लोकांकडुन कायम होत राहिला आहे. पण आपण सावध रहायला हवे. मागे एकाने एका लेखात असाच गणपती हि विघ्नहर्ता देवता नसुन विघ्न कारक देवता आहे असा मुद्दा आपल्या लेखात मांडला होता. अशी मंडळी आपण किती प्रगाढ पंडित आणि विचारवंत आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करतात. ' 

तो लेख समजून घेण्यात आणि त्याला उत्तर देण्यात बराच वेळ गेला. इतरही काही प्रापंचिक गोष्टो होत्या। गुढी उभारायची होती. तिला नैवेद्य दाखवायचा होता. वैगेरे …… वैगेरे. त्यात मध्ये वीज गेली. वीज आली तर नेटची रेंज गेली. असं करता करता पोस्ट पोस्ट करायला पाच वाजलेत. सॉरी.   

पण या सगळ्या धावपळीत माझ्या ब्लॉगच्या वाचकांना,ब्लॉगर मित्र - मैत्रीणींना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा न देवून कसे चालेल. आशा आहे माझ्याच ओळी असलेलं हे भेटकार्ड तुम्हाला नक्की आवडेल.







                             

4 comments:

  1. अशा मंडळींच ऐकून कुणी सण साजरे करायचे थांबवणार आहे का?

    ReplyDelete
    Replies
    1. खरं आहे अगदी काल पर्वाची गोष्ट
      छत्रपति शिवरायांची पुण्यतिथि सुद्धा तारखे प्रमाणे की तिथि प्रमाणे साजरी करावी या बद्दल whatsapp ग्रुप मधे शाब्दिक चकमकी उड़ताना दिसत होत्या

      पुढे अजुन काय काय लिहायचे या वरुण हे न सांगितलेलाच बरें

      Delete
    2. अभिप्रायाबद्दल आभार मित्रा. पण हि मंडळी समाज विघातक आहेत असे वाटत नाही का ?

      Delete
    3. चिंतामणीजी , अभिप्रायाबद्दल आभार. Whatsapp च कशाला फेसबुक सह सगळ्याच सोशल साईट समाज बिघडविण्याचेच काम करीत आहेत. माझेही ग्रुप आहेत. नको नको त्या गोष्टी असतात त्यावर. हे असलं टाकत जाऊ नका असं सांगितलं तरी कोणी ऐकत नाही. ग्रुपमधून बाहेर पडणं हा एकच पर्याय हाती रहातो. आता आपल्या प्रतिक्रिया नियमित मिळतील ही अपेक्षा.
      आणखी एक योग्य इथं आपण नव्यानं अभिप्राय नोंदवताय. त्यामुळे आपण reply वर क्लिक न करता add comment क्लिक करावे.

      Delete