कुणी काही म्हणालं तरी शिवसेना - भाजपा युती तुटणार नाही असा मला विश्वास आहे. शिवसेना का माघार घेईल आणि कोणत्या अटी घालेल याविषयी मी माझ्या
Indian Politics : शिवसेना माघार घेईल पण का आणि कशी ?
तर शिवसेनेला संपवण्याच जे स्वप्नं राज ठाकरेंनी पाहिलं आहे ते प्रत्यक्षात यायला राज ठाकरेंना फारशी वाट पहावी लागणार नाही. आज महाराष्ट्रात मनसेची नाही म्हणलं तरी ताकद आहे. मुंबई महानगर पालिकेत तर ती राष्ट्रवादीपेक्षा जास्त आहे. नाशिक महानगरपालिका मनसेकडे आहे. मुंबई महानगर पालिकेतली शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मुंबईला जे काही लाभलं ते युतीच्या सत्ता काळात. शिवसेनेची सत्ता आणि त्यांचाच महापौर असताना शिवसेनेने मुंबई शहराच्या विकासात फारशी भर टाकलेली नाही. त्यामुळेच भाजपा बरोबर युती तुटली तर पुढच्या वेळी म्हणजे २०१७ ला मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेची एकट्याने लढून सत्ता येणे कदापी शक्य नाही. कारण युती असतानाही २०१२ च्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला २००७ च्या तुलनेत ९ ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे. भले मनसे कुणी म्हणेल मनसे अस्तित्वात आल्यामुळे शिवसेनेला हा तोटा झाला आहे. पण मनसे यापुढेही रहाणार आहे आणि त्यामुळेच शिवसेनेला संपवण्याच राज ठाकरेंनी पाहिलेलं स्वप्नं वास्तवात यायला फार काळ जावा लागणार नाही.
शिवसेनेला संपवणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करणं हेच राज ठाकरे यांचं ध्येय असल्यामुळे ते भाजपाच्या सोबत जाऊ शकतात. आणि राज ठाकरे भाजपा सोबत गेले तर शिवसेनेचं अधपतन उद्धव ठाकरेच काय कोणीच थांबवू शकणार.
परंतु केवळ मुख्यमंत्री पदावर डोळा असलेल्या राज ठाकरेंच्या हे सारं लक्षात येणं शक्य नाही.
शिवसेना भाजपा युती तुटली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय आणि शिवसंग्राम हे महायुतीतले चारही घटक पक्ष भाजपाच्या गोटात जातील. कारण उद्धव ठाकरेंचा हेकेखोरपणा या चारही मित्रपक्षांनी फार जवळून पाहिला आहे. जो माणूस अमित शहांसारख्या एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुखाची पत्रास ठेवत नाही. तो आपल्याला काय किंमत देईल याची त्यांना चांगलीच जाणीव झाली असेल.
पण युती तुटणार नाही. हे पुन्हा पुन्हा एकदा अधोरेखित करतानाच युती तुटलीच तर महायुतीतल्या इतर घटक पक्षांना सोबत घेतानाच भाजपा मनसेलाही सोबत घेईल. आणि अशी युती झाली तर शिवसेनेचे ४० आमदार तरी निवडून येतील कि नाही याची शंकाच आहे.
त्याहीपेक्षा महत्वाचं महत्वाचं म्हणजे भाजपाशी काडीमोड घेतलेल्या शिवसेनेला सोबत घ्यावा असा दुसरा कोणताच दमदार पक्ष नाही. एक शक्यता आहे कधीकाळी शिवसेनेना राष्ट्रवादी अशी युती होऊ शकते. पण ती आज नाही. आणि तशी युती होउस्तोवर शिवसेनेची जी पिछेहाट झालेली असेल त्यामुळे त्या युतीतही राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहील आणि त्या युतीत शिवसेनेचं स्थान दुय्यमच राहील.
उद्धव ठाकरे हा सगळा सारासार विचार करतील आणि आज धोक्यात येऊ घातलेली युती टिकवतील असा मला विश्वास आहे. भाजपा १२५ ते १३० जागा घेऊन तडजोड करेल. पण त्यासाठी मुख्यमंत्रीपदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात घालणार नाही. भाजपानं १३० जागा घेतल्या तर शिवसेनेला १४० आणि मित्र पक्षांना १८ जागा मिळू शकतील. म्हणजेच शिवसेनेच्या आत्ताच्या सूत्रनुसार भाजपाच्या ११ जागा वाढलेल्या असतील आणि शिवसेनेच्या ११ जागा कमी झालेल्या असतील. पण त्यामुळे युतीची सत्ता बहुमतानं सत्ता येण्याची शक्यता वाढणार असल्याने शिवसेनेनं माघार घेणं गरजेचं आहे.

सर ͧशवसेना माघार घेईल. राçĚवादȣ माघार घेईल.
ReplyDeleteपण Ǒह मंडळी ͩकती èवाथȸ आहेत हेफार Ĥकषा[नं
जाणवतंआहे. आता मतदारांनी राçĚȣय प¢ालाच
अͬधक बळ ɮयावंहेयातनू अधोरेͨखत होतंआहे.
Mi tumchya vicharashi sahamat nahi. Mumbai madhe bjp chya netyani election pracharachi chalavaleli postebaji sagle sangun jat aahe, bjp chya mumbai madhil gujrati ani vidarbhatil gadakri group la shivasena cha mukhyamantri nako aahe. bjp che he doni gat senela dominate karat aahet. tyamule senene tanun dharle te barobar aahe. yat seneche kami ani bjp che nuksan jast hoil.
ReplyDeleteमित्रा अमेरिकेत ४६ लाख भारतीय आहेत. ते तिथे आनंदानं राहतात. मालमत्ता खरेदी करू शकतात.तिथले महापौर होऊ शकतात. आणि आपण आपल्याच घरात गुजराती बिहारी असा वाद घालत बसतो. विचारसरणी आपली नसते. असली विचारसरणी आपले पुढारी आपल्याला देतात आणि आपण वाट चुकून आपल्या आपल्यातच भांडत बसतो. नेत्यांनी आपल्याला दिलेल्या या असल्या जातीयवादामुळे, प्रांतवादामुळे, धर्मवादामुळे, भाषावादामुळे आपल्याला आपला देश आपला कधीच वाटत नाही. आपण देश म्हणून या भूमिवर प्रेम कधीच करत नाही.
ReplyDeleteकेशवजी शिवसेनेनं आणि राष्ट्रवादीनं माघार घेऊ देत अथवा न घेवु देत. या स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा लक्षात घेतला पाहिजे आणि लोकसभेला जसे एकसंघपणे एका राष्ट्रीय पक्षाच्या पाठीशी उभे राहिलोत तसेच विधानसभेतही राष्ट्रीय पक्षांनाच पाठबळ दिलं पाहिजे.
ReplyDeleteसर उद्धव खूपच उद्धट आहे … लोकसभेला पण जे १८ खासदार लागले ते पण मोदी लाटेमुळे त्या मध्ये उद्धव चे काही पण श्रेय नहिये. एक साधे उद्हारण देतो शिर्धी मतदारसंघ मध्ये वाघचौरे सोडून गेल्यावर त्यांनी अचानक उमेदवार बदलून पण लोखंडे जिंकून आला … त्यावरूनच समजते तिथे मोदी लाट किती होति।
ReplyDeleteआणि १००% भाजपा चा महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणार आहे त्यामध्ये काहीच वाद नाहीये । आम्ही १८ ऑक्टोबर ची वाट पह्तोय… जय महाराष्ट्र
सुजितजी प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. आता सेच भेटत रहा.
ReplyDeleteसर तुमचे सगळे खूप चांगले असतात परंतु मला असं विचारायचे आहे की, जेव्हा शिवसेना व मनसे वाले मराठी आणि परप्रांतीय (यात युपी बिहार, गुजरात सर्व) असा दुजाभाव करतात तर तुम्ही त्यावर का लिहीत नाही
ReplyDeleteकारण जेव्हा राज ठाकरे यांनी गुजराती लोकांवर टीका केली तेव्हा खूप वाईट वाटले होते. कारण कोणता ही गुजराती माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात उतरलेला नाही (अपवाद दर्डा बंधू आणि अरुण गुजराथी)
आदेशजी, प्रतिक्रियेबद्दल आभार. आपणास माझे लेख आवडतात हे वाचुन आनंद वाटला. गावी गेलो होतो म्हणुन आपल्या प्रतिक्रियेस उत्तर दयायला उशीर झाला. कृपया गैरसमज करून घेऊ नये. असेच नियमित भेटत रहा.
ReplyDelete