Sunday 7 July 2019

अमर्त्यसेन हे भारतरत्न कसे?

मी सचिन आणि रोहितची तुलना करणारी एक तिरकस पोस्ट लिहिली आणि सचिनप्रेमी मंडळींना बरेच वाईट वाटले. म्हणून हे स्पष्टीकरण. खरेतर मी लेखक कवी. मोदी सत्तेत आले काय आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले काय मला काहीच फरक पडायला नको. त्याच प्रमाणे सचिनला भारतरत्न दिले म्हणून मला काहीही फरक पडायचं कारण नाही. परंतु एखादी गोष्ट चुकीची  घडत असेल तर त्याविषयी लिहायला हवेच ना.

खरेतर मला स्वतःला सचिनविषयी जेवढे प्रेम आहे तेवढेच प्रेम धोनीविषयी आहे. याउपर नेतृत्व गुण यासह इतर
अनेक कसोट्यांवर मला सचिनपेक्षाही धोनी थोर वाटतो. पण खेळात सर्वक्षेष्ठ कामगिरी असणाऱ्या खेळाडूसाठी खेलरत्न हा पुरस्कार आहे. आणि भारतरत्न या पुरस्काराची व्याप्ती फार मोठी आहे. सामाजिक कामाचे दाखले कोणी देणार असेल तर इतर अनेक सामान्य व्यक्ती स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन सामाजिक काम करतात. आपल्याला प्रकाशातील मंडळी तेवढी माहित आहेत. जेव्हा सचिनला भारतरत्न दिले तेव्हाच मी याऐषयी लेख लिहून माझी नाराजी व्यक्त केली होती. सचिनविषयी मला आकस असण्याचे काहीही कारण नाही. शतकाचं शतक करणारऱ्या सचिनविषयी मला नितांत आदर आहे.

भारतरत्न हा पुरस्कार कुणाला द्यायचा हे सत्ताधारी ठरवतात. सचिनला काँग्रेस सरकारने भारत रत्न पुरस्कार देण्याचे निश्चित केले. तेही लोकसभेच्या अवघे काही महिने आधी. त्याच बरोबर सचिनला राज्यसभेवर घेण्यात आले. कारण एकच कि जनतेच्या गळ्यातला ताईत असलेल्या सचिनचा अशा रीतीने गौरव करून आपण आपल्या सोबत घेतले तर जनता आपल्या सोबत येईल. पण तसे झाले नाही. आणि यापुढे कधीही तसे होणार नाही.

आता सचिनने जे काही विक्रम नोंदविले ते मोडीत काढणाऱ्या प्रत्येक क्रिकेट खेळाडूला भारतरत्न द्यायलाच हवा ना. मुळात आजवर ४८ व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात निम्मे अधिक राजकीय नेते आहेत. मदर तेरेसा यांच्यासह अनेक आदर्शवत व्यक्तिमत्वांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या अमर्त्य सेन यांना, 'रामाला बंगाली जनतेच्या मनात स्थान नाही.' असे विधान करण्याचा काय अधिकार आहे. कसे भारतरत्न म्हणायचे यांना?

भारतरत्न हि खिरापत नाही. परंतु अलीकडे कोणतेही पुरस्कार खिरापत दिल्याप्रमाणे वाटले जातात. राजकीय पद भूषविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्याचे काहीही कारण नाही. परंतु सरकारी पुरस्कार हे आपली खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे वाटले जातात. राहुल गांधी कधीही पंतप्रधान होण्याची शक्यता नाही. पण समजा ते यावेळी पंतप्रधान झाले असते तर लवकरच सोनिया गांधी यांनाही भारतरत्न म्हणून सन्मानित करण्यात आले असते. आणि पुढल्या काही काळात राहुल गांधी यांना भारतरत्न म्हणून गौरविण्यात आले असते. आपल्या देशात लोकशाही आहे असे आपण म्हणतो खरे. पण आजवर लोकशाहीच्या नावाखाली निवडून दिलेले मूठभर लोक सव्वाशे कोटी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आले आहेत हेच खरे.  

No comments:

Post a Comment