Friday 7 November 2014

facebook : फेसबुकवरची अश्लीलता

आधी मी ऑर्कुटवर होतो. आता अनेक वर्षापासून फेसबुकवर आहे. अनेकांचे प्रोफाईल पाहिले. त्यात चांगली माणसं जशी भेटली तशीच नको तशीही भेटली. अनेकदा शोध न घेताही खुप घाणेरडे ज्याला अश्लिल म्हणता येतील असे फोटो डोळ्यासमोर आले. तेव्हा भीती वाटते हे सारं आपल्या मुलांच्या नजरेलाही येत असेल. काय परिणाम होत असतील याचे ?
कसं टाळता येईल हे सारं. या सगळ्या उद्देशाने मुलांना मोबाईलपासून दुर ठेवावं असं आव्हान करणारे सोशल मिडिया आणि अश्लीलता  या मथळ्याखाली भाग १, भाग २ , भाग ३ आणि भाग ४ असे चार लेख लिहिले होते. ते वाचकांनी पुन्हा नक्की वाचावेत. 

मी पहातो अनेक मंडळी फेसबुकवर आपले फोटो लोड करतात. त्यात मुलीही मोठ्या प्रमाणात असतात. परंतु यातील किती जण आपले खाते शेअर करताना काळजी घेतात. व्यक्तिगत कारणासाठी फेस्बुक्चा वापर करताना प्रत्येकाने आपण जे काही शेअर करणार आहोत ते सार्वजनिक होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. एखादयाची मैत्रीसाठीची विनंती स्विकारताना किंवा एखादयाला मैत्रीची विनंती करताना खरच आपण त्या व्यक्तीला प्रत्यक्ष ओळखतो का याची काळजी घेणे गरजेचे आहे.

राजहट्ट, बालहट्टआणि स्त्रीहट्ट हे सर्व श्रेष्ठ आहेत असं म्हणतात. पैकी राजहट्टाचा ( राज म्हणजे राजा,  ठाकरेंचा राज नव्हे ) आपल्याला अनुभव नसला तरी बालहट्ट आणि स्त्रीहट्ट किती भयंकर असतो याचा अनुभव आपल्याला पदोपदी येत असतो. असाच एक अनुभव. 

माझ्या मित्राची मुलगी. नुकतीच १० वी पास झालेली. तिला नवा मोबाईल घ्यायचा होता. शक्य असुनही मित्र तिला साधा मोबाईल घेऊ इच्छित होता. तर तिला चांगला ८ - १० हजाराचा स्मार्टफोन हवा होता. मी एक दिवस त्याच्या घरी गेलो. तशी तिनं माझ्या कानावर तक्रार घातली. " काका , बघा ना. बाबा मला साधा मोबाईल घ्यायला निघालेत. "
" मग काय हरकत आहे ? "
" जा. मी नाही घेणार साधा मोबाईल. माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे बघा कसले एक से एक मोबाईल आहेत. मला नकोय तसला डब्बा. " ती रुसून बसत म्हणाली.
" ठीक आहे. आपण तुला हवा तसा मोबाईल घेऊ या. पण एका अटीवर. " मी.
" कसली अट ? "
" तू तुझ्या फेसबुकला स्वतःचे फोटो टाकायचे नाहीत. "
" का ? "
" कारण विचारायचं नाही. "
" पण काका माझ्या सगळ्या मैत्रिणींचे फोटो फेसबुकला असतात. मी का नाही टाकायचे ? " 
" या अटीला उत्तर नाही. मान्य असेल तर सांग. " ती अट तिनं मान्य केली आणि आम्ही तिला हवा तसा मोबाईल घेतला.

आता कुणी म्हणेल तुम्ही फार बुरसटलेल्या विचारसरणीचे आहात. काही म्हणा. पण मला गरजेचं वाटलं ते मी केलं.  आणि मी केलं ते योग्य केलं हे पुढील उदाहरणावरून आपणास नक्की पटेल.

माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये एक मुलगी आहे. कोण ? कुठली ? माहित नाही. तिच्या प्रोफाईलवर तिचा स्वतःचा फोटो आहे. सुंदर आहे. फोटोवरून ती खुप सोज्वळ आणि सुसंस्कारीत असावी असे वाटते. तो फोटो पाहिल्या नंतर आपल्याला अशीच सुन मिळावी असे वाटण्याइतपत मी प्रभावित झालो होतो. अर्थात माझा मुलगा अजुन शिकतोय. पण एक दिवस मी तिच्या नव्यानं लोड केलेल्या फोटोला एका तरुणानं दिलेली प्रतिक्रिया पाहिली. ती प्रतिक्रिया अशी, " ये अपना माल है बॉस. इसकी तरफ देखना भी नही. काट के रख दुंगा. "

त्या मुलाने अशी प्रतिक्रिया देण्यात तिचा काही दोष आहे असे मला मुळीच म्हणायच नाही. पण असला मुलगा तिच्या फ्रेंड सर्कलमधे कसा आला हा प्रश्न आहेच ना ? तिचे इतर परिचित किंवा फेसबुक वापरणारे इतर तरुण हि प्रतिक्रिया पहातील तेव्हा त्यांचा त्या मुलीविषयी काय समज होईल ?

आणखी एक उदाहरण. एक दिवस मला एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. मीही तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर तिच्या पेजवर गेलो. तर त्यावर अनेक अश्लिल फोटो. मी लगेच तिला माझ्या फ्रेंड लिस्ट मधून काढुन टाकलं. 

फेसबुकवर अनेकजण केवळ गुड मॉर्निंग आणि गुड नाईट करताना दिसतात. कशासाठी ?

फेसबुकवर लाईक करणं हि गोष्ट तर इतकी सोपी आहे कि अनेकजण डोळे झाकून लाईक करतात. आपण कशाला लाईक करतोय हेही वाचण्याची तसदी ते घेत नाहीत. एक उदाहरण सांगतो. परवा नगर जिल्ह्यात झालेल्या तिहेरी दलित हत्याकांडाची बातमी ABP माझानं अपलोड केली. अनेकांनी या बातमीलाही लाईक केलेलं दिसलं. आता अशा हत्याकांडाच्या लाईक मिळत असतील तर त्याचा अर्थ काय घ्यायचा. तीच अवस्था रमेश जाधवच्या हत्येच्या बातमीची. निषेध कमी लाईक जास्त. 

अनेक मंडळी केवळ आपली फ्रेंड लिस्ट खूप लांबलचक असावी म्हणुन कुणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत सुटतात. आणि त्यातून काही धोके ओढवून घेतात. कशासाठी हे सगळं ? 

हो पण , अनेक जण खूप चांगले वैचारिक लेख लिहितात. अनेक चांगले सुविचार पोस्ट करतात. ते मात्र जरूर पहावेत. अशा लेखांना न वाचताच निव्वळ लाईक करण्यापेक्षा मन लाऊन वाचावं. आपल्याला योग्य वाटेल अशी प्रतिक्रिया दयावी. 

फेसबुक वाईट आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. पण त्याचा मुक्त वापर नक्कीच धोकादायक आहे असे
मला वाटते. त्यामुळेच आपले खाते सर्वांसाठी खुले ठेवू नका. अनावश्यक आणि अती वापर टाळा. अनोळखी व्यक्तीची मैत्री स्विकारू नका किंवा अशा व्यक्तीच्या मैत्रीसाठी हात पुढे करू नका. 

असो मित्रांनो, माझा लेख योग्य वाटत असेल तर ठीकच आहे. नक्की अंमलात आणा. नाही तर सोडून दया. 

6 comments:

  1. का? फेसबुकवर फक्त मोदीच पाहिजे वाटत?

    ReplyDelete
  2. मारुती काम्बळेच काय झाल?एन्रानच काय झाल? देखो देखो कोन आया गुजरात का 'केर' आया. आता घटना बदला. जाहिरात करा. दलितावर अन्याय करा. तुला काही पद दिले नाही वाटत.

    ReplyDelete
  3. मित्रा प्रतिक्रियेबद्दल आभार. परंतु हा लेख लिहिताना माझ्या मनात क्षणभरही राजकीय हेतु नव्हता. किंवा तशा संदर्भाचा एकही शब्द लेखात नाही. असे असताना आपण या लेखाचा संबंध मोदींशी कसा काय जोडलात ?

    ReplyDelete
  4. मित्रा प्रतिक्रियेबद्दल आभार. परंतु हा लेख लिहिताना माझ्या मनात क्षणभरही राजकीय हेतु नव्हता. किंवा तशा संदर्भाचा एकही शब्द लेखात नाही. असे असताना आपण राजकीय वास येणारी प्रतिक्रिया कशी काय दिली ?

    आपल्याला मारुती कांबळे दिसतात पण वर्ष उलटुन गेलं तरी नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी सापडले नाहीत. कधी कधी या अनिष्ट प्रवृत्तींच नशीब जोरावर असतं. दलितांवर अन्याय होत रहावा असे कुणालच वाटत नाही.

    ReplyDelete
  5. 1995 ला युतीने atrocity रद्द केला होता. दाभोळकरान्चा धर्मवादी bjp ला विरोध होता. अधश्रध्दा विधेयकाला bjpचा जास्त विरोध आहे. जवखेडाकड बघा जरा.

    ReplyDelete
  6. मित्रा तुझी माहिती नीट तपासून पहा. atrocity कायदा भाजपानं रद्द नाही केला तर अधिक मजबूत केला http://en.wikipedia.org/wiki/Scheduled_Caste_and_Scheduled_Tribe_%28Prevention_of_Atrocities%29_Act,_1989 हि लिंक पहा. अंधश्रद्धा कायद्याला भाजपाचा विरोध कधीच नव्हता आणि असण्याचं कारण नाही. दाभोलकरांचा भाजपाला विरोध होता असे आपण म्हणता यास पुरावा काय ? आणि असला तरी आजही १०० % जनता भाजपाला मतदान करत नाही. प्रत्येकाला आपापली मते असतात. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete