Sunday, 8 December 2019

प्रियांका रेड्डी प्रकरण


प्रियांका रेड्डी या पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या तरुणीवर बलात्कार होतो. तिला जाळून मारण्यात येते. आणि तरीही या देशातील काही मंडळी मानवाधिकाराच्या नावाखाली त्या गुन्हेगारांची पाठराखण करतात. त्या नराधमाची बायको,
'माझ्या नवऱ्यावर अन्याय झाला आहे. आता मी एकटी जगून काय करू. मलाही गोळ्या घाला असा कांगावा करते.' हे अत्यंत निंदनीय आहे.

त्याविषयी मी फेसबुकवर चारच ओळी लिहिल्या. मान्य आहे मला माझे मत अत्यंत टोकाचे असेल. परंतु अशा वृत्तींना आवर घालायचा असेल तर अशीच दहशत असायला हवी हो. इथे कुणी माझा एन्काउंटर करत नाही. त्यामुळे ज्यांचा एन्काउंटर झाला त्यांच्याविषयी दुःख करण्याचे मला फार काही कारण नाही.

No comments:

Post a Comment