Wednesday, 4 March 2015

उद्धवराव आणि शेखचिल्ली

आजपर्यंत कुणाचा गाजला नसेल इतका मोदींचा कोट गाजला. ' मोदिका कोट …… केजरीवालका मफलर. ' अशी तुलना झाली.

म्हणणारे म्हणतात कि, '  केवळ त्या कोटामुळे दिल्लीची सत्ता भाजपाच्या हातुन गेली. '

कुणी म्हणालं ,  ' मोदींचा दहा लाखाचा कोट मतदारांच्या डोळ्यावर आला. '

कॉंग्रेसला भाजपावर टीका करायला इतर कोणताही राजकीय मुद्दा सापडत नाही त्यामुळेच असला मुद्दा मिळाला कि ते अधाश्यासारखे तुटून पडतात.

मग नंतर कळालं
कि गुजरातच्या कुणा व्यापाऱ्यान तो कोट मोदींना भेट दिला होता. मोदींनी ती भेट स्विकारतानाच मिडीयाला सोबत घ्यायला हवं होतं. पण मोदींना पुढचं कुठे दिसत होतं.

असो. पुढे मोदींच्या कोटाचा लिलाव झाला. त्यातुन मिळालेला निधी गंगा स्वच्छता अभियानाला देण्याचा निर्णय मोदींनी घेतला. तरीही विरोधकांच्या तंगड्या वरच. म्हणे, " त्यांच्यावर झालेल्या टिकेतून सुटका करून घेण्यासाठी मोदींनी हि पळवाट शोधली. "

काही असो. पण मोदींनी कोट घातला तरी चर्चा घडत राहिली आणि मोदींनी कोट विकला तरी चर्चा घडत राहिली.

आपल्याला मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्याची मोदींची हि काही पहिलीच वेळ नव्हती. पण विरोधकांना काय ? ' साप , साप ' म्हणत भुई बडवली तरी लोक जमा होतातच हे माहिती होतं. पण विरोधकांच जाऊ द्या. सत्तेची चव चाखणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सुद्धा विरोधकांच्या सुरत सूर मिसळावेत हे जरा अतीच नाही का ? उद्धव तर उद्धव.  राज सुद्धा. खरं तर विरोधकांना आणि मित्रांनाही सारं वास्तव ठाऊक होतं. पण आपण असा दहा नव्हे वीस लाखाचा कोट शिवला तरी असे चर्चेत येणार नाही. आणि तोच कोट उद्या लिलावात काढला तर तो कोणी आहे त्या किंमतीमध्येसुद्धा विकत घेणार नाही. याची जाणीव होती. त्यामुळेच कोट न शिवता केवळ मोदींच्या कोटावर आपण बोलत राहिलो तरी आपण चर्चेत राहू शकतो या एकाच आशेने या साऱ्यांनी रान माजवलं.

भ्रष्टाचाराला पाठीशी कसं घालावं आणि आपल्या विरोधात दंड थोपटणाऱ्या माणसावर चिखलफेक कशी करावी हे काँग्रेसकडून शिकावं. त्यांनी आण्णांवर ताशेरे ओढले. त्यांनी रामदेव बाबांना सळो को पळो करून सोडलं. पण टू जी स्पेक्ट्रम घोटाळा बहाद्दर ए राजाला पाठीशी घातलं.

असो हि मंडळी अशीच वागणार. पण यांना कधीही शहाणपण येणार नाही. आपण ज्या फांदीवर बसतो त्या फांदीवर घाव घालू नये हे शेखचिल्लीला कळालं असेल पण या उद्धव सारख्या राजकारण्यांना कधीच कळणार नाही. अशाच काही कल्पनेतुन हि राजकीय वात्रटीका लिहिली गेली आहे.       

  
देशहितासाठी मोदींनी
विकला त्यांचा कोट
म्हणुन उद्धवरावांनी बाजारात
आणली त्यांची लंगोट

उद्धवरावांची लंगोट
कुणी फुकटसुद्धा घेईना
लंगोट विकतानाचा फोटो
' सामना ' तसुद्धा येईना

काय करावं उद्धवरावांना
काहीच कळत नव्हतं
एकहाती सत्तेचं
गणित जुळत नव्हतं


लंगोट टाकुन बाजारात
उद्धवराव उठले
इतक्यात तिथे त्यांना
शेखचिल्ली भेटले.

उद्धवराव आपल्याच दुखात
लागले होते झिंगु
शहाणपणाचे शेखचिल्ली
शब्द लागले सांगु,

" जिस डालपर बैठते
उसपे कुल्हाडी नही मारते
पेड तो नही गिरता
मिया,  हमही गिरते."

                           विजय शेंडगे,पुणे.






24 comments:

  1. केशव काटकर4 March 2015 at 20:12

    तुमचे लेख वैचारिक खाद्य पुरवतातच बरोबर मनोरंजनही करतात.

    ReplyDelete
    Replies
    1. केशवजी अभिप्रायाबद्दल आभार.

      Delete
    2. Indian society has a very bad curse that is to glorify person known as personality cult .and since ages Indian people find one masiha to carry their load .and star his or her glorification .same is happening with modi . person siting on such responsible post and country having such huge poverty and malnutrition ,its non sensible to see such behaviour. Many will agrree or can vary . I am strictly not a political person just a social student .

      Delete
    3. Vijaykumarji, you may be a social student but your observation are quite true. But people come out through this thinking. I think voters in Delhi run behind Arvind Kejriwalnot looking to but looking towards is announcement of free water and electricity with 50 % charges. This harmful to Indian democracy.

      Delete
  2. अनिरुद्ध देशपांडे6 March 2015 at 15:19

    उध्दव ठाकरे आणि शेखचिल्लीची तुलना अप्रतिम.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार अनिरुद्धजी. असेच भेटत रहा. आपले अभिप्राय कळवत रहा.

      Delete
  3. नमस्कार !
    आपला लेख आहे तर मस्तच पण याबददल मला काहीतरी सांगायचे आहे. सुरूवार करूया आमच्या महाराष्ट्राच्या राज ठाकरे पासून. माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की हा राज ठाकरे फक्त शिवाजी महाराजांच्या नावावर उडया मारत आलेला आहे. शिवाजी महाराजांचे कौतुक या राज ठाकरेकडून ऐकून समोरील जनता काही दिवासांसाठी भुलतेे. पण मला वाटत या राज ठाकरेने तोंडाचा आवाज आवरून हात चालवले पाहिजेत म्हणजेच काम केले पाहिजे म्हणजे शिवाजी महाराजसुदधा खुश होतील. दुसरी गोष्ट म्हणजे उध्दव ठाकरे. हे सुध्दा राजचेच भाऊ. निवडनुकीपुर्वी भाषणावेळी या उध्ववने मोदींना दिल्लीचा अफझलखान म्हटले होते आणि जेव्हा महाराष्ट्रात भाजप निवडून आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा हा उध्दव ठाकरे त्याच मोदींच्या पुढयात निर्लज्जासारखा बसला होता, निदान त्याने मोदींना कशाची उपमा दिली होती त्याचेही स्मरण नव्हते. असे हे शिवसेना व मनसे. हिंदूत्वाच्या नावावर भेदभावाला खतपाणी घालतात. एकीकडे आम्ही आपच्या कॉलेजमधीन मुस्लीम मित्रांचा आदर करतो, ते सुध्दा आमचा आदर करतात, आम्ही हिंदू-मुस्लिम एकत्र कधी येतात ते बघतो आहोत तर दुसरीकडे ही ठाकरे मंडळी हिंदू-मुस्लिम वेगळे कसे होतात ते बघतात म्हणजेच भेदभावाला खतपाणी घालतात ते सुदधा शिवाजी महाराजांच्या पराक्रमावरून. आता मला एक गोष्ट सांगा की ज्या मुस्लीमांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, ज्या मुसलमानांनी संभाजी महाराजांचा खूप हाल करून खून केला, शिक्षा द्यायला पाहिजे होती ती म्हणजे त्या जुन्या काळातल्या क्रुर मस्लिमांना. सध्याच्या मुस्लिम लोकांना महाराष्ट्राबाहेर काढून जनतेला काय मिळणार आहे? तुम्ही पाहिलच असेल की गणेश चतुर्थीच्या वेळी हिंदूंपेक्षा मुसलमान लोक आरतीला उपस्थित असतात. कुठे काही अपघात घडला तर लगेच धावून येणाऱ्यात एकतरी मुसलमान असतोच असतो. मी काही इथे मुसलमानांचे गाणे गात नाही कारण मी सुध्दा काही असे व्हिडीओज पाहिले आहेत ज्यामध्ये मुसलमान हिंदू लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या समोर कापतात, याचे प्रमुख कारण ते म्हणजे कुरान, कुरान सांगते की मुस्लिम नसणाऱ्यांचा खुन करा. त्यामुळे मला वाटत नाही की कोणी देवाने लिहीले असेल. अशा मानवनिर्मीत प्रथांवर तर बंदी आणलीच पाहीजे. आपल्या महाराष्ट्राबरोबर आपल्या देशाचे भले तेव्हाच होईल जेव्हा सर्व धर्मांतील वाईट प्रथा बंद होतील आणि सर्वधर्मसमभाव होऊन सर्व धर्म एकत्र येतील. आता आपण वळूया मोदींकडे. जेव्हा मी नववीत होतो तेव्हा मी वर्तमानपत्राची कव्हर पुस्तकांना घालायचो. त्यावर काहीना काही एक तरी मोदींचा लेख मिळायचाच. उदा. Underground Gas Line, Free Internet यांसारख्या मोदींकडून गुजरातमध्ये सुरू झालेल्या अनेक सुविधा वाचायला मिळायच्यात. गेल्या आठवडयात मी पहिल्यांदाच लोकसभेचे थेट प्रक्षेपण पहिले. त्यामध्ये मोदी जनधन योजना व इतर नवीन सरकारने सुरू केलेल्या ऑनलाईन फॉर्म सुविधांबददल बोलत होते. मोदी जेव्हा दौऱ्यावर गेले होते त्याबददल विरोधकांनी प्रश्न विचारला तेव्हा मोदींनी त्यांना उत्तर दिले की त्यांनी एका वेज्ञानिकाबददल वाचले होते ताे जपान मध्ये राहत असे. त्याने एक प्रकारचे औषध बनवले होते ते भारतातील आदिवासी बंधूुंना उपयोगी पडेल म्हणून भारतातीन वैज्ञानिकांना त्या औषधाबददल मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यासाठी त्या वैज्ञानिकाला भेटण्यासाठी मोदी जपानमध्ये गेले होते. अशाप्रकारे इतर प्रवासाबददल माेदींनी विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. जेव्हा काही विषय उरला नाही तेव्हा विरोधकांनी धर्मांला मध्ये आणले आणि हिंदू-मूस्लीमांच्या हिंसेबददल विचारले. तेव्हा मोदींनी त्यांच्या एका भाषणातील ओळ सांगीतली की, "हिंदूंचा सगळयात मोठा शत्रू कोण आहे? तर तो म्हणजे गरीबी. मुसलमानांचा सगळयात मोठा शत्रुू कोण आहे? तो सुध्दा गरीबी, दोघांचा शत्रू एकच आहे, तर का एकदुसऱ्याशी भांडायचे? हिंदू-मुस्लिमांनू एकत्र या आणि गरीबीला मुळापासून उखाडून फेका." टाळयांच्या कडकडाटाने विरोधक गप्प बसले.
    त्यामुळे मला वाटते की आमच्या भारतमातेला अनेक वर्षांनी युधिष्टीर सारखा राजा मिळाला. भाजप एकी कडे दृष्ट हिंसक प्रथा बंद करून हिंदू-मुस्मिम ऐक्य करायला बघते तर दुसरीकडे ठाकरे परिवार हिंदू-मुस्लिमांमध्ये फुट पाडायला बघते. त्यामुळे मला वाटते मोदीच आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल करू शकतात.

    मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे https://mygov.in/ बददल. माेदींनी जेव्हा ऑस्ट्रेलियात भाषण दिले होते तेव्हा त्यांनी या वेबसाईटचा उल्लेख केला होता. मोदींनी ही वेबसाईट खास आमच्याकरता (सर्व नागरिकांकरता) बनवली आहे जेणेकरून नागरिकांची मते, व इतर सुविधाबददल माहिती तसेच नागरिकांच्या अडचणी मोदींना कळतील. आपल्याला फक्त्‍ा एकदा Sign In करायला पाहिजे आणि नंतर आपण आपला लेख मोदींपर्यंत 500 शब्दांच्या मर्यादेत पाठवू शकता. धन्यवाद ! https://mygov.in/

    ReplyDelete
    Replies
    1. अक्षयजी, अभिप्रायाबद्दल आभार. माझे https://mygov.in/ ला खाते आहे. वेगवेगळ्या मुद्यांवर तिथे माझी मते मांडत असतो. इतकेच काय मी मुख्यमंत्री मा. देवन्द्र फडणवीस यांनाही आजपर्यंत दोनदा पाच पाच पानी पत्रे पाठवली आहे. आपणही खुप जागरूक नागरिक आहात. आनंद वाटला. त्यामुळेच आपल्या प्रतिक्रया नेहमीच मिळाव्यात हि अपेक्षा.

      Delete
    2. आपला Reply वाचून खूप बरे वाटले. मी काही एवढा काही राजकारणात वैगेरे लक्ष देत नाही पण जेव्हा पासून मोदी सरकार आले तेव्हापासून मोदींच्या सकारात्मक विचारांमुळे थोडा थोडा राजकारणात लक्ष देऊ लागलो.

      Delete
    3. अक्षयजी, परिक्षा संपली असेल. पेपर उत्तम गेले असतील. रिझल्ट कळवाल अपेक्षा. आता निवत असाल. इतर जुन्या पोस्ट वाचून आपला अभिप्राय मिळेलही अपेक्षा. आपण अत्यंत जागरूक आणि विचारी तरुण आहात. आपण राजकारणाकडे अत्यंत डोळस रीतीने पाहता आहात. आपल्यासारख्या तरुणांनी राजकारणात असे लक्ष घालणे हे आमची लोकशाही सशक्त होत असल्याचे लक्षण आहे.

      Delete
  4. इथे तर नमोरूग्णाची खोगीर भरती झालीय

    ReplyDelete
    Replies
    1. संजीवजी, माझी मोदींवर निष्ठा नक्कीच आहे. परंतु त्याचे प्रतिबिंब आपणास माझ्या लेखात दिसले असेल तर उद्धव ठाकरे अत्यंत योग्य रीतीने वागताहेत असे म्हणावे लागेल. आपच्या दिल्ली विधानसभेतील विजयानंतर त्यांनी जी मुक्ताफळं उधळली होती ती आठवा. आज उद्धव ठाकरे काहीसे शांत झालेत. कारण त्यांना वस्तुस्थितीची जाणीव झाली आहे.

      Delete
  5. Replies
    1. चेतनजी, मी भाजपाच्या विचारधारेने प्रेरित आहे हे मी मान्य करतो. याचा अर्थ मी बीजेपीची कायम पाठराखण करेन असा नव्हे. परंतु शिवसेनेचेच काय कोणत्याही स्थानिक पक्षाचे राजकारण देश हिताचे असेल असे आपणास वाटते का ?

      Delete
    2. ka asu shakt nahi. Aani kontahi paksh direct Rashtriy paksh hou shakt nahi. Fakt rashtriy pakshach pahije as mhana mhanje Vaicharik diwal khorich lakshan aahe.

      Mala ek sanga Rashtri pakshanchi Stahnik prashnavr kay bhumika aahe. Belgav prashn aahe, Krishna nadi pani vatap aahe etyadi...

      Delete
    3. चेतनजी , स्थानिक पक्षांनी कोणते स्थानिक प्रश्न तडीस नेले ? राजु शेट्टींसारखा माणुस शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे राजकारण करून स्वतःची पोळी भाजतो, महादेव जानकर जातीच्या नावावर राजकारण करतात , रामदास आठवले दलितांना गाठीला घेतात , कॉंग्रेस मुस्लिमांना गोंजारते अशा लोकांचे राजकारण देश हिताचे असेल असे आपणास वाटते ? वाटत असेल तर खुशाल त्यांचे समर्थन करा. आपण whatsapp वर असाल तर फ्रान्स विषयी सध्या खुप चांगल्या पोस्ट येताहेत. नक्की पहा. विरोध करण खुप सोपं असत. एवढंच लक्षात ठेवा.

      Delete
    4. Saheb aadhi mi je prashan upsthit kelet tyanchi tari uttare dya. Chandrababu aani navin patnaik hya baddal aaple kay vichar aahet tehi sanga.
      Sarsakat Pradeshik paksh as nako mhanryala Lok shahi kalate ha prashn padato. Aani France baddal tar tumhi na bolalelach bar. Tyanchavar purnpane lokashahi sanskar aahet. Aani tumhi tar Pradeshik paksh nako as bolun tya lokashahilach nakartay. kiti he Vidamban. Jay Ho Modi (Andha) bhakt... :D

      Delete
    5. चेतनजी मी माझी मते मी कोणावर लादू इच्छित नाही. तुम्ही माझ्याशी वाद घालत बसण्यापेक्षा स्वतंत्र लेखन करून तुम्हाला हवे त्यांचे समर्थन करू शकता. माझे लेख रोज साधारण चार सहाशे वाचक वाचतात. अनेकजण माझ्या मतांशी सहमत असतात. चार सहा वाचकांशी वाद विवाद करण्यात काय हशील ?

      Delete
    6. Jay ho tumachi Lokshahi. Mala kaltay aata tumhala raag yetoy te. karan tumachyakade majya prashnanchi uttare nahit. Kinva dyayachi ichcha nahi :D.
      Bhakt bana pan andh bhakt nako. Chukila chuki mhana. Dhanyawaad!!!

      Delete
    7. चेतनजी, मला कधीच राग येत नाही.पण एका वाचकाचे समाधान करत बसण्या इतका वेळ माझ्याकडे नाही. तरीही मी प्रत्येक वाचकाचा आदर करतो म्हणुन न चुकता उत्तर देत असतो. पण प्रत्येकाचे समाधान करणे अशक्य असते.

      Delete
    8. Samadhanacha prashnach nahi. Mi fakt kahi prashn ubhe kelele. Durdaivane tumhi tytanchi kahich uttare deu shakla nahit.

      Delete
    9. चेतनजी, १,२,..... अशा क्रमाने इथे आपले नेमके प्रश्न उपस्थित करा. त्या अनुशंगाने मी स्वतंत्र लेख लिहून आपल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन. त्यातून आपले समधान झाले तर आनंद आहे. परंतु दोनचार लेखांवर एवढा अट्टहास करत बसण्यापेक्षा माझ्या इतर लेखांवर ही आपले मत कळावे.

      Delete
    10. Tumachya navin lekhanvar pratikriya dyavishi vatali kinva khatakl tar nakich lihin..

      Delete
    11. कदाचित आपले राजकीय विचार जुळणार नाहीत. पण तरीही तुमची प्रतिक्रिया महत्वाची. मी इतर म्हणजे ललित लेखांविषयी बोलतोय. ललित , सामाजिक लेखांवर आणि कवितांवर सुद्धा आपले विचार मांडलेत तर आनंदच वाटेल .

      Delete