बोटात दहा वीस रुपयाची नोटा अडकवून टाळ्या वाजवत भीक मागणारे तृतीयपंथी सगळ्यांनीच पाहिलेले असतील. काही जणांच्या गलालाही त्यांनी हात लावला असेल. काही जणांचा गलगुच्चा
घेतला असेल. आपण कुटुंब आपल्या सोबत असताना असा काही प्रसंग येऊ नये म्हणून अनेकांनी त्या तृतीयपंथी मंडळींना भीक दिली असेल. त्याविषयी आणि भीक कोणाला द्यावी याविषयी या लेखात.
मी भीक आणि दान हा लेख पोस्ट केला. आणि तात्यासाहेब बापुसाहेब भिसे तात्यासाहेब बापुसाहेब भिसे भिसे, वैभव देवधर अशा काही मित्रांनी तृतीय पंथी भीक मागतात याविषयी आपले मत काय? अशी विचारणा केली काही मित्रांचे फोन सुध्दा आले.पण अशी विचारणा ही होणार याची मला जाणीव होती. अथवा भीक मागणारे तृतीयपंथी हा विषय लेखात घेतल्याशिवाय लेख पूर्ण होणार नाही याची मला जाणीव होती. पण एक लेखात सगळे मांडणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यापुढील रविवारी जी लेख लिहिला त्यात तो विषय सुध्दा घेतला होता.
तृतीयपंथीयांना कोणीही काम देत नाही त्यामुळे भीक मागण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरत नाही. कुठेतरी एखादा तृतीयपंथी नगरसेवक होतो, महापौर होतो, पदवीधर होतो आणि त्याची बातमी होते. पण त्यांना काम मिळत नाही त्यामुळे भीक मागण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. परंतु उद्या आपण त्यांना काम द्यायचे ठरवले तरी कोणतेही श्रम न करता भीक मागून पोट भरण्याची सवय लागलेला हा समाज काम करेल?
तृतीयपंथी व्यक्तींकडे भीक मागण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे मान्य केले तर त्यांच्या भीक मागण्याला विरोध करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी भीक मागण्याला मी विरोध नाही करणार. पण ते ज्यारितीने अंगावर येतात त्याला माझा नक्कीच विरोध आहे. अर्थात तेही माणूस पाहून तसे करतात. मी आजवर एकही तृतीयपंथी व्यक्तीला अथवा अन्य कुणाला भीक घातली नाही. त्यामुळे भीक कोणाला घालावी? हा सर्व विषय मी माझी सत्पात्री दान या पुढल्या लेखात मांडला आहे.
खरंतर योग्य व्यक्तीला दिलेली भीक ही भीक नसतेच मुळी दान असते असे माझे मत आहे.
No comments:
Post a Comment