Wednesday, 15 October 2014

Shiv Sena, BJP, Congress, NCP : उद्धव ठाकरेंचं ढोंग

Add caption
झालं. आज मतदान होतंय. सगळ्याच उमेदवारांच भवितव्य आज मतदान पेटीत बंद होतंय. १९ ला मतमोजणी होईल. त्याची उस्तुकता प्रत्येकाला आहेच. पण युती तुटल्यापासून शेवट पर्यंत भाजपने युती तोडली हा एकाच पाढा उद्धव ठाकरे घोकत राहिले. पण खरंच कोणी तोडली युती ?
माझा कयास तुम्हाला पटत नसेल तर सांगा.

काल खासदार आणि सामनाचे सहसंपादक संजय राउत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. सामनातनं प्रकाशित केली. निवडणूक न लढताही उद्धव ठाकरेंच्या समोर मुख्यमंत्री होण्याचे अनेक मार्ग आहेत हे सांगितलं. एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर उद्धव ठाकरे का नाही होऊ शकणार ? असा मुद्दा मांडला.  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं हि जनतेची इच्छा असल्याचं सांगितलं. पुरावा काय ? काहीच नाही. हे म्हणजे आपणच आपल्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारून घेतल्यासारख झालं. 

गेली पंधरा दिवस भाजपावर चौफेर टिका केल्यानंतर शिवसेनेने हे शेवटचं अस्त्र बाहेर काढलं होतं. अगदी मतदानाच्या पुर्व संध्येला. हेतू एवढाच कि ज्याप्रमाणे भाजपने मोदींना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करून लोकसभेला स्पष्ट बहुमत मिळवलं त्याच प्रमाणे आपण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणुन जाहीर केलं तर जनता शिवसेनेच्या पारड्यातही बहुमत टाकेल. पण जनता एवढी खुळी नाही. हो उद्धव ठाकरे निवडणुकीला सामोरे गेले असते तर त्याचा शिवसेनेला थोडाफार फायदा नक्कीच झाला असता. 

लोकसभेला मोदींवर चोहोबाजूने टिका झाली. भाजपा बहुमतानं सत्तेत आली. त्यामुळे यावेळी विरोधीपक्ष त्यातून काही धडा घेतील असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा भाजपाचा बहुमताने सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झालाय. १०० % नाही तरी ९० टक्के भाजपा बहुमतानं सत्तेत येईल असा माझा अंदाज आहे.  संध्याकाळ पर्यंत स्थिती आणखी निश्चित होईल. कदाचित ती १०० % हि असेल. 

' असो युती तोडायची ' हा शिवसेनेचा निश्चय होता यासाठी अनेक मुद्दे मांडता येतील . मी माझ्या मे महिन्यात लिहिलेल्या Indian Politics : उद्धवा जमिनीवर ये या लेखात असं म्हणालो होतो कि, ' हेच काय महाराष्ट्रातले बहुतेक निकाल भल्या भल्या राजकीय धुरिणांना अचंबित करायला लावणारा होते. महाराष्ट्रात भाजपा आणि मित्रपक्षांना तीसपेक्षा अधिक जागा मिळतील असं कुणालाच वाटत नव्हतं. पण तीसपस्तीस नव्हे तर भाजपा आणि मित्रपक्षांनी चक्क बेचाळीस जागा जिंकल्या. आणि याचं सारं श्रेय केवळ मोदींनाच दयायला हवं. 

हे सगळं उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यायला हवं आणि अधिक जागाच काय वेळ पडलीच तर मुख्यमंत्रीपदही भाजपाला द्यायला हवं. पण महाराष्ट्रात मीच मोठा असा सूर उद्धव ठाकरे लावत बसले आणि आघाडीत बिघाड आणला तर शरद पवार टपून बसलेले आहेतच. ते उद्धव ठाकरेंच्या या अस्मितेला खतपाणीच घालतील. आणि त्यातून काही चुकीचं घडलं तर उद्धवरावांची अवस्था ' आ बैल मुझे मार ' अशी होईल.' 

तिथपासून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं उद्धव ठाकरे सांगत सुटले होते. धुसफूस सुरूच होती. एवढया मोठा विजय मिळाल्या नंतर भाजपाची निम्म्या जागांची मागणी अवास्तव नव्हती. पण भाजपाला निम्म्या जागा देण्यापेक्षा आपण सगळ्या जागा लढवल्या तर आपण बहुमत नक्कीच मिळवू शकतो असा विश्वास उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या सवंगड्यांना ( प्रामुख्यानं संजय राउत ) होता. त्यामुळेच आपण भाजपाची मागणी मान्य करायची नाही आणि त्यांना युती तोडायला भाग पडायचं असा मनसुबा शिवसेनेने आखला होता आणि तो तडीस नेला. 

त्यामुळेच मिशन १५० प्लस हे जिंकण्याच्या जागांचच मिशन होतं. आणि त्यासाठी युती तोडणं हि शिवसेनेची गरज होती. ' युती तुटणार आहे ' हे जनतेला आपण नाही सांगायचं. भाजपाला जनतेसमोर जायला भाग पाडायचं  आणि मग संपूर्ण प्रचारात आपण भाजपाच्या नावानं शिमगा करायचा. हा शिवसेनेचा डाव. 

असो. शिवसेनेने त्यांच्या परीनं खूप प्रयत्न केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच सुप्रिया सुळे आणि आणखी काही इतर काही नेत्यांनी सभेदरम्यान श्रोत्यांशी संवाद साधण्याची मोदींची लकब उचलली. मोदी संसदेच्या पायरीवर नतमस्तक झाले. उद्धव ठाकरेंनी प्रचारसभेपासुन वाकायला सुरवात केली. पण मोदींच्या विरुद्ध प्रत्येक सभेत अत्यंत असभ्य भाषा वापरणाऱ्या उद्धव ठाकरेंचं हे ढोंग जनतेच्या लक्षात येणार नाही का ? 

आता तर काय त्यांनी अनेक नेत्यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाला कारवाई करायला सांगुन आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मोदी पंतप्रधान झाले पण त्यांनी असा शह कुणाला दिला नाही. 

आणि उद्धव ठाकरेंची हि उलटी बोंब ही कामी येणार नाही. 

16 comments:

  1. खरे आहे,यांचे म्हणणे ,जनता मतपेटीच्या माद्यमातून शिवसेनेला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.खूप वाचाळपणा केला "उद्धट " ठाकरेंनी. ..नवरात्रिचे उपवास करणारा अफझल खान पाहिला आहे का? जिथे जाईल तिथे गीता भेट देणारा? निवडून आल्या आल्या गंगामातेची आरती करणारा? नेपालमध्ये गेल्यावर पशुपतिनाथ मंदिरात पूजा करणारा रायगडवर येवून शिवछत्रपतींच्या समाधीसमोर ध्यानस्थ बसणारा अफझल खान? उद्धव ठाकरे आपण हे बोलून चुकला आहात.. काल पर्यंत होते आदरणीय मोदीजी आज अचानक त्यांची तुलना अफजलखानाशी?????? काल काल पर्यंत होते ते विकास पुरुष. आज अचानक झाले महाराष्ट्राचे काळ पुरुष??? काल पर्यंत गोडवे गायले ज्यांचे. आज अचानक कट्टर शत्रू ते आमचे???? मोदींनी, बाळासाहेब , शिवसेने बद्दल काही न बोलता मोठे पणा दाखवला. उद्धवजी तुम्ही मात्र फार खालच्या पातळीवर गेला आहात . कस काय राज्य द्यायचे तुमचे हातात ? पोपट वाघ साप उंदीर यांचे उल्लेख या उद्धव साहेबांच्या भाषणात सतत येतात. यांना हि महाराष्ट्राची निवडणूक आहे म्हणव जंगलाची नाही. आज सामन्यात यांनी सर्व मर्यादा ओलांडत मोदी साहेबांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली


    आहेत त्या ४४ जागा टिकविणे शिवसेनेला अवघड जाणार आहे, प्रचाराची पातळी यांच्या पक्ष प्रमुखामुळे खूप घसरली.जनता यांना आपली जागा दाखवून देयील. ..सेनेला वरिष्ट नेता नाही महणून वायफळ बडबड चालू आहे ,अन्यथा वैयातिक टीका झाली नसती , जनता उतार देईलच भाजप १२२, सेना ६२ , राष्ट्रवादी ४२ ,कॉंग्रेस ३२ मनसे ३० जर १४५ सेना १२५ भाजप मित्र १८ प्रमाणे जागावाटप झाले असते तर चित्र खालीलप्रमाणे दिसले असते सेनाभाजप २२० राष्ट्रवादी ,कॉंग्रेस ५२ मनसे १६

    ReplyDelete
  2. सुजीतजी माझ्या लेख इतकीच तुमची प्रतिक्रियाही सुरेख आहे. आपण स्वतंत्रपणे ब्लॉग लिहू शकाल इतकं चं लिहु लागला आहात. माझ्या सल्ल्याचा जरूर विचार करावा.

    ReplyDelete
  3. शेंडगेसाहेब तुमचे विचार sugar coated गोळी सारखे आहेत.स्वतःला शिवसैनिक म्हणवता आणि त्याच शिवसेनेविषयी गरळ ओकता.मी जास्त लिहिणार नाही पण तुम्हाला व सुजीत भुजबळ यांना एवढाच सल्ला देईन की त्यांनी ह्याच ब्लॉगवर असलेली श्री.आषीश चंदोरकर यांची पोस्ट "माझे मत शिवसेनेला ...आजही उद्याही"वाचावी.तंतोतंत माझे विचार.आणि तुम्हाला समर्पक असं उत्तर त्या लेखामध्ये आहे.

    ReplyDelete
  4. बबनजी प्रतिक्रियेबद्दल आभार. तुम्ही म्हणता ती आशिष चांदोरकरांची पोस्ट मी वाचली आहे. कदाचित माझ्या आधी तुम्ही वाचली असेल. अन्यथा त्या पोस्टला मी दिलेली प्रतिक्रिया तुम्हाला वाचायला मिळाली असती. तुम्ही म्हणता तुमचे विचार ' सुगर कोटेड गोळी ' सारखे आहेत. असतीलही. आपल्यासारख्या निष्ठावंतांच्या ती सहज पचनी पडणार नाही. पण बबनजी सुगर कोटेड गोळी हि अनेक दुर्धर आजारांवरच रामबाण औषध असते हे कायम लक्षात ठेवा. मी शिवसैनिक आहे. निश्चित आहे. पण शिवाजी महाराजांच्या विचारांशी नातं सांगणारा. उद्धव ठाकरे नाव घेतात शिवाजी महाराजांचं आणि करणी मात्र ……………जाऊ दया लिहित नाही. पण मी शिवसेनेतल राजकारण ( समाजकारण नाही ) इतक्या जवळून पाहिलं आहे कि ते सारं इथं लिहिणं शक्य नाही. असो. शिवसैनिक म्हणुन नव्हे पण एक मित्र म्हणुन ब्लॉग नियमित भेटत रहाल हि अपेक्षा.

    ReplyDelete
  5. Are tula bhajapchya pracharache kiti paise miltat. Ase kiti lokana bjp ne kamavar lavle ahe. Bjp mhanje bamana-marvadyancha paksha.

    ReplyDelete
  6. मित्रा ज्या उद्धव ठाकरेंना वडीलधाऱ्यांचा मन कसं राखावं हे कळत नाही. त्यांना शिवाजी महाराजांचं नवा घेण्याचा तरी अधिकार आहे का ? माझ्या ब्लॉग वरच्या सगळ्या पोस्ट वाच. आणि मग मला पुन्हा उत्तर दे.
    आणखी एक माणसं विकत घेऊन युद्ध जिंकता येत नाही. तुला तुझ्या कामाचे किती पैसे मिळतात ? हे मी विचारणार नाही. तुझ्या निष्ठेविषयी मला शंका नाही. परंतु आपण चुकीच्या ठिकाणी निष्ठा दाखवतोय हे तुला आज नाही काही वर्षांनी नक्की कळेल.

    ReplyDelete
  7. BJP LA bahumat milnar . Udhdhaw Thakrenna addal ghadnar.

    ReplyDelete
  8. मित्रा उद्धव ठाकरेंना अद्दल घडो अथवा न घडो. पण भाजपाला बहुमत मिळायला हवं हे खरं. पण ती शक्यता कमी वाटते आहे. भाजपा शिवसेनेला एकत्र यावच लागणार आहे. बघू या काय होतंय ते.

    ReplyDelete
  9. Balasahebanch dikavyapurate nav ghenaryano lok bjp la dhulit milavalyashivay rahnar nahit.jay Balasaheb.

    ReplyDelete
  10. मित्रा असं इतरांवर चिखल फेकुन काही होत नसतं. घोडा मैदान जवळ आलंय. पण तेव्हाही तुमच्यासारखे समर्थक काय म्हणणार आहेत ते आम्हाला ठाऊक आहे. किंवा आजही ते मिडीयावर पहातो आहोत. असो माझ्या इतरही पोस्ट वाच

    ReplyDelete
  11. बहुतांश लोकांना ठाकरे पवार अथवा इतर घराने।।।
    मराठी एक्संघ महाराष्ट्र असली भावनिक अव्हाहने ह्याच्याशी काहोही घेणे नाही
    त्यांना विकासाची हामी देणारा नेता हवा पक्ष हवा
    भावनिक राजकारण बालासाहेब करायचे,पण ते बालासाहेब होते ते युगपुरुष होते
    राज उद्धव ह्यांची ती पात्रता नाही
    मोदी खुप मोठे आहे त्यांचे आई बाप काढून उद्धव ठाकरेंनि सेनेची कबर खोदली आहे

    ReplyDelete
  12. हे प्रत्येकाला कळू लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने आमच्या देशात लोकशाही प्रस्थापित होईल.

    ReplyDelete
  13. आज मोदी काय मिळाले,, आता काय कुणाची गरज? बाळासाहेबांच्या निधनानंतर सेनेला खिंडीत गाठायचे, मातोश्रीचे महत्त्व कमी करायचे आणि वर मोदी म्हणणार बाळासाहेबांच्या स्मृतीला स्मरून, त्यांचं योगदान मानून ‘सेने’वर बोलणार नाही! मोदींची चलाखी इथेच संपत नाही. ते म्हणतात, ‘केंद्रातून मला महाराष्ट्रात मदत करायची आहे तेव्हा इथे मला प्रतिसाद देणारं, साथ देणारं सरकार हवं आहे, म्हणून भाजपला विजयी करा!’ २५ वर्षांचा मित्रपक्ष तुम्हाला तुमचा वाटत नाही? काँग्रेसने जसे गांधी भिंतीवर टांगले तसे बाळासाहेबांना भिंतीवर टांगून तुम्ही सत्ता ओरपणार?

    ReplyDelete
  14. मित्रा प्रतिक्रियेबद्दल आभार. पण रसिक वाचकांनी शक्यतो अशी निनावी प्रतिक्रिया देऊ नये. मोदी एक आशेचा किरण आहेत. भाषेचं, प्रांतवादाच राजकारण आपण बाजूला ठेऊ य. पाच वर्ष त्यांनी पुरेसं काम करून देऊ आणि नाही पटलं तर पुन्हा एखादा दुसरा पर्याय शोधू. पण नेत्यांची भाषा आपण बोलू नये. आपण आपल्या विचारांनी मतं मांडावीत.

    ReplyDelete
  15. विजय सर ,
    शिवसेनेचा भाजपला बिनशर्त पाठिंबा असल्याचे समजते । हेच निवडणुकी आधी म्हणत होते कि आम्ही दिल्लीश्वारापुढे झुकणार नाही करून ...... आणि आता काय झाले आता स्वतः निघाले तिकडे ...... देवा ........ अखेर अफझल खाना समोर झुकालेच आणि खानाला अपेक्षित घडले ...... वाघा चा उंदीर झाला ! ;)

    ReplyDelete
  16. सुजित या नंतर अनेक पोस्ट. लिहिल्या आहेत त्या तुझ्यापर्यंत पोहचल्या नाहीत का ? असो तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेला काय म्हणायचं आहे ते म्हणू दे. पण राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ येऊ नये एवढ मात्र खरं.

    ReplyDelete