किती दुर्दैव आहे पहा ! इकडे सोनिया राहुलला देशाच्या राष्ट्रीय भाषेत बोलायचं म्हटलं तरी भाषण कागदावर लिहून आणावं लागतं. आणि तिकडे मोदी अमेरिकन सिनेटमध्ये अखंड एक तास इंग्रजीत प्रभावीपणे विचार मांडतात. इकडे राहुल गांधींची डिग्री काय ? सोनिया गांधींची डिग्री काय ? लालूची डिग्री काय ? हा प्रश्न कोणालाच पडत नाही. पण ज्यांना नीट हिंदीतही बोलता येत नाही तीच मंडळी मोदींच्या शैक्षणिक पात्रतेविषयी प्रश्न उपस्थित करणार ? वा रे विरोधक !
परवा गावाकडे असाच चावडीवर उभा होतो. एक वृध्द गृहस्थ सनदी अधिकारी या नात्यानं कोणाच्या तरी छायांकित प्रतिवर सही शिक्के मारत होते. तिथेच तोंडात माव्याचा तोबरा भरलेला तरुण उभा होता. मोदींचा पाच देशाचा दौरा निश्चित झाला होता. आणि चावडीवरच्या त्या दोघांमध्ये संवाद चालला होता -
" नाना मोदी निघाला परत फिरायला " , तो तरुण.
" त्याला दुसरं काय काम आहे. त्याला फिरायला पैसे नव्हते म्हणून तर पुन्हा पेट्रोलचे भाव आणि सेवाकर वाढवलाय ना. " , ते वयस्कर गृहस्थ.
काल संजय राउत या शिवसेनेतल्या टवाळाची मुक्ताफळं ऐकल्यापासुन तो गृहस्थ आमच्या गावच्या चावडीवर उभा आहे असे मला वाटू लागले आहे.
चावडीवरचे दोघे काय आणि संजय राउत यांच्यासारखे बोलघेवडे नेते काय ? आमच्या देशातल्या नव्वद टक्के जनतेला जिथं राष्ट्रीय राजकारण कळतं नाही. तिथं आंतरराष्ट्रीय राजकारण कोठून कळणार ? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण सोडा आमच्या जनतेला राजकारण म्हणजे काय हेच नेमकं कळत नाही. कारण आमच्या दृष्टीनं राजकारण म्हणजे लालूनं मोदींना कसा धोबीपछाड दिला ....... उद्धव ठाकरेंनी मोदींच्या विरोधात कशी मुक्ताफळं उधळी ........... शरद पवारांनी मोदींना कसा चिमटा काढला हे आणि एवढंच !
तांदूळ दोन रुपये किलो दराने देणाऱ्याला मतदान करणारी आमची जनता , आरक्षण .....आरक्षण करत छाती बडवत सरकारच्या नावाने शिमगा करणारा समाज, मतागणिक हजार पाचशे देईल त्याला मत देणारा आमचा मतदार. कसं होणार आमच्या देशाचं ?
मोदींच्या भाषणात किती वेळा टाळ्या पडल्या , अमेरिकन सिनेटच्या सदस्यांनी मोदींना किती वेळा उभं राहून अभिवादन केलं या गोष्टी फारशा महत्वाच्या नाहीतच मुळी. पण जगात सर्वोच्चस्थानी असलेल्या अमेरिकेच्या व्यासपिठावर उभं राहून दहशत वादाच्या विरोधात बोलणं हे काही कुणा येडयागबाळ्याचं काम नाही. त्यासाठी खऱ्या अर्थाने छपन्न इंचाची छातीच असावी लागते.
असो. या देशातलं राजकारण आणि समाजकारण पार रसातळाला गेलं होतं. पण मोदींच्या रुपानं एक आशेचा किरण दिसू लागलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं सुराज्य येण्याचे दिवस जवळ आले आहेत असं दिसू लागलंय. गरज आहे ती प्रत्येकानं मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभं रहाण्याची.
Nice one Article about Modi
ReplyDeleteदत्ताजी अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. विरोधकांच्या भुमिकेमुळे आपल्या देशातले राजकारण मात्र किती हीन दर्जाचे आहे हे लक्षात येते. विरोधकांच्या अप्पलपोटी भूमिकेला तोंड देत देश विकास पथावर नेणे फार कठीण आहे. पण मोदी ते काम नक्की करतील असा विश्वास आहे.
DeleteMadam, superb write up. We should be proud and support such an exemplary leader.
ReplyDeleteThanks
प्रल्हादजी आपण ' रिमझिम पाऊस 'पहिल्यांदाच भेट दिलेली दिसते. ' रिमझिम पाऊस ' वर आपले मनापासून स्वागत. तुमच्या माझ्यासारखे अनेक जन मोदींच्या पाठीशी आहेतच. गरज आहे ती विरोधकांना या प्रवाहात आणण्याची.
Deleteखूपच सुंंदर
ReplyDeleteआभार अनामिक मित्रा.
Deleteजे देशाच खरोखर भल व्हाव म्हणून झटतात त्यांच्या पाठीशी एकजूटीने उभे राहूया
Deleteवागलेसाहेब अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.
Deleteआपण टेलेप्राॅम्पटर बद्दल ऐकलय का?
ReplyDeleteथोडं बहुत. पण नक्की नाही सांगता यायचं. पण आपल्याला नेमकं काय म्हणायचंय प्रविणजी ?
Deleteआजचं आपलं लेखन हे देशातल्या त्रयस्थ नागरीकाचं मत आहे.मोदींचं हे कर्तुत्व कोणी नाराजाने नाकारलं तर कमी होणार नाही.उलट असे प्रसंग, आणि घटना हीच मोदींची स्थायी मालमत्ता आहे. आणि कुणालाही ती हिरावुन घेता येणार नाही हे नक्की.
ReplyDeleteछान लिहीले आहे!!
प्रमोद सर आज खूप दिवसानंतर आपली प्रतिक्रिया मिळाली. आपल्या सारख्या पितृतुल्य व्यक्तीची कौतुकाची थाप हीच माझ्या लिखाणाची प्रेरणा. मनापासून आभार.
Deleteनमस्कार आपला लेख मनापासून आवडला
ReplyDeleteमनापासून आभार वकीलसाहेब. आपण माझ्या ब्लॉगला पहिल्यांदाच भेट दिलेली दिसते. यापुढे आपण नियमितपणे मार्गदर्शन करावे हि अपेक्षा.
Deleteजबरदस्त साहेब
Deleteआभार मित्रा.
Delete
ReplyDeleteभारताची कोणतीही राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही केंद्रशासनाची राजभाषा आहे. तरीही जयललिता, ममता, बादल, चंद्राबाबू यांना हिंदी बोलता किंवा वाचता येतं का? पंतप्रधान् मोदींनीही टेलिप्रॉम्प्टरची मदत घेऊनच अमेरिकन काँग्रेसमधलं भाषण केलं होतं. - वाचलं होतं.
http://www.rediff.com/news/report/the-teleprompters-behind-modi-magic-on-capitol-hill/20160609.htm
पंतप्रधानांच्या डिग्रीबद्दलच्या अनेक आर टी आय अर्जांना पानं पुसली गेली नसती तर ही वेळ आली नसती. तसंही तशी मागणी करणार्यांतले एक अरविंद केजरीवाल आहेत. त्यांना हिंदी बोलता येतं आणि त्यांच्याकडे आय आय टीची डिग्रीही आहे.
दहशतवाद आणि ५६ इंच छातीबद्दल :
२००५ साली त्यावे़ळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अमेरिकन संसदेसमोर दिलेल्या भाषणातून : Our commitment to democratic values and practices means there are many concerns and perceptions that we share with the United States. The most important common concern is the threat of terrorism. Democracy can only thrive in open and free societies. But open societies like ours are today threatened more than ever before by the rise of terrorism.
The very openness of our societies makes us more vulnerable, and yet we must deal effectively with the threat without losing the openness we so value and cherish. India and the United States have both suffered grievously from terrorism and we must make common cause against it. We know that those who resort to terror often clothe it in the garb of real or imaginary grievances. We must categorically affirm that no grievance can justify resort to terror.
सरकारी बातम्यांमधून गेल्या दहा वर्षांत पहिल्याच भारतीय पंतप्रधानांचं अमेरिकेत संसदेसमोरचं भाषण असं पुन्हापुन्हा का सांगितलं गेलं? आपल्या भाषणात गांधी, आंबेडकरांनंतर पं मोदींनी वाजपेयींचा उल्लेख केला. त्यांना आपल्या पूर्वसूरींचं एवढं वावडं का? २००८ च्या भारत -अमेरिका नागरी अणुकराराचा उल्लेख करतानाही मनमोहन सिंग यांचा अनुल्लेख का?
भारतजी, आपण कॉंग्रेसची तळी उचलून धरता आहात. आनंद आहे. काँग्रेसन गेल्या साठ वर्षात देशाला गरिबी आणि भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काय दिलं. कॉंग्रेसन खरच विकास केला असता तर आज साठ वर्षानंतरही लातूरला ट्रेनन पाणी पुरवण्याची वेळ आली नसती.
Deleteआपण म्हणता तसे टेलीप्रोम्पटरचा वापर करून मोदींनी भाषण केले असेलही पण तसे जाणवले नाही. नाही तर सोनिया आणि राहुल हिंदीतला भाषण वाचतानाही श्रोत्यांकडे कमी आणि हातातल्या कागदाकडे अधिक पहात असतात.
हिंदी हि आमची नसून केंद्राची राष्ट्रभाषा आहे असे आपले म्हणणे आहे. किती दुर्दैवाची गोष्ट आहे हि.
असो. आपण मनमोहनसिंग यांच्या अमेरिकन संसदेतल्या भाषणाचा उल्लेख केला आहे. काय झाले त्याचे ? दहा वर्षात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर त्याचे कोणते पडसाद उमटलेले आपणास दिसले. वाघाच्या डरकाळीत आणि कोल्ह्याच्या कोल्हेकुईत जो फरक होता तोच फरक मोदींच्या आणि मनमोहनसिंग यांच्या भाषणात होता भारतजी.
असे असूनही आपणास मोदींच्या नेतृत्वाची संभावना करायची असेल तर माझी काहीच हरकत नाही.
कपिल मिश्रा सारख्या कॉंग्रेसच्या आघाडीच्या नेत्याने काय ट्वीट केले आहे हे आपणास माहित असेलच. मोदींच्या भाषणावर कपिल मिश्रांसारखा कॉंग्रेसचा आघाडीचा नेता इतके हीन ट्वीट करीत असेल तर आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने मोदींच्या भाषणावर अशी आगपाखड केल्याने काय फरक पडणार आहे ?
१. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही . केंद्रशासनाची राजभाषा आहे. हे माझे म्हणणे नाही, तर फॅक्ट आहे. कृपया तपासून पहा.
Delete२. आदरणीय पं.नरेंद्र मोदी चांगले वक्ते आहेत याबाबत दुमत नाहीच.
३. मनमोहन सिंग यांनी घडवून आणलेल्या अमेरिका भारत नागरी अणुकराराच्या जोरावरच अनेक देशांकडून अणुइंधन मिळवणे शक्य झाले आहे.
विज्ञानाच्या अनेक क्षेत्रांतल्या भारताच्या भरारीचे : मंगलयान ते मिसाइल टेक्नॉलॉजी - श्रेय नेहरूंपासूनच्या काँग्रेस नेत्यांच्या दूरदृष्टीला व बैज्ञानिक दृष्टिकोनालाच आहे.
"वाघाच्या डरकाळीत आणि कोल्ह्याच्या कोल्हेकुईत जो फरक होता तोच फरक मोदींच्या आणि मनमोहनसिंग यांच्या भाषणात होता " पठाणकोट आणि गुरुदासपूरबद्दल बोलताय का? बरोबर.
सर आपले मत दुसर्यावर लादणे चुकीचे आहे. त्यांना जर काँग्रेस चे मत पटत असेल तर त्यावर इतर कुणाला हरकत असण्याचे कारण नाही. ४४ खासदार व पडलेल्या उमेदवारांची मते पाहता तीही एक विचारधारा आहे. सोनिया गांधी कागद धरुन वाचतात हे माझ्या प्रमाणे सर्वांना माहीती आहे. परंतू पंतप्रधान मोदींनी टेलेप्राॅम्पटर वापरला हे NYT ने जगाला सांगितले परंतु आपण म्हणता की वापरला असेलही समजले नाही म्हणजे तुम्ही काही कारणाने डोळेझाक करता. कारण तुम्हाला माहिती आहेच. टेलेप्राॅम्पटरला माझा किंवा कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही कारण आंतरराष्ट्रीय संबंध एका चुकीच्या वाक्य रचनेने बिघडू शकतात. मात्र मोठेपणा हे मान्य करण्यात आहे. आपले विचार योग्य व इतर शुद्र ही मनोवृत्ती वाईट आहे. याचमुळे मी शहाणा इतरांना काय कळते? करा त्याचे शोषण असे घडते.
Deleteमी भारताच्या विकासात पक्षापेक्षा जास्त रस घेतो. व आपणास सांगू इच्छितो की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञ (तुम्ही मानत नसला तरी जग मानते व त्यांचे व्याख्यान आयोजित करते) आहेत व त्यांच्या दूरदृष्टीची कदर पंतप्रधान मोदीही करतात.
मनमोहनसिंगांच्या भाषणास कोल्हेकुई म्हणणे हास्यास्पद आहे व आपला पूर्वग्रहदूषितपणा दिसून येतो. त्यांचे आजही पंजाब विद्यापीठात लेक्चर असतात. त्यांचा बायोडाटा कृपया एकदा पहा. चांगल्या गोष्टींना चांगले म्हणण्याची आमच्याकडे प्रथा आहे.
Deleteनिश्चितच पंतप्रधान मोदीही भारताचा त्यांच्या धोरणानुसार विकास करतीलच. त्यांनाही वेळ हवा. जर ६० वर्षात अजिबात विकास नाही असे म्हणायचे असेल, तर मी आत्ता मोबाईल वरुन (तंत्रज्ञान) वाचून(शिक्षण) आपणास माहिती न देता पत्र लिहायला हवे होते.
प्रविणजी माफ करा. मला मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्वास कमीपणा आणण्याचा माझा हेतू नव्हता. आपण काय म्हणतो यापेक्षाही आपण आपले म्हणणे कसे मांडतो हे अधिक महत्वाचे असते. तो फरक स्पष्ट करण्यासाठी मी त्या उपमा दिल्या.
Deleteप्रविणजी धनुष्यातून सुटलेला बाण कुठेतरी जाऊन लागणारच कि. आज राष्ट्रीय बँकाचे ४ लाख कोटींचे कर्ज बुडीत निघांर असल्याची बातमी वाचली. याला जबाबदार कोण ? काँग्रेसन विकासापेक्षा भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम प्राधान्याने केले.
साठ वर्षांनतरही आम्हाला पिण्यासाठी , शेतीसाठी आणि उद्योगासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसेल तर त्याला विकास म्हणायचे का ?
मनमोहनसिंग यांच्या विषयी मला पूर्ण आदर आहे. पण गांधी परिवाराने त्यांचे कळसूत्री बाहुले केले होते याचेच वाईट वाटते.
आणखी एक माझ्याही दृष्टीने केवळ देशाचे सार्वभौमत्व आणि विकास महत्वाचा आहे. तो विकास काँग्रेस करतेय कि भाजपा याला काहीच महत्व नाही. पण साठ वर्षाची गोळाबेरीज सांगायची सोडून विरोधक मोदींच्या दोन वर्षाच्या कामाचा हिशोब मागतात , मोदींना आणि त्यांच्या सरकारला कुचकामी ठरवतात हे न पटण्यासारखे आहे. जनतेला हे समजावून सांगावे म्हणून माझा आटापिटा.
Deleteएखाद्या देशाचं नेतृत्व करण्यासाठी व्यक्ती फक्त हुशार आणि ञानी असून चालत नसते तर ती विचारधारेने मजबूत आणि पक्की असावी लागते
Deleteती कधी सर्वसामान्यांसारखी मानसन्मानापुढे लाचार होत नसतात
मनमोहन सिंग ही व्यक्ती हुशार पण त्यांनी पदासाठी लाचारी पत्करली आणि त्याची फळं पूर्ण देशाला भोगावी लागली
गुरुदासजी, आपले म्हणणे शतप्रतिशत खरे आहे. मनमोहनसिंग लायक नव्हते असे मला कधीच म्हणायचे नाही. पण काँग्रेसी रिमोटने त्यांचे पार बाहुले बनवून टाकले होते. आणि मनमोहनसिंग कशाला मोदींनी सुध्दा वयाच्या पंचाहत्तरी नंतर देशाचे नेतृत्व करू नये असे माझे प्रामाणिक मत आहे.
Deleteअप्रतिम लेख.वर्षानुवर्षे गलिच्छ राजकारण खेळणाऱ्यां ना मोदींची प्रगल्भता काय कळणार? त्यांची कींवच केलेली बरी
ReplyDeleteआभिप्रयाबद्दल आपले मनापासून आभार उल्काजी. भारत यांना दिलेले उत्तर पहा. अशी मंडळी असणारच. तुम्ही म्हणता तसे ता लोकांची किव करावी तेवढी थोडी.
Deleteभारतजी प्रविण यांना दिलेले दोन्ही अभिप्राय वाचा. आपले समाधान होईल हि अपेक्षा. न झाल्यास आग्रह नाही. आपल्या मतांचाही मी आदर करतो.
Deleteमोदी सारखे नेतृत्व सतत राहो.त्या साठी मतदान सक्तीचे असणे गरजेचे आहे.
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल आभार सुर्यकांतजी. विरोधकांना आणि मतदानाची सुट्टी मौजमजेसाठी हवी असते त्यांना तेही नको आहे.
Deleteअगदी बरोबर विजय जी... दुर्दैव हेच कि विदेशात मोदींना वर्ल्ड लीडर म्हणून बघितल्या जाते तर भारतात त्यांच्या शिक्षणावरणं वाद होतात, 60 वर्ष लॉलीपॉप चे राजकारण बघितलेल्या जनतेला काय कळणार NSG चं महत्व..
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून आभार प्रसादजी. कॉंग्रेसला साठ वर्ष मिळाली. मोदींना दोन पूर्ण टर्म मिळाव्यात. एवढीच इच्छा.
DeleteJanata Party 1977-80, Janata Dal + samajawadi Janata party 1989-91, Janata Dal United 1996-98, BJP 1998-2004.
Delete13 years of non-congress governement from 1952-2014. Just noting the facts.
भारतजी ठीक आहे. २०१६ - १६४७ म्हणजे ६९ वर्षे. आता ६९ - १३ म्हणजे. ५६ वर्ष काँग्रेसचीच सत्ता होती ना. मी ढोबळपणे साठ म्हणालो होतो. तुम्ही फारच मनावर घेता बुवा. मोदींना तर फक्त दोन अखंड टर्म म्हणजे १० वर्षे सत्ता मिळावी एवढीच माझी अपेक्षा. आणि आपल्यासारख्या मंडळींनी येत्या पंचवार्षिकला त्यांची सत्ता हिसकावून कॉंग्रेसच्या ताब्यात दिली तरी मला काय फरक पडणार आहे. चालू द्या तुमच्या हिशोबाने.
Delete२०१४ ते २०१६ ही मोदींची ना. ती काँग्रेसला का देताय? पहिल्या सार्वत्रिक निवडणुका १९५१-५२ मध्ये झाल्या. म्हणून १९५२ पासून मोजलेय. १९५२-२०१४ : ६४ वर्षे -१३ = ५१ वर्षे
Deleteकाँग्रेसने ६० वर्षांत काय ही हे वाक्य भक्तगण पाठ केल्यासारखे म्हणत असतात, त्याचा कंटाळा आलाय.जनतेने अन्य पक्षांनाही संधी दिली होती. एवढंच सांगायचंय.
मोदीसरकारची दोन वर्षे पूर्ण झाली त्याचा सोहळा पाहताना इंडिया शायनिंग आणि तळमळे अवघी प्रजा - उत्सवी मग्न राजा हे आठवलं.
असो.
भरत
ठीक आहे भरतजी. आपण ५० वर्षच धरू. म्हणजे कमी नाही. काँग्रेस पन्नास वर्ष सत्तेत असूनही सिंचनासाठी सोडा साधे पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देऊ शकले नाही. शेतकरी आत्महत्या करतात म्हणून आज आपण सत्ताधारी पक्षाला बोल लावतोय. पाच वर्ष केंद्रात कृषिमंत्री असलेले शरद पवार त्यासाठी शिमगा करतात. भोळी भाबडी जनतासुद्धा फसते. पण हि सगळे आपलेच कर्तुत्व आहे हे ना ५० वर्ष सत्तेत राहिलेली सत्ताधारी मान्य करतात ना ते जनतेच्या लक्षात येते.
Deleteखूप लिहिता येईल भरतजी. पण पुरे.
मोदिंचा अमेरिकन कॉग्रेंस मधील भाषण ऐकले.. एक भारतीय म्हणुन अभिमानाने उर भरुन आले.. पण भाषण ऐकता ऐकता मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.. त्यातील मुख्य प्रश्न
ReplyDelete१) अमेरिकेचे भारतावरील प्रेम अचानक कसे वाढले?
२) ज्या मोदिंचा अमेरिकने व्हिसा नाकारला पण अचानक त्यांचा इतका सन्मान कसा?
पहिल्या प्रश्नावर विचार करता लक्षात आले सध्या चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा प्रतीस्पर्धी आहे. जर चीनला शह द्यायचा असेल तर अमेरिकेला भारता शिवाय दुसरा पर्याय सध्यातरी नाहि. दुसरे असे की भारत हा तरुंणाचा देश आहे.. तसेच भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे अमेरिकेला निर्यात वाढवायची असेल तर भारता शिवाय पर्याय नाहि. या शिवाय अमेरिकेतील भारतीयांची संख्या खुप मोठी आहे. याचाच अर्थ भारत हा अमेरिकेला उत्तम मनुष्यबळ पुरवतो. राजकीय व सामाजिक दृष्टीने भारता सोबत चांगला व्यवहार ठेवने अमेरिकेला अपरिहार्य बनले आहे. त्यामुळेच नाइलाजास्तव अमेरिकेचे भारता वरिल प्रेम..
मोदिंच्या सन्मानाविषयी विचार करता लक्षात येईल कि मोदिंनी असे काय केले कि त्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचा सन्मान व्हावा. मोदि पुर्ण बहुमत असलेले सरकार चालवतात त्यामुळेच त्यांना कोणत्याही संबंधित बील पास करण्यास लोकसभेत अडचण नाहि. जे कायदे कॉग्रेंसच्या कार्यकाळात बीजेपी अमेरिका धार्जनी आहेत असे संबोधत आज त्याच कायद्याचा मोदि अमेरिका संबंध सुधारण्यास वापर करत आहेत. हा सर्वात मोठा अमेरिकेचा हेतु, याशिवाय वरील हेतू आहेतच.
पण मोठा प्रश्न असा कि अमेरिका खरोखरच भारतावर इतके प्रेम करते तर हे प्रेम टिकणारे आहे का. जर असेल तर पाकिस्तान विषयीची अमेरिकेची भुमीका अमेरिकेने स्पष्ट करावी. नाहितर या पोकळ जय जय कारत नेहरुंची चीन संबंधित विदेशी नीतीसारखी गफलत झाली नाही तर मिळवले.
जय हिंद
मिलिंदजी इतक्या सविस्तर आणि अभ्यासपूर्ण अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. त्यावेळीं अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारणे हे कदाचित राजकीय कट कारस्थानही असू शकते. परंतु मोदींच्या नेतृत्वाचे पैलू आपले विरोधक सोडले तर साऱ्या जगाने ओळखले आहे.
Deleteदुसरे आपण बिल पास करण्याविषयी लिहिले आहे. मिलिंदजी आपल्याकडे जशी लोकसभा असते तशीच राज्यसभाही असते. कोणतेही बिल दोन्ही सभागृहात पास होणे गरजेचे असते. त्यामुळेच निव्वळ लोकसभेत बहुमत असून भागात नाही. राज्यसभेत विरोधी पक्षाचे बहुमत असल्यामुळे तयंची मनधरणी करावीच लागते. त्यामुळेच काही विधेयकासंदर्भात मोदी सरकारला अध्यादेश काढावे लागले आहेत.
असो. मोदी अत्यंत चांगल्या रितीने राज्यकारभार करीत आहेत. त्यामुळेच भारत यापुढे प्रगतीपथावर राहील असा विश्वास बाळगू या.