Sunday, 8 November 2015

लोकशाहीची फसवणूक


ज्या बिहारच्या निवडणुकीची सगळेजण आतुरतेने वाट पहात होते, ती बिहारची निवडणूक पार पडली. दुसऱ्याच्या दुखातच आपलं सुख शोधणं हि भारतीय संस्कृतीच आहे याची प्रचीती यावी तसं शिवसेनेच्या संजय राउतांनी आनंदोस्त्व साजरा करत भाजपाला चिमटा काढला. म्हणाले ,
" महाराष्ट्रात आत्ता निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातहि बिहारसारखेच चित्र पहायला मिळेल. " व्वा ! काय मित्र आहे.

भाजपाच्या पराभवाचे अनेक अर्थ काढले जातील. कुणी म्हणेल हा मोदींचा पराभव. कोणी म्हणेल हा मोदींच्या धोरणाचा पराभव. कोणी म्हणेल अमित शहांची राजकीय खेळी चुकली.

लालू म्हणतील, " हा बिहारच्या जनतेचा विजय आहे. "         

राहुल गांधी म्हणतील, " हा लोकशाहीचा विजय आहे. "

पण मला वाटतं हा लोकशाहीचा विजय नसुन लोकशाहीची फसवणूक आहे.

स्वतःला  राष्ट्रीय पक्ष म्हणवणाऱ्या कॉंग्रेसने केवळ भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी दुय्यम नव्हे तर जीतानराम मांझीसारख्या तळागाळातल्या नेत्यासारखी अगदी पडेल भुमिका घ्यावी हा कॉंग्रेसचा पराभव नाही का ? पण भाजपा सत्तेपासून दुर आहे ना.  मग हे खुष.    

खरंतर दिल्लीतल्या घडामोडी पाहून बिहारची जनता काही बोध घेईल असे मला वाटत होते. परंतु आमची लोकशाही अशीच आहे. ती जातपात पहाते, ती धर्म पहाते, ती प्रांत पहाते, मतासाठी दिलेल्या आश्वासनात ती स्वतःचा स्वार्थ शोधते. पण ती देशाच्या सर्वांगीण विकासाचा विचार कधीच करत नाही.        

पहा ना ! केवळ व्यक्तिगत विरोध म्हणुन आणि आपल्याला डोईजड होईल असं कुणीतरी पुढ जातंय हे पाहून नितीश कुमारांनी मोदींना विरोध दाखवत भाजपापासून फारकत घेतली. आणि आपले कट्टर विरोधक असलेल्या लालूंच्या गळ्यात गळा घातला. कशासाठी ? बिहारच्या जनतेच्या कल्याणासाठी ? एकेकाळी नितीशकुमारांवर तोंडसुख घेणारे लालू आज त्यांचे गोडवे गाताहेत. कशासाठी ? बिहारच्या जनतेच्या हितासाठी ? छे ! यांना तर फक्त सत्ता हवी आहे.

कल्याण डोंबिवली एवढी गलिच्छ नगरपालिका मी दुसरी पाहिली नाही. पण तरीही तिथे वर्षानुवर्ष सत्तेत असणारी शिवसेना सर्वाधिक जागा मिळवते. दिल्लीतल्या जनतेला केवळ ' बिजली हाफ , पाणी माफ ' चं गजर दाखवत केजरीवाल एकहाती सत्ता मिळवतात.     

भाजपाच्या पराभवाचे कारण त्यांच्या कर्तृत्वात शोधण्यापेक्षा सगळे वैरभाव विसरून राजकीय शहाणपण दाखवत नितीश लालूच्या अभद्र युतीत युतीत शोधावे लागेल. सत्तेसाठी एकत्र आलेले नितीश लालू आणि भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी त्यांच्या पायाशी लोळण घेणारी कॉंग्रेस हे खरं भाजपाच्या पराभवाच कारण आहे. त्याच बरोबर आपणच खरे किंगमेकर हे दाखवून देण्यासाठी कधीकाळी केजरीवालचा रथ हाकणारी आणि आता भाजपाचे पाय ओढणारी मिडियासुद्धा भाजपाच्या पराभवाला कारणीभूत आहे. 

या सगळ्यामुळे सत्याचाच विजय होतो या निष्ठेला तडा जातो. अनेक द्रुष्ट शक्ती एकत्र आल्या तर त्या चांगुलपणाचा पराभव करू शकतात हे दिसून आले. उद्या पश्चिम बंगाल आहे, उत्तर पद्रेश आहे असेच चालत राहिले तर अवघड आहे.

आपले भले कशात आहे हे आमच्या लोकशाहीला कधी कळणार ?      



     

12 comments:

  1. हे पहा विरोधक एकत्र आले म्हणून घाबरायचे नसते आणि तरी सुधा भाजपने खूप चुका केल्या आहेत । गो मांस तसेच आरक्षण ह्या विषयावर किती गोंधळ घातला भाजपने …. .तसेच जर सुशील कुमार मोदी ला मुख्यमंत्री चा उमेदवार केला असता तर आज असे दिवस आले नसते

    ReplyDelete
    Replies
    1. सुजित , घाब्र्त्य कोण ? ' थ्री इडियट ' मधला राजु रस्तोगीचा डायलॉग आठवतोय. ' तिसरे मालेसे कुदकर हाथ पाव तुडवाकर ये अॅटिट्यूड लाया है . और आप कहते है ये अॅटिट्यूड छोड दु. नही छोड सकता सर. आप आपनी नौकरी रख लीजिये मै अपना अॅटिट्यूड रख लेता हुँ. " अगदी तसंच 2 वरून दोनशे झालेत ते लू नितीश सारख्या बाजार बुनग्यांची साथ न घेता. सुजीतजी या लोकांनी अटलजींच्याही नाकी नऊ आणले होते. प्रश्न मोदींच्या अथवा बीजेपीच्या पराभवाचा नाही. केवळ मोदी द्वेषापोटी भिन्न विचारसरणीच्या पक्षांनी गळ्यात गळे घालण्याचा आणि जनतेनं त्याला भूलण्याचा आहे.

      Delete
  2. Kiti Bhakti karnar. Aani dar veli shiv senela dosh denyapeksha BJP chya chukahi dakhava.
    Tumhala mahiti nasel tar KDMC madhe BJP hi sene barobar sattet hoti. mhanje KDMC madhe janatene donhi Galich Rajakarnyana parat nivadun dile.

    Baki soda did varshat kontya changalya goshti jhalyat te tari sanag ekada.

    ReplyDelete
  3. चेतनजी, आपण दाखवून दया ना बीजेपीच्या चुका.

    ReplyDelete
  4. Ek kami vyakti shikshit hya deshachi HRD minister aahe. Vinod Tawade hyanchi BE degree nakki kasali aahe he tar jag jahir aahech. Chiiki Prakaran ahe. Dalinche chade bhav aahet. International market madhe Petrol bhav 1/3 var aalet tari Bharatat jaise the.
    Pardeshat jaun Modinche Virodhakana vait bolane. Swachata abhiyanach failure. Var service tax 1 varshat 2 vel vadhavala. Tyamule mahagai kashi vadhate he vegal sanagayachi garaj nahi. Bhrashtachar kami kel as mantatat pan tyach ek hi udhaharan nahi.

    Aani ho KDMC chi vat Shiv Seneberobar koni lavali hyuach uttar den talalat tumhi.

    ReplyDelete
    Replies
    1. चेतनजी, पण जे लिहिलेत ती विरोधकांच्या तोंडुन अथवा दृश्य माध्यमातून ऐकीव माहितीवर आधारित आहे. यात आपली विचारसरणी दिसून येत नाही. तावडेंची डिग्री तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहिली असेल पण मी पाहिलेली नाही . त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. पण बिहारच्या नववी झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या तुलनेत ते बरे नाही का ? आणि केडीएमसी ची वाट कोणी लावली या प्रश्नाचे उत्तर मी काय द्यावे ? अहो , मुंबई अथवा उपनगरात शिवसेनेचेच अधिपत्य आहे. हो त्या पापात भाजपा भागीदार आहे हे मी नाकारत नाही. पण आज महाराष्ट्रच्या भल्या बुर्याचे खापर आपण भाजपाच्याच माथ्यावर फोडणार आहोत ना ?

      Delete
    2. Vaaah. Kay Uttam Pratikriya aahe. Dusaryanchi mahiti Aikiv aani tumachi Satya mahiti. tumachya Vinod tawadeni hi he manya kelay ki tyani Degree kuthun ghetali te. Aani bahutek international petrol rate padalet he pan bahutek Media ne pasaravlay. Tumachya Soyiche mudde far chhan lihita. Itar mudyana bagal deta
      Dusara Muda . Jar BJP hi KDMC chya karbharat Bhagidar aahe tar mag tumhi shivya Shiv Senelach ka detay. BJP virudh ka nahi kahi lihit.

      Delete
    3. आज तीन प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि त्या तुमच्याच असतील अशी खात्री होती. चेतनजी मी माझी मते मी कोणावर लादू इच्छित नाही. तुम्ही माझ्याशी वाद घालत बसण्यापेक्षा स्वतंत्र लेखन करून तुम्हाला हवे त्यांचे समर्थन करू शकता. अगदी परवा पाकिस्तानात जाऊन भारत विरोधी वक्तव्य करणाऱ्या अय्यांगर आणि सलमान खुर्शिदचे हि समर्थन करू शकता.

      Delete
    4. ha ha ha. Tumhala koni sangital ki Congress Samarthak aahe. Murkh lokanch samrthan mi kashala karu?
      aani punha ekda majhya shankanch mudedesud uttar denyat tumhi napas jhalat.
      Tumhi lihita changla pan ekach pakshach samrthan karu naka. Lihitana aapn tathasthpane lihilat tar khup changal hoil. Baki tumachi ichachha. Dhanyawad!!!

      Delete
    5. चेतनजी, माझे लिखाण आपल्या पसंतीस उतरले एवढे माझ्यासाठी पुरेसे आहे. मी आपणास कॉंग्रेस समर्थक म्हणालो नाही.स्वतंत्र लेखन करून तुम्हाला हवे त्यांचे समर्थन करू शकता असे म्हणालोय. माझी मते आपण स्वीकारावीत असं माझा आग्रह नाही. पण माझ्या लिखाणावर आपले नियमित मत मला गरजेचे वाटते. कृपया इतरही लेखांवर , कवितांवर आपले मत कळावे.

      Delete
    6. Nakkich navin lekhavar majh mat sangen.

      Delete
    7. मनापासून आभार
      .

      Delete