समाज माध्यमांवर नेमके काय लिहावे असा प्रश्न मला कधीच पडला नाही. परंतु विरोधकांच्या विरोधात लिहिले की मोदी समर्थक ( अंधभक्त नव्हे ) त्या पोस्ट वर गर्दी करतात. आणि विरोधकांचे समर्थ ( नमोरुग्ण नव्हे )
विरोध करण्यासाठी त्या पोस्ट वर येतात. परंतु मी काय माझ्यासारखे अनेक लेखक केवळ कोणावर टीका करायची अथवा कोणा एकाची तळी उचलून धरायची म्हणून लेखन करत नाहीत.
इथे सरळ सरळ पोस्ट केली तर दोन्ही बाजूची मंडळी त्या पोस्ट वर येतातच. अगदी बाह्या सरसावून वाद घालतात. अपशब्द वापरतात. लहान मोठे हा भेद विसरतात. कशासाठी हे सगळे?
या सगळ्यापासून मुक्त व्हावे म्हणून मी इथे पोस्ट न करता माझ्या ब्लॉगवर पोस्ट करायचे ठरवले. माझ्या रसिक वाचकांना तशी सूचना देणारी पोस्ट केली. ब्लॉगवर पोस्ट करायचे आणि इथे त्या पोस्टचा सारांश देवून लिंक द्यायची असे ठरवले.
परावा तेजो महालय विषयी एक पोस्ट लिहिली तर फार थोड्या मंडळींनी ती पोस्ट वाचली.
माझ्या पोस्टचे काही वाचक असे आहेत की ते उद्या माझे एखादे पुस्तक प्रकाशित झाले तरी त्याच्या पाच दहा प्रती विकत घेवुन स्वतः वाचतील आणि मित्रांना ते पुस्तक भेट देवून त्या मित्रांना वाचायला सांगतील. या विषयी माझ्या मनात शंका नाही.
परंतु मी इथे ज्या नियमित पोस्ट करतो त्यावर जशी गर्दी होते तशी गर्दी कालच्या पोस्ट वर झाली नाही. हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. लाईक कॉमेंट हा विषय गौण आहे. विषय वाचकांपर्यंत पोहचणे महत्वाचे आहे. माध्यम याला काहीही महत्व नाही.
शिवाय काल अनेकांनी फोन करून तुमच्या ब्लॉग वर जाण्याची तसदी का देताय? इथेच नेहमीप्रमाणे पोस्ट करा ना असे सांगितले. काही जणांनी मेसेज सुध्दा केले. त्यामुळे मला निर्णय बदलावा लागेल असे दिसते. परंतु तो एवढ्या घाईघाईने बदलणार नाही. बघू या.
परंतु विषय कोणताही असो रसिकांनी तो आत्मीयतेने वाचला, अभ्यासू वृत्तीने त्यावर अभिप्राय दिला तर आनंद वाटतो. सामाजिक विषयांवर लिहिले तर वाचक तिकडे पाठ फिरवतात असे दिसून येते. पण त्यातून वैचारिक जडणघडण होत नसते हे लक्षात घ्यायला हवे.
मराठी भाषा दीन आला म्हणून त्याविषयी पोस्ट केली. कुठे बलात्कार झाला, महिलेचे जळीतकांड झाले त्याविषयी लिहिले की आमची जबाबदारी संपत नाही. त्यामुळे मोदी समर्थक असोत की मोदी विरोधक त्यांनी कोणत्याही लेखनाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे असे माझे मत आहे.
शरद पवार अनेक विधाने करतात ते केवळ जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी. मुस्लिम, दलित आणि बहुजन मतांच्या बेरजेचे राजकारण करून त्यांनी राजकारण केले. राजकीय घडी बसवली. परवा सुद्धा त्यांनी असेच 'सरकार राम मंदिरासाठी ट्रस्ट निर्माण करते तर मशिदीसाठी ट्रस्ट निर्माण का करत नाही' असे विधान केले. असे विधान करताना आपल्याला मुस्लिम मतपेढीचे पाठबळ मिळेल याची तजवीज केली. पुढील काळात सुद्धा ते अशीच विधाने करत राहतील. मुस्लिम समाजाला पूरक विधाने करताना हिंदू मतांचा आधार कमी होईल अशी भीती पवारांना वाटत नाही. कारण हिंदूंमधील जाती जातींमध्ये पाचर ठोकून मी ती मते हवी तशी फिरवू शकतो असा त्यांना विश्वास वाटतो. शरद पवारांनी जनतेच्या कल्याणासाठी एखादी धर्मदाय संस्था चालविली आहे असे कोणी सांगू शकेल काय?
शरद पवारांच्या, राहुल गांधींच्या अथवा तमाम मोदी विरोधकांच्या विरोधात लिहिणे असा माझा हेतू मुळीच नसतो. त्यामुळेच वाचकांनी माझ्या ब्लॉगवर जाऊन पोस्ट वाचल्यास अधिक योग्य होईल.
खरंय. आजपर्यंत पवारांचे राजकारण ही हिंदूंची आणि महाराष्ट्राची एक सरळसरळ फसवणूक आहे. पवारांनी आजपर्यंत सकारात्मक राजकारण केलेच नाही. सगळे राजकारण टवाळखोरी आणि इतरांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात खर्च झाले.
ReplyDeleteआणि तरीही त्यांच्याविषयी आदर भाव असणारे आहेत. हे केवढे वाईट.
Delete