Saturday 13 March 2021

बॉम्बे बेगम आणि अयोध्येचा रावण

नेटफलिक्स वर बॉम्बे बेगम वेब सिरीज आहे. त्या विषयी आणि त्यातील भगवत गीतेचा आधार घेवून लिहिलेल्या संवादा विषयी जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु आज नव्हे कला क्षेत्रात अनेक वर्षापासून हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू चालीरीती , हिंदू रीतिरिवाज याच्या विरोधात लिहिले की तशा लेखकाचा सन्मान केला जातो. त्यालाच पुरस्कार दिले जातात. तशा साहित्यकृतीला, कलाकृतीला पुरस्कार मिळाला म्हणून इतर लेखक त्याच प्रकारचे लेखन करायला बाह्या मागे सारतात. 

काल असाच यू ट्यूब वर मान्यवर साहित्यिकांचा परिसंवाद ऐकला. त्यांच्या मते मृत्युंजय, राधेय या कलाकृती वाचक मान्य असतील परंतु त्यांचे साहित्यिक मूल्य फार उंचीचे नाही. असे सांगत असताना अलीकडच्या काळात लिहिली गेलेली अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम या शीर्षकाची कादंबरी आदर्श ठरविली गेली आहे. असे काही उलट सुलट लिहिले की समीक्षक आपल्या साहित्याची दखल घेतातच. असे लेखकांना कलावंतांना वाटते. 

मला एक कळत नाही हे सगळे साहित्यिक रामायण लिहिणाऱ्या महर्षी वाल्मिकिपेक्षा आणि महाभारत लिहिणाऱ्या महर्षी व्यासांपेक्षा स्वताला श्रेष्ठ समजतात काय? 

वि स खांडेकरांनी ययाती लिहिली. या कादंबरीला ज्ञानपीठ हा सन्मान मिळाला आहे. ययातीच्या लेखनासाठी वि स खांडेकरांना ज्ञानपीठ मिळावा असे ययाती मध्ये कोणते ज्ञानाचे भांडार आहे? समजा कोणता संसंस्कृत संदेश ती कादंबरी देते? असे प्रश्न माझी तमोहरा कादंबरी बुक करणाऱ्या आठवी शिकलेल्या एका प्रौढ वाचकाने व्यक्त केले होते.

परंतु पुरस्कार ठरविणारी मंडळी अशाच विचारधारेची आहेत. लेखन समाजावर कोणता संस्कार करते याचा ते कधीही विचार करत नाहीत.

मध्ये एकता कपूरने तिच्या बेगुसराय वेब सिरीज सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या अर्धांगिनी विषयी शींतोडे उडविले होतेच. त्या वेब सिरिजचे पुढे काय झाले माहीत नाही. परंतु अलीकडे बहुतेक लेखक असेच चित्रण करण्यात व्यस्त आहेत. स्त्री स्वातंत्र्य, स्त्री शोषण असे विषय हाताळत आहोत असे दाखवत स्त्रीच्या गुप्तांगांचा उल्लेख करताना त्यांच्या लेखणीला अजिबात शरम वाटत नाही. अशा प्रकारचे अभ्यासक्रमातील साहित्य नाकारणे, त्याची होळी करणे ही सामाजिक गरज झाली आहे. असे केले तरच समाज नासवणारी आणि स्वताला साहित्यिक विचारवंत म्हणवणारी ही जात लयाला जाईल. अन्यथा ही जात अशीच आमची संस्कृती नासवत राहील.

1 comment:

  1. चांगले लीहणारे मला वाटते कमी आहेत.तुम्ही घेतलेला वसा टाकू नका.

    ReplyDelete