Saturday, 13 March 2021

आठ दिवसात कोंबडीला पिल्लं सुध्दा होत नाही.

दोन दिवसावर आलेल्या एमपीएससी परीक्षा आज मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या. आणि पुन्हा आठ दिवसात परीक्षा घेण्याचे वचन दिले. त्या वाचनाचा भरोसा काय? आठ दिवसांनी कोरोना ची परिस्थिती आणखी गंभीर झाली तर काय करणार आहात? की तेव्हा, तेव्हा पुन्हा फेसबुक लाईव्ह घेवून कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर झाल्यामुळे मी माझे वचन पाळू शकत नाही. असे म्हणणार आहात?

मुळात तुम्ही गेल्या वर्षभरात कोणते निर्णय योग्य रीतीने घेतले? सुशांतसिंग हत्येच्या तपासासाठी आलेल्या पथकाची अडवणूक केलीत. कंगना चे ऑफिस पाडण्यासाठी जीवाचे रान केले. वाझे रक्षण करण्यासाठी आत गेलेली छाती पुढे काढून विरोधकांच्या गोळ्या झेलल्या. सर्वात आधी दारूचे गुत्ते सुरू करण्यासाठी धाव घेतली.

गेल्या जुलै महिन्यापासून तुम्ही शाळा सुरू करण्यासाठी धडपड करत होतात. पण जानेवारी उलटून गेला तरी ते तुम्हाला जमले नाही. त्यातून आठ दिवसापूर्वी शाळा सुरू केल्या. आणि चार दिवसात पुन्हा बंद कराव्या लागल्या. वास्तवात माझ्यासारखी अनेक सामान्य माणसे अगदी सुरुवातीपासून पहिले ते आठवी पर्यंतच्या मुलांना सरळ पुढील वर्गात घालावे. नववी, दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू करावेत. पण निर्णय कोण घेणार?

तुम्ही अधिवेशन घेताय. तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेताय. त्याचा जल्लोष साजरा करताय. मग या मुलांच्या परीक्षा घेवून टाकायला हव्या होत्या ना. जे येतील ते येतील. जे नाही येणार ते पुढल्या परीक्षेला बसतील. परंतु तुमची कुवत केवळ स्थगिती देण्याची. जनहिताचे निर्णय घेण्याची तुमची तयारी नाही. आठ दिवसांनी परीक्षा घेणार म्हणे. आठ दिवसांनी काय होणार आहे? आठ दिवसात तर कोंबडीला पिल्ले देखील होत नाही.

तुम्ही निर्णय घेतला. सांगून मोकळे झाले. परंतु दोन दिवसावर आलेल्या परीक्षेसाठी केंद्र परिसरात येवून राहिलेल्या विद्यार्थ्यांनी काय करायचे? तुम्ही सांगितले घरी जा मी घरी जायचे. तुम्ही सांगितले या की परत यायचे. एवढेच करायचे का? आता काय बाळासाहेब पुढे आले. आणि म्हणतात, यात एमपीएससी परीक्षकांचा दोष आहे. किती दिवस दुसऱ्यांच्या डोक्यावर खापर फोडत राहणार आहात.

No comments:

Post a Comment