निवडणुका झाल्या. मतमोजणी झाली. आवाजी मतदानानं का असेना पण भाजपा सरकार सत्तेवर आलं. खूप गदारोळ मजला. कोण सरकारच्या बाजुने आणि कोण विरोधात हे कळायला मार्ग नव्हता. खरंच भाजपानं दिल्ली विधानसभेच्या निवडणुकात स्पष्ट बहुमत मिळालं नाही तेव्हा सरकार स्थापन न करण्याची जी भुमिका महाराष्ट्रातही घेतली होती तीच घेतली असती तर बरे झाले असते.पण
दिल्लीतली परिस्थिती वेगळी होती. तिथं भाजपाला कोणी मित्रं नव्हता. महाराष्ट्रात मात्र शिवसेनेसारखा पंचवीस वर्षाचा जुना मित्रं होता. तो सोबत करेल अशी भाजपाला आशा होती. पण त्या मित्रालाही फक्त आपला स्वार्थ दिसत होता. महाराष्ट्रातल्या जनतेची त्यांना काहीच कदर नव्हती. त्यामुळेच मित्रानेच वैरयासारखी विखारी भूमिका घेतली. सहाजिकच भाजपावर आजची परिस्थिती ओढवली. पण खरंच भाजपानं ' शिवसेना बिनशर्त सोबत करणार असेल तरच आम्ही सरकार स्थापन करू. ' अशी भुमिका घेतली असती तर बरे झाले असते.
दिल्लीतली परिस्थिती वेगळी होती. तिथं भाजपाला कोणी मित्रं नव्हता. महाराष्ट्रात मात्र शिवसेनेसारखा पंचवीस वर्षाचा जुना मित्रं होता. तो सोबत करेल अशी भाजपाला आशा होती. पण त्या मित्रालाही फक्त आपला स्वार्थ दिसत होता. महाराष्ट्रातल्या जनतेची त्यांना काहीच कदर नव्हती. त्यामुळेच मित्रानेच वैरयासारखी विखारी भूमिका घेतली. सहाजिकच भाजपावर आजची परिस्थिती ओढवली. पण खरंच भाजपानं ' शिवसेना बिनशर्त सोबत करणार असेल तरच आम्ही सरकार स्थापन करू. ' अशी भुमिका घेतली असती तर बरे झाले असते.
भाजपानं अशी भूमिका घेतली असती तर आज एकेकाळच्या मित्रपक्षासह सारेच जो आरडाओरडा करताहेत तो कुणाला करता आला नसता. दुसऱ्या कुणीही सरकार स्थापन केलं असतं तर त्यांची अवस्था केजरीवाल सरकार सारखीच झाली असती. पण झालं ते झालं. शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आपल्यासोबत येईल अशी भाजपाला आशा होती. आजही आहे. पण शिवसेनेने सुरवातीपासुन ते आजतागायत अर्धवट भूमिका घेतली. त्यामुळे नुकसान कुणाचं झालं हे येणारा काळच सांगेल.
निवडणुका जाहीर झाल्यापासुन ते परवा बाळासाहेबांच्या स्मृती दिनापर्यंत भाजपानं शिवसेनेवर कधीही टीका केली नाही. हा त्या पक्षाचा संस्कार किंवा हि त्या पक्षाची रणनीती म्हणलं तरी चालेल. पण शिवसेनेकडे कोणताही संस्कार अथवा कोणतीही रणनीती नसल्याचं प्रत्येक क्षणाला दिसुन आलं. मिशन १५१ प्लस जाहीर करून केवळ ६३ आमदार निवडून आणले. उमेद्वार जाहीर करण्याच्या अंतिम टप्प्यात राज ठाकरेंची शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा होती. तिथं उद्धव ठाकरेंनी त्यांना जवळ केलं नाही. मतमोजणी पार पडल्यानंतर स्वाभिमानाच्या नावाखाली सतत आडमुठी भूमिका घेतली. मी माझ्या ' उद्धवा आता तरी शहाणा हो ! ' या लेखात ' अजुनही वेळ गेलेली नाही. अगदी या क्षणी शिवसेनेने भाजपाला बिनशर्त पाठींबा
दयावा. कोणत्याही पदावर हक्क सांगू नये. भाजपानं दिलं तरी कोणतही पद घेऊ
नये. पाच वर्ष भाजपाला निर्विघ्नपणे सरकार चालवू द्यावं. शिवसेनेने या
क्षणी हा पावित्रा घेतला तर गोची भाजपाची होईल. आणि जनमानसातली शिवसेनेची
आणि उद्धव ठाकरेंची प्रतिमा उंचावेल. महाराष्ट्राची सहानभूती मिळेल.' असे मत व्यक्त केले होते. पण असा विचार करण्यासाठी जे बौद्धिक अधिष्ठान लागतं ते शिवसेनेच्या एकाही नेत्याकडे नाही. त्याला कोणीच काही करू शकत नाही.
अगदी परवा बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे पोहचताच शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. मी असं म्हणणार नाही कि या घोषणा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून दिल्या. त्याहीपेक्षा , ' मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध घोषणा द्या.' असे उद्धव ठाकरे मुळीच सांगणार नाहीत असा मला विश्वास आहे. पण उद्धव स्वतःच भाजपावर मनमानी टीका करीत असल्यामुळे शिवसैनिकांना जोर येणारच. कारण मराठीत म्हणच आहे, " खाण तशी माती. " काही महिन्यापुर्वी आपल्या मित्रपक्षाविरुद्ध आगपाखड करताना उद्धव ठाकरेंनी कधीच विचार केला नाही. मग मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देताना शिवसैनिक कशाला विचार करतील. उलट आपण भाजपावर टीका केली तर शिवसैनिकांना स्फुरण चढेल असा विचार उद्धव ठाकरे करायचे तर आपण भाजपा सरकारला आणि नेत्यांना शिव्या घातल्या कि साहेब आपल्याला मांडीवर घेतील असा विचार शिवसैनिक करतात.
त्यामुळेच बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी मुख्यमंत्र्यांनी , ' राज्यशासन बाळासाहेबांच भव्य स्मारक उभारेल. ' असं जाहीर करताच.' बाळासाहेबांच स्मारक उभारायला शिवसेना समर्थ आहे. त्यासाठी आम्हाला कुणाची गरज नाही. ' असं विधान एकनाथ शिंदे करतात. कारण बाकी काही न करता उद्धव ठाकरेंच्या मनातली आपली प्रतिमा अधिक मोठी करण्याचा तोच एक सर्वोत्तम मार्ग आहे याची जाणीव एकनाथ शिंदेना आहे. संजय राउत नेहमीच उद्धव ठाकरेंवर शाब्दिक छत्र्या धरण्याचं काम करतात. भाजपाला भांडी घासायला लावण्याची भाषा करतात ते त्यासाठीच. एवढीच धमक आहे ना शिवसैनिकांमध्ये ? जा ना पाकिस्तानात……. बांधा ना दाउदच्या मुसक्या. परवा ओवैसी आला होता नगरला………… का नाही एकही शिवसैनिक आडवा गेला त्याला.
आम्ही फक्त इथं दंड थोपटणार………. मुंबईत बसुन. आमचे स्वार्थ साधले गेले नाहीत म्हणुन आम्ही आमच्याच माणसावर चिखल फेकणार. हिंदुत्वाची लक्तरं व्हायला हिंदुच कारणीभूत आहेत. कसे ते मी माझ्या ' एमआयएमचा विजय आणि हिंदुत्वाचा पराभव ' या लेखात स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रत्येकानं जागं व्हायला हवं. ती काळाची गरज आहे.
पण शिवसेनेच्या अशा बिनबुडाच्या विधानांमुळे भाजपा शिवसेनेतली दरी अधिक रुंदावतेय याची जाणीव ना उद्धवरावांना आहे आणि ना त्यांच्या कार्यकर्त्यांना.
पण शिवसेनेच्या या अशा कितीही कुरवाळली तरी वाकडया रहाणाऱ्या शेपटाचा त्रास शिवसेनेलाच अधिक होणार आहे हे नक्की.
शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार कोणते ?
ReplyDeleteडिसेंबर २०१३ कापुस ५०००
डिसेंबर२०१४ कापुस ३९५०
आता सांगा चांगले दिवस कुणाचे आले
शेतकऱ्यांचे !
शरदचंद्र पवार,
ReplyDeleteगाव 12 मती.....
जन्म तारीख 12/12.....
BJP शी दोस्ती 12 तारीख. ....
.
.
.
.
.
.
.
.
.BJP che 12 वाजवूनच शांत बसेल.
आपण चुकीची माहिती पुरवताय. २०१३ ला ज्या शेतकऱ्याचा कापूस ५०००रुपये क्विंटलने विकला गेलाय अशा एका शेतकऱ्याची पट्टी आपण फेसबुकवर लोड करावी. आणि आपण सांगत असाल तर २०१३ ला ३२०० रुपये क्विंटलने कापूस विकला अशा ध पट्ट्या मी फेसबुकला लोड करीन.
ReplyDeleteमित्रा काय होईल ते येणारा काळच सांगेल.
ReplyDeleteतुम्ही शिवसेने ला कुत्रा म्हणताय आओ भाजप संपल्याने आपले काही नुकसान होणार नाही पण शिवसेने मुले नक्कीच होणार आणि का म्हणून शिवसेनेने फुकट पाठींबा द्यावा मी म्हणेन शिवसेने ने ह्यांना पाठींबा देऊ नको
ReplyDeleteयोगेश अभिप्रायाबद्दल धन्यवाद. व्यंग चित्रांचे अर्थ असे एवढे सरळ घेवू नयेत. शिवसेना भाजपा ने एकत्र यायचे कि नाही हे तुमच्या आणि माझ्याही हातात नाही. गेली साठ वर्ष शिवसेनेच्या हातात सत्ता नाही. त्यामुळे काय नुकसान झाले ? आणि वाजपेयींच्या काळात महाराष्ट्राचे काय नुकसान झाले. आपण केवळ महाराष्ट्रच अविचार करणार आहोत संपूर्ण देशाचा ? इंग्रजांच्या तावडीतुन देश सोडवला तेव्हा होती का शिवसेना ? स्थानिक पक्ष स्थानिक मुद्द्यांच भांडवल करून त्यांचा स्वार्थ साधतात हे जनतेला कधीच कळणार नाही का ? स्थानिक पक्षांमुळे देशाचं राजकारण अस्थिर होतं आहे हे आपल्याला कधी कळणार ? युपीए काळात झालेल्या टुजी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा व्हायला हे स्थानिक पक्षच जबाबदार आहेत. एकट्या काँग्रेसचे सरकार केंद्रात सत्तेत असते तर कदाचित हे घोटाळे झालेही नसते.
ReplyDeletei think vijay is bjp pravakta....
ReplyDeletethats why he wrote good things regarding bjp
मित्रा, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाही. ५५ वर्षाहून अधिक काळ या देशावर राज्य करून काँग्रेस राजवटीन भ्रष्टाचाराचा भस्मासुर उभा केला. आज भाजपाच्या रुपानं एक समर्थ पर्याय उभा राहिला आहे असे दिसते. ते लोकांपर्यंत पोहचवून जनमत तयार करणं हा माझा हेतु. पाच वर्षात भाजपानं काही साधलं नाही तर मी भाजपावर टीका करायला मागे पुढे पहाणार नाही.
ReplyDeleteतुमचे लिखाण बीजेपी धारण आहे असे नाही वाटत तुम्हाला????????
ReplyDeleteमित्रा अभिप्रायाबद्दल आभार. लिखाण बीजेपी धार्जिणे आहे असे आपण म्हणालात तरी हरकत नाही. मला आज तरी भाजपाचे काही चुकतेय असे वाटत नाही. आणि जेव्हा भाजपा चुकतेय असे मला वाटेल तेव्हा निश्चित मी त्यावर टीका करेन. पण शिवसेनेने राष्ट्रहिताचे, मैत्रीहिताचे आणि जनहिताचे कोणते निर्णय घेतलेत ते आपण सांगा. एकही पद न घेता भाजपाला पाठींबा घेऊन सगळ्यांनाच धक्का देत आला नसता का ? बहुमतासाठी केवळ २० आमदार कमी पडत असताना भाजपाने शिवसेनेला १० मंत्रिपदे ( शिवसेनेच्या दोन आमदारांमागे एक या प्रमाणात ) का दयावित ? मुळात महाराष्ट्रातली जनता शहाणी नाही असे माझे ठाम मत होऊ लागले आहे. कारण इतर सर्व राजे कोणत्यातरी एकाच पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन मिरवत असताना आम्ही मात्र राष्ट्रवादी , काँग्रेस , शिवसेना , भाजपा , मनसे , अशा डझनभर पक्षांचे झेंडे खांद्यावर घेवून फिरणार. दया ना शिवसेनेच्या हातात सत्ता. मला मुळीच दुख होणार नाही. पण देशात असो अस्थ्वा राज्यात एकच पक्षाचं सरकार हवं. तरच प्रगती होईल अन्यथा सगळेच या देशाचे लचके तोडायला बसले आहेतच.
ReplyDelete