Wednesday, 11 November 2015

दिवा म्हणजे नेमकं काय ?


अनेकांना अनेकांकडून दिवाळीच्या खुप शुभेच्छा आल्या असतील. त्याचा फार मोठा ढीग झाला असेल. त्यात आणखी भर. कोण आणि कशा शोधणार त्या ढिगातून माझ्या शुभेच्छा. कोण वाचणार हि पोस्ट ? कशासाठी वाचणार ? पण हि पोस्ट वाचायलाच हवी मित्रांनो. कारण
या नुसत्या शुभेच्छा नाहीत या आहेत माझ्या अस्तित्वाच्या खुणा आणि तुमच्या प्रती माझ्या मनात असलेल्या प्रेमाची पावती. 

मी पहातोय गेली दोन दिवस माझ्या ब्लॉगवर दिवाळीच्या संदर्भातील पोस्टचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती केवळ मी मागील दिवाळीला लिहिलेली ' दिवाळी माझ्या बैलाची ' हि एकमेव पोस्ट लागली. 

दिवाळी परवाच सुरु झालीय. पण मी आज गावाहून आलोय. माझ्या जवळजवळ ३२ हजारहून अधिक वाचकांना शुभेच्छा द्यायलाच हव्यात याची जाणीवही  होती मला. पण माझ्या पोस्टमधली संदर्भचित्रं जरी मी इंतरनेटवरून घेत असलो तरी ओळी मात्र माझ्याच असतात. घरी आलो. फ्रेश झालो. ओळींची जुळवाजुळव करू लागलो. हो ! जुळवाजुळवंच. या ओळींना मी कविता म्हणणार नाही. हि जुळवाजुळवंच. कारण या ओळी अशा मनाच्या आतून आलेल्या नसतात. म्हणजे यातल्या शुभेच्छा सुद्धा मनापासून नसाव्यात असा गैरसमज मात्र करून घेवू नका हं !

ओळी मनातून आलेल्या नसल्या तरी शुभेच्छा मात्र खूप खूप मनातून ……… खूप खूप मनापासून !!!!!!!


No comments:

Post a Comment