काल गावाहून आलो. अनेकांनी मकरसंक्रांती संबंधित काहीतरी मिळेल या अपेक्षेने माझ्या ब्लॉगला भेट दिली होती. नवं काहीतरी द्यावं या हेतूनं बसलो. इकडून तिकडून थोडी माहिती गोळा केली. मनातल्या मनात काही ओळी आकाराला आल्या. एक भेटकार्ड तयार करून त्या त्यावर उतरवल्या. ते भेटकार्ड तुम्हाला मनापासून आवडेल अशी आशा आहे.
या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Friday, 15 January 2016
Wednesday, 6 January 2016
Sunday, 3 January 2016
श्रीपाल सबनीस हे कसले साहित्यिक ?
गुरूंची परंपरा द्रोणाचार्यांपासून साने गुरुजींपर्यंत आणि चौथीच्या पायजमा, सदरा, टोपी या पेहरावातल्या पण आम्हाला हाताला धरून लिहायला शिकविणाऱ्या धुमाळ गुरुजींपासुन अकरावी बारावीला नुसतंच डिकटेशन न देता आमच्या वहीत असणारा शब्द न शब्द फळ्यावर उतरवणारे देशमुख गुरुजी अशी प्रदीर्घ आहे. पण स्वतःला शिक्षक म्हणवणारे श्रीपाल सबनीस पाहिले आणि असाही शिक्षक असतो हे पाहून अचंबित झालो.
Subscribe to:
Posts (Atom)