गुरूंची परंपरा द्रोणाचार्यांपासून साने गुरुजींपर्यंत आणि चौथीच्या पायजमा, सदरा, टोपी या पेहरावातल्या पण आम्हाला हाताला धरून लिहायला शिकविणाऱ्या धुमाळ गुरुजींपासुन अकरावी बारावीला नुसतंच डिकटेशन न देता आमच्या वहीत असणारा शब्द न शब्द फळ्यावर उतरवणारे देशमुख गुरुजी अशी प्रदीर्घ आहे. पण स्वतःला शिक्षक म्हणवणारे श्रीपाल सबनीस पाहिले आणि असाही शिक्षक असतो हे पाहून अचंबित झालो.
साहित्य संमेलन कुणासाठी आणि कशासाठी ? हा माझ्यादृष्टीने फार मोठा प्रश्न आहे. साहित्य महमंडळ नि आखिल भारतीय साहित्य परिषद काय करते ? हा संशोधनाचा विषय आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आजवर लाभलेल्या साहित्यिकांनी वर्तमान पत्रांना, आणि इतर प्रसिद्धी माध्यमांना तसेच साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून भाषण देण्या व्यतिरिक्त काय केले हा उत्खननाचा विषय आहे. गर्दी खेचण्यासाठी अमिताभ सारख्या चंदेरी दुनियेतल्या भूल भूल्लैयाला निमंत्रित करावे लागते हे साहित्याचे आणि साहित्य परंपरेचे अपयशच नव्हे काय ? स्वर्गीय मंगेश पाडगावकरांसारखा जातिवंत साहित्यिक या असल्या थेरांपासून दुर रहातो ते उगाच नव्हे. तरीही दरवर्षी साहित्या संमेलन भरते आणि त्यावर करोडो रुपये खर्च होतात.
नेहमीप्रमाणे याही वर्षी साहित्य संमेलन भरणार आहे. अध्यक्षीय निवडणुका पार पडल्या आणि विठ्ठल वाघांसारख्या कवीला मागे सारत श्रीपाल सबनीस संमेलनाच्या अध्यक्षपदी आरूढ झाले. एक साहित्यिक असुनही मी साहित्य संमेलनाची आणि त्या संदर्भातील घडामोडींची फारशी दखल घेत नाही. कारण त्याची दखल घेण्यासारखं त्यात काही नसतं याचा अनुभव मी पुण्यात पार पडलेल्या दोन्ही संमेलनाच्या वेळी चांगलाच घेतला आहे. त्यामुळे श्रीपाल सबनीस साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले याची मला विशेष दखल घ्यावीशी वाटली नाही. कारण तसे माझे वाचन बऱ्यापैकी आहे आणि तरीही श्रीपाल सबनीस नावाचे हे साहित्यिक माझ्या परिचयाचे नव्हते.
पण परवा ते जे काही बरळले त्या नंतर या गृहस्थांची माहिती घ्यावी असे मला वाटले. विकिपीडिया शोध घेतला पण तिथं त्यांचं नाव सापडलं नाही. गुगल गुरुंनाही त्यांच्या साहित्य परंपरेची माहिती नव्हती. खूप शोध घेतला तेव्हा ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्या अनुषंगाने सकाळने दिलेल्या एका बातमीत मला त्यांची साहित्य संपदा सापडली. तेव्हा माझ्या लक्षात आलं हे गृहस्थ साहित्य साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष झाले नसते आणि परवा मोदींच्या संदर्भात नको ते बरळले नसते तर पुढच्या शंभर वर्षातही श्रीपाल सबनीस नावचे कोणी साहित्यिक होते हे समान्य माणसाला कळाले नसते.
त्यांच्या वक्तव्य मी नीट ऐकलंय. स्वतःला शिक्षक म्हणवणारे हे गृहस्थ. पण आपल्या देशाच्या पंतप्रधानाचा आदरार्थी उल्लेख करावा हे हि यांना कळू नये. त्यांच्या भाषा आणि बोलण्याची शैली पाहिल्या नंतर या माणसाने कसे विद्यार्थी घडवले असतील असा फार मोठा प्रश्न पडला.
आनंद यादव यांच्या सारख्या तनामनाने साहित्यिक असलेल्या लेखकाला लोकांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष्य म्हणुन साहित्य संमेलनाची पायरी चढू दिली नव्हती. त्यांचा खर तर काहीच अपराध नव्हता. पण श्रीपाल सबनीसांचा अपराध अक्षम्य आहे. त्यांना तर खरेच अध्यक्ष पदाच्या खुर्चीपासून दुर ठेवायलाच पाहिजे .
कसे आहे मोदी वर टीका केली कि लोकांना प्रसद्धि मिळते म्हणून आज काल कोणी पण मोदींवर टीका करत असतो …
ReplyDeleteश्रीपाद सबनीस यांना कोणीच इतके दिवस ओळखत नव्हते किवा उद्या मराठी संमेलन झाले असते तरी त्यांना कोणी ओळखले नसते । मुद्दामून त्यांनी मोदींवर टीका केली आणि प्रसिद्धी मिळवली …. ठीक आहे तुम्ही टीका करा मोदींवर पण एकेरी शब्दांमध्ये कशाला करता ??
टीका करयची पण एका पद्धत असते । आणि परत बोलतात कि आमची भाषाच अशी आहे । . अहो तुम्ही मराठी साहित्य सामेलांचे अध्यक्ष आणि असली भाषा ???
खरे आहे सुजीतजी. मझी भाषाच अशी आंहे असे म्हणण्याचा त्यांना काहीच हक्क नाही.
Deleteते "श्रीपाल सबनीस" आहेत, "श्रीपाद" नव्हे!
ReplyDeleteदुसरं म्हणजे, खरंच त्यांचा ताळतंत्र सुटला आहे. मोदीजींवर एकेरी टिका करण्याचा यांना कुणी अधिकार दिला..? काय संबंध यांचा....? त्यांना पदच्युत करायला पाहीजे.
कुणीही ऐरागैरा उठतो आणि देशाच्या पंतप्रधानांवर , तेही अतिशय सक्षम आणि प्रभावी पंतप्रधानांवर टीका करतो हे विचार-अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे तर बेताल बडबड आहे.
आभार. खूप दिवसांनी मझ्या ब्लॉगला भेट दिलीत. आपण सुचविल्याप्रमाणे दुरुस्ती केली आहे.
Delete